Majhi Tujhi Reshimgath Hindi Remake : माझी तुझी रेशीमगाठ ही लोकप्रिय मालिका पुन्हा सुरू होतेय

Majhi Tujhi Reshimgath Hindi Remake   

Majhi Tujhi Reshimgath Hindi Remake तुम्हाला जर कोणी सांगितलं की सर्वांची आवडती ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका पुन्हा एकदा सुरू होतेय तर आपल्याला किती आनंद होईल. हो हे खरं आहे की माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका परत एकदा सुरू होतेय पण ही मालिका एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता श्रेयस तळपदे, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि बाल कलाकार मायरा वायकुळच्या उत्तम अभिनयाने सजलेली ही मालिका परत येतेय.

Majhi Tujhi Reshimgath Hindi Remake   

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर सगळेजण या मालिकेला खूप मिस करत होते. पण आता लवकरच या मालिकेचा हिंदी रिमेक (Majhi Tujhi Reshimgath Hindi Remake) प्रेक्षकांसमोर येणार आहे.

या हिंदी रिमेकचं नाव ‘मैं हू साथ तेरे’ असं असेल. येत्या 29 एप्रिलपासून रोज संध्याकाळी 7:30 वाजता ही मालिका दाखवण्यात येणार आहे. या हिंदी मालिकेची कथा, सगळी पात्रं ही माझी तुझी रेशीमगाठ मालिकेसारखेच आहेत फक्त यामध्ये एकच फरक आहे तो म्हणजे यात बालकलाकार म्हणून एक मुलगी नसून एक मुलगा आहे. ही कथा आर्यमान, जान्हवी आणि छोट्या कियानची असणार आहे.

माझी तुझी रेशीमगाठ हिंदी रिमेक  

सध्या या मालिकेचे प्रोमो सगळीकडेच दाखवले जात आहेत आणि मालिकेचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. या हिंदी मालिकेचे प्रोमो अगदी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेसारखेच आहेत. यश, नेहा आणि परीप्रमाणेच आर्यमान, जान्हवी आणि कियानसोबतचे हे प्रोमो आहेत. या हिंदी रिमेकमध्ये उल्का गुप्ता, करण वोहरा, निहान जैन हे कलाकार असणार आहेत.

हिंदीप्रमाणेच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा (Majhi Tujhi Reshimgath Hindi Remake) याआधीही दुसऱ्या भाषांमध्ये रिमेक करण्यात आला आहे. कानडी भाषेत ‘सीता रामा’ या नावाने मालिकेचा रिमेक करण्यात आला आहे. तर ओडिया भाषेत ‘श्री’ नावाने मालिका बनवली गेलीय जी झी सार्थक चॅनलवर दाखवली जाते.

ही प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार अबीर गुलाल मालिकेत

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचे फॅन्स ही मालिका पुन्हा एकदा सुरू व्हावी अशी अपेक्षा करत असतात पण ते शक्य नाही. अशावेळी तुम्ही या नवीन हिंदी मालिकेला नक्की पाहू शकता. तुम्ही जर खरंच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेला मिस करत असाल तर ही हिंदी मालिका (Majhi Tujhi Reshimgath Hindi Remake) नक्की बघा म्हणजे तुमच्या जुन्या आठवणी नक्कीच ताज्या होतील.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top