Satyanarayan Prasad Sheera Marathi Recipe
Satyanarayan Prasad Sheera Marathi Recipe आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये आपण कुठल्याही शुभप्रसंगाच्या वेळी घरात सत्यनारायणाची पूजा ठेवतो. नवीन घराचा गृहप्रवेश असो किंवा मग लग्नसमारंभानंतर घरात सत्यनारायणाची पूजा ठेवली जाते त्यामुळे कुठल्याही गोष्टीची छान सुरुवात होते आणि घरातलं वातावरण अगदी पवित्र होऊन जातं. या निमित्ताने आपल्याला परमेश्वराचे आशीर्वादही मिळतात.
या सत्यनारायणाच्या पूजेसाठी आपण प्रसादाचा शिरा Satyanarayan Prasad Sheera Marathi Recipe म्हणजेच रव्याचा शिरा बनवतो तो अतिशय टेस्टी असतो. हा प्रसादाचा शिरा चवीला काही वेगळाच असतो. प्रसादाचा शिरा हा सर्वांच्याच खूप आवडीचा असतो. प्रसादाचा शिरा खाल्ल्यानंतर दुसरा कोणता शिरा खाण्याची इच्छाच होत नाही. घरात नेहमी खाण्यासाठी केला जाणारा शिरा हा चवीमध्ये प्रसादाच्या शिऱ्यासारखा बनतच नाही त्यामुळे अनेकदा प्रसादाच्या शिऱ्यासारखा Satyanarayan Prasad Sheera Marathi Recipe शिरा बनवण्याची फर्माईश केली जाते.
एरवी आपण कितीही प्रयत्न केले तर शिऱ्याला प्रसादाच्या शिऱ्याची चव येत नाही असा अनुभव आपल्या सर्वांना आलेला असेल. पण हा प्रसादाचा शिरा बनवण्याची रेसिपी खूपच सोपी आहे.
आज आम्ही तुमच्यासाठी सत्यनारायण पूजेला बनवला जाणारा प्रसादाचा शिरा Satyanarayan Prasad Sheera Marathi Recipe बनविण्याची अगदी सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवून पहा.
प्रसादाचा शिरा बनवण्याचं साहित्य :
प्रसादाचा शिरा Satyanarayan Prasad Sheera Marathi Recipe बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.
1 कप रवा
1 कप साखर
1 कप तूप
1 कप दूध
1 कप पाणी
थोडेसे काजू बदामाचे काप
थोडीशी वेलची पूड
1 पिकलेली केळी
तुळशीची पानं
2 ते 3 इलायची
2 लवंगा
प्रसादाचा शिरा बनवण्याची कृती :
1. प्रसादाचा शिरा Satyanarayan Prasad Sheera Marathi Recipe बनवण्यासाठी सर्वात आधी आपण रवा कोरडा भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करून घेऊया. मग त्यात 1 कप रवा टाकायचा. रवा तुपात भाजण्याच्या अगोदर कोरडा भाजून घेऊया त्यामुळे रवा छान फुलतो आणि शिऱ्याचं टेक्सचर खूप छान येतं त्यामुळे रवा आपल्याला 10 ते 12 मिनिटे मंद गॅसवर कोरडा भाजून घ्यायचा आहे.
2. 12 मिनिटे झाल्यावर गॅस बंद करायचाय आणि एका प्लेटमध्ये हा रवा काढून घ्यायचाय.
3. त्यानंतर दुसऱ्या पॅनमध्ये दूध आणि पाणी गरम करायला ठेवूया. त्यासाठी पॅनमध्ये 1 कप पाणी आणि 1 कप दूध टाकायचं. जर शिरा तुम्हाला 1 ते 2 दिवस ठेवायचा असेल किंवा थोड्यावेळाने खाणार असाल तर इथे दुधाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे.
तुम्हाला शिरा गरमागरम खायला लागत असेल आणि छान मोकळासर आवडत असेल तर 1 कप दूध आणि 1 कप पाणी टाकायचं. पण तुम्हाला दुधाचं किंवा पाण्याचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता.
4. तोपर्यंत दुसरीकडे आपण रवा तुपामध्ये भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवर पॅन ठेवायचा. त्यासाठी 1 कप वितळलेलं तूप घ्यायचंय. तूप पॅनमध्ये टाकायचं आणि त्यातलं 1 ते 2 चमचे तूप आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. 2 लवंगा टाकायच्या लवंगामुळे शिऱ्याला खूप छान फ्लेवर येतो.
5. त्यानंतर 2 ते 3 अख्खी विलायची टाकायची. 2 तुळशीचे पानं टाकायचे तुळशीच्या पानांचा छान फ्लेवर येतो. थोडेसे काजू बदामाचे काप टाकायचे. गॅस एकदम मंद ठेवायचा.
6. त्यानंतर आपण भाजलेला रवा यात घालायचा आणि त्याला मंद गॅसवर छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जर तुम्हाला भाजलेल्या ड्रायफ्रूटसचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही ड्रायफ्रूटस पूर्ण रवा भाजून झाल्यावर टाकू शकता.
7. आपण इथे तूप गरम होऊ दिलेलं नाही. ड्रायफ्रूटस आपण रव्याबरोबर भाजून घेत आहोत. तुम्हाला भाजलेले ड्रायफ्रूटस आवडत नसतील तर नंतरही टाकू शकता. एकदम मंद गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे.
8. शिरा Satyanarayan Prasad Sheera Marathi Recipe जास्त प्रमाणात बनवला जातो. जर रवा जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही मिडीयम गॅसवरही भाजू शकता. रव्याला छान खरपूस रंग आल्यानंतर आपण यात अर्धी केळी घालूया. पूर्ण केळी टाकली तरी चालेल.
9. आपण इथे 10 ते 12 मिनिटे तुपावर छान परतल्यानंतर केळी टाकलेली आहे. केळी यासोबत छान मिक्स करून घ्यायची. आपला पांढरा शुभ्र रवा आता गुलाबी रंगाचा दिसतोय. छान खरपूस होईपर्यंत आपल्याला सलग भाजत राहायचं आहे. चमच्याने हलवत राहायचं आहे.
जर तुम्ही रव्याला चमच्याने सलग हलवत राहिलं नाही तर रवा पॅनला खाली चिकटण्याची किंवा करपण्याची भीती असते.
10. दुसरीकडे आपलं दूध आणि पाणी गरम झालंय आता गॅस बंद करूया. रव्याला छान खरपूस रंग आल्यानंतर दूध आणि पाणी यात घालूया. रवा या दूध आणि पाण्यात छान मिक्स करून घ्यायचा. जर तुम्हाला शिरा मऊसर हवा असेल किंवा 4 ते 5 तासांनंतर खायचा असेल तर तुम्ही दूध आणि पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. कारण जसाजसा वेळ जातो रव्याचा शिरा कोरडा होत जातो.
जर तुम्हाला गरमागरम खायचा असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने करू शकता. खूप छान टेस्ट लागते.
11. त्यानंतर पॅनवर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे छान वाफ काढून घेऊया. 3 मिनिटानंतर झाकण काढून घेऊया. आपला रवा छान फुललेला आहे. खूप सुंदर टेक्सचर आलंय. शिरा छान मोकळा आणि मऊसुद्धा झालाय.
12.1-2 मिनिट चमच्याने फिरवून घेऊया आणि आता यात 1 कप साखर टाकायची. जर तुम्ही थोडंसं कमी गोड खाणार असाल तर थोडी साखर कमी करू शकता पण 1 कप रव्याला 1 कप साखर पुरेशी होते.
13. त्यानंतर थोडीशी वेलची पूड टाकायची खूप छान फ्लेवर येतो आणि याला छान मिक्स करून घेऊया. आपल्या रव्याला खूप सुंदर टेक्सचर आलंय.
14. आता पुन्हा पॅनवर झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटे छान वाफ काढून घेऊया. 2 मिनिटांनंतर झाकण काढायचं. आपला शिरा आता तयार झालेला आहे. चमच्याने छान फिरवून घ्यायचा. आपला रवा किती छान फुललेला आहे. रव्याचा एकेक दाणा आपल्याला दिसतोय आणि मस्त मोकळा आणि मऊसुद्धा झालाय.
15. आपण जे तूप बाजूला ठेवलं होतं त्यातील 1 चमचा तूप शिऱ्यात टाकायचं. जर तुम्ही नॉनस्टिक पॅन वापरला असेल तर तूप नाही घातलं तरी चालेल पण दुसरा पॅन वापरला असेल तर शिरा छान सुटून येतो त्यामुळे शेवटी 1 किंवा 2 चमचे तूप घालायचं आहे.
आपला हा शिरा Satyanarayan Prasad Sheera Marathi Recipe तयार आहे. आता गॅस बंद करूया. एका वाटीमध्ये शिरा काढून घेऊया आणि केळ्याच्या पानावर हा शिरा सर्व्ह करूया. शिऱ्यावर तुळशीचं पान ठेवायचं म्हणजे आपला प्रसादाचा शिरा तयार आहे.
आवळा मुरांबा रेसिपी
Satyanarayan Prasad Sheera Marathi Recipe Important Tips महत्वाच्या टिप्स :
1. रवा तुपात भाजण्याच्या अगोदर कोरडा भाजून घ्यायचा त्यामुळे रवा छान फुलतो आणि शिऱ्याचं टेक्सचर खूप छान येतं. रवा मंद गॅसवर भाजून घ्यायचा.
2. जर शिरा तुम्हाला काही तासांनंतर खायचा असेल किंवा 1 ते 2 दिवस ठेवायचा असेल तर दुधाचं आणि पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे. पण जर शिरा गरमच खायचा असेल तर दिलेलं प्रमाणच टाकायचं आहे.
3. जर तुम्हाला भाजलेल्या ड्रायफ्रूटसचा फ्लेवर आवडत नसेल किंवा ड्रायफ्रूटसचा फ्लेवर आहे तसा ठेवायचा असेल तर तुम्ही रवा भाजल्यानंतरही ड्रायफ्रूटस टाकू शकता.
4. शिरा बनवताना रवा जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही मिडीयम गॅसवर भाजू शकता.
5. प्रसादाच्या शिऱ्यात केळी घालताना पिकलेली घालायची. जर कच्ची केळी टाकली तर शिरा लवकर खराब होतो.
6. शिरा Satyanarayan Prasad Sheera Marathi Recipe बनवताना त्यात दूध गरम करून घालायचं म्हणजे रवा फुलण्यास मदत होते.
7. रवा चमच्याने सलग हलवत राहायचा नाहीतर तो कढईला खाली चिकटतो किंवा करपून जातो.
8. रव्याचा शिरा काही वेळाने कोरडा होत जातो त्यामुळे तुम्हाला जर शिरा मऊसर हवा असेल तर दूध आणि पाण्याचं प्रमाण वाढवू शकता.
9. शिऱ्यात साखर टाकल्यानंतर जास्त वेळ शिजवायचं नाही नाहीतर साखरेचा पाक तयार होऊन शिरा थंड झाल्यावर त्यात गठ्ठे तयार होतात.
10. तुम्ही जर नॉनस्टिक तवा वापरला असेल तर शेवटी तूप घालण्याची गरज नाही पण जर दुसरा तवा वापरला असेल तर शेवटी 1 ते 2 चमचे तूप घालायचं.
वरील सर्व टिप्स वापरून तुम्ही टेस्टी प्रसादाचा शिरा सहज बनवू शकता.
FAQ FOR Satyanarayan Prasad Sheera Marathi Recipe काही महत्त्वाचे प्रश्न :
1. सत्यनारायण पूजेच्या प्रसादाचा शिरा कसा बनवतात ?
सत्यनारायण पूजेच्या प्रसादाचा शिरा Satyanarayan Prasad Sheera Marathi Recipe बनवण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये रवा कोरडाच भाजून घ्यायचा. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. दुसऱ्या पॅनमध्ये दूध आणि पाणी समप्रमाणात टाकून गरम करायचं. आता रवा तुपामध्ये भाजून घेऊया. दुसरीकडे पॅनमध्ये वितळलेलं तूप टाकायचं. त्यात लवंगा, विलायची, तुळशीची पानं, काजू बदामाचे काप आणि भाजलेला रवा टाकायचा. रवा खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. त्यानंतर त्यात केळी टाकायची. रवा भाजून झाल्यावर त्यात दूध आणि पाणी टाकायचं. पॅनवर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची. साखर आणि वेलची टाकून मिक्स करायचं. पुन्हा वाफ काढून घ्यायची. आता आपला प्रसादाचा शिरा तयार आहे.
2. रवा खाण्याचे काय फायदे आहेत ?
आहारात रवा खाण्याचे अनेक फायदे आहेत. रव्यामध्ये कॅलरीज, प्रोटीन, फायबर, लोह, मॅग्नेशियम, कार्ब्स, थायामिन, फोलेट उत्तम प्रमाणात असतात. रवा खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजारांशी लढण्यात मदत होते. ब्लडप्रेशरची पातळी नियंत्रणात राहते. अपचन, बद्धकोष्ठता अशा पचनाशी संबंधित समस्या कमी होतात. बराचवेळ भूक लागत नाही पोट भरलेलं राहतं त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं.
आपला प्रसादाचा टेस्टी शिरा बनवून तयार आहे. या शिऱ्याची टेस्ट काहीशी वेगळीच असते. दुसऱ्या कोणत्याच पदार्थाला अशी चव नाही एवढं मात्र खरं. तुम्ही ही रेसिपी पाहून प्रसादाचा शिरा नक्की बनवा आणि आपल्या घरच्यांना हा टेस्टी शिरा खायला द्या. सगळे अगदी खुश होऊन जातील.
तुम्हाला ही Satyanarayan Prasad Sheera Marathi Recipe रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा. अशाच स्वादिष्ट आणि सात्विक रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.