Jui Gadkari Threat On Instagram : जुई गडकरीला फॅनकडून मिळाली तुरुंगात टाकण्याची धमकी

Jui Gadkari Threat On Instagram

Jui Gadkari Threat On Instagram जुई गडकरी ही प्रेक्षकांची खूपच आवडती अभिनेत्री आहे. ती सध्या सायलीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. तिचे असंख्य चाहतेदेखील आहेत. जुई सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या नेहमी संपर्कात राहते. अनेकदा ती इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या फॅन्सबरोबर संवाद साधतानाही दिसते. ती इंस्टाग्रामवर सेशन घेऊन फॅन्सच्या प्रश्नांना उत्तरंदेखील देते. वैयक्तिक आयुष्यासोबतच आपल्या कामाबद्दलही महत्वपूर्ण गोष्टी शेअर करते. फॅन्ससुद्धा तिच्या या प्रयत्नांना उत्तम प्रतिसाद देताना दिसतात आणि तिच्यावर भरभरून प्रेम करतात.

 Jui Gadkari Threat On Instagram 

पण नुकताच जुईला इंस्टाग्रामवर अतिशय धक्कादायक अनुभव आला आहे. जुईला तिची फॅन असल्याचं म्हणणाऱ्या इंस्टाग्राम युजरकडून धमकी मिळाली आहे. या धमकीला जुईने इंस्टाग्राम स्टोरी ठेवून सडेतोड उत्तरसुद्धा दिलं आहे.

Milind Gawali Cricket : अभिनेते मिलिंद गवळी सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेट शिकायचे
https://faktyojana.com/milind-gawali-cricket/

या युजरने मेसेजमध्ये लिहलं आहे की,

‘काय गं तुला खूप माज आलाय का, आम्ही तुला फॉलो करायचं आणि तुला आम्हाला फॉलो करायला काय झालं ? कळत नाही का तुला ? आताच्या आता आम्हाला फॉलो करायचं. सपना पांचाळ, राखी सुतार, करुणा विन्हेरकर, यश विन्हेरकर यांना तू फॉलो कर नाहीतर तुला जेलमध्ये टाकेन. (Jui Gadkari Threat On Instagram) आजपर्यंत तू आमची आवडती होतीस कारण आम्हाला वाटलं की तू फॉलो करशील आम्हाला पण नाही आणि म्हणून मी तुला पोलिसांत टाकेन. मी उद्याच्या उद्या तुझ्या गावाला येते कर्जतला समजलं. कुठेही पळायचं नाही, ओके बाय.’

अशा शब्दांत जुईला इंस्टाग्राम युजरने धमकी दिली आहे. पण जुईनेही या धमकीला योग्य उत्तर दिलं आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीला या धमकीचा स्क्रीनशॉट ठेवलाय आणि लिहलं की हे सहन केल्या जाणार नाही. आधीच सांगते. डायरेक्ट पोलीस स्टेशनला भेटू मग आपण.

अभिनेत्री जुई गडकरीला मिळाली धमकी

यासोबतच जुईने धमकी देणाऱ्या युजरला टॅग करत लिहलं की, @rakhee_sutar झालीस तू फेमस. येच कर्जतला बघतेच मी पण.

जुईने अनेकदा आपल्या फॅन्ससोबत इंस्टाग्रामवरून संवाद साधला असेल पण पहिल्यांदा तिला असा धक्कादायक अनुभव आला आहे. (Jui Gadkari Threat On Instagram) तिनेही हे सगळं सहन न करता अगदी योग्य शब्दांत उत्तर दिलं आहे. आता या बाबतीत पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद !  

Scroll to Top