ATM Noise While Withdrawing Money आधुनिक काळात अनेक महत्त्वाचे शोध लावले गेले ज्यामुळे माणसाचं आयुष्य खूप आरामदायी बनलं आहे. या सर्व सुखसोयी आपल्याला कामामध्येही खूप मदत करतात. अशीच एक महत्वाची सुविधा म्हणजे एटीएम मशीन. बँकेत न जाता लांबलचक लाईनमध्ये न लागता आपण सहज आपल्या बँक अकाउंटमधून हवे तितके पैसे काढू शकतो हे फक्त एटीएम मशिनमुळे शक्य होऊ शकलं आहे.
आज आपण याच एटीएम मशीनबद्दल एक गमतीशीर गोष्ट जाणून घेणार आहोत.
एटीएम मशीनचा शोध कसा लागला ?
एटीएम मशीन हे स्कॉटलंडचे नागरिक जॉन शेफर्ड बॅरन यांनी बनवलं आहे. त्यामागची गोष्ट अशी आहे की जॉन शेफर्ड बॅरन हे 1965 साली एक दिवस बँकेत पैसे काढण्यासाठी गेले पण त्यांना बँकेत पोहचायला 1 मिनिट उशीर झाला त्यामुळे बँक बंद झाली आणि त्यादिवशी त्यांना पैसे काढता आले नाहीत. तेव्हा त्यांनी विचार केला की अशी मशीन बनवायची ज्यातून 24 तास पैसे काढता येतील. मग त्यांनी 2 वर्ष भरपूर कष्ट घेऊन एटीएम मशीन बनवलं. पुढे 27 जून 1967 ला बार्कलेज बँक ऑफ लंडनमध्ये पहिलं एटीएम लावण्यात आलं होतं. विनोदी अभिनेता रेन वार्गी एटीएममधून पैसे काढणारा पहिला माणूस होता.
भारतात सोन्याच्या खाणी कोठे आहेत ?
ही तर झाली एटीएमच्या जन्माची गोष्ट पण तुम्ही जेव्हा एटीएमला पैसे काढायला जाता आणि एटीएम मशीनमध्ये कार्ड टाकल्यानंतर पिनकोड दाबता आणि किती पैसे काढायचे ते मशीनला सांगता त्यानंतर मशीन नोटा मोजतेय तसा आवाज येतो (ATM Noise While Withdrawing Money पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की हा नोटा) मोजण्याचा आवाज नसतो तर दुसराच आवाज असतो.
ATM Noise While Withdrawing Money
खरंतर तो आवाज एटीएममधील मोटर आणि मशीन काम करताना होणारा आवाज असतो. यासाठी एटीएममध्ये कोणताही स्पीकर लावला जात नाही. तर एटीएम मशीन बनवताना ते कृत्रिमरीत्या आवाज काढू शकेल असंच त्याचं डिझाइन केलेलं असतं. आपल्याला वाटतं की एटीएम मशीन पैसे मोजताना (ATM Noise While Withdrawing Money) तसा आवाज येतोय पण तो तर त्यातील मोटर आणि मशीनचाच आवाज असतो.
एटीएमबद्दल ही खरंच एक मजेशीर बाब आहे जी आपल्याला माहीतच नसते.
अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद.