SBI Share Price आपल्या देशात बँक म्हटलं की स्टेट बँक ऑफ इंडिया हे नाव सर्वात आधी डोळ्यांसमोर येतं. स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक आहे. जगातील टॉप टेन बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचं नाव येतं. भारतातील टॉप 10 कंपन्यांपैकी एक आघाडीची कंपनी म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाला ओळखलं जातं.
स्टेट बॅंकेचे कर्मचारी ग्राहकांना कशी वागणूक देतात, त्याबद्दल सोशल मीडिया तसेच वृत्तपत्रामध्ये तुम्ही ऐकलं असेल, परंतु ही बँक मोठ्या नफ्यात आहे आणि आता गुंतवणूकदारांना सुद्धा मोठा नफा मिळवून देतेय.
SBI Share Price
शेअर बाजारासाठी मागील आठवडा खूप चांगला राहिलाय. निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आणि यामध्ये मोठा वाटा होता भारतातील टॉप 10 कंपन्यांचा. सध्या टॉप टेन कंपन्यांच्या यादीत एसबीआय सातव्या क्रमांकावर आहे आणि एसबीआयचं मार्केट कॅप 7 लाख कोटींपेक्षा जास्त.
SBI च्या गुंतवणूकदारांनी कमावले बक्कळ पैसे
मागील काही वर्षांपूर्वी 300 ते 400 रुपये दरम्यान असलेल्या एसबीआय शेअरची किंमत आता ऑल टाईम हाय आहे. ती 816 रुपये झाली आहे. त्यामुळे एसबीआयच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झालाय.
फक्त मागील आठवड्यातचं एसबीआयमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी 45 हजार करोड रुपयांची कमाई केलीये आणि पुढील काळात एसबीआयच्या शेअरची (SBI Share Price) किंमत आणखीन वाढेल, अशी शक्यताही वर्तवली जातेय आणि लवकरचं हा शेअर एक हजाराचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची ?
एकीकडे एसबीआयच्या शेअरने मोठी उडी घेतलेली असली, तरी मार्केटमधील इतर प्रमुख कंपन्या रिलायन्स आणि टीसीएसच्या शेअरने मात्र गटांगळी खाल्लीये आणि या गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागला आहे.
सध्या मार्केट कॅपनुसार रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्या खालोखाल टाटाच्या टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस या कंपनीचा नंबर लागतो. याव्यतिरिक्त मागील आठवड्यात आयटीसी, एलआयसी आणि इन्फोसिस या कंपन्यांचा मार्केट कॅपही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
एसबीआयच्या शेअर प्राईसमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे आता अनेक गुंतवणूकदार एसबीआयच्या शेअरमध्ये (SBI Share Price) गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. तर तुम्ही या शेअरमध्ये पैसे गुंतवले आहेत का ? नक्कीचं कमेंट करू सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !