PM Svanidhi Yojana 2024 | प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची संपूर्ण माहिती

PM Svanidhi Yojana 2024

PM Svanidhi Yojana 2024

PM Svanidhi Yojana 2024 लॉकडाऊन हा शब्द जरी घेतला तरी अंगावर काटा उभा राहतो. 2020 मध्ये आलेल्या कोरोना या रोगाने 2 वर्ष संपूर्ण जगात तांडव केलं होतं. भारतात कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आलं. घराबाहेर निघणंही अवघड झालं. त्यामुळे सगळ्यांचचं नुकसान झालं. परंतु सर्वात जास्त नुकसान झालं गरिबांचं आणि मध्यमवर्गीयांचं. जे लोक असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात. स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय करतात.

या लॉकडाऊनमुळे छोट्या व्यापाऱ्यांचं, रस्त्यावर छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचं खूप मोठं नुकसान झालं. सरकारच्या लक्षात ही गोष्ट आली आणि मग कोरोना काळातचं भारत सरकारने प्रधानमंत्री स्वनिधी योजना राबवली होती. आजही ही योजना सुरू आहे. या योजनेने अनेक छोट्या व्यापाऱ्यांना आणि विक्रेत्यांना पुन्हा एकदा स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची संधी दिलीये.

मग ही प्रधानमंत्री स्वनिधी योजना PM Svanidhi Yojana 2024 आहे तरी काय ? या योजनेचा काय लाभ आहे ? या योजनेच्या पात्रता आणि अटी काय आहेत ? वैशिष्ट्य आणि उद्दिष्ट काय आहेत ? आज आपण त्याबद्दलचं जाणून घेणार आहोत.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना काय आहे ?

आपण याआधी चर्चा केलीये की, कोरोना काळात लॉकडाऊनमुळे छोटे व्यापारी आणि रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यांना या नुकसानीतून वाचवण्यासाठी स्वतःचा व्यवसाय पुन्हा एकदा उभा करण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची PM Svanidhi Yojana 2024 सुरुवात केली होती.

या योजनेअंतर्गत रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांना 50 हजार रुपयांपर्यंत लोन दिलं जातं. व्यवसाय सुरू करण्यापासून, व्यवसाय वाढण्यापर्यंत अनेक फायदे दिले जातात.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी अर्ज कसा करायचा

या योजनेअंतर्गत PM Svanidhi Yojana 2024 ज्या लोकांचा छोटासा व्यवसाय आहे किंवा त्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी आपल्या नजीकच्या सरकारी बँकेत प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत एक अर्ज करायचा असतो.

यार अर्जात त्यांची सर्व वैयक्तिक माहिती, त्याचबरोबर त्यांच्या व्यवसायाबद्दल सर्व माहिती लिहायची असते. हा अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे बँकेत जमा केल्यानंतर बँकेचे अधिकारी या व्यक्तीची आणि त्याच्या व्यवसायाची सर्व शहानिशा करतात.

सर्व गोष्टी योग्य आढळल्यास बँक या अर्जदाराच्या लोन अप्लिकेशनला मान्यता देते. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत PM Svanidhi Yojana 2024 10 हजार रुपयांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंतचं लोन मिळतं. ते कसं हे आपण जाणून घेऊया.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे लाभ

बँकेतर्फे तुमचा अर्ज स्वीकार झाल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला बँकेकडून 10 हजार रुपये लोन दिलं जातं.

या लोनचा वापर तुम्ही तुमचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी करू शकतात.

हे लोन देण्यासाठी बँक तुमच्याकडून कोणतीही गॅरंटी मागत नाही. तुम्हाला काही तारण ठेवण्याची गरज नसते किंवा तुमचा क्रेडिट स्कोरही पाहिला जात नाही.

हे कर्ज परत करण्यासाठी 12 महिन्यांची मुदत असते आणि जर त्या 12 महिन्यांच्या कालावधीत तुम्ही हे कर्ज बँकेला परत केलं, तर बँक तुम्हाला आणखी लोन देण्यासाठी ग्राह्य धरतं.

यानंतर तुम्हाला जर गरज असेल, तर बँक 20 हजार रुपयांपर्यंत लोन आणखी 12 महिन्यासाठी देतं. हे लोन परत करण्याची मुदत 12 महिन्यांची असते. 12 महिन्यांमध्ये तुम्ही हे 20000 रुपये परत केल्यानंतर तुम्हाला बँक 50 हजार रुपयांपर्यंत लोन देतं.

म्हणजे एकूणचं प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत PM Svanidhi Yojana 2024 छोटे व्यापारी आणि विक्रेते 80 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळवू शकतात. फक्त पहिल्या दोन वेळेस त्यांनी कर्ज वेळेवर भरायला हवं.

हेही वाचा : Pradhanmantri Kisan Mandhan Yojana | प्रधानमंत्री किसान मानधन योजना

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची वैशिष्ट्ये

आता आपण प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची PM Svanidhi Yojana 2024 वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

1) या योजनेअंतर्गत छोटे व्यापारी आणि रस्त्यावर व्यवसाय करणारे विक्रेते यांना बँक कोणत्याही गॅरंटीशिवाय किंवा तारणाशिवाय 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज देतं.

2) छोट्या विक्रेत्यांसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना खूप महत्त्वाची आहे. कारण छोट्या व्यापारी आणि विक्रेत्यांना कोणतीही बँक कर्ज देत नाही. परंतु प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत त्यांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कर्ज मिळणं ही खूप मोठी मदत आहे.

3) या योजनेअंतर्गत तीन स्तर ठरवले गेले आहेत. 10 हजार, 20 हजार आणि 50 हजार. एवढं लोन छोट्या विक्रेत्यांना मिळू शकतं. ते पहिल्यादा आणि दुसऱ्यांदा मिळालेले लोन कसं परत करतात, यानुसार त्यांना तिसऱ्यांदा 50 हजार रुपयांपर्यंत लोन मिळू शकतं.

4) प्रधानमंत्री स्वनिधी योजना PM Svanidhi Yojana 2024 त्या छोट्या विक्रेत्यांसाठी जीवनदायी आहे. ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा वाढवायचा आहे.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

या योजनेसाठी PM Svanidhi Yojana 2024 जेव्हा तुम्ही बँकेत अर्ज करायला जातात. तेव्हा तुमच्याकडे काही कागदपत्र असणं खूप गरजेचं आहे. आपण त्या कागदपत्रांची लिस्ट पाहूया.

1) अर्जदाराचे आधार कार्ड

2) अर्जदाराचं पॅन कार्ड

3) अर्जदार कोणता व्यवसाय करतो, याबद्दल सविस्तर माहिती

4) अर्जदाराचे बँक खातं पासबुक

प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत लोन सबसिडी

या योजनेअंतर्गत PM Svanidhi Yojana 2024 मिळणाऱ्या कर्जावर तुम्हाला व्याजही द्यावं लागतं. पण जर तुम्ही वेळेच्या आधीचं लोन परत केलं, तर तुम्हाला लोनवर असलेल्या व्याजदरावर 7 टक्के सबसिडी मिळते.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे सामाजिक महत्त्व

आपण आजूबाजूला नेहमीचं पाहिलं असेल की, जो नोकरी करतो, त्याला बँका सहज कर्ज देतात. मग ते कर्ज घर, गाडी किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी असो. परंतु जो व्यक्ती स्वतःचा व्यवसाय करतो, त्याला बँकांकडून कर्ज मिळणं खूप अवघड असतं.

मोठा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याना तर सहज कर्ज उपलब्ध होतं. परंतु जे लोक छोटे व्यवसाय करतात. जे रस्त्यावर एखादी वस्तू विकतात. त्यांना मात्र कोणतीही बँक कर्ज देत नाही. कारण त्यांचं दरमहा उत्पन्न फिक्स नसतं. त्यांच्याकडे इन्कमटॅक्स रिटर्न, क्रेडिट स्कोर अशा कोणत्याही गोष्टी उपलब्ध नसतात.

त्यामुळे जर अशा छोट्या व्यापाऱ्यांना ल, रस्त्यावर विक्री करणाऱ्या लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, वाढवायचा असेल, तर त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. त्यांना सावकारी कर्ज घ्यावं लागतं किंवा घरातील एखादी वस्तू गहाण ठेवावी लागते. सोन्यावर तारण कर्ज घ्यावं लागतं.

त्यांना कर्ज तर मिळतं, परंतु या कर्जावर त्यांना खूप जास्त व्याज द्यावं लागतं आणि जर त्यांचा व्यवसाय वाढला नाही, तर उलट ते कर्जबाजारी होतात. विक्रेत्यांची हीच अडचण लक्षात घेऊन भारत सरकारने प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची घोषणा केली.

या PM Svanidhi Yojana 2024 योजनेअंतर्गत छोटे व्यापारी आणि रस्त्यावर विविध वस्तूंचे विक्री करणारे विक्रेता यांना कोणत्याही गॅरंटीशिवाय 10 हजार पासून 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं.

आपल्याला माहितेय की, लॉकडाऊननंतर छोटे व्यापारी आणि विक्रेता यांची आर्थिक परिस्थिती खूप घसरली होती. त्यांचे उद्योगधंदे पूर्णपणे उध्वस्त झाले होते. परंतु या योजनेमुळे हे व्यापारी आणि विक्रेते पुन्हा एकदा त्यांचा व्यवसाय वाढवत आहेत. उभा करत आहेत.

आजही ज्या व्यापाऱ्यांना, विक्रेत्यांना स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यांना या योजनेअंतर्गत 10 हजार रुपयांचं कर्ज मिळतं. या कर्जाच्या सहाय्याने ते आपला नवीन व्यवसाय सुरू करू शकतात आणि मग ते हे कर्ज किती लवकर फेडतात, त्यानुसार त्यांना आणखीन मोठं कर्ज मिळण्याची व्यवस्था होते.

FAQ About PM Svanidhi Yojana प्रधानमंत्री स्वनिधी योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1) प्रश्न : प्रधानमंत्री स्वनिधी योजना PM Svanidhi Yojana 2024 कधी सुरू करण्यात आली ?

उत्तर : ही योजना कोरोना काळात सुरू करण्यात आली.

2) प्रश्न : प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू करण्याचं उद्दिष्ट काय आहे ?

उत्तर : छोटे व्यापारी आणि रस्त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी या योजनेअंतर्गत कोणत्याही गॅरंटीशिवाय कर्ज दिलं जातं.

3) प्रश्न : प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत किती रुपयांचं कर्ज दिलं जातं ?

उत्तर : या PM Svanidhi Yojana 2024 योजनेअंतर्गत छोट्या व्यापाऱ्यांना आणि विक्रेत्यांना 10 हजार रुपयांपासून 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं.

4) प्रश्न : प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत मिळालेल्या कर्जाची परतफेड कधी करावी लागते ?

उत्तर : या योजनेअंतर्गत 10 हजार रुपये ते 50 हजार रुपयांपर्यंतचं लोन मिळतं आणि या कर्जाची परतफेड 12 महिन्यांमध्ये करायची असते.

5) प्रश्न : प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी अर्ज कोठे करायचा असतो ?

उत्तर : नजीकच्या सरकारी बँकेत प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी अर्ज करता येतो.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना PM Svanidhi Yojana 2024 खूपचं कौतुकास्पद पाऊल आहे. आजपर्यंत छोटे व्यापारी आणि विक्रेते यांचा विचार कधीही केला गेला नव्हता. त्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कर्जाची गरज पडते. परंतु कोणतीही बँक त्यांना कर्ज देत नव्हतं. अशावेळेस या योजनेअंतर्गत त्यांच्या या समस्येवर मोठा तोडगा काढला गेला आहे आणि आता छोटे व्यापारी आणि विक्रेतेही त्यांचा व्यवसाय सुरू करू शकतात, वाढवू शकतात. त्यांनाही आर्थिक स्थैर्य मिळेल, यात शंका नाही.

तुमच्या मनात प्रधानमंत्री स्वनिधी योजनेबद्दल आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा आणि आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. सरकारच्या इतर योजनाबद्दल जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top