Actress Nivedita Saraf Insult : निवेदिता सराफ यांचा हिंदी मालिकेच्या सेटवर अपमान रडत आल्या घरी

Actress Nivedita Saraf Insult 

Actress Nivedita Saraf Insult निवेदिता सराफ आपल्या सर्वांच्या आवडत्या अभिनेत्री आहेत. त्यांनी ऐंशी आणि नव्वदच्या दशकात अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आणि रुपेरी पडदा गाजवला.

दे दनादन, अशी ही बनवाबनवी, धूम धडाका या चित्रपटातील त्यांचा अभिनय आजही लोक आठवतात. चित्रपट विश्वात यश मिळवल्यानंतर त्यांनी मालिका विश्वाकडे आपला मोर्चा वळवला. मराठीतील अगबाई सासुबाई तसेच भाग्य दिले तू मला या कार्यक्रमातही त्यांची भूमिका सर्वांनाच आवडली.

Actress Nivedita Saraf Insult 

परंतु आता निवेदिता सराफ यांनी एका मुलाखतीत आपला अनुभव शेअर केला आहे. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.

निवेदिता सराफ सांगतात की, त्यांनी हिंदी मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. परंतु आपल्या मराठी लोकांचा हिंदी बोलताना एक वेगळा लहजा असतो. तेव्हा हिंदी मालिका विश्वात फक्त उत्तर भारतीय लोकांच वर्चस्व होतं. त्यामुळे या मालिकेच्या सेटवर मला खूप त्रास दिला गेला.

निवेदिता सराफ यांचा हिंदी मालिकेच्या सेटवर अपमान

मी एखादा डायलॉग बोलला, तर हसलं गेलं, मला टोमणे मारले गेले. या गोष्टीचा मला खूप त्रास व्हायचा आणि एक दिवस हे सगळं मला असह्य झालं. मी रडत रडत घरी आले आणि घरी येऊन माझ्या आईला सांगितलं की, मी उद्यापासून हे काम करणार नाही.

तेव्हा माझ्या आईने मला समजावून सांगितलं की, मालिकेत काम करणं सोडणं, हे खूप सोपं आहे. परंतु जर त्यांना असं वाटत असेल की, तुला हिंदी भाषा येत नाही. (Actress Nivedita Saraf Insult) तर त्यावर प्रभुत्व मिळव आणि त्यांच्या नाकावर टिच्चून चांगली हिंदी बोलून दाखव. हे तू करू शकतेस, आपण लढणार आहोत, हरणारे नाही.

या प्रसिद्ध अभिनेत्याची वाईट अवस्था नीट बोलता येत नाही

निवेदिता जोशी यांना आईची ही गोष्ट पटली आणि त्या दिवसापासून त्यांनी उर्दू शिकायला सुरुवात केली आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवलं. पुढे या ग्रुप बरोबरच त्यांनी एका उर्दू भाषेतील नाटकातसुद्धा काम करून दाखवलं. तेव्हा सर्वांनी त्यांना मानलं होतं.

एकूणच निवेदिता जोशी यांनी आजच्या पिढीसमोर एक आदर्श ठेवला आहे की, जर एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल, (Actress Nivedita Saraf Insult) तर त्या गोष्टीचा अभ्यास करावा. त्या गोष्टीत आपण विशेष प्राविण्य मिळवू शकतो. पळ काढणं हा कोणताही उपाय नसतो.

मनोरंजन विश्वाशी निगडित अशाच नवीन नवीन बातम्यांसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top