Sun Marathi Kanyadan Serial सन मराठी वाहिनीवर लवकरचं एक जबरदस्त मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 6 मेपासून अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री पल्लवी पाटील यांची ‘आदिशक्ती’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता दाखवली जाईल.
आता सन मराठी चॅनलवर नवीन मालिका सुरू होतेय त्यामुळे या वेळेवर आधीपासून सुरू असलेली ‘कन्यादान’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
Sun Marathi Kanyadan Serial
सन मराठी चॅनलवर 2021 पासून ‘कन्यादान’ ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेत अभिनेता अविनाश नारकर, अनिषा सबनीस, संग्राम साळवी, शुभंकर एकबोटे, अमृता बने, चेतन गुरव, स्मितल हळदणकर हे सर्व कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेची कथा आणि सर्वच पात्रं प्रेक्षकांना खूप आवडतात. चॅनलवरील ही सर्वात लोकप्रिय मालिकासुद्धा आहे.
गेली अडीच वर्षे ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतेय. पण आता नवीन मालिका सुरू होणार असल्यामुळे कन्यादान मालिका बंद होणार आहे. या मालिकेचं शूटिंगदेखील पूर्ण झालं आहे. शूटिंग संपल्यानंतर मालिकेच्या टीमने केक कापून रॅप पार्टी साजरी केली.
सन मराठीची नवीन मालिका आदिशक्ती
‘आदिशक्ती’ ही नवीन मालिका कन्यादान मालिकेची जागा घेणार असल्याची बातमी समजल्यापासून ‘कन्यादान’ मालिकेचे चाहते खूप नाराज झाले आहेत. ही मालिका अनेक प्रेक्षकांची खूपच आवडती आहे. सन मराठीवरील ही सर्वात लोकप्रिय मालिका आहे. अनेकजण ‘कन्यादान’ मालिका बंद न करता तिची वेळ बदलण्याची मागणी करत आहेत. पण चॅनलने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अखेर अडीच वर्षांनंतर ही मालिका आपल्या सर्वांचा निरोप घेतेय.
आता ‘कन्यादान’ (Sun Marathi Kanyadan Serial) मालिकेचे चाहते या मालिकेला नक्कीच खूप मिस करतील. यासोबतच ‘आदिशक्ती’ ही नवीन मालिका कशी असेल त्याबद्दलही प्रेक्षकांच्या मनात जबरदस्त उत्सुकता आहे.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद.