Tilachi Chikki Recipe In Marathi
Tilachi Chikki Recipe In Marathi मकरसंक्रांतीचा सण आपल्याकडे खूप उत्साहात साजरा करतात. या सणाला पतंग उडवतात, सोबत स्त्रियांचे कार्यक्रम असतात आणि मुख्य म्हणजे तिळाचे खूप सारे प्रकारचे पदार्थसुद्धा बनवले जातात. मकरसंक्रांतीला आपल्याकडे तिळाचं खूप महत्व आहे. या सणाला खाण्यासाठी आपण तिळाचे लाडू, शेंगदाण्याची चिक्की, शेंगदाणे, तीळ आणि गुळाचे अतिशय टेस्टी लाडूसुद्धा बनवत असतो.
पण दरवर्षी हेच पदार्थ खाल्ल्यामुळे कंटाळा येतो त्यामुळे यावेळी तुम्ही तिळाची चिक्की Tilachi Chikki Recipe In Marathi हा नवीन पदार्थ नक्कीच बनवून पाहू शकता. तिळाची चिक्की हा यावर्षीच्या मकरसंक्रांतीला बनवण्यासाठी एक नवीन आणि उत्तम पर्याय आहे. तिळाची चिक्की चवीला तर स्वादिष्ट असतेच पण आपल्या आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर आहे. तुमच्या घरातील लहान मुलांसह मोठ्यांनाही ही चिक्की नक्कीच आवडेल.
आज आम्ही तुमच्यासाठी कुरकुरीत तिळाची चिक्की बनवण्याची अगदी सोपी Tilachi Chikki Recipe In Marathi रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवून पहा म्हणजे तुमच्या मकरसंक्रांतीचा आनंद आणखीनच द्विगुणित होईल आणि सर्वांचं तोंड गोडसुद्धा होईल.
तिळाची चिक्की बनवण्याचं साहित्य :
तिळाची चिक्की Tilachi Chikki Recipe In Marathi बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.
- 250 ग्रॅम पांढरे तीळ
250 ग्रॅम चिक्कीचा गूळ
2 चमचे तूप
थोडेसे काजू आणि पिस्त्याचे काप
थोडंसं जायफळ
1 चमचा वेलची पूड
2 चमचे पाणी
तिळाची चिक्की बनवण्याची कृती :
1. तिळाची चिक्की Tilachi Chikki Recipe In Marathi बनवण्यासाठी सर्वात आधी आपण तीळ भाजून घेणार आहोत. एक पॅन मंद गॅसवर ठेवून त्यात 250 ग्रॅम तीळ टाकायचे आणि चमच्याने हलवत चांगले खरपूस रंग येईपर्यंत 3 ते 4 मिनिटे भाजून घ्यायचे आहेत.
2. आपले तीळ जास्त आहेत त्यामुळे याला भाजायला 4-5 मिनिटे लागतील. जर तुम्ही तीळ कमी घेतले तर ते 2-3 मिनिटांत भाजून होतात. तीळ आपल्याला चमच्याने सलग हलवत राहायचे आणि गॅस एकदम मंद ठेवायचा.
3. आता 4 ते 5 मिनिटे झालीत आणि आपले तीळ छान भाजून झालेले आहेत. गॅस बंद करूया आणि हे तीळ लगेचच दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. हे तीळ तुम्ही खाऊन बघू शकता. खाल्ल्यानंतर खूप क्रिस्पी लागतात.
4. एका बोर्डला आपण थोडं तूप लावून घेऊया. यावर आपण आपल्या चिक्कीचं मिश्रण पसरवणार आहोत त्यामुळे याला आधीच तूप लावून घेऊया. यामुळे मिश्रण पसरवल्यावर आपली चिक्की सहज निघणार. बोर्डला तूप लावून झालंय.
5. दुसऱ्या पॅनमध्ये आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा आहे. त्यासाठी पॅन गॅसवर ठेवायचा. त्यात 1 चमचा तूप टाकायचं. तुपामुळे चिक्कीला छान चकाकी येते. त्यानंतर 250 ग्रॅम चिक्कीचा गूळ टाकायचा. आपण 250 ग्रॅम तीळ घेतले होते म्हणून 250 ग्रॅमच गूळ घ्यायचा. तीळ आणि गूळ दोन्ही वजनात समप्रमाणात घ्यायचे.
6. हा गूळ पॅनमध्ये टाकून द्यायचा. त्यानंतर 2 चमचे पाणी टाकायचं. गॅसच्या कमी फ्लेमवर आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे. आता आपण हा गूळ वितळून घेऊया. गॅस मंद ठेवलेला आहे. साधारण 5 ते 6 मिनिटे गूळ वितळायला लागतील. चमच्याने हलवत राहायचं आहे.
7. आपला गूळ छान वितळला आहे. 6 ते 7 मिनिटे गूळ वितळायला लागलीत. आपला गूळ पूर्णपणे वितळला आहे. आता गॅसच्या स्टँडवर आणखी एक स्टॅण्ड ठेवायचं आणि मग त्यावर आपला पॅन ठेवायचा कारण आपल्याला एकदम कमी फ्लेम पाहिजे. यामुळे आपला गूळ पॅनला खालून लागणार नाही किंवा काळा पडणार नाही. गॅस आपला एकदम कमी आहे आणि दोन स्टॅण्ड ठेवून हा गूळ शिजवून घ्यायचाय. चमच्याने हे सलग हलवत राहायचं.
8. आता आपला पाक झाला की नाही ते चेक करायचं असेल तर एका कपमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात हा पाक टाकायचा. यानंतर बोटाने हा पाक पाहायचा. अजून पाक पातळ आहे त्यामुळे अजून 1-2 मिनिटे शिजवून घेऊया.
जर तुम्ही या स्टेजवर गुळामध्ये तीळ टाकले तर चिक्की वातळ होईल.
9. पुन्हा 2 मिनिटांनी पाक पाण्यात टाकून चेक करूया. पाक बोटांनी पाहिल्यावर तो अजूनही क्रिस्पी व्हायला थोडासा वेळ आहे. पुन्हा 2 मिनिटे पाक शिजवल्यावर तो पाण्यात टाकून पाहायचा. बोटाने चेक केल्यावर पाक थोडासा कडक झालेला आहे आणि आपल्याला हीच कंसिस्टंसी हवी आहे.
जर तुम्ही यापेक्षा जास्त वेळ गूळ शिजवला तर चिक्की फार कडक होईल.
10. यामध्ये 1 छोटा चमचा वेलची पूड टाकायची, काजू आणि पिस्त्याचे काप टाकायचे. त्यानंतर आपले तीळ टाकून चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं. आपल्याला गॅस एकदम मंद ठेवायचा आहे.
थोडंसं जायफळ किसणीने छान किसून घालायचं. जायफळाचा खूप छान स्वाद येतो. पाक शिजायला 15 मिनिटे लागलीत कारण आपण पाक मंद गॅसवर शिजवून घेतला आहे.
11. आपले तीळ गुळाच्या पाकाबरोबर छान एकजीव झाले आहेत. गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण तुपाने ग्रीस केलेल्या बोर्डवर पसरून घ्यायचं. हे काम लवकर लवकर करायचं आहे.
12. हे मिश्रण बोर्डवर काढून घेऊया. गरम असतानाच आपल्याला हे सगळं करायचं आहे. चमच्याने मिश्रण बोर्डवर पसरून घेऊया. आता लाटण्याला तूप लावून घ्यायचं आणि लाटण्याने हे मिश्रण छान पसरून घ्यायचं. आता याचे काप करून घेऊया. गरम असतानाच याचे काप करून घ्यायचे आहेत.
तुम्हाला जसा शेप हवा असेल त्या शेपमध्ये तुम्ही कापू शकता. तुम्हाला जर सुरीने कापायचं असेल तर ओढून कापायचं नाही. सुरीने मिश्रणावर प्रेस करा वरती खेचा असं करायचं. सुरीने ओढून कापलं तर चिक्कीचा शेप बिघडतो. तुमच्याकडे मोठी सुरी असेल तर ती तुम्ही वापरू शकता. हाताने सुरीवर दाब द्यायचा आणि वर खेचायचं. तुमच्याकडे स्टीलचा सराटा असेल तर सराटा उभा करून टोकाने काप करून वर खेचायचं त्यामुळे चिक्की छान कट करता येते.
13. आपली चिक्की छान कापून झाली आहे. आता 20 ते 25 मिनिटे छान थंड होऊ देऊया म्हणजे आपली क्रिस्पी चिक्की तयार होईल.
25 मिनिटांनंतर आपली चिक्की छान तयार झाली आहे. आता ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया. ही चिक्की छान कुरकुरीत होते फक्त आपल्याला गूळ चांगला शिजवून घ्यायचा आहे. ही चिक्की Tilachi Chikki Recipe In Marathi तुम्ही घरच्यांना टेस्ट करायला देऊ शकता.
Solkadhi Recipe In Marathi | सोलकढी रेसिपी मराठी
महत्वाच्या टिप्स :
1. आपण चिक्कीचं मिश्रण एका बोर्डवर पसरवणार आहोत त्याला आधीच तूप लावून घ्यायचं म्हणजे आपली चिक्की सहज निघते.
2. गूळ पूर्णपणे कढईत वितळल्यानंतर गॅसच्या स्टँडवर आणखी एक स्टँड ठेवायचं आणि मग त्यावर आपली कढई ठेवायची म्हणजे आपल्याला एकदम कमी फ्लेम मिळेल यामुळे आपला गूळ कढईला खाली लागणार नाही किंवा काळा पडणार नाही.
3. आपला पाक झाला का नाही ते पाहण्यासाठी पाक पाण्यात टाकून पाहायचा जर पाक बोटाला कडक लागला तर तसाच आपल्याला हवा आहे.
4. पाक नरम असताना तीळ गुळाच्या पाकामध्ये घातले तर चिक्की वातळ होईल.
5. पाक कडक झाल्यावर जर यापेक्षा जास्त वेळ गूळ शिजवला तर आपली चिक्कीसुद्धा कडक होते.
6. तिळाचं मिश्रण गुळाच्या पाकाबरोबर एकजीव झाल्यानंतर ते मिश्रण लगेच बोर्डवर काढून घ्यायचं आणि गरम असतानाच त्याचे काप करून घ्यायचे.
7. तुम्ही जर सुरीने चिक्की कापत असाल तर सूरी ओढून चिक्की कट करायची नाही त्यामुळे चिक्कीचा शेप बिघडतो. मिश्रणावर प्रेस करायचं वर खेचायचं अशाप्रकारे कट करायचं म्हणजे चिक्की छान कापली जाते.
8. तिळाची चिक्की Tilachi Chikki Recipe In Marathi छान कुरकुरीत होण्यासाठी गुळाचा पाक चांगला शिजवून घ्यायचा.
या मस्त टिप्स वापरून तुम्ही कुरकुरीत तिळाची चिक्की Tilachi Chikki Recipe In Marathi सहज आपल्या घरी बनवू शकता.
FAQ’s About Tilachi Chikki Recipe In Marathi काही महत्त्वाचे प्रश्न :
1. कुरकुरीत तिळाची चिक्की कशी बनवली जाते ?
तिळाची चिक्की Tilachi Chikki Recipe In Marathi बनवण्यासाठी सर्वात आधी पॅनमध्ये खरपूस रंग येईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे. तीळ भाजून झाल्यावर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. चिक्कीचं मिश्रण पसरवण्यासाठी एका बोर्डला तूप लावून घ्यायचं. आता एका पॅनमध्ये गुळाचा पाक तयार करून घेऊया. गॅसवर पॅनमध्ये गूळ टाकायचा आणि वितळून घ्यायचा. गूळ शिजवून त्याचा कडक पाक होऊ द्यायचा. मग त्यात वेलची पूड, काजू पिस्त्याचे काप आणि तीळ टाकून हे मिश्रण चमच्याने एकजीव करायचं. तिळाचं मिश्रण गुळाच्या पाकाबरोबर मिक्स झाल्यावर ते बोर्डवर पसरून घ्यायचं आणि त्याचे चिक्कीच्या आकाराचे काप करायचे. आपली तिळाची चिक्की तयार आहे.
2. तिळाची चिक्की खाण्याचे काय काय फायदे आहेत ?
तिळाची चिक्की Tilachi Chikki Recipe In Marathi खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. ही तिळाची चिक्की आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करते. आपलं शरीर उबदार ठेवते. आपल्या पचनाच्या समस्या कमी होतात. पोटाचे विकार कमी होतात. असे अनेक प्रकारचे फायदे तिळाची चिक्की खाल्ल्यामुळे शरीराला होतात त्यामुळे ही आरोग्यदायी चिक्की नक्कीच खायला हवी.
तुम्ही यावर्षीच्या मकरसंक्रांतीला तिळाची चिक्की Tilachi Chikki Recipe In Marathi नक्कीच बनवा आणि आपल्या घरातील सर्वांना ती खायला द्या. ही तिळाची चिक्की खाऊन नक्कीच सर्वांना खूप छान वाटेल. सणाचा आनंद यामुळे आणखीनच वाढेल यात शंका नाही. मकरसंक्रांतीला तिळाचा हा नवीन पदार्थ खूपच स्वादिष्ट आहे आणि प्रत्येकाला आवडेल असाच आहे. तुम्ही ही नवीन रेसिपी एकदा नक्कीच बनवून पहा म्हणजे तुम्ही पुन्हा पुन्हा नक्कीच बनवाल. तुमच्या घरातील लहान मुलांना तर ही कुरकुरीत तिळाची चिक्की खूप जास्त आवडेल हे नक्की.
तुम्हाला ही Tilachi Chikki Recipe In Marathi रेसिपी आवडली का नक्कीच सांगा. अशाच कुरकुरीत आणि टेस्टी रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद !