Jowar Thalipeeth Recipe In Marathi | ज्वारीचे थालीपीठ रेसिपी मराठी

Jowar Thalipeeth Recipe In Marathi

Jowar Thalipeeth Recipe In Marathi

Jowar Thalipeeth Recipe In Marathi थालिपीठ हा आपल्या महाराष्ट्राचा पारंपरिक खाद्यपदार्थ आहे आणि आपल्या खाद्यसंस्कृतीची ओळख आहे. जो खूप चविष्ट आणि आरोग्यदायी असतो. आपल्या सर्वांच्या घरात थालिपीठ तर नेहमीच बनवले जातात. खमंग थालिपीठ हा आपल्या सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. काहीतरी टेस्टी खाण्याची इच्छा झाली की आपल्या घरात वेगवेगळ्या प्रकारचे थालिपीठ बनवले जातात आणि सगळे खूप आवडीनेसुद्धा खातात. लोणच्यासोबत थालिपीठाची चव तर आणखीनच वाढते.

थालिपीठ Jowar Thalipeeth Recipe In Marathi हे नाश्ता आणि जेवणासाठीही बनवले जातात. आपल्या घरात भाजणीचे थालिपीठ, तांदळाचे थालिपीठ, काकडीचे थालिपीठ, ज्वारीचे थालिपीठ, बाजरीचे थालिपीठ, साबुदाण्याचे थालिपीठ, शिंगाड्याचे थालिपीठ, गव्हाचे थालिपीठ असे अनेक प्रकारचे थालिपीठ बनवले जातात. ही सर्व थालिपीठं खूप टेस्टी लागतात.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर असे गरमागरम टेस्टी थालिपीठ खाण्याची मजा काही वेगळीच असते. आजकाल थालिपीठाची क्रेझ पाहता अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्येही टेस्टी थालिपीठ खायला मिळतात. थालिपीठाचे फॅन्स खूप आवडीने तिथे खात असतात. पण थालिपीठ घरी बनवायलाही खूप सोपे असतात.

आज आम्ही तुमच्यासाठी ज्वारीचे थालिपीठ Jowar Thalipeeth Recipe In Marathi बनवण्याची अतिशय सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही ही रेसिपी नक्कीच एकदा ट्राय करून पहा.

महाराष्ट्रीयन झुणका रेसिपी

ज्वारीचे थालीपीठ बनवण्याचं साहित्य :

ज्वारीचे थालिपीठ Jowar Thalipeeth Recipe In Marathi बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.

दीड कप ज्वारीचं पीठ
अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर
1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
1 चमचा धनेपूड
अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड
1 चमचा तीळ
1 चमचा लाल मिरची पावडर
2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि आलं लसणाची पेस्ट
पाव चमचा हळद
चवीनुसार मीठ
अर्धा चमचा ओवा
2 चमचे तेल
2 चमचे दही
गरजेनुसार पाणी
थोडंसं तेल

ज्वारीचे थालीपीठ बनवण्याची कृती :

1. ज्वारीचे थालीपीठ Jowar Thalipeeth Recipe In Marathi बनवण्यासाठी सर्वात आधी एक बाऊल घ्यायचा त्यात दीड कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 चमचा तीळ, 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि आलं लसणाची पेस्ट, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा ओवा चोळून घालायचा, 2 चमचे तेलाचं मोहन घालायचं.

2. त्यानंतर 2 चमचे दही घालायचं. दही फार जास्त नाही घालायचं फक्त स्वाद छान येण्याकरिता आपण थोडंसं घालणार आहोत. दही घातल्यामुळे कुठलाही पदार्थ सॉफ्ट बनतो. आपल्याला थालीपीठ खुसखुशीत हवेत त्यामुळे दही फार जास्त नाही घालायचं.

3. आता हे सगळं कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिक्स करून घेणार आहोत. आपलं मिश्रण छान एकजीव झालंय आता यामध्ये आपण थोडं थोडं थंड पाणी घालून मिक्स करून घेणार आहोत. थालीपीठ थापता येईल एवढं पीठ आपल्याला सैल ठेवायचं आहे.

आपलं पीठ झालेलं आहे याला साधारण अर्धा कप पाणी लागलेलं आहे. हे आपलं मिश्रण तयार आहे याला साधारण 5 ते 10 मिनिटे रेस्ट करायला बाजूला ठेवायचं आहे.

4. 10 मिनिटे झालेली आहेत आपलं मिश्रण तयार आहे. आता आपण थालीपीठ थापून घेणार आहोत. एक तवा घ्यायचा आणि तो थंड असतानाच त्यावर थालीपीठ थापून घ्यायचं आहे.

5. आता तव्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं. पाण्याचा हात घेऊन एक मध्यम आकाराचा गोळा घेऊन मध्यम आकाराचं थालीपीठ आपण थापून घेणार आहोत. थालिपीठाचा गोळा तव्यावर ठेवायचा आणि पाण्याचा हात घेऊन हाताने दाबून छान हे थालीपीठ थापून घ्यायचं.

आपण तवा तापवून घेतलेला नाही त्यामुळे त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं म्हणजे पीठ त्याला चिकटणार नाही. जेवढं पातळ थापता येईल तेवढं थापून घ्यायचं.

6. आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे. आता हा तवा गॅसवर ठेवायचा आणि थालिपीठाला बोटाने छिद्र पाडून घ्यायचे आहेत.

7. आता गॅस चालू करायचा. गॅसच्या मिडीयम फ्लेमवर आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचे आहेत. या थालिपीठावर तेल किंवा तूप सोडायचं आहे. आपण थालिपीठावर जे छिद्र करून घेतले होते त्यावर तेल सोडायचं आणि कडेनेसुद्धा तेल किंवा तूप सोडायचं.

8. यानंतर आता थालिपीठावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटे प्रत्येक बाजूने शिजवून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा म्हणजे ते छान खरपूस भाजलं जातं. थालीपीठ तुम्ही ओला रुमाल करून त्यावर थापून यावर घालू शकता पण त्यामुळे बरेचसे भांडे भरतात.

अशावेळेस आपण जेव्हा अशा पद्धतीने थालीपीठ बनवतो तेव्हा तवा गरम झाल्यावर पुन्हा तो थंड होऊ द्यावा लागतो आणि मग पुन्हा त्यावर थालीपीठ थापावं लागतं त्यामुळे त्यात खूप वेळ जातो.

9. यावर पर्याय म्हणून दुसरा तवा घ्यायचा त्यावर तेल किंवा तूप लावून थालीपीठ Jowar Thalipeeth Recipe In Marathi थापून घ्यायचं. आधीचं थालीपीठ आपलं शिजवून झालं की दुसरा तवा ठेवून हे थालीपीठ शिजवून घ्यायचं. यामुळे तुमचे थालीपीठ झटपट तयार होतील आणि तुम्हाला प्रत्येकवेळेस तवा थंड होण्यासाठी वाट पहावी लागणार नाही किंवा रुमालावर थापूनही करावे लागणार नाही.

10. आधीचं थालीपीठ तव्यावर शिजत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या तव्यावर दुसरं थालीपीठ थापून घेऊया. या तव्यालाही तेल किंवा तूप लावून घ्यायचं. मग पाण्याचा हात घेऊन पिठाचा गोळा घ्यायचा आणि तव्यावर टाकून हाताने दाबून थालीपीठ थापून घ्यायचं. थालीपीठ थापायच्या आधी तव्याला तेल किंवा तूप लावायचं नाहीतर ते तुमच्या तव्याला चिकटू शकतात. तुम्ही नॉनस्टिक तवा वापरला असेल तर तेल किंवा तूप लावायची गरज नाही पण नॉर्मल तवा वापरला असेल तर तेल किंवा तूप लावायचं.

11. आधीचं थालीपीठ Jowar Thalipeeth Recipe In Marathi शिजेपर्यंत आपलं दुसरं थालीपीठ थापून तयार आहे. 4 ते 5 मिनिटे झालेली आहेत. आता झाकण काढून आपलं थालीपीठ पलटून घ्यायचं. आपल्या थालिपीठाला छान खरपूस रंग आलेला आहे. थोडंसं तेल किंवा तूप यावर घालायचं आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने 4 ते 5 मिनिटे कमी फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे.

12. थालीपीठ Jowar Thalipeeth Recipe In Marathi भाजताना घाई करायची नाही गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा म्हणजे ते छान भाजले जातात. गॅसचा फ्लेम जास्त केला तर ते नीट आतपर्यंत शिजले जाणार नाहीत त्यामुळे ही काळजी घ्यायचीय.

13. आपलं थालीपीठ तयार आहे. हे थालीपीठ लगेच काढून प्लेटवर नाही ठेवायचं. एक प्लेट घ्यायची त्यावर वाटी ठेवायची आणि या वाटीवर आपल्याला थालीपीठ ठेवायचं आहे म्हणजे ते मऊ होणार नाही आणि बराचवेळ छान कुरकुरीत राहील. हे थालीपीठ थंड होऊ देऊया. तवा गॅसवरून उचलून बाजूला थंड व्हायला ठेवायचा आणि दुसरा तवा गॅसवर ठेवून थालीपीठ शिजवून घ्यायचं.

दुसरं थालीपीठ शिजल्यावर ते वाटीवर ठेवून द्यायचं. अशाप्रकारे आपले सर्व थालीपीठ तयार करून घ्यायचे.

14. इथे आपले ज्वारीचे थालीपीठ Jowar Thalipeeth Recipe In Marathi तयार आहेत. एवढ्या प्रमाणात मध्यम 5 ते 6 थालिपीठ तयार होतात. हे थालिपीठ तुम्ही असेच खाऊ शकता किंवा मग दही आणि बटरसोबतही खाऊ शकता खूप छान लागतं. तुम्ही तूप किंवा लोणच्यासोबतही खाऊ शकता खूप टेस्टी लागतात. तुम्ही हे घरच्यांना सर्व्ह करू शकता.

Jowar Thalipeeth Recipe In Marathi महत्वाच्या टिप्स :

1. थालिपीठ Jowar Thalipeeth Recipe In Marathi बनवताना त्यात दही फक्त स्वाद येण्याकरिता थोडंसं घालायचं. जास्त घालायचं नाही कारण दही टाकल्यामुळे कोणताही पदार्थ मऊ बनतो. थालिपीठ खुसखुशीत हवे असतील तर दही कमी घालायचं.

2. तवा थंड असतानाच आपण त्यावर थालिपीठ थापून घेणार आहोत त्यामुळे आधी त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं म्हणजे थालिपीठ त्याला चिकटणार नाही. तुम्ही नॉनस्टिक तवा वापरला तर तेल किंवा तूप लावायची गरज नाही पण नॉर्मल तवा वापरला तर तेल किंवा तूप लावायचं.

3. थालिपीठ तव्यावर टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा म्हणजे ते छान खरपूस भाजलं जातं.

4. एक थालिपीठ तव्यावर शिजेपर्यंत दुसऱ्या तव्यावर लगेच दुसरं थालिपीठ थापून घ्यायचं म्हणजे तुमचे थालिपीठ झटपट तयार होतील.

5. थालिपीठ भाजताना गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा म्हणजे ते छान भाजले जातात. जर तुम्ही गॅसचा फ्लेम जास्त केला तर ते बरोबर आतपर्यंत शिजले जाणार नाहीत.

6. थालिपीठ तयार झाल्यानंतर ते लगेच प्लेटवर नाही ठेवायचं तर प्लेटवर एक वाटी ठेवून त्यावर ठेवायचं म्हणजे ते मऊ होणार नाही आणि बराचवेळ कुरकुरीत राहील.

वरील सर्व टिप्स वापरून तुम्ही कुरकुरीत ज्वारीचे थालिपीठ Jowar Thalipeeth Recipe In Marathi बनवू शकता.

FAQ’s For Jowar Thalipeeth Recipe In Marathi काही महत्त्वाचे प्रश्न :

1. ज्वारीचे थालिपीठ कसे बनवले जातात ?

ज्वारीचे थालिपीठ बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये ज्वारीचं पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, धनेपूड, जिरेपूड, तीळ, लाल मिरची पावडर, हिरव्या मिरच्या आणि आलं लसणाची पेस्ट, हळद, मीठ, ओवा, तेल आणि थोडं दही टाकून हे कोरडं मिक्स करून घ्यायचं. नंतर थोडं थोडं पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यायचं. आपलं पीठ तयार झालंय आता 5 ते 10 मिनिटे बाजूला ठेवायचं. त्यानंतर तवा थंड असतानाच त्यावर तेल लावून थालिपीठ हाताने थापून घ्यायचं. मग आपला तवा गॅसवर ठेवून थालिपीठ दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं. अशाप्रकारे आपलं थालिपीठ तयार आहे.

2. थालिपीठ खाण्याचे काय फायदे आहेत ?

थालिपीठ Jowar Thalipeeth Recipe In Marathi हे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. यामध्ये भरपूर कॅल्शियम, फायबर आणि अनेक पोषकतत्वे असतात. थालिपीठ हे धान्य आणि अनेक डाळींपासून बनवलेले असते. थालिपीठ खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. शरीराची पचनसंस्था निरोगी राहते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी थालिपीठ मदत करते.

ज्वारीचे थालिपीठ Jowar Thalipeeth Recipe In Marathi खूपच चविष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच बनवून पहा आणि घरच्यांना खायला द्या. सगळ्यांना हे थालिपीठ नक्कीच आवडतील.

तुम्हाला ही Jowar Thalipeeth Recipe In Marathi रेसिपी आवडली का नक्कीच सांगा. अशाच खमंग रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.

तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.  

Scroll to Top