Baipan Bhari Deva On Star Pravah बाईचं भारीपण दाखवून देणारा एक भव्यदिव्य मराठी चित्रपट मागच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेला तो म्हणजे ‘बाईपण भारी देवा’. या चित्रपटाने स्त्रियांचं आयुष्य अगदी उत्तमरित्या पडद्यावर साकारलं आहे. आपल्या घरातील आणि आसपासच्या स्त्रिया आपापल्या घरासाठी किती काही करत असतात पण त्यांना तितकंसं महत्व दिलं जात नाही. घरसंसार सांभाळताना या स्त्रिया स्वतःची आवडनिवड आणि स्वतःचं अस्तित्व जपायलाच विसरून जातात. त्यांना आपल्या कुटुंबापुढे काहीच दिसत नाही आणि एवढं करूनही त्यांना हवा तो मानसन्मान ते महत्व दिलं जात नाही.
Baipan Bhari Deva On Star Pravah
या चित्रपटात अशाच सहा बहिणींची कथा दाखवली गेलीय ज्या आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी राबता राबता आपली आवडनिवड आपलं आयुष्य जगायच्या राहून गेल्यात. केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट जून 2023 मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा, मांडणी आणि कलाकारांचा अभिनय सगळंच एवढं उत्तम होतं की प्रेक्षकांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला. विशेषतः स्त्रियांनी या चित्रपटाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. अक्षरशः संपूर्ण चित्रपटगृह हे फक्त स्त्रियांच्या गर्दीने भरून गेलेलं असायचं. फक्त स्त्रियांसाठी स्पेशल शो ठेवण्यात आले आणि त्याला स्त्रियांचा प्रतिसादही उत्तम मिळाला. सगळेच शो हाऊसफुल व्हायला लागले. महिलांसोबतच लहान मुलं ते मोठी माणसं सर्वांनाच चित्रपट खूप आवडला.
बाईपण भारी देवा टीव्हीवर कधी आणि कोणत्या चॅनेलवर पहायचा
या चित्रपटाने 2023 हे वर्ष खूपच गाजवलं. सहा सख्ख्या बहिणी स्वतःला सिद्ध करण्यासाठी मंगळागौर स्पर्धेत भाग घेतात. मग ही स्पर्धा जिंकण्यासाठी त्यांची होणारी कसरत आणि या दरम्यान त्या बहिणींमध्ये पुन्हा कसं प्रेमाचं नातं तयार होतं यावर चित्रपटाची कथा आधारित आहे.
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं होतं तर चित्रपटाची निर्मिती माधुरी भोसले यांनी केली होती. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, सुकन्या मोने, दीपा परब, शिल्पा नवलकर या सर्व मातब्बर अभिनेत्री मुख्य भूमिकेत होत्या. Baipan Bhari Deva On Star Pravah बाईपण भारी देवा 30 जून 2023 ला प्रदर्शित झाला आणि पुढील अनेक महिने चित्रपटगृहात गाजला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही 92 करोड रुपयांची कमाई केली होती.
Baipan Bhari Deva World TV Premier
चित्रपटाला येऊन 9 महिने होऊन गेले तरी प्रेक्षकांच्या मनात हा चित्रपट अजूनही आहे. सगळ्यांना हा चित्रपट पुन्हा एकदा टीव्हीवरसुद्धा पाहायचा आहे (Baipan Bhari Deva On Star Pravah) त्यामुळे कधी हा चित्रपट टीव्हीवर येईल याचीच सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलीय. प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.
तारक मेहता मालिकेतील रोशन सोढी म्हणजे गुरुचरण सिंग बेपत्ता
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचा लवकरच वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर (Baipan Bhari Deva On Star Pravah) होणार आहे. येत्या 19 मेला संध्याकाळी 7 वाजता हा चित्रपट स्टार प्रवाह वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. याबद्दल चॅनलवर प्रोमोसुद्धा दाखवण्यात आला त्यामुळे प्रेक्षक खूपच उत्साहित आहेत.
डिझ्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट आधीपासूनच उपलब्ध आहे. 20 जानेवारीलाच चित्रपट त्यावर प्रदर्शित झाला होता. मराठीसह हिंदीमध्येही चित्रपट त्यावर उपलब्ध आहे.
सर्वच प्रेक्षक या चित्रपटाची खूपच आतुरतेने वाट पाहताय त्यामुळे सर्वजण या संधीचा नक्की फायदा घेतील आणि हा चित्रपट सहकुटुंब बसून टीव्हीवर Baipan Bhari Deva On Star Pravah नक्की पाहतील यात शंका नाही.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद.