Gold Rate Today सध्या संपूर्ण देशात लग्नाचा सिझन सुरू आहे. जवळपास प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या घरात लग्न होतंय आणि आपल्या भारतात लग्न म्हटलं की, सर्वात मोठी खरेदी असते सोन्याच्या दागिन्यांची. लग्न होणारं कुटुंब कितीही गरीब असलं किंवा कितीही श्रीमंत असलं, तरीही ते आपल्या ऐपतीप्रमाणे सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतातचं.
Gold Rate Today
तसंच 10 मे रोजी अक्षय तृतीया हा सणही साजरा केला जाईल आणि या दिवशीही सोनं विकत घेण्याची परंपरा आहे. सोनं विकत घेणं खूप शुभ मानलं जातं. या सर्व गोष्टींमुळे सोन्याच्या दरांमध्ये चांगलीचं तेजी निर्माण झालीये.
जवळपास महिन्याभरापूर्वी 1 एप्रिलच्या आसपास ज्या सोन्याचा दर 70000 रुपये प्रति तोळा होता तो आता 75 हजार रुपयांच्या आसपास आहे.
या एप्रिल महिन्यातचं सोन्याच्या दराने (Gold Rate Today) उच्चांकी 75 हजार रुपयांचा टप्पा गाठला होता. परंतु आता हे दर थोडेसे उतरलेत आणि ७४५०० रुपयांच्या आसपास आहेत.
सोन्याच्या दरात मोठी घसरण
तसं तर विविध शहरांमध्ये सोन्याचे भाव वेगवेगळे असतात आणि तुम्हाला सोनं ज्या पद्धतीने खरेदी करायचंय, म्हणजेचं घट असलेले दागिने किंवा घट नसलेलं सोनं त्यानुसारही सोन्याच्या किमती कमी जास्त होतात. ज्या दुकानातून तुम्ही सोनं विकत घेत आहात, त्यांचे मेकिंग चार्जसुद्धा असतात.
भारतात सोन्याला अनन्य साधारण महत्त्व आहे आणि एका अंदाजानुसार आपल्या देशात इतकं सोनं आहे, जितकं जगातील 8 मोठ्या बँकांकडेही नाहीये. दरवर्षी भारतात हजारो टन सोन्याची आयात केली जाते.
जसा आपल्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा मोठ्या प्रमाणात खप होतो. परंतु देशात पेट्रोल आणि डिझेलच्या खाणी नसल्यामुळे उत्पादन कमी आहे. तसंच सोन्या आणि चांदीचाही आपल्या देशात मोठ्या प्रमाणात खप होतो. परंतु सोने आणि चांदीचे उत्पादन देशात खूप कमी होतं.
आपल्या देशात सोन्याच्या खाणी कुठे आहेत ?
त्याबद्दलही आम्ही एक माहितीपर लेख लिहिला आहे. तुम्ही हा लेख या लिंकवर क्लिक करून नक्की वाचू शकता.
तसंच अनेकांच्या मनात हाही प्रश्न असतो की, सोन्याचे दर कोण ठरवतं ? (Gold Rate Today) भारत सरकार किंवा इतर एखाद्या देशाचं सरकार ठरवतं का ? तर त्याबद्दलसुद्धा आम्ही माहिती एका लेखात दिली आहे. तो लेख तुम्ही या लिंकवर क्लिक करून नक्की वाचू शकता.
तर तुम्ही या वाढलेल्या दरात सोनं खरेदी करताय का ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !