TMKOC Gurucharan Singh Missing News मनोरंजन विश्वातून खूपचं धक्कादायक बातमी समोर येत आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा या कार्यक्रमात रोशन सिंग सोडीची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता गुरुचरण सिंग गायब झाला आहे. गुरुचरणच्या वडिलांनी पोलिसांमध्ये त्याच्या गायब होण्याबद्दल तक्रार दाखल केलीये.
TMKOC Gurucharan Singh Missing News
ही बातमी सोशल मीडियावर आल्यापासून सर्वांनाचं मोठा धक्का बसलाय आणि सगळे प्रेक्षक गुरुचरण सिंग लवकरात लवकर परत मिळावेत यासाठी प्रार्थना करत आहेत. ते सुखरूप असावेत यासाठी प्रार्थना करताय.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुचरण सिंग हे 22 एप्रिलपासून गायब आहेत. 25 एप्रिलला त्यांच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलीये. दिल्ली एअरपोर्टवर शेवटच्या वेळेस त्यांना पाहिलं गेलं आणि त्यानंतर ते कुठेही दिसलेले नाहीयेत.
तारक मेहताचे रोशन सिंग सोधी गायब
गुरुचरण सिंग यांनी 2008 ते 2020 पर्यंत तारक मेहता का उल्टा चश्मा या कार्यक्रमात रोशन सिंग सोडीची भूमिका साकारली होती. एक पंजाबी कॅरेक्टर त्यांनी खूप छान साकारलं होतं. त्यांची डायलॉग डिलिव्हरी, यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. त्यामुळे ते सर्वांचे आवडते होते.
परंतु 2020 मध्ये त्यांनी या कार्यक्रमाला राम राम ठोकला. असं सांगितलं गेलं की, कार्यक्रमाच्या निर्मात्यांबरोबर त्यांचे काही वाद-विवाद झाले. त्याचबरोबर त्यांना आपल्या आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यायची होती। त्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम सोडला.
अभिनेत्री स्मिता तांबे दिसण्यावरून ट्रोल
TMKOC Gurucharan Singh Missing News तारक मेहता का उल्टा चश्मा बरोबरचं त्यांनी अभिनय क्षेत्रालाही राम राम ठोकला आणि ते पंजाबमध्ये जाऊन राहू लागले. गुरुचरण सिंग हे सोशल मीडियावरील ऍक्टिव्ह आहेत. अनेकदा ते आपले व्हिडिओज आणि फोटो शेअर करत असतात. परंतु 22 तारखेपासून त्यांची कोणतीही अपडेट आलेली नाहीये. त्यामुळे सगळेचं टेन्शनमध्ये आहेत.
तारक मेहता का उल्टा चश्मा TMKOC Gurucharan Singh Missing News कार्यक्रम मागील काही काळापासून चांगलाचं वादात अडकलाय. गुरुचरण सिंग यांच्या पत्नीची रोशन कोर सोडीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने सुद्धा कार्यक्रमाच्या निर्मात्यांवर आरोप लावत ही मालिका सोडली होती.
या कार्यक्रमाला आता आधीसारखा प्रतिसाद मिळत नाहीये. टीआरपीच्या शर्यतीतही हा कार्यक्रम मागे पडला आहे. आता सगळे गुरुचरण सिंग ठीक असावा, याबद्दल प्रार्थना करताय.
मनोरंजन विश्वाशी निगडित अशाचं नवीन नवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !