Nagraj Manjule Biography आज जर कोणी प्रश्न विचारला की, मराठीतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण आहे, तर 10 पैकी 9 लोकांच्या तोंडी एकच उत्तर असेल आणि ते म्हणजे ” नागराज मंजुळे.” पिस्तुल्या, फॅन्ड्री, सैराट आणि झुंड सारख्या चित्रपटातून नागराज मंजुळे यांनी ते सिद्ध करून दाखवलंय.
त्यांचा सैराट हा चित्रपट मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय आणि कमाई करणारा चित्रपट आहे. परंतु सैराट, फॅन्ड्री आणि पिस्तुल्या हे काही डोकं बाजूला ठेवून फक्त मनोरंजन करणारे चित्रपट नाहीत. तर ते खूपच महत्त्वाचा सामाजिक संदेशसुद्धा देतात. म्हणूनच चित्रपटातील कलाकारांपेक्षा अभिनेता आणि अभिनेत्रीपेक्षा नागराज मंजुळे (Nagraj Manjule Biography) यांना जास्त लोकप्रियता मिळाली. जास्त महत्व मिळालं.
Nagraj Manjule Biography
परंतु नागराज मंजुळे यांचा सुपरस्टार दिग्दर्शक नागराज मंजुळे बनण्याचा प्रवास काही सोपा नव्हता. त्यांनी खूप कष्टातून, खूप संघर्षातून हे यश मिळवलंय, स्वतःला घडवलंय. पण कसा होता त्यांचा हा प्रवास ? अठरा विश्व दारिद्र्यात जन्मलेला, व्यसनाच्या आहारी गेलेला नागराज कसा बनला सुपरस्टार दिग्दर्शक नागराज मंजुळे. आपण आज याबद्दलच जाणून घेणार आहोत. त्यांची जीवन कहाणी जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया.
व्यसनाच्या आहारी गेलेला नागराज कसा बनला सुपरस्टार दिग्दर्शक नागराज मंजुळे
नागराज मंजुळे यांचं पूर्ण नाव नागराज पोपटराव मंजुळे आहे. त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1977 ला महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात जेऊर या गावी झाला. त्यांची घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. त्यामुळे त्यांचे मोठे काका बाबुराव मंजुळे यांनी नागराज मंजुळे यांना दत्तक घेतलं.
अभिनेत्री प्रार्थना बेहरेची जीवनकहानी
नागराज मंजुळे (Nagraj Manjule Biography) यांच्या कुटुंबात त्यावेळेस मुलं जास्त शिकत नव्हती आणि त्यांनाही शिक्षणाची जास्त आवड नव्हती. अभ्यास करण्यापेक्षा नाटक आणि सिनेमा पाहण्यात त्यांना जास्त रस होता. दप्तर फेकून सिनेमा पहायला जाणं ही त्यांची मुख्य आवड होती. लहानपणापासूनच त्यांना सिनेमाचं आणि सिनेमाच्या गोष्टी आपल्या मित्रांना सांगण्याचं वेड लागलं होतं.
वयाच्या 19 व्या वर्षी झालं नागराज मंजुळेचं लग्न
नागराज मंजुळे (Nagraj Manjule Biography) यांनी आपल्या गावी जेऊरला बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. परंतु याच दरम्यान १९९७ मध्ये वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी त्यांच्या कुटुंबाने त्यांच लग्न सुनिता या महिलेशी लावून दिलं. लग्न झाल्यानंतर काही मित्रांच्या नादाने नागराज मंजुळे यांना व्यसनही लागलं आणि ते पूर्णपणे व्यसनांच्या अधीन झाले.
परंतु लवकरच त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की, यामुळे त्यांच्या आयुष्याचं खूप मोठ नुकसान होतंय. त्यामुळे त्यांनी सगळी व्यसन बाजूला ठेवून आपलं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि ते पुण्याला आले. पुणे विद्यापीठातून त्यांनी मराठी विषयात एम. ए आणि एम. फील या पदव्या घेतल्या.
कॉलेजच्या एका प्रोजेक्टमुळे बदललं नागराज मंजुळेच नशीब
परंतु सिनेमाची आवड ही काही शांत बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी नगरच्या विद्यालयात मास कम्युनिकेशन हा दोन वर्षांचा कोर्स केला आणि या दरम्यानच चित्रपट बनवायचं वेड त्यांना लागलं. त्यांनी आपल्या कॉलेजच्या एका प्रोजेक्टसाठी पिस्तुल्या ही शॉर्ट फिल्म बनवली आणि इथूनच त्यांच्या नशिबाने कलाटणी घेतली.
नागराज मंजुळे (Nagraj Manjule Biography) यांची पिस्तुल्या ही शॉर्ट फिल्म तुफान गाजली. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये तिला पुरस्कार मिळायला लागले आणि मग चक्क सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला. त्याचबरोबर चित्रपटात काम करणाऱ्या बालकलाकाराला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
आता नागराज मंजुळे यांना चित्रपटाचा मोठा पडदा खुणावत होता. परंतु पैसा नव्हता. मग त्यांनी मिळेल ते काम करायला सुरुवात केली. आपली गोष्ट ते अनेक निर्मात्याकडे घेऊन गेले आणि शेवटी त्यांचा फॅन्ड्री हा चित्रपट अवतरला. समाजातील जाती व्यवस्थेवर भाष्य करणारा हा चित्रपट तुफान गाजला. चित्रपटाची गाणी, गोष्ट हे सगळच प्रेक्षकांना भावलं आणि फॅन्ड्रीनेसुद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला.
सैराटने दिली नागराज मंजुळेना अमाप प्रसिद्धी
यानंतर नागराज मंजुळे यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. 2016 मध्ये त्यांचा सैराट हा चित्रपट प्रदर्शित झाला. सैराटची गोष्ट सामाजिक विषयावर भाष्य करणारीच होती. परंतु एका प्रेम कथेच्या माध्यमातून ती मांडण्यात आली आणि प्रेक्षकांच्या काळजाला ती भिडली.
सैराट चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांची मुख्य भूमिका असलेला सैराट कलाकारांचा अभिनय, गाणी, गोष्ट, डायलॉग आणि नागराज मंजुळे यांचं दिग्दर्शन यामुळे प्रेक्षकांना खूप आवडला. सैराटने चक्क 100 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आणि असं करणारा मराठी चित्रपटांच्या इतिहासातील पहिला चित्रपट ठरला.
सैराटने नागराज मंजुळे (Nagraj Manjule Biography) यांना अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी झुंड हा अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिकेत असलेला हिंदी चित्रपटही दिग्दर्शित केला. फक्त दिग्दर्शकच नाही, तर नाळसारख्या चित्रपटातून एक अभिनेता म्हणूनही त्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.
नागराज मंजुळेंचा पहिल्या पत्नीला घटस्फोट
या दरम्यानचं 2014 मध्ये त्यांनी आपली पहिली पत्नी सुनिताला घटस्फोट दिला आणि त्यानंतर गार्गी कुलकर्णीबरोबर लग्न केलं. सध्या नागराज मंजुळे चित्रपटांमध्ये अभिनय करताय आणि आपल्या आगामी चित्रपटासाठी पटकथाही लिहिताय.
नागराज मंजुळे (Nagraj Manjule Biography) हे आज जरी सुपरस्टार दिग्दर्शक असले, संपूर्ण जगभरात त्यांची लोकप्रियता असली, तरी सुद्धा त्यांनी ज्या हलाखीच्या परिस्थितीतून, समाज रचनेतून हे यश मिळवलंय, ते वाखाणण्याजोग आहे आणि त्यांच्या जिद्दीला, त्यांच्या यशाला सलाम करणं तर बनत.
तर मित्रांनो तुम्हाला नागराज मंजुळे यांचे कोणते चित्रपट आवडतात ? नक्कीच कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वाशी निगडित अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
खूप खूप धन्यवाद !