Milind Gawali Cricket : अभिनेते मिलिंद गवळी सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेट शिकायचे

Milind Gawali Cricket

Milind Gawali Cricket प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी हे आपल्या उत्तम अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमधून उत्तम भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्यांनी ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्धच्या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपलं फॅन बनवलं आहे. पण तुम्हाला माहितेय का ते अभिनयासोबतच क्रिकेट खेळण्यामध्येही मास्टर आहेत.

Milind Gawali Cricket

त्यांनी नुकताच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केलाय त्यामध्ये ते उत्तम क्रिकेट खेळताना दिसताय. त्यांच्या या व्हिडिओची सगळीकडे खूपच चर्चा होतेय. या व्हिडिओसोबत त्यांनी एक पोस्टसुद्धा शेअर केलीय. त्यात त्यांनी (Milind Gawali Cricket) क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि त्यांचे गुरू आचरेकर सरांचादेखील उल्लेख केला आहे. ते नेमके या पोस्टमध्ये काय म्हणाले ते आपण पाहूया.

अभिनेते मिलिंद गवळींनी या पोस्टमध्ये लिहलंय की,

Cricket Fever रविवार सुट्टीचा दिवस.
माझा भाचा शिवम म्हणाला ” मामाजी दर रविवारी आम्ही सगळे मित्र क्रिकेट खेळतो आमच्याबरोबर क्रिकेट खेळणार का ?”
जवळजवळ वीस पंचवीस वर्षानंतर कोणीतरी मला विचारलं ” क्रिकेट
खेळणार का ? “
आज सकाळी एक पुण्यात meeting होती, लगेच मी ती meeting postponed केली,
आणि पहाटे ५.०० वाजता आम्ही रावेत ला निघालो,
६.०० वाजे पर्यंत एक एक शिवम चे मित्र जमा व्हायला लागले,
कोणी वकील तर कोणी businessman, तर कोणी student, पण actor या जमाती मधला मी एकटाच होतो,
कुणी मला मामा म्हणे कोणी मला काका म्हणे, पण त्यांच्यामध्ये एक उंच असा मुलगा होता त्याचं नाव होतं अनिरूद्ध, कोणी ही त्याला हाक मारली की मला उगाचच वाटत होतं की मलाच बोलतायत,
जवळजवळ वीस पंचवीस वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानात उतरलो होतो क्रिकेटची बॅट हातात धरली होती, माझे जुने शिवाजी पार्क मधले दिवस आठवले, असंच रविवारी सकाळी आचरेकर सर कॅच प्रॅक्टिस द्यायचे, कदाचित त्या शाळेमधल्या प्रॅक्टिस मुळेच आज तीन कॅच पकडता आल्या, आमच्या शाळेमध्ये म्हणजे शारदाश्रम विद्यामंदिर दादर मध्ये विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांनी admission घेतल्यानंतर, त्यांची बॅटिंग बघून माझ्या लक्षात आलं होतं की हा खेळ ” अपने बस की बात नही है इतक्या वर्षानंतर आज परत या पोरांना बघून सुद्धा तेच वाटलं की हे ” आज भी अपने बस की बात नही है “

https://faktyojana.com/web-stories/milind-gawali-plays-cricket-with-sachin-tendulkar/

आजकालची मुलं ही खूपच छान खेळतात, turf club च्या जाळ्या इतक्या उंच होत्या तरीसुद्धा सात बॉल हरवले,
या वीस-बावीस मुलांचा मी आभारी आहे कारण मी त्यांच्यापेक्षा वयाने खूपच लहान (Milind Gawali Cricket)असून सुद्धा त्यांनी मला आज खेळायला घेतलं.
या सगळ्यांच्या उज्वल भविष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.

आता फॅन्स त्यांच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. सगळ्यांना अभिनेते मिलिंद गवळींचं क्रिकेट आणि त्यांची ही पोस्ट खूपच आवडलीय.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद.  

Scroll to Top