Amla Muramba Marathi Recipe 2024
Amla Muramba Marathi Recipe 2024 आजकाल आपण सगळेच छोट्या छोट्या वातावरणातील बदलांमुळे कायम आजारी पडत असतो. थोडंसं उन्हात गेलो की, लगेच आपल्याला ताप येतो. तर कधी थोडासा पाऊस किंवा थंडी लागली तरी आपली तब्येत बिघडते. बाहेर दवाखाने तर पेशंटच्या गर्दीने अक्षरशः भरून गेलेले आहेत. अशावेळी आपल्याला आपल्या खाण्यापिण्याची काळजी घेणं आणि व्यायाम करून शरीर सुदृढ ठेवणं अतिशय महत्वाचं आहे.
काहीतरी हेल्दी खाणं खूप महत्त्वाचं आहे ज्यामुळे आपण नेहमी निरोगी राहू. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवळा खाणं हा उत्तम पर्याय आहे. खरंतर आवळा हे आपल्यासाठी निसर्गाचं वरदान आहे. आवळा खाल्ल्याने आपल्या आरोग्याला असंख्य फायदे होऊ शकतात. आवळा खाल्ल्याने अनेक रोगांपासून आपलं संरक्षणदेखील होतं. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पण आवळा चवीला तुरट असल्यामुळे आपण तो खाण्याचा कंटाळा करतो.
अशावेळी आवळ्याची चटणी किंवा आवळ्याचा मुरंबा Amla Muramba Marathi Recipe 2024 करून आपण आवळ्याची टेस्ट वाढवू शकतो. हा मुरंबा चवीला आंबट गोड लागतो त्यामुळे सगळेजण आवडीने खातात. हा आवळ्याचा मुरंबा बाजारातही मिळतो पण त्यापेक्षा घरी अगदी सोप्या पद्धतीने हा टेस्टी मुरंबा आपण बनवू शकतो.
आज आम्ही तुमच्यासाठी हेल्दी आवळ्याचा मुरंबा Amla Muramba Marathi Recipe 2024 बनवण्याची अगदी सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून पहा.
आवळा मुरंबा बनवण्याचं साहित्य :
आवळ्याचा मुरंबा Amla Muramba Marathi Recipe 2024 बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.
1 किलो आवळे
1 किलो साखर
250 मिली पाणी
10-12 वेलची
1 छोटा चमचा मीठ
आवळा मुरंबा बनवण्याची कृती :
1. आवळ्याचा मुरंबा Amla Muramba Marathi Recipe 2024 तयार करण्यासाठी आपण 1 किलो आवळे घेणार आहोत. आवळे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत. आपल्याला या आवळ्याला एक वाफ द्यायची आहे त्यासाठी एका स्टीमरमध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यावर प्लेट ठेवून आपल्याला हे आवळे मिडीयम फ्लेमवर स्टीम करून घ्यायचे आहेत.
2. मुरंब्यासाठी आवळे Amla Muramba Marathi Recipe 2024 थोडे मोठ्या आकाराचे घ्यायचे आहेत. इथे आपण 15 ते 20 मिनिटे आवळे वाफवून घेतले आहेत. हे आपण थोडावेळ थंड होऊ देऊया.
3. थोडावेळ थंड झाल्यावर आपल्याला काटेरी चमचा घेऊन याला टोचे मारून घ्यायचे आहेत. चमच्याने आवळ्याला छिद्र पाडून घ्यायचे आहेत. आवळ्याला छिद्र पाडायला सोपं जावं म्हणून आपण हे आवळे वाफवून घेतले आहेत. कारण कच्च्या आवळ्याला आपण जेव्हा छिद्र पाडतो त्याला खूप मेहनत लागते आणि ते किचकट जातं त्यामुळे आधी वाफ देऊन सॉफ्ट करून घ्यायचे आणि मग ही प्रोसेस खूप सोपी होते.
आपण जेव्हा हे आवळे साखरेच्या पाकात शिजवतो तेव्हा साखरेचा पाक आतमध्ये छान मुरला जातो. अशाप्रकारे आपल्या सगळ्या आवळ्याला छिद्र पाडून घ्यायचेत. थोडीशी कंटाळवाणी प्रोसेस आहे पण नक्की करा. सर्व बाजूने आवळ्याला छिद्र पाडून घ्यायचे आहेत.
4. आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला मुरंबा शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी एक मोठं भांडं घेऊन त्यात 1 किलो साखर घ्यायची. 1 किलो आवळ्याला 1 किलो साखर घ्यायचीय. तुम्हाला थोडंसं गोड हवं असल्यास साखरेचं प्रमाण वाढवू शकता.
5. त्यानंतर 1 किलो साखरेला 250 मिली पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला साखर विरघळेपर्यंत वाट बघायची आहे. गॅसचा फ्लेम मिडीयम ठेवायचा आहे.
6. आता आपली साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे. आपल्याला आवळे पाण्यामध्ये घालायचे आहेत. सर्व आवळे पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला या साखरेच्या पाण्यात छान उकळी काढून घ्यायची आहे. तोपर्यंत गॅसचा फ्लेम आपल्याला मिडीयम ठेवायचा आहे.
7. हळूहळू उकळी येऊ लागलेली आहे. या स्टेजला 10 ते 12 वेलची थोडीशी कुटून घ्यायची आणि सालासकट यामध्ये घालायची आहे. आता आपल्याला हे आवळे छान शिजवून घ्यायचे आहेत. एकदा छान उकळी आली की गॅसचा फ्लेम आपल्याला मंद करायचाय. यावर झाकण ठेवून साधारण दीड ते पावणे दोन तास हे शिजवून घ्यायचं आहे.
यासाठी जो वेळ लागतो तो गॅसच्या फ्लेमवर आणि भांडं कसं आहे त्यानुसार बदलतं. साधारण 1 ते 2 तासांपर्यंत वेळ लागू शकतो. प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागू शकतो. मधेमधे तुम्हाला ढवळत राहायचंय चेक करत राहायचं आणि मंद गॅसवरच शिजवायचं त्यामुळे साखरेचा पाक आवळ्यामध्ये छान मुरतो. आतपर्यंत छान जातो आणि शेवटी रिझल्ट खूप छान मिळतो. एकदम गुलाबजामसारखे आपले आवळे दिसतात आणि खायलाही खूप चविष्ट लागतात.
8. साधारण 1 तास झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 छोटा चमचा मीठ घालायचंय. तुम्ही बघू शकता हळूहळू आवळ्याचा रंग डार्क होत चाललेला आहे. साखरेचा पाकसुद्धा घट्ट होत चाललेला आहे. तर जोपर्यंत आपले हे आवळे ब्राऊन कलरचे म्हणजे एकदम गुलाबजामसारखे नाही दिसत तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत.
9. तर यामध्ये आपल्याला 1 तास वेळ लागू शकतो किंवा मग दीड ते 2 तासही वेळ लागू शकतो. कारण आपण गॅसचा फ्लेम एकदम मंद ठेवलेला होता त्यामुळे आवळे छान शिजले जातात आणि पाक त्यामध्ये छान मुरतो.
वेळ कमी असेल तर तुम्ही मिडीयम फ्लेमवरसुद्धा शिजवून घेऊ शकता. पण ते गॅसवर ठेवून गॅसचा फ्लेम मंद करून आरामात मस्त शिजू द्यायचे तोपर्यंत तुम्ही तुमचे दुसरे कामं करू शकता.
10. ब्राऊन रंगाचे गुलाबजामसारखे आपले आवळे दिसायला लागले आहेत आणि एकतारी पाक झालेला आहे. तर या स्टेजवर तुम्हाला गॅस बंद करायचा आहे. हा आवळ्याचा मुरंबा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. साधारण 5 ते 6 तास पूर्णपणे गार व्हायला लागतात.
त्यानंतर हवाबंद डबा किंवा काचेची बरणी असेल तर तिला पूर्णपणे स्वच्छ धुवून, पुसून उन्हामध्ये वाळवून घ्यायची आणि त्यामध्ये हा मुरंबा आपल्याला भरून ठेवायचा आहे.
फ्रीजमध्ये हा मुरंबा ठेवला तर 1 वर्ष आरामात टिकतो. फ्रिजच्या बाहेरही तुम्ही ठेवू शकता पण जेव्हा आपण रोज आवळ्याचा मुरंबा काढतो तर त्याला पाणी किंवा हवा लागू शकते आणि तो खराब होऊ शकतो त्यामुळे तो धोका टाळण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे खराब होण्याचं टेन्शन राहत नाही.
13. तुम्ही नक्की हा टेस्टी आवळ्याचा मुरंबा Amla Muramba Marathi Recipe 2024 बनवून पहा. आज आपण पाणी घालून आवळ्याचा मुरंबा केला आहे. तुम्ही पाणी न घालता फक्त साखर विरघळून सुद्धा हा मुरंबा बनवू शकता पण चवीमध्ये फरक पडतो.
पण पाणी घालून बनवलेल्या आवळ्याच्या मुरंब्याची Amla Muramba Marathi Recipe 2024 चव छान लागते आणि जास्त दिवसही टिकतो. ही आवळ्याच्या मुरंब्याची रेसिपी तुम्हालाही नक्कीच आवडेल.
महत्वाच्या टिप्स :
1. आवळ्याला छिद्र पाडण्यासाठी ते आधी वाफवून घ्यायचे आणि मग चमच्याने छिद्र पाडायचे म्हणजे ते सोपं जातं. कच्च्या आवळ्याला छिद्र पाडायला खूप मेहनत लागते ते खूप किचकट असतं.
2. आवळे 10 ते 15 मिनिटे स्टीमरमध्ये स्टीम करून घ्यायचे. त्यानंतर त्याला चमच्याने छिद्र पाडून घ्यायचे म्हणजे ते आपण साखरेच्या पाकात शिजवतो तेव्हा त्यात पाक छान मुरतो.
3. आवळे शिजवतो ते गॅसच्या फ्लेमवर आणि भांडं कसं आहे त्यावर अवलंबून असतं. आवळा गुलाबजामसारखा नाही दिसत तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे.
4. गॅसचा फ्लेम खूप मंद ठेवायचा त्यामुळे आवळे छान शिजले जातात. कमी वेळ असेल तर मिडीयम फ्लेमवर शिजवू शकता. पण त्यापेक्षा मंद गॅसवर ठेवून आवळे आरामात छान शिजू द्यायचे तोवर तुम्ही दुसरी कामं करू शकता.
5. आवळ्याचा मुरंबा Amla Muramba Marathi Recipe 2024 हवाबंद डब्यात किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचा म्हणजे तो 1 वर्ष आरामात टिकतो. तो लवकर खराब होत नाही. तुम्ही फ्रीजच्या बाहेरही ठेवू शकता पण रोज आवळा काढताना त्याला हवा किंवा पाणी लागून तो खराब होऊ शकतो.
6. तुम्ही आवळ्याचा मुरंबा Amla Muramba Marathi Recipe 2024 पाणी घालून किंवा पाणी न घालता साखर विरघळूनही बनवू शकता. पण पाणी वापरल्यामुळे चव छान लागते शिवाय मुरंबा जास्त काळ टिकतो त्यामुळे असाच बनवायचा.
वरील मस्त टिप्स वापरून तुम्ही आवळ्याचा मुरंबा सहज बनवू शकता.
FAQ’s For Amla Muramba Marathi Recipe 2024 काही महत्त्वाचे प्रश्न :
1. आवळ्याचा मुरंबा कसा बनवता येतो ?
आवळ्याचा मुरंबा Amla Muramba Marathi Recipe 2024 बनवण्यासाठी आवळे धुवून पुसून घ्यायचे. त्यानंतर स्टीमरमध्ये पाणी घेऊन प्लेटवर आवळे ठेवून स्टीम करून घ्यायचे. त्यानंतर आवळे थोडावेळ थंड होऊ द्यायचे. मग काटेरी चमच्याने सगळ्या आवळ्याला छिद्र पाडून घ्यायचे. गॅसवर एका मोठ्या भांड्यात साखर आणि पाणी टाकायचं. साखर विरघळली की त्यात आवळे टाकायचे आणि साखरेच्या पाण्याला उकळी येऊ द्यायची. 10 ते 12 वेलची कुटून टाकायची. भांड्यावर झाकण ठेवून आवळे ब्राऊन रंग होईपर्यंत शिजवून घ्यायचे. आपला आवळा मुरंबा तयार आहे थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवायचा.
2. आवळ्याचा मुरंबा खाण्याचे फायदे कोणते आहेत ?
आवळ्याचा मुरंबा Amla Muramba Marathi Recipe 2024 खाण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी रिकाम्यापोटी आवळ्याचा मुरंबा खाल्ला तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीरातील रक्ताची कमी दूर होते. गॅस ऍसिडिटीपासून सुटका होते. आपल्या हृदयाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. गरोदर महिलांच्या बाळासाठी खूप फायदेशीर आहे. आपल्या शरीरातील हाडं मजबूत होतात. केसगळतीची समस्या दूर होते.
आवळ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात त्यामुळे आपण एक आवळा तरी रोज खाल्लाच पाहिजे. आपण आज बनवलेली आवळा मुरंबाची रेसिपी खूपच टेस्टी आणि हेल्दी आहे. या पद्धतीने तरी आपल्या पोटात एक आवळा रोज जाईल त्यामुळे तुम्ही ही रेसिपी करून आवळ्याचा मुरंबा Amla Muramba Marathi Recipe 2024 नक्की बनवा आणि आपल्या घरच्यांना खायला द्या.
तुम्हाला ही Amla Muramba Marathi Recipe 2024 रेसिपी आवडली का नक्कीच सांगा. अशाच हेल्दी रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.