Maharashtrian Zunka Marathi Recipe
Maharashtrian Zunka Marathi Recipe झुणका भाकर ही तर आपल्या महाराष्ट्राची शान आहे. मिरचीचा झुणका आणि त्याबरोबर गरमगरम भाकरी हे आपल्या महाराष्ट्राचं पारंपरिक जेवण आहे. आपल्या समृद्ध खाद्यसंस्कृतीचं प्रतीक आहे. आपल्या सर्वांना ही झुणका भाकर खायला प्रचंड आवडते. झणझणीत झुणका आणि त्यावर गरमागरम भाकरी आणि सोबतीला कांदा हा जगात भारी बेत आहे.
झुणका भाकर आणि कांदा एवढं जरी ऐकलं तर आपल्या प्रत्येकाच्याच तोंडात पाणी येतं एवढं मात्र नक्की. एखाद्या आनंदाच्या प्रसंगी किंवा मग सुट्टीच्या दिवशी हा झुणका भाकरीचा बेत आपल्या घरी केला तर आपला दिवसच मस्त होणार हे नक्की. एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर किंवा प्रवासात ही झुणका भाकरी Maharashtrian Zunka Marathi Recipe खायला वेगळीच मजा येते.
हीच झुणका भाकरीची क्रेझ पाहता आजकाल अनेक ठिकाणी हे झुणका भाकर केंद्र उघडले आहेत जिथे झुणका भाकर खायला मिळते आणि खवय्ये गर्दी करून ही टेस्टी झुणका भाकर खाताना दिसतात. ही झुणका भाकरी घरीसुद्धा बनवायला अतिशय सोपी असते आणि खूप टेस्टीसुद्धा लागते.
आज आम्ही तुमच्यासाठी झणझणीत झुणका बनवण्याची अतिशय सोपी Maharashtrian Zunka Marathi Recipe रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा.
झुणका बनवण्याचं साहित्य :
झुणका Maharashtrian Zunka Marathi Recipe बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.
- अर्धा कप बेसन
5-6 हिरव्या मिरच्या
5-6 लसणाच्या पाकळ्या
अर्धा कप पाणी
3 मोठे चमचे तेल
1 छोटा चमचा मोहरी
5-6 कढीपत्त्याची पानं
थोडीशी हिरवी कोथिंबीर
चिमूटभर हिंग
1 छोटा बारीक चिरलेला कांदा
अर्धा छोटा चमचा हळद
चवीनुसार मीठ
झुणका बनवण्याची कृती :
1. झणझणीत झुणका Maharashtrian Zunka Marathi Recipe बनवण्यासाठी आपण अर्धा कप बेसन घेतलंय हे बेसन थोडं जाडसर दळलेलं असेल तर झुणक्याचं टेक्सचर खूप छान येतं.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण मिरचीचा झुणका बनवणार आहोत त्यासाठी 5 ते 6 गडद रंगाच्या तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. जर तुम्ही कमी तिखट खाणारे असाल तर कमीतकमी 4 मिरच्या वापरा कारण मिरच्यामुळे खूप छान चव येते.
2. सर्वात आधी आपण इथे 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत त्या खलबत्त्यात ठेचून घेणार आहोत. यासोबतच हिरव्या मिरच्यांचे थोडे मोठे काप करून घ्यायचे आहेत.
3. यानंतर आपण बेसन भिजवून घेणार आहोत. बेसन एका बाऊलमध्ये टाकायचं आणि अर्धा कप बेसनाला आपण अर्धा कप पाणी घेणार आहोत. पण त्याआधी अर्धा कपला थोडं कमी पाणी घालायचं आणि उरलेलं पाणी थोड्यावेळाने वापरणार आहोत. रवीने हे छान मिक्स करून घेऊया. यामध्ये कुठलीही गुठळी राहता कामा नये. एकदम स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचंय.
4. त्यानंतर गॅसवर पॅन गरम करून घ्यायचा. पॅन गरम झाला की त्यात 3 मोठे चमचे तेल घालायचं आहे. तेल झुणक्याला बऱ्यापैकी लागतं. जुन्या पारंपरिक पदार्थांना भरपूर तेल लागतं त्यामुळे जर तुम्ही कमी तेल घातलं तर ती चव ते टेक्सचर येणार नाही त्यामुळे झुणक्याला तेल घालणं फार महत्त्वाचं आहे आणि आपलं बेसन तेलामुळेच छान शिजणार आहे.
5. तेल गरम झाल्यावर त्यात 1 छोटा चमचा मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली पाहिजे तरच खमंग अशी चव येते. त्यानंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्या मोठ्या चिरलेल्या त्यात टाकायच्या. ज्यांना तिखट वाटत असेल तर त्या मिरच्या बाजूला काढून ठेवू शकता. अर्धा कप बेसनासाठी कमीतकमी 4 मिरच्या टाकायच्या आहेत.
6. त्यानंतर आपण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या त्या टाकायच्या. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं खुडून यामध्ये टाकायचे. थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकायची. फोडणीमध्ये कोथिंबीर छान लागते. चिमूटभर हिंग टाकून फोडणी छान मिक्स करून घ्यायची. फोडणी खमंग बसली तर त्याचा कुठल्याही पदार्थामध्ये स्वाद खूप छान येतो.
7. आता 1 छोटा बारीक चिरलेला कांदा टाकायचा. 3 ते 4 मिनिटे आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आपण यामध्ये लाल तिखट घालणार नाही. जो काही तिखटपणा येणार आहे तो आपल्या मिरच्यांमुळेच येणार आहे. मिरच्या आपण थोड्या जास्त घातलेल्या आहेत आणि या झुणक्यामध्ये मिरचीचा फ्लेवर खूप छान येतो.
8. इथे कांदा छान शिजल्यानंतर आपल्याला बेसन घालायच्या अगोदर गॅस मंद हवाय त्यासाठी गॅसच्या स्टँडवर दुसरं स्टँड ठेवायचं आणि त्यावर पॅन ठेवायचा म्हणजे आपल्याला एकदम कमी फ्लेम मिळणार आहे आणि आपलं बेसन पॅनला खाली लागणार नाही. ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. एकदम मंद आपल्याला गॅसचा फ्लेम हवा आहे.
9. त्यानंतर आपण जे बेसन भिजवून ठेवलं होतं ते पॅनमध्ये घालूया. त्यानंतर आपण अर्ध्या कपला कमी पाणी घातलं होतं त्यातील उरलेलं पाणी बेसनाच्या बाऊलमध्ये टाकून मिक्स करून पॅनमध्ये घालूया. आता अर्ध्या कप बेसनाला अर्धा कप पाणी आपण घातलेलं आहे. हे छान मिक्स करून घेऊया.
हे लगेचच घट्ट होणार त्यामुळे गॅस आपल्याला एकदम मंद हवा आहे. इथे आपल्याला बेसन भाजून घ्यायची गरज नाही. आपण तेल थोडं जास्त घातलंय त्यामुळे तेलामुळेच हे बेसन छान शिजलं जातं. लगेचच हे बेसन छान घट्ट होतं. असंच आपल्याला 3 ते 4 मिनिटे परतत राहायचं आहे.
परतून झाल्यावर पॅनवर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटे आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. गॅसचा फ्लेम एकदम मंद ठेवायचा त्यामुळे आपलं बेसन खालून लागणार नाही.
10. 7 ते 8 मिनिटे झाल्यावर आपलं झुणकं Maharashtrian Zunka Marathi Recipe खमंग शिजलं गेलं आहे. बेसन छान फुललेलं आहे. तेलामुळे बेसन छान फुलतं आणि त्याचं टेक्सचरही खूप छान आलेलं आहे. हे बेसन तुम्ही दिवसभर कधीही खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून नंतर तुम्ही कधीही काढलं तरी याचं टेक्सचर असंच राहील. असंच स्मूथ राहील हे कोरडं पडणार नाही.
बेसन छान फुललं गेलेलं आहे आणि जर तुम्हाला वाटलं की तेल थोडं जास्त झालेलं आहे तर यामध्ये कोरडं बेसनपीठ घालून ऍडजस्ट करू शकता. जेव्हा आपण भिजवलेलं बेसन घातलं होतं तेव्हा थोडंसं बेसनपीठ घालून ऍडजस्ट करू शकता.
11. आपला एकदम झणझणीत झुणका Maharashtrian Zunka Marathi Recipe तयार झालेला आहे. हे खाण्यासाठी तयार आहे तर आपण याला प्लेटमध्ये सर्व्ह करूया. प्लेटमध्ये ज्वारी बाजरीची भाकरी घ्यायची आणि त्यावर झुणका टाकून घ्यायचा. झुणक्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि कांद्याबरोबर सर्व्ह करायचं. गरमागरम भाकरी, मऊ लुसलुशीत भात किंवा फुलक्यांबरोबर हा झुणका खूप छान लागतो.
झुणका Maharashtrian Zunka Marathi Recipe बनवण्याची ही खूपच सोपी पद्धत आहे. बऱ्याचशा अशा पद्धती आहेत ज्या खूप किचकट आहेत पण तुम्ही या पद्धतीने झुणकं बनवलं तर खूपच चविष्ट बनेल.
Tilachi Chikki Recipe In Marathi | तिळाची चिक्की रेसिपी मराठी
महत्वाच्या टिप्स :
1. बेसन थोडं जाडसर दळलेलं असेल तर झुणक्याचं टेक्सचर खूप छान येतं आणि मिरच्या थोड्या जास्त वापरायच्या आहेत कारण मिरच्यांमुळे खूप छान चव येते.
2. झुणका Maharashtrian Zunka Marathi Recipe बनवायला तेल बऱ्यापैकी लागतं, जर तुम्ही तेल कमी टाकलं तर ती चव ते टेक्सचर येणार नाही त्यामुळे झुणक्याला तेल जास्त घालणं महत्वाचं आहे आणि आपलं बेसन तेलामुळेच छान शिजणार आहे.
3. लाल तिखट वापरायचं नाही जो काही तिखटपणा येणार आहे तो मिरच्यांमुळेच येतो. मिरच्या आपण थोड्या जास्त घातलेल्या आहेत आणि झुणक्यामध्ये मिरचीचा फ्लेवर खूप छान येतो.
4. कांदा शिजल्यानंतर बेसन टाकायच्या आधी आपल्याला गॅस मंद हवाय त्यासाठी गॅसचं स्टँड एकावर एक ठेवायचं आणि त्यावर मग कढई ठेवायची म्हणजे आपल्याला एकदम लो फ्लेम मिळेल आणि बेसन कढईला खाली लागणार नाही.
5. बेसन भाजून घेण्याची गरज नाही कारण तेलामुळेच बेसन छान शिजतं.
6. जर तुम्हाला वाटलं तेल थोडं जास्त झालंय तर तुम्ही यामध्ये थोडं कोरडं बेसनपीठ टाकून ऍडजस्ट करू शकता. भिजलेल्या बेसनात आणखी थोडं बेसनपीठ टाकायचं.
वरील सर्व मस्त टिप्स वापरून तुम्ही झणझणीत झुणकं Maharashtrian Zunka Marathi Recipe सहज बनवू शकता.
FAQ About Maharashtrian Zunka Marathi Recipe काही महत्त्वाचे प्रश्न :
1. झणझणीत झुणका कसा बनवला जातो ?
झुणका Maharashtrian Zunka Marathi Recipe बनवण्यासाठी लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आणि मिरच्यांचे काप करून घ्यायचे. त्यानंतर बेसन पाण्यात भिजवून घ्यायचं आणि रवीने मिक्स करून त्याचं बॅटर तयार करायचं. त्यानंतर गॅसवर पॅन ठेवून त्यात तेल टाकून मोहरी, हिरव्या मिरच्यांचे काप, लसणाच्या पाकळ्याचा ठेचा, कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिंग, बारीक चिरलेला कांदा, हळद, मीठ आणि भिजवलेलं बेसन टाकून हे सगळं परतून घ्यायचं. आता पॅनवर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची. आपलं बेसन छान शिजलं आहे. आता आपला झुणका तयार आहे.
2. झुणका भाकर आरोग्यासाठी चांगली आहे का ?
झुणका भाकर Maharashtrian Zunka Marathi Recipe खाणं हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगलं आहे. झुणका भाकर हे एक पूर्ण अन्नच आहे. झुणका भाकर खाल्ल्याने आपल्याला चांगल्या दर्जाची भरपूर सारी प्रोटिन्स मिळतात आणि भरपूर कॅलरीजसुद्धा मिळतात. झुणका आणि भाकर हे डाळ आणि धान्याचं मिश्रण असल्यामुळे यात भरपूर पोषणद्रव्ये असतात. झुणका भाकरमध्ये भरपूर प्रोटिन्स असतात आणि प्रोटिन्सवरच आपल्या शरीराची वाढ आणि आरोग्य अवलंबून असतं.
एखाद्या सुट्टीच्या दिवशी तुम्हाला काही स्पेशल बनवून खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही हे झणझणीत झुणका भाकर Maharashtrian Zunka Marathi Recipe बनवून नक्की खाऊ शकता. तुमच्या घरातील सर्वाना हे टेस्टी झुणका भाकर नक्की खायला द्या. अशा पध्दतीने आपल्या पारंपरिक मराठी खाद्यपदार्थांची ओळख आपल्या लहान मुलांनासुद्धा होईल आणि घरातील मोठी माणसंसुद्धा या पारंपरिक पदार्थांचा मनभरून आस्वाद घेऊ शकतील. तुम्ही ही स्पेशल झुणका भाकर रेसिपी नक्कीच बनवून पहा.
तुम्हाला ही Maharashtrian Zunka Marathi Recipe रेसिपी आवडली का नक्कीच सांगा. अशाच खमंग आणि झणझणीत रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद !