Coconut Barfi Recipe In Marathi
Coconut Barfi Recipe In Marathi आपल्या भारतीय संस्कृतीत सणांना खूप महत्व आहे. सगळेच सण आपल्याकडे अतिशय जल्लोषात साजरे केले जातात आणि सणाच्या दिवशी आपल्या आजूबाजूला एक वेगळीच रौनक असते. सगळेजण मस्त नवीन कपडे घालतात आणि घरातसुद्धा प्रत्येक सणाला खाण्यातही एक वेगळाच बेत असतो. घरात सणांना काहीतरी गोडधोड बनवण्याची परंपरा आपल्याकडे आहे.
असाच एक महत्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. यादिवशी राखीपोर्णिमासुद्धा साजरी केली जाते. भावा बहिणीचा हा पवित्र सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून ओवाळते आणि त्याच्याकडून ओवाळणी घेते. भावाकडून बहीण आपल्या रक्षणाचं वचनही घेते. सोबत त्याला गोड म्हणून काहीतरी नारळाचा पदार्थ भरवते.
नारळीपौर्णिमेला नारळी भात, नारळाची करंजी, नारळाचा लाडू, नारळाची वडी Coconut Barfi Recipe In Marathi यातलं काहीतरी नक्की बनवतात. नारळाची वडी तर बनवायला अतिशय सोपी आणि खूपच टेस्टीसुद्धा असते. आपण नेहमी नेहमी ही नारळाची वडी करत नाही त्यामुळे जेव्हा पण आपण नारळाची वडी बनवतो सर्वांना खायला खूप आवडते. चवीला खुसखुशीत अशी नारळाची वडी खूप सोप्यात बनवता येते.
आज आम्ही तुमच्यासाठी खुसखुशीत नारळाची वडी बनवण्याची खूप सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही एकदा ही नारळाची वडी बनवूनच पहा. घरातील सर्वांना नक्कीच आवडेल.
नारळाची वडी बनवण्याचं साहित्य :
नारळाची वडी Coconut Barfi Recipe In Marathi बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.
2 ओल्या नारळांचा किस
1 छोटा चमचा तूप
2 कप म्हशीचं मलाईदार दूध
1 कपपेक्षा थोडी जास्त साखर
थोडीशी वेलची पूड
जायफळ पूड
थोडेसे पिस्त्याचे काप
नारळाची वडी बनवण्याची कृती :
1. नारळाची वडी Coconut Barfi Recipe In Marathi बनवण्यासाठी सर्वात आधी आपण 2 ओले नारळ वरचे साल काढून किसणीने किसून घेणार आहोत. नारळ किसून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये बारीक करायचे नाही. किसून घेतल्याने खूप छान टेक्सचर येतं.
2. आता एका नॉनस्टिक पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकायचं. आपल्याला तूप थोडंसं लागतं कारण खोबऱ्याला त्याचं तेल सुटतं त्यामुळे तूप फक्त 1 चमचा टाकायचं आहे. त्यानंतर आपण किसलेलं नारळ पॅनमध्ये टाकायचं आहे.
3. आता आपण किसलेलं नारळ तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत मिडीयम ठेवायचा आहे त्यामुळे आपलं मिश्रण लवकर तयार होतं. आपण हा किस 3 ते 4 मिनिटे तुपामध्ये भाजून घेतलेला आहे. खूप वेळ नाही भाजायचा.
हलकासा यातला ओलसरपणा कमी झाला की यामध्ये आपल्याला 2 कप म्हशीचं मलाईदार दूध घालायचं आहे. साय असलेलं दूध आपण यामध्ये घातलेलं आहे. तुम्ही जर पॅकेटचं दूध वापरणार असाल तर फुल क्रीम दूध तुम्हाला वापरायचं आहे त्यामुळे आपल्या वडीला खूप छान टेस्ट येते.
4. गॅसच्या मिडीयम फ्लेमवर हे दूध पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मधेमधे आपल्याला ढवळत राहायचं आहे कारण गॅसचा फ्लेम मिडीयम आहे त्यामुळे लक्ष ठेवायचंय. आपलं बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे आणि जेव्हा थोडंसं दूध उरेल त्याक्षणी आपल्याला साखर घालायची आहे.
साखर टाकताना यामध्ये थोडंसं दूध असायला हवं म्हणजे साखर लवकर विरघळेल. आपण दोन नारळ किसून घेतलेले आहेत त्यासाठी 1 कपपेक्षा थोडी जास्त साखर टाकायची आहे. तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर 1 कप साखर टाकली तरी चालेल. आता हे मिश्रण साखर विरघळल्यानंतर अजून पातळ होईल.
5. आता हे मिश्रण साखर आणि दूध पूर्णपणे आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम मिडीयम ठेवायचा आहे. साखर टाकल्यानंतर तुम्हाला हे मिश्रण चमच्याने सलग ढवळत राहायचं आहे हलवत राहायचं आहे नाहीतर खालून ते लागेल. आपण नॉनस्टिक पॅन वापरला आहे त्यामुळे ते खालून चिकटणार नाही फक्त ते जळलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची.
6. इथे साखर आणि दूध आटेपर्यंत आपण हे मिश्रण छान शिजवून घेतलं आहे. आता आपल्याला हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे. जेव्हा हे खोबरं तेल सोडायला लागेल तेव्हा आपलं हे मिश्रण झालं म्हणून समजायचं.
7. आता छान गोल्डन रंग आलेला आहे. आपलं मिश्रण तयार आहे. गॅसचा फ्लेम कमी करायचा. यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकायची आहे आणि थोडंसं जायफळ किसणीने किसून घालायचं आहे. या बर्फीमध्ये जायफळ खूप छान लागतं त्यामुळे नक्की टाकायचं. त्यानंतर ही वेलची आणि जायफळ छान मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण आपलं तयार आहे.
8. आता एक ताट घेऊन ते तुपाने ग्रीस करून घ्यायचं. आपल्याला लगेचच हे मिश्रण ताटामध्ये टाकायचं आहे. इथे आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाही कारण या वड्या लवकर सेट होतात. आपण हे मिश्रण इतकं छान शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे ते लवकर सेट होतं. आपण चौकोनी आकाराच्या वड्या करणार आहोत त्यासाठी या मिश्रणाला चमच्याने चौकोनी आकार द्यायचा आहे.
काही वेळाने आपलं हे मिश्रण चांगलं सेट व्हायला लागलं आहे. मिश्रणाला आपण चौकोनी आकार दिलेला आहे. आता लगेच चाकूने वड्या पाडून घ्यायच्या. कारण जास्त सेट झाल्यावर वड्या बरोबर पडत नाही. वड्यांना शेप बरोबर येत नाही. आपल्या सर्व वड्या पाडून झालेल्या आहेत. हे मिश्रण चमच्याने पुन्हा एकदा प्रेस करून घ्यायचं.
9. आता आपल्याला या वड्या 25 ते 30 मिनिटं सेट होईपर्यंत बाजूला ठेवायच्या आहेत. या वड्या बाहेरच रूम टेंपरेचरवर सेट होऊ द्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण वाट बघूया. आता अर्धा तास झालाय आपल्या वड्या चांगल्या सेट झाल्या आहेत. या वड्या एका प्लेटमध्ये सर्व्ह करून घेऊया.
10. या वड्यांवर सजावटीसाठी वरून पिस्त्याचे काप टाकायचे आहेत. आपण या वड्यांमध्ये काजू, बदाम किंवा खवा असं काहीच घातलेलं नाही पण तुम्हाला या वड्या खाल्ल्यानंतर एखादा सुकामेवाचा पदार्थ खाताय अशीच टेस्ट येईल.
तुम्ही नारळी पौर्णिमेला हा Coconut Barfi Recipe In Marathi पदार्थ नक्कीच बनवून पहा. इतर दिवशीही तुम्ही ही नारळाची वडी बनवू शकता. या वड्या बनवल्यानंतर सणावाराचा आनंद आणखीनच द्विगुणित होईल. या वड्या इतक्या टेस्टी होतात की दोन तीन नारळाच्या वड्या खाल्ल्याशिवाय तुमचं मनच भरणार नाही. घरातील लहान मुलं असो किंवा मग मोठी माणसं सगळेच या वड्या आनंदाने खातील. या ओल्या नारळाच्या वड्या तुम्ही ज्यादिवशी बनवाल त्याचदिवशी संपून जातील एवढी गॅरेंटी आहे.
Coconut Barfi Recipe In Marathi महत्वाच्या टिप्स :
1. ओल्या नारळाच्या वड्या Coconut Barfi Recipe In Marathi बनवण्यासाठी नारळ हे किसणीने किसून घ्यायचं ते मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही. नारळ किसून घेतल्यावर बर्फीला मस्त टेक्सचर येतं.
2. किसलेलं नारळ तुपात परतताना तूप कमीच टाकायचं कारण नारळाला तेल सुटतं.
3. वड्या बनवण्यासाठी म्हशीचं मलाईदार दूध वापरायचं किंवा पॅकेटचं दूध वापरणार असाल तर फुल क्रीम दूध घ्यायचं त्यामुळे वडीला छान टेस्ट येते.
4. किसलेल्या नारळात साखर टाकताना त्यात थोडंसं दूध असायला हवं म्हणजे साखर लवकर विरघळते.
5. साखर टाकल्यानंतर किसलेल्या नारळाचं मिश्रण चमच्याने सलग ढवळत राहायचं नाहीतर ते कढईला खाली चिकटेल किंवा जळून जाईल.
6. नारळाच्या वडीत जायफळ किसून नक्की घालायचं म्हणजे खूप छान चव येते.
7. मिश्रण तयार झाल्यानंतर ते ताटात लवकर टाकून आकार द्यायचा कारण ते लवकर कडक होतं.
8. मिश्रण ताटात टाकलं की लगेच चाकूने त्याच्या वड्या पाडायच्या नाहीतर नंतर वड्यांना नीट आकार येत नाही.
वरील सर्व टिप्स वापरून तुम्ही ओल्या नारळाच्या वड्या Coconut Barfi Recipe In Marathi बनवू शकता.
FAQ’s For Coconut Barfi Recipe In Marathi काही महत्त्वाचे प्रश्न :
1. ओल्या नारळाच्या वड्या Coconut Barfi Recipe In Marathi कशा बनवल्या जातात ?
ओल्या नारळाच्या वड्या बनवण्यासाठी ओले नारळ वरचे साल काढून किसून घ्यायचे. यानंतर गॅसवर पॅन ठेवून त्यात तूप टाकायचं आणि मग किसलेलं नारळ टाकून तुपामध्ये परतून घ्यायचं. किसलेलं नारळ तुपात भाजून घ्यायचं. मग त्यात म्हशीचं दूध टाकायचं. आता दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचं. थोडंसं दूध उरलं की त्यात साखर टाकायची. आता साखर आणि दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचं. गोल्डन रंग आल्यानंतर आपलं मिश्रण तयार आहे. यात वेलची पूड आणि जायफळ टाकून मिक्स करायचं. मिश्रण तयार आहे. हे मिश्रण ताटात टाकून चौकोनी आकार द्यायचा आणि चाकूने वड्या पाडायच्या. अर्धा तास सेट होऊ द्यायच्या आणि प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. त्यावर पिस्त्याचे काप टाकायचे. नारळाच्या वड्या तयार आहेत.
2. नारळ खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे का ?
नारळामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. नारळामध्ये विषाणूंपासून लढण्याचे गुणधर्म आहेत. रक्तातील साखरसुद्धा नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. नारळात फॅट आणि कॅलरीज खूप जास्त असतात त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर नारळ कमी खायला हवं. नारळ जर किसून खाल्लं तर गुड कोलेस्टेरॉल वाढतं आणि बॅड कोलेस्टेरॉल कमी होतं. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.
नारळी पौर्णिमेच्या सणाला गोड पदार्थ म्हणून ओल्या नारळाच्या वड्या Coconut Barfi Recipe In Marathi बनवल्या तर सणाला आणखी शोभा येईल एवढं खरं आहे. या नारळाच्या वड्या तर इतक्या टेस्टी आणि सॉफ्ट आहेत की तोंडात टाकल्यावरच लगेच विरघळतात. एक वडी खाऊन तर कोणाचंच मन भरणार नाही सगळेजण त्यापेक्षा जास्त वड्या तर हमखास खातील. या खुसखुशीत नारळाच्या वड्या आजच बनवून पहा आणि आपल्या घरच्यांना नक्की टेस्ट करायला द्या.
तुम्हाला ही Coconut Barfi Recipe In Marathi रेसिपी आवडली का नक्कीच सांगा. अशाच खुसखुशीत रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.