Public Provident Fund (PPF) 2024
Public Provident Fund (PPF) 2024 बचत म्हणजे मोठा भाऊ. तुम्ही केलेली बचतचं तुम्हाला वेळेवर कामाला येते. अडचणीच्या वेळेस संकटातून तारते. त्यामुळे प्रत्येक कमावणाऱ्या व्यक्तीने बचत करायलाचं हवी. आज कमावलेल्या पैशातून थोडे पैसे भविष्यासाठी राखून ठेवणे म्हणजेचं बचत होय.
देशातील सरकारचंसुद्धा हे कर्तव्य असतं की, देशातील लोकांना बचत करण्यासाठी प्रोत्साहित करणं. ज्यामुळे त्यांना भविष्यात आर्थिक गरज पडल्यास कोणतीही अडचण येणार नाही आणि त्यांचे आयुष्य सुरळीत चालू शकेल. म्हणूनचं वेळोवेळी सरकार अशा योजना राबवत असतं, ज्यामुळे लोक बचत करण्यासाठी उत्साहित होतील.
या बचत योजनांचा मुख्य उद्देश्य लोकांना दीर्घकाळासाठी बचत करण्यास उत्साहित करणे असा असतो आणि या बचत योजनांमध्ये जितका जास्त व्याजदर दिला जाईल, तितकंच लोकांना बचत करण्यासाठी प्रोत्साहित करता येतं.
आपल्या देशात अशी एक बचत योजना आहे, जी सर्वात जुनी आणि प्रसिद्ध बचत योजना म्हणून ओळखली जाते. ही योजना भारत सरकारने 1968 म्हणजेचं आजपासून 56 वर्षांपूर्वी सुरू केली होती. या योजनेचे नाव आहे पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड बचत योजना Public Provident Fund (PPF) 2024.
ही पीपीएफ म्हणजेचं पब्लिक प्रॉव्हिडंट फंड बचत योजना नेमकी आहे तरी काय ? या योजनेत कशी गुंतवणूक करता येते ? या योजनेची उद्दिष्टे काय आहेत ? वैशिष्ट्ये काय आहेत ? या योजनेत कोण गुंतवणूक करू शकतं ? किती गुंतवणूक करू शकतात ? व्याजदर किती मिळतो ? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड बचत योजनेची वैशिष्ट्ये
भारतातील सर्वात जुनी आणि प्रसिद्ध अशा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड बचत योजनेची Public Provident Fund (PPF) 2024 वैशिष्ट्ये काय आहेत, आपण ते जाणून घेऊयात.
1) 1968 मध्ये भारतीय लोकांमध्ये बचत करण्यासाठी उत्साह आणण्यासाठी ही योजना सरकारने सुरू केली होती.
2) पब्लिक प्रॉव्हिडंट फंड बचत योजनेअंतर्गत गुंतवणूक केलेली रक्कम आयकर नियमात सूट मिळवून देते. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत मिळालेलं व्याज आणि परतावा हा सुद्धा करमुक्त असतो.
3) या योजनेअंतर्गत गुंतवणूक करणे खूपचं सोप्प आहे. तुम्ही जवळच्या कोणत्याही सरकारी बँकेत या योजनेअंतर्गत गुंतवणूक करू शकतात.
4) दीर्घकालीन सरकारी बचत योजना असल्यामुळे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड बचत योजनेअंतर्गत Public Provident Fund (PPF) 2024 केलेली कोणतीही गुंतवणूक सुरक्षित असते. यावर मिळणारा परतावा सुद्धा 100 टक्के गॅरंटीड असतो. त्यावर बाजारातील इतर कोणत्याही फॅक्टरचा प्रभाव पडत नाही.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड बचत योजनेतमध्ये गुंतवणूक कशी करावी
या Public Provident Fund (PPF) 2024 योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही नजीकच्या कोणत्याही सरकारी बँकेमध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड बचत योजनेअंतर्गत अकाउंट उघडू शकता.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड बचत योजनेच्या पात्रता अटी
1) कोणतीही भारतीय व्यक्ती या योजनेअंतर्गत गुंतवणूक करू शकते.
2) आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावाने पालक हे अकाउंट उघडू शकतात.
3) अनिवासी भारतीय या Public Provident Fund (PPF) 2024 योजनेअंतर्गत गुंतवणूक करू शकत नाही.
हेही वाचा : PM Svanidhi Yojana 2024 | प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची संपूर्ण माहिती
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड बचत योजनेत किती रुपयांची गुंतवणूक करता येते
1) या Public Provident Fund (PPF) 2024 योजनेअंतर्गत कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 1 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक दरवर्षी करता येते.
2) तुम्हाला जर यापेक्षा जास्त रक्कम गुंतवायची असेल, तर तुम्ही ती पुढील आर्थिक वर्षात गुंतवू शकतात. एका आर्थिक वर्षात दीड लाख रुपयांपेक्षा जास्त पैशांची गुंतवणूक करता येत नाही.
3) गुंतवलेली रक्कम तुम्ही एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये सुद्धा भरू शकतात.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड बचत योजनेअंतर्गत किती व्याज दिलं जातं
प्रत्येक 3 महिन्यात या Public Provident Fund (PPF) 2024 योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या व्याजाच्या रकमेची समीक्षा केली जाते. सध्या या योजनेअंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर 7.1% व्याजदर दिला जातोय.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड बचत योजनेबद्दल महत्त्वाच्या गोष्टी
आता या Public Provident Fund (PPF) 2024 योजनेशी निगडित काही महत्त्वाच्या बाबींबद्दल आपण जाणून घेऊया.
1) या योजनेअंतर्गत तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर मिळणारं व्याज दर आर्थिक वर्षाच्या शेवटी पीपीएफ अकाउंटवर जमा केलं जातं.
2) या योजनेअंतर्गत गुंतवणूक केलेली 1.5 लाख पर्यंतची रक्कम आयकर नियम 80C अंतर्गत करमुक्त आहे.
3) तसंच या योजनेअंतर्गत मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम सुद्धा करमुक्त आहे.
4) तुमच्या पीपीएफ खात्यावर तुम्हाला कर्ज सुद्धा मिळू शकतं. यासाठी काही अटी आहेत. ज्या पीपीएफ खात्याला 3 किंवा 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या पीपीएफ खात्यांवर मागच्या आर्थिक वर्षात किती रक्कम जमा केली गेली आहे, त्या रकमेच्या 25% कर्ज मिळू शकतं आणि या कर्जाची परतफेड 36 महिन्यात करावी लागते.
5) या योजनेअंतर्गत तुम्हाला नामांकनही करावं लागतं. म्हणजे खातेदाराच्या अकाली मृत्यूच्या बाबतीत त्या नामांकित व्यक्तीला या अकाउंटमध्ये असलेली रक्कम दिली जाईल.
6) पीपीएफ खात्याचा सुरुवातीचा कालावधी जास्तीत जास्त 15 वर्षांचा असतो. त्यानंतर तुम्ही कितीही वेळेस तो 5 वर्षांनी वाढवू शकतात.
7) तुम्हाला जर मुदतीआधी पीपीएफ खातं बंद करायचं असेल, तर त्यासाठीही काही नियम आहेत. 5 वर्षांआधी हे खातं बंद करता येत नाही आणि त्यानंतरही खातं बंद करण्यासाठी काही अटी आखून दिलेल्या आहेत.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड बचत योजना सर्वोत्कृष्ट बचतीचा पर्याय
सध्या बाजारात गुंतवणुकीच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. काही सरकारी तर काही खाजगी. परंतु खाजगी योजनांमध्ये पैसे गुंतवणूक करताना अनेकांच्या मनात धाकधूक असते. आपण गुंतवलेले पैसे वाढतील का ? मूळ रक्कम तरी परत येईल का ? अशा अनेक शंका मनात असतात.
परंतु सरकारी बचत योजनांमध्ये अशी कोणतीही भीती नसते. मूळ रक्कम तर परत येईलचं, पण त्याचबरोबर या योजनेत मिळणारं व्याजही चांगलं असेल आणि तेही आपल्याला मिळेल. असा गुंतवणूकदारांना भरोसा असतो. म्हणून या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते.
सध्या भारत सरकारतर्फे सुकन्या समृद्धी योजना, वरिष्ठ नागरिक बचत योजना, अशा योजना सुरू केल्या गेल्या आहेत. परंतु काही वर्षांपूर्वी जेव्हा या योजना नव्हत्या, तेव्हा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ ही अशी एकमेव योजना होती, जी लोकांना बचत करण्यास प्रोत्साहित करायची.
अनेकांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेली रक्कम एखाद्या सुरक्षित योजनेत गुंतवायची असते किंवा आपल्या मुलांसाठी भविष्यात मोठी रक्कम मिळेल, या आशेने गुंतवणूक करायची असते. अशा लोकांसाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) Public Provident Fund (PPF) 2024 ही सर्वोत्कृष्ट योजना आहे. जेथे तुम्ही गुंतवलेल्या मूळ रकमेची शाश्वती आहे. व्याजदरही चांगला मिळेल आणि परतावाही चांगला मिळेल. त्याचबरोबर कोणतीही रिस्क नाहीये. म्हणूनचं या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.
सध्या बाजारात अशा अनेक प्रायव्हेट कंपन्यांच्या बचत योजना आहेत, जेथे तुम्हाला खूप मोठी मोठी आश्वासन दिली जातात. परतावा मोठा मिळेल असं सांगितलं जातं. परंतु तेथे जोखीम सुद्धा तेवढीचं मोठी असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा एखाद्या योजनेत पैसे गुंतवायचे आहेत. जिथे जोखीम नाहीये आणि परतावा सुद्धा चांगला मिळेल, तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड बचत योजना तुमच्यासाठीचं आहे.
FAQ About Public Provident Fund PPF पीपीएफ बचत योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1) प्रश्न : पीपीएफ म्हणजेचं पब्लिक प्रॉव्हिडंट फंड बचत योजना Public Provident Fund (PPF) 2024 कधी सुरू करण्यात आली ?
उत्तर : ही योजना भारत सरकारने 1968 मध्ये भारतीयांना बचत करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सुरू केली होती.
2) प्रश्न : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड बचत योजनेमध्ये किती रुपयांची गुंतवणूक करता येते ?
उत्तर : या Public Provident Fund (PPF) 2024 योजनेअंतर्गत गुंतवणूकदार कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 1 लाख 50 हजार रुपये प्रत्येक आर्थिक वर्षात गुंतवणूक करू शकतात.
3) प्रश्न : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड बचत योजनेमध्ये किती टक्के व्याजदर मिळतं ?
उत्तर : या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या व्याजाची समीक्षा दर 3 महिन्यानी केली जाते. सध्या या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर 7.1% व्याजदर मिळतं.
4) प्रश्न : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड बचत योजनेमध्ये कर सवलत मिळते का ?
उत्तर : होय, या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर आयकर नियम 80C अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतची कर सवलत मिळते. तसंच या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर मिळालेलं व्याज आणि परतावा सुद्धा करमुक्त असतो.
5) प्रश्न : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड बचत योजनेमध्ये गुंतवलेल्या रकमेवर जोखीम असते का ?
उत्तर : नाही, या Public Provident Fund (PPF) 2024 योजनेअंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर कोणतीही जोखीम नसते. तुमची मूळ रक्कम आणि परतावा सुरक्षित राहतो.
मागील 56 वर्षांपासून भारत सरकारची ही पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड बचत योजना Public Provident Fund (PPF) 2024 भारतीयांना बचत करण्यासाठी प्रोत्साहित करतेय. गुंतवलेल्या मूळ रकमेवर आणि परताव्यावर सरकारची गॅरंटी असल्याने या योजनेत लोक मोठ्या प्रमाणात गुंतवणुक करताय आणि ज्यांना नवीन गुंतवणूक करण्याची इच्छा आहे, अशांनी सुद्धा या योजनेचा विचार करण्यास हरकत नाही.
तुमच्या मनात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड बचत योजनेबद्दल आणखी काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू आणि अशाच नवीन नवीन योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !