Top 5 Water Park In Maharashtra सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याला आणि देशाला उन्हाचा तडाखा सहन करावा लागतोय. उन्हाळा प्रत्येकालाचं असह्य झालाय आणि या उन्हापासून बचाव करण्यासाठी सगळेच काही ना काही तरी शक्कल लढवताय. काहीजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेलेत. परंतु कामाच्या व्यापातून दूरवर थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाणं प्रत्येकाला शक्य होत नाही.
Top 5 Water Park In Maharashtra
बच्चे कंपनीला जरी सुट्टी असली, तरी मोठ्यांना मात्र आठवड्यातून एकचं दिवस सुट्टी मिळते. एकाच दिवसात प्रवास करून कुठे जाणंदेखील शक्य नसतं, त्यामुळे सध्या अनेकजण वाटर पार्कमध्ये एंजॉय करत आहेत. वॉटर पार्कला जाऊन दिवसभर वेगवेगळ्या राईड्समध्ये मस्त एन्जॉय करायचा आणि उष्णतेला पळवायचं हा खूप सोपा ऑप्शन आहे.
भारतात येथे आहेत सोन्याच्या खाणी
जर तुम्हालाही वॉटर पार्कमध्ये जाऊन धमाल करायची असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी पुण्याजवळ असलेल्या पाच सर्वात प्रसिद्ध वॉटर पार्कची (Top 5 Water Park In Maharashtra) माहिती घेऊन आलो आहोत. तर चला सुरू करूया.
1) वेट एन जॉय वॉटर पार्क, लोणावळा : हा वॉटर पार्क फक्त पुण्यातचं नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. संपूर्ण राज्यातून लोक येथे एन्जॉय करण्यासाठी येत असतात. त्यामुळे जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत येथे येण्याचा प्रोग्राम बनवत असाल, तर तुम्ही नक्कीचं खूप एन्जॉय कराल, यात शंका नाही. सध्या येथे एका व्यक्तीचं तिकीट जवळपास 1500 रुपये आहे.
2) डायमंड वॉटर पार्क : वेट अँड जॉय प्रमाणेचं डायमंड वॉटर पार्कसुद्धा खूप प्रसिद्ध आहे. येथील राईडस तर खूपचं एन्जॉयबल आहेत. तुम्ही सुद्धा वाटर पार्कला येण्याचा प्लॅन बनवत असाल, तर हा ऑप्शन तुमच्यासाठी योग्य असेल. येथे एका व्यक्तीचं सरासरी तिकीट जवळपास 1600 रुपये आहे.
3) राजगड वॉटर पार्क : जर तुम्हाला एखादा अफोरडेबल ऑप्शन हवा असेल, तर राजगड वॉटर पार्क तुमच्यासाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो. जवळपास 1000 रुपयांमध्ये येथे तुम्ही दिवसभर विविध राईड्स एन्जॉय करू शकतात.
4) कृष्णाई वॉटर पार्क : अफोरडेबल रेंजमध्ये कृष्णाई वॉटर पार्कसुद्धा तुमच्यासाठी चांगला ऑप्शन आहे. येथील राईड्ससुद्धा खूप एन्जॉयबल आहेत.
5) Santosa वॉटर पार्क : वेट अँड जॉय आणि डायमंड वॉटर पार्कला टक्कर देणारा सेंटोसा वॉटर पार्क तुम्हाला या उन्हाच्या तडक्यापासून नक्कीचं वाचवेल यात शंका नाही.
तर तुम्ही यापैकी कोणत्या वॉटर पार्कमध्ये (Top 5 Water Park In Maharashtra) गेला आहात किंवा जाण्याचा प्लॅन बनवत आहात, नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !