Popular Actress In Abir Gulal कलर्स मराठी वाहिनीवर सध्या अनेक नवीन मालिका सुरू होत आहेत. नुकतीच ‘अबीर गुलाल’ या नवीन मालिकेची घोषणा केली गेली आणि या मालिकेचा प्रोमोसुद्धा समोर आलाय. या मालिकेतून दोन मुलींच्या आयुष्याची हृदयस्पर्शी कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्यांची जन्माच्या वेळी अदलाबदली केली गेली होती आणि त्या रात्री त्यांचं नशीबच बदललं होतं. एक मुलगी श्रीमंत घरातील तर दुसरी मुलगी गरीब घरातील असेल हेसुद्धा प्रोमोवरून कळतंय.
Popular Actress In Abir Gulal
ही मालिका कधी सुरू होणार याबद्दल काहीच कळलेलं नाही आणि मालिकेत कोणकोणते कलाकार असणार हेसुद्धा माहिती नाही. पण आता हळूहळू मालिकेबद्दल माहिती समोर यायला सुरुवात झालीये.
मालिकेत कोण कोण कलाकार दिसणार आहेत तेसुद्धा समोर येतंय. अभिनेत्री सुरभी भावे ही ‘अबीर गुलाल’ या मालिकेत एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. (Popular Actress In Abir Gulal) तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीला ‘अबीर गुलाल’ मालिकेचा प्रोमो शेअर करत ‘लवकरच एका नव्या भूमिकेत’ असंसुद्धा लिहलं आहे.
ही प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार अबीर गुलाल मालिकेत
ही बातमी कळताच सुरभीचे फॅन्स खूप खुश झाले आहेत. तिचे खूप सारे फॅन्सदेखील आहेत. सुरभी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमी आपल्या पर्सनल लाईफसोबतच कामाबद्दलचे पोस्ट शेअर करत असते. आपले फोटो आणि व्हिडिओ ती फॅन्ससोबत शेअर करते आणि या माध्यमातून फॅन्सच्या नेहमी संपर्कात राहते.
सुरभीने याआधी कलर्स मराठीच्या ‘भाग्य दिले तू मला‘ या मालिकेत (Popular Actress In Abir Gulal) सुवर्णा दाभोळकरची भूमिका साकारली होती. तिने साकारलेली ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. तर सध्या ती सोनी मराठी वाहिनीवर ‘राणी मी होणार’ या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारतेय. ‘स्वामिनी’, ’36 गुणी जोडी’ या मालिकांमध्येही ती दिसली होती. याशिवाय ती महेश माजरेकरांच्या ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटातदेखील दिसली होती.
अभिनेत्री क्षिती जोगच्या लग्नाचा किस्सा माहितेय का ?
‘अबीर गुलाल’ ही मालिका ‘कलर्स कन्नडा’ चॅनलवरील ‘लक्षणा’ या मालिकेचा रिमेक असल्याचं बोललं जात आहे.
या मालिकेचा प्रोमो आल्यापासून प्रेक्षकांमध्ये नवीन मालिकेसाठी खूपच उत्सुकता वाढली आहे.
सध्या टीआरपीच्या रेसमध्ये पुढे निघण्यासाठी कलर्स मराठी चॅनलने कंबर कसली आहे. एकानंतर एक ते नवनवीन मालिकांची घोषणा करत आहेत. (Popular Actress In Abir Gulal) मालिकेची कथा खूपच वेगळी आणि उत्तम असणार असं दिसून येतंय. मालिकेविषयीची आणखी माहितीसुद्धा लवकरच समोर येईल तोपर्यंत आपण वाट पाहूया.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे खूप खूप धन्यवाद.