Free Scooty Yojana In Marathi | फ्री स्कुटी योजनेची माहिती

Free Scooty Yojana In Marathi

Free Scooty Yojana In Marathi

Free Scooty Yojana In Marathi आपल्या देशात बेटी बचाओ बेटी पढाओ ही संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न केला जातोय. कन्या भ्रूण हत्या, मुलींचे बालविवाह, मुलींना समाजात दुय्यम स्थान दिलं जाणं, कशा समस्यांनी आपला देश ग्रस्त आहे. म्हणूनचं भारत सरकार आणि विविध राज्य सरकार यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे.

आता या मिशन अंतर्गतचं देशातील अनेक राज्य सरकार आपापल्या राज्यात विविध योजना राबवत आहेत, जसं की आपल्या महाराष्ट्रात लेक लाडकी योजना सुरू केली गेली. या योजनेत मुलींना अठरा वर्षांची होईपर्यंत 1 लाख रुपयांची रोख रक्कम दिली जाईल. आज आपण अशाचं एका राज्य सरकारच्या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. ही योजना आहे फ्री स्कुटी योजना.

मग ही फ्री स्कुटी योजना Free Scooty Yojana In Marathi कोणत्या राज्याने सुरू केली आहे ? या योजनेची पात्रता काय आहे ? कोणत्या मुलींना फ्री स्कुटी मिळणार ? या योजनेसाठी पात्रता अटी आहेत ? आज आपण त्याबद्दलचं जाणून घेणार आहोत.

फ्री स्कुटी योजना कोणी सुरू केली

ही Free Scooty Yojana In Marathi योजना राजस्थान सरकारने सुरू केली असून या योजनेचे नाव आहे “कालीबाई भील मेधावी विद्यार्थी योजना.” या योजनेअंतर्गत राजस्थान सरकार बारावी पास झालेल्या मुलींना स्कुटी गिफ्ट देणार आहे म्हणजेचं फ्री देणार आहे. परंतु असं नाहीये की, राज्यातील सर्वच बारावी पास झालेल्या विद्यार्थीनींना ही स्कुटी फ्री मिळेल. त्यासाठी काही अटी आहेत. आपण त्याबद्दलही जाणून घेऊया.

फ्री स्कुटी योजनेची उद्दिष्टे

राजस्थान सरकारने ही फ्री स्कुटी योजना Free Scooty Yojana In Marathi सुरू केली आहे, मग यामागे उद्दिष्टे काय आहेत ?त्याबद्दल जाणून घेऊया. या योजनेअंतर्गत राज्यातील बारावी पास झालेल्या विद्यार्थिनींना फ्री स्कुटी दिली जाते. पण यासाठी त्यांना आर्थिक निकषसुद्धा लावले आहेत. म्हणजेचं बिकट आर्थिक परिस्थितीतून चांगले मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थिनींना ही फ्री स्कुटी दिली जाईल. ज्यामुळे त्यांचं शैक्षणिक आणि सामाजिक स्तर उंचावलं जाईल. त्यांना आपली दैनंदिन काम करणं सोपं जाईल. असा या योजनेचा उद्देश आहे.

फ्री स्कुटी योजनेच्या पात्रता अटी

राजस्थान सरकारने या Free Scooty Yojana In Marathi योजनेसाठी काही पात्रता अटी ठेवल्या आहेत. त्या आपण जाणून घेऊया.

1) या योजनेअंतर्गत राजस्थान बोर्डच्या सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींना 50% स्कुटी देण्यात येतील. तर राजस्थान बोर्डाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रायव्हेट शाळांमधील विद्यार्थिनींना 25% स्कुटी देण्यात येतील. तसंच केंद्रीय बोर्ड म्हणजे सीबीएससी बोर्ड अंतर्गत पास झालेल्या प्रायव्हेट आणि सरकारी शाळेतील विद्यार्थिनींना उरलेल्या 25 टक्के स्कुटी देण्यात येतील.

2) याचा अर्थ असा की, जर 100 स्कुटी वितरित करायच्या असतील, तर त्यापैकी 50% स्कुटी राजस्थान बोर्ड अंतर्गत येणाऱ्या सरकारी शाळेतील मुलींना देण्यात येतील. 25% स्कुटी राजस्थान बोर्ड अंतर्गत येणाऱ्या प्रायव्हेट शाळांच्या विद्यार्थिनींना देण्यात येतील आणि बाकीच्या 25% स्कुटी या सीबीएससी बोर्ड अंतर्गत येणाऱ्या सरकारी आणि प्रायव्हेट शाळेतील विद्यार्थिनींना देण्यात येतील.

3) फक्त शाळा आणि बोर्डाबद्दलचं हा नियम लागू नाहीये, तर ज्या विद्यार्थिनींनी कला विभागातून बारावीची परीक्षा पास केलीये, त्यांना 50% स्कुटी देण्यात येतील. तर वाणिज्य शाखेतून पास झालेल्या विद्यार्थिनींना 5 टक्के स्कुटी देण्यात येतील आणि विज्ञान शाखेतून पास झालेल्या विद्यार्थिनींना 45% स्कुटी घेण्यात येतील.

फ्री स्कुटी योजनेचे लाभ

1) ज्या विद्यार्थिनींना फ्री स्कुटी मिळाली आहे. त्यांना या स्कुटीची कोणतीही रिपेरिंग फ्रीमध्ये सरकारद्वारेचं करून देण्यात येईल.

2) तसंच ही फ्रि स्कुटी वितरित करताना विद्यार्थिनींना यामध्ये 2 लिटर पेट्रोल भरून देण्यात येईल.

3) एकदा स्कुटी विद्यार्थिनींना दिल्यानंतर पुढील पाच वर्ष विद्यार्थिनी ती दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला विकू शकत नाही. ती कोणाच्याही नावावर ट्रान्सफर करता येत नाही.

4) या स्कुटीबरोबर विद्यार्थिनींना एक वर्षांचा सामान्य विमा आणि पाच वर्षांचा थर्ड पार्टी विमा आणि एक हेल्मेटही दिलं जातं.

फ्री स्कुटी योजनेअंतर्गत Free Scooty Yojana In Marathi कोणत्या मुलींना फ्री स्कुटी वितरित करण्यात येईल

या योजनेत Free Scooty Yojana In Marathi कोणत्या मुलींना स्कुटी फ्री देण्यात येईल, त्याबद्दल काही नियम सरकारने आखून दिले आहेत.

1) लाभार्थी विद्यार्थिनी राजस्थानची मूळ निवासी असावी.

2) या योजनेचा लाभ फक्त मुलींनाचं दिला जाईल.

3) ज्या मुलींना बारावी बोर्डाच्या परीक्षेत 75% पेक्षा जास्त गुण आहेत. त्याच मुलींना या योजनेचा लाभ देण्यात येईल.

4) या योजनेत सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ज्या मुली आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंबातून येतात, त्यांनाच फ्री स्कुटी योजनेचा लाभ मिळेल.

फ्री स्कुटी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा Free Scooty Yojana In Marathi अर्ज भरण्यासाठी तुमच्याकडे खालील प्रमाणे कागदपत्र असणं आवश्यक आहे.

1) अर्जदार मुलीचं आधार कार्ड

2) अर्जदार मुलीचं बारावी परीक्षेचे प्रमाणपत्र

3) मुलीच्या कुटुंबाचा आर्थिक उत्पन्नाचा दाखला

4) अर्जदार मुलीचं रेशन कार्ड

5) अर्जदार मुलीच्या वयाचा दाखला

6) अर्जदार मुलीचं बँक अकाउंट पासबुक

7) अर्जदार मुलीचे पासपोर्ट साईज फोटो

हेही वाचा : LIC Nivesh Plus Scheme In Marathi | एलआयसी निवेश प्लस योजना

फ्री स्कुटी योजनेसाठी अर्ज कसा भरायचा

दरवर्षी बारावीच्या परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर राजस्थान सरकार या Free Scooty Yojana In Marathi योजनेसाठी एक ऑनलाईन पोर्टल सुरू करतं.

या पोर्टलला भेट देऊन या योजने संबंधित अटींमध्ये बसणाऱ्या विद्यार्थिनींनी ऑनलाइन फॉर्म सबमिट करायचा असतो. सगळी कागदपत्र अपलोड करायची असतात.

त्यानंतर या सर्व कागदपत्रांची छाननी केली जाते आणि मग अर्जदार मुलींना लाभार्थी म्हणून ही स्कुटी फ्री गिफ्ट मिळते.

फ्री स्कुटी योजनेचे सामाजिक महत्त्व

काही वर्षांपूर्वी शाळा असो किंवा कॉलेज सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपापल्या सायकलवर किंवा पायी शाळा आणि कॉलेजेसमध्ये जायचे. परंतु बदलत्या काळानुसार आता कॉलेजेसमध्ये विद्यार्थिनी आणि विद्यार्थी त्यांची बाईक किंवा स्कुटीवर जाताना दिसतात.

हे पाहून अनेक विद्यार्थिनींच्या मनात ही भावना येते की, आपल्याकडे अशी स्कुटी पाहिजे होती. परंतु त्यांच्या कुटुंबाची अवस्था आर्थिक दृष्ट्या हालाखीची असल्यामुळे त्यांना स्कुटी घेणं परवडत नाही, शक्य होत नाही.

तसंच अनेक विद्यार्थिनी अशा आहेत, ज्या शहरातील कॉलेजेसमध्ये लांबच्या गावांमधून येत असतात. त्यांचा प्रवास बसने होत असतो किंवा प्रायव्हेट गाड्यांनी होत असतो. परंतु या बसच्या वेळा आणि त्यांच्या कॉलेजच्या वेळा बरोबर मॅच होत नाही. बसेसमध्ये गर्दी खूप जास्त असते. त्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावरही होतो.

अनेक हुशार विद्यार्थिनी ज्यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवले आहेत. परंतु कॉलेज घरापासून दूर असल्यामुळे त्यांनी पुढील शिक्षण घेतलं नाही, अशीही अनेक उदाहरणं आहेत. म्हणूनचं राजस्थान सरकारने या सर्व बाबींचा विचार करून फ्री स्कुटी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

जसं की, आपण या आधी चर्चा केली ज्या मुलींना बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये 75 टक्के पेक्षा जास्त गुण आहेत आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. अशा मुलींना या योजनेचा लाभ घेण्यात येईल. म्हणजे सरकारने एक खूप चांगला उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही Free Scooty Yojana In Marathi योजना सुरू केली आहे.

या योजनेचा फायदा असा होईल की, ज्या विद्यार्थिनींनी मेहनत केलीये, गरीब आर्थिक परिस्थितीतूनही इतके चांगले मार्क मिळवलेत, विशेष प्राविण्य मिळवलंय, त्यांचा सत्कार केल्यासारखं होईल. त्यांच्या मेहनतीचं त्यांना बक्षीस मिळेल. त्याचबरोबर अशा मुली ज्या चांगले मार्क्स मिळवून सुद्धा घरापासून कॉलेज लांब असल्यामुळे आणि घरी कोणतंही वाहन नसल्यामुळे पुढील शिक्षण घेत नाही. अशा मुलींना या फ्री स्कुटी योजनेचा खूप लाभ होईल.

FAQ About Free Scooty Yojana फ्री स्कुटी योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1) प्रश्न : फ्री स्कुटी योजना महाराष्ट्रात सुरू आहे का ?

उत्तर : नाही, ही योजना महाराष्ट्रात सुरू नाहीये. फ्री स्कुटी योजनेची सुरुवात राजस्थान सरकारने केलीये आणि राजस्थान राज्याच्या मूळ निवासी विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ होतो.

2) प्रश्न : Free Scooty Yojana In Marathi लाभ कोणत्या विद्यार्थिनींना मिळतो ?

उत्तर : ज्या विद्यार्थिनींनी राजस्थान माध्यमिक बोर्डाच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवत 75% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत आणि त्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. अशा मुलींना या योजनेचा लाभ मिळतो.

3) प्रश्न : फ्री स्कुटी योजनेत स्कुटी बरोबर आणखीन काय काय फायदे मिळतात ?

उत्तर : या Free Scooty Yojana In Marathi योजनेत मुलींना फ्री स्कुटी बरोबर हेल्मेट, दोन लिटर पेट्रोल, एक वर्षांचा सामान्य विमा आणि पाच वर्षांचा थर्ड पार्टी विमा ही दिला जातो.

4) प्रश्न : फ्री स्कुटी योजनेचा लाभ बारावी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळेल का ?

उत्तर : नाही, या योजनेचा लाभ बारावी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना नाही मिळणार. त्यासाठी राजस्थान सरकारने काही अटी ठेवल्या आहेत.

5) प्रश्न : फ्री स्कुटी योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळतो का ?

उत्तर : नाही, या योजनेचा लाभ फक्त मुलींनाच मिळतो. मुलांना या योजनेत लाभार्थी होता येणार नाही.

एकूणचं राजस्थान सरकारने सुरू केलेली ही फ्री स्कुटी योजना Free Scooty Yojana In Marathi खूपच कौतुकास्पद आहे. बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या मुलींना या योजनेने नक्कीचं पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि त्या आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नक्कीच सुधारू शकतील.

तुमच्या मनात फ्री स्कुटी योजनेबद्दल Free Scooty Yojana In Marathi आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीच कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि अशाच नवीन नवीन योजनांच्या माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

धन्यवाद !

Scroll to Top