PM Yasasvi Scholarship In Marathi | प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना

PM Yasasvi Scholarship In Marathi

PM Yasasvi Scholarship In Marathi

PM Yasasvi Scholarship In Marathi अन्न, वस्त्र आणि निवारा याप्रमाणेचं शिक्षण हा सुद्धा प्रत्येक माणसाचा मूलभूत अधिकार आहे. आपल्या भारत देशात साक्षरता अभियान राबवलं जातं. 100% भारतीय जनता साक्षर असावी, अशी सरकारची आणि आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. जो देश साक्षर असतो, तो लवकरचं विकसित बनतो.

परंतु भारताला 100 ℅ साक्षर बनवण्यामध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे गरीबी. आजही आपल्या देशातील अनेक लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत. त्यांना रोज दोन वेळेच्या अन्नाची पडलेली असते. अशावेळेस आपल्या लहान मुलांना शिक्षण देणं त्यांच्यासाठी दिवसेंदिवस महाग बनत चाललंय.

त्यामुळेचं भारत सरकार आणि विविध राज्य सरकार विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक योजना घेऊन येत असतं. आज आम्ही तुम्हाला भारत सरकारच्या अशाचं एका स्कॉलरशिपबद्दल सांगणार आहोत, जी विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करते. योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना. मग ही प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना नेमकी आहे तरी काय ? या PM Yasasvi Scholarship In Marathi योजनेसाठी पात्रता अटी काय आहेत ? विद्यार्थ्यांना किती रुपयांचा लाभ मिळतो ? ही स्कॉलरशिप कोणाला मिळू शकते ? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत.

प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना

या PM Yasasvi Scholarship In Marathi योजनेचं संपूर्ण नाव PM YOUNG ACHIEVERS SCHOLARSHIP AWARD SCHEME FOR VIBRANT INDIA FOR OBCs AND OTHERS (PM -YASASVI) असं आहे आणि या योजनेला म्हणूनचं प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना असे म्हटलं जातं

प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेची वैशिष्ट्ये

आपण या योजनेची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.

1) ही PM Yasasvi Scholarship In Marathi योजना नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचं पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक लाभ देते.

2) या योजनेअंतर्गत 75 हजार रुपये ते 1 लाख 25 हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत विद्यार्थ्यांना केली जाते.

3) प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेचे दोन भाग आहेत. पहिला भाग आहे नववीच्या विद्यार्थ्यांसाठी. जे विद्यार्थी या योजनेमध्ये सिलेक्ट होतात, त्यांना 75 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा दुसरा भाग आहे अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी. जे विद्यार्थी अकरावीत असताना या योजनेसाठी सिलेक्ट होतात, त्यांना 1 लाख 25 हजार रुपयांची आर्थिक मदत म्हणजेचं स्कॉलरशिप दिली जाते.

4) ही योजना त्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहेत, जे मागासवर्ग म्हणजेच ओबीसी आणि आर्थिक रूपाने मागास म्हणजेचं ईबीसीअंतर्गत येतात.

5) सरकारने संपूर्ण देशभरात अशा काही शाळांची निवड केली आहे, ज्या शाळांतील नववी आणि अकरावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपसाठी परीक्षा देता येते आणि मग या परीक्षेत पास झाल्यावर त्यांना ही स्कॉलरशिप मिळते.

6) ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्या विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपसाठी अर्ज करता येतो आणि मग परीक्षेत पास झाल्यावर त्यांना 75 हजार रुपये ते 1 लाख 25 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती म्हणजेचं स्कॉलरशिप मिळते.

प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेसाठी पात्रता अटी

या PM Yasasvi Scholarship In Marathi स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही अटी घालून दिल्या आहेत.

1) अर्जदार विद्यार्थी भारतीय नागरिक असावा.

2) अर्जदार विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी कुणीही असू शकतं.

3) ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो.

4) ईबीसीअंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला हवं.

5) या योजनेसाठी जेव्हा ऑनलाईन नोंदणी सुरू होते, तेव्हा सरकार विद्यार्थ्यांचे वयोगटसुद्धा नमूद करते. त्यावेळी या वयोगटातील विद्यार्थ्यांना सदर योजनेसाठी अर्ज करता येतो.

हेही वाचा : Free Scooty Yojana In Marathi | फ्री स्कुटी योजनेची माहिती

प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

या PM Yasasvi Scholarship In Marathi योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची आवश्यकता असते. तेव्हा विद्यार्थ्यांची काही कागदपत्रेही जमा करावी लागतात. या कागदपत्रांची लिस्ट खालीलप्रमाणे आहे.

1) अर्जदाराचं आधार कार्ड

2) अर्जदाराचं जाती प्रमाणपत्र

3) अर्जदाराचं उत्पन्न प्रमाणपत्र

4) अर्जदाराच्या शाळेचं ओळखपत्र

5) अर्जदाराचं बँक पासबुक

6) अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो

प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज कसा करायचा

ही PM Yasasvi Scholarship In Marathi स्कॉलरशिप मिळवण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना एक परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेच्या काही महिन्याआधी भारत सरकार एक ऑनलाईन पोर्टल सुरू करतं. या ऑनलाइन पोर्टलवर जाऊन विद्यार्थ्यांना फॉर्म भरावा लागतो आणि कागदपत्र जमा करावी लागतात.

साधारणतः दरवर्षी ऑगस्ट महिन्यात हे ऑनलाइन पोर्टल सुरू होतं.

प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेत निवड कशी होते

आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीचं आला असेल की, या योजनेत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप कशी दिली जाते ? तर पात्र विद्यार्थी जेव्हा ऑनलाईन अर्ज करतात. त्यानंतर त्यांच्या अर्जांची छाननी होते आणि मग या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट पाठवलं जातं.

राष्ट्रीय परीक्षण एजन्सी द्वारे या यशस्वी स्कॉलरशिप योजनेसाठी एक परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपाची असून यात विविध विषयांच्या वेगवेगळ्या परीक्षा असतात आणि पर्यायांची निवड करावी लागते. (MQC Pattern)

या परीक्षेमध्ये कोण कोणते विषय असतील ? किती प्रश्न असतील ? आणि त्यांना किती गुण दिले जातील ? ही सर्व माहिती खालीप्रमाणे दिलेली आहे.

PM YASASVI Scholarship
PM YASASVI Scholarship

या PM Yasasvi Scholarship In Marathi परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेचा लाभ दिला जातो. जसं की आपण चर्चा केलीये. नववीच्या विद्यार्थ्यांना 75 हजार रुपये आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना 1 लाख 25 हजार रुपयांची शिष्यवृत्ती म्हणजेचं स्कॉलरशिप दिली जाते.

या स्कॉलरशिपचा उपयोग विद्यार्थी त्यांच्या पुढील शिक्षणासाठी करू शकतात.

प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना किती महत्त्वाची

दिवसेंदिवस होणाऱ्या आधुनिकीकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात स्पर्धा वाढत चालली आहे. नर्सरी ते दहावी या वर्गांसाठी विविध प्रायव्हेट शाळा आहेत. ज्यांची फीस गरिबांना परवडणारी नाहीये. त्यामुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना सरकारी शाळांमध्ये शिक्षण घ्यावं लागतं.

पुढे दहावी आणि बारावीनंतर ग्रॅज्युएशन करण्यासाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी, अनेक महागडी कॉलेजेस आहेत. वह्या, पुस्तकं प्रोजेक्ट यांचा खर्च गरीब विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर असतो. त्यामुळे हुशारी आणि टॅलेंट असूनसुद्धा अनेक गरीब विद्यार्थ्यांच्या हातून उच्च शिक्षण घेण्याची संधी निघून जाते. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षण घेता येत नाही. खिशाला परवडेल, असं शिक्षण ते घेतात किंवा अनेक विद्यार्थी तर शिक्षण सोडूनही देतात.

अशा विद्यार्थ्यांसाठी प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली आहे. जे आर्थिकदृष्ट्या कुमकुवत आहेत. गरीब कुटुंबातून येतात. परंतु त्यांना शिकायचंय. विशेष प्राविण्य आहे. म्हणूनचं या योजने अंतर्गत एक परीक्षा घेतली जाते आणि या परीक्षेद्वारे जे विद्यार्थी उत्तीर्ण होतात, त्यांना ही स्कॉलरशिप दिली जाते.

भारत सरकारच्या या योजनेव्यतिरिक्त अनेक राज्य सरकारलासुद्धा गरीब मुलांसाठी स्कॉलरशिप योजना राबवतात. नवोदय परीक्षा स्कॉलरशिप तर तुम्हाला माहीतचं असेल.

भारत सरकारने शिक्षणाच्या अधिकाराचा कायदाही आणला आहे. ज्यामध्ये मग कितीही मोठी प्रायव्हेट शाळा असली, तरी त्यांना आपल्या शाळेतील काही जागा गरीब विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवाव्या लागतात. म्हणजे सर्वांनाचं समान शिक्षणाची संधी मिळेल.

जोपर्यंत कोणत्याही देशात सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षणाची संधी मिळत नाही, प्रत्येक मुलाला शिक्षण घेण्याची संधी मिळत नाही. तोपर्यंत तो देश कधीही पूर्णपणे विकसित होऊ शकत नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा यांप्रमाणेच आजच्या आधुनिक जगात शिक्षण ही माणसाची मूलभूत गरज आहे. शिक्षणाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही.

त्यामुळे भारत सरकारने आणलेली ही PM Yasasvi Scholarship In Marathi योजना नक्कीचं कौतुकास्पद आहे. प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यायला हवा. जेणेकरून त्यांचं उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न अधुरं राहणार नाही आणि त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करता येतील.

FAQ About PM YASASVI Scholarship Yojana प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1) प्रश्न : प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेत (PM Yasasvi Scholarship In Marathi) भारतातील कोणत्याही शाळेतील विद्यार्थी भाग घेऊ शकतो का ?

उत्तर : या योजनेसाठी सरकारने देशभरात काही शाळांची निवड केली आहे. या शाळांमधील विद्यार्थी या योजनेत अर्ज करू शकता.

2) प्रश्न : प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेत विद्यार्थ्यांना कोणता लाभ मिळतो ?

उत्तर : या योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांना भारत सरकारकडून 75 हजार रुपये ते 1 लाख 25 हजार रुपयांपर्यंत आर्थिक लाभ दिला जातो.

3) प्रश्न : PM Yasasvi Scholarship In Marathi विद्यार्थी पात्र कसे होतात ?

उत्तर : या योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांना एक परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री स्कॉलरशिप योजनेचा लाभ दिला जातो.

4) प्रश्न : प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना फक्त मुलांसाठीचं आहे का ?

उत्तर : नाही, प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना PM Yasasvi Scholarship In Marathi मुलं आणि मुली या दोघांसाठीही आहे.

5) प्रश्न : प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेसाठी आर्थिक पात्रता निकषही आहेत का ?

उत्तर : होय, या योजनेसाठी त्याच कुटुंबातील मुलांना अर्ज करता येतो, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयेपेक्षा कमी आहे.

भारत सरकारने सुरू केलेली ही प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना PM Yasasvi Scholarship In Marathi खरंच विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. ज्या विद्यार्थ्यांचं उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न पैशांअभावी अपूर्ण राहतं. त्या विद्यार्थ्यांनी नक्कीचं या योजनेचा लाभ घ्यायला हवा. विशेष प्राविण्य असलेले विद्यार्थी नक्कीच त्यांचं उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न या योजनेद्वारे पूर्ण करू शकतात.

तुमच्या मनात PM Yasasvi Scholarship In Marathi योजनेबद्दल आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू आणि अशाच नवीन नवीन योजनाबद्दल जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top