Satvya Mulichi Satvi Mulgi सध्या झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी हा कार्यक्रम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय आणि या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेता राहुल मेहंदळेची भूमिका सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडतेय.
राहुल मेहंदळे आणि त्याची बायको श्वेता मेहेंदळे हे मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध कलाकार आहेत. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडते. परंतु आता एका मुलाखतीत राहुल मेहेंदळे यांनी आपल्या आयुष्यात घडलेला एक भयानक प्रसंग सांगितला आहे.
Satvya Mulichi Satvi Mulgi
राहुल महिंदळे सांगतो की, एक दिवस पूजा करत होतो, तेव्हा अचानक श्लोक म्हणताना त्याला लं आणि ळ हे शब्द बोलता येत नव्हते. असं आपल्याला का होतय, हेच (Satvya Mulichi Satvi Mulgi) त्याला कळलं नाही आणि तो डॉक्टरांकडे गेला.
तेव्हा डॉक्टरांनी त्याला सांगितलं की, तुला ब्रेन स्ट्रोक झाला आहे, त्यामुळे असं होतंय. राहुलला लं आणि ळ हे दोन अक्षर न बोलता आल्यामुळे आता आपण अभिनेता म्हणून काम कसं करायचं, डायलॉग कसे बोलायचे, हा प्रश्न त्याला पडला.
अभिनेता राहुल मेहंदळेची तब्येत बिघडली
राहुलने लगेचं नानावती रुग्णालय गाठलं आणि तिथे गेल्यावर ट्रीटमेंट सुरू केली आणि हळूहळू त्याच्या बोलण्यात फरक पडायला लागला. तरी सुद्धा हे शब्द उच्चारण त्याच्यासाठी कठीण होत होतं. राहुलच्या अशा अवस्थेमुळे तो जे नाटक करत होता, त्याचे प्रयोगही काही दिवस थांबले होते.
परंतु काही दिवसानंतर हळूहळू तो एकेक शब्द बोलायला लागला. 90% त्याची पकड बसली. परंतु दहा टक्के त्याला बोलता येत नव्हतं. हे समोरच्याच्या लक्षात येत नव्हतं. (Satvya Mulichi Satvi Mulgi) परंतु अभिनेता म्हणून उत्तम काम करणं हे राहुल आपलं कर्तव्य मानत होता.
आणि त्यानंतर राहुल या आजारातून पूर्णपणे बरा झाला. या प्रवासात त्याची पत्नी श्वेताने त्याची खूप मदत केली.
एकूणचं प्रत्येक कलाकारासाठी शब्दांचे उच्चार नीट करण, हे खूप महत्त्वाचं असतं. त्यातच हा कलाकार जर मराठी रंगभूमीवर असेल, (Satvya Mulichi Satvi Mulgi) तर रांगेत बसलेल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आवाज आणि उच्चार स्पष्ट पोहोचणं हे खूप महत्त्वाचं.
राहुल आता पूर्णपणे बरा झाला आहे आणि तो विविध नाटक, चित्रपट आणि मालिकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आपण सुद्धा राहुलला उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देऊयात आणि मनोरंजन विश्वाशी निगडित अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
खूप खूप धन्यवाद !