Solkadhi Recipe In Marathi
Solkadhi Recipe In Marathi मैत्रिणींनो एप्रिल महिना सुरू झालाय आणि त्याचबरोबर कडकडीत उन्हामुळे सगळीकडे वातावरण खूपच तापलंय. दिवसा आणि रात्रीसुद्धा उकाड्यामुळे जीव अगदी हैराण झालाय. काहीच खाण्याची ईच्छा होत नाही आणि उन्हामुळे सारखा घसा कोरडा पडतो. अशावेळी प्रत्येकजण काहीतरी थंडगार पेय पिण्याचा विचार करतो. परंतु ते आरोग्यदायी देखील असणे गरजेचे आहे. कारण उन्हाळ्यात निरोगी राहणं फार महत्त्वाचं आहे.
मग निरोगी राहण्यासाठी मार्केटमधील कोल्डड्रिंक्स न पिता घरातील लिंबू पाणी, ताक, लस्सी, मठ्ठा, सोलकढी, कैरीचं पन्हं हे सगळं पिणं अतिशय फायदेशीर आहे. ही सर्व थंडपेय पिल्यामुळे आपल्या शरीराला योग्य ते सर्व घटक मिळतात आणि आपलं आरोग्य उत्तम राहतं. बाहेरची थंडपेय पिण्यापेक्षा घरगुती काही बनवणं हे नेहमीच उत्तम आहे.
तुम्हाला जर या उन्हाळ्यात काही थंडगार आणि आरोग्यदायी बनवायचं असेल तर सोलकढी Solkadhi Recipe In Marathi हादेखील एक उत्तम पर्याय आहे. सोलकढी ही आपल्या कोकण मालवण भागातील अतिशय प्रसिद्ध पेय आहे. हे तुम्ही जेवणासोबत किंवा जेवणानंतर पाचक पदार्थ म्हणून पिऊ शकता. सोलकढी भाताबरोबरसुद्धा खाल्ली जाते. आमसुलातील पोषक तत्व जेवण पचण्यास मदत करतात.
सोलकढी Solkadhi Recipe In Marathi ही पित्तशामक आणि आरोग्यदायी आहे. सोलकढी आपल्या शरीरास थंडावा देते, पचनास मदत करते आणि शरीरातील पाण्याचं प्रमाणही योग्य ठेवते असे त्याचे अनेक फायदे आहेत.
कडक उन्हाळ्यात थंडगार सोलकढी पिण्याची मजा काही औरच आहे. यासोबतच तुम्ही पाहुणे घरी आल्यावरही त्यांना सोलकढी देऊ शकता तेसुद्धा सोलकढी पिऊन तृप्त होतील. आज आम्ही हीच थंडगार सोलकढी घरी बनवण्याची सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत. आपण ही सोलकढी दोन प्रकारे सर्व्ह करू शकतो ते आपण पुढे Solkadhi Recipe In Marathi रेसिपीमध्ये बघणार आहोत.
सोलकढी बनवण्याचं साहित्य :
सोलकढी Solkadhi Recipe In Marathi बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.
- 10 ते 12 कोकम किंवा आमसूल
भिजवण्यासाठी गरम पाणी
1 ओलं खोबरं बारीक काप केलेले
2 हिरव्या मिरच्या
3-4 लसणाच्या पाकळ्या
अर्धा इंच आल्याचा तुकडा
आवश्यकतेनुसार कोमट पाणी
1 छोटा चमचा साखर
चवीपुरतं मीठ
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
तडका देण्यासाठी साहित्य :
- 1 चमचा तेल
अर्धा चमचा मोहरी
अर्धा चमचा जिरे
थोडीशी कढीपत्त्याची पानं
थोडंसं हिंग
सोलकढी बनवण्याची कृती :
1. सोलकढी Solkadhi Recipe In Marathi बनवण्यासाठी सर्वात आधी एका वाटीमध्ये 10 ते 12 कोकम किंवा आमसूल घेतलेले आहेत. ताजे आमसूल असतील तर फारच चांगलं होईल. हे आमसूल आपल्याला अर्धा तास गरम पाण्यात भिजत ठेवायचे आहेत. आपल्याला याचा रस काढून घ्यायचा आहे.
2. हे कोकम आमसूल भिजतील एवढं गरम पाणी वाटीमध्ये टाकायचं आणि अर्धा तास भिजत ठेवायचं.
3. तोपर्यंत दुसरीकडे आपल्याला 1 ओल्या नारळाचे चाकूने बारीक काप करून घ्यायचे आहेत. मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये आपण याचा चव तयार करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यात काढून पाणी न टाकताच हे वाटून घ्यायचंय. आपला नारळाचा चव तयार आहे. आता आपण यापासून नारळाचं दूध तयार करणार आहोत.
4. त्यासाठी मिक्सरचा ज्युसर पॉट घ्यायचा. त्यामध्ये हा नारळाचा चव टाकायचा, 2 हिरव्या मिरच्या, 3-4 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, आवश्यकतेनुसार कोमट पाणी टाकून हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं.
5. मिश्रण वाटून झाल्यावर ते गाळून घ्यायचं आहे. त्यासाठी एक बाऊल घ्यायचा त्यावर गाळणी ठेवायची. बारीक छिद्र असलेली गाळणी आपल्याला वापरायची आहे. तुम्ही गाळण्याकरिता सुती कपड्याचाही उपयोग करू शकता.
6. आता आपलं हे वाटण गाळणीवर टाकून गाळून घेऊया. वरून चमच्याने दाबून नारळाचं दूध काढून घ्यायचं. पहिली बॅचमधून आपलं नारळाचं घट्ट दूध निघालंय. आता दुसरी बॅचमध्ये याचा जो चोथा उरलेला आहे त्यात थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घेऊया. हे गाळणीवर टाकून हाताने दाबून किंवा चमच्याने दाबून रस काढायचा. पुन्हा हा उरलेला चोथा मिक्सरमध्ये टाकून त्यात थोडंसं पाणी टाकून फिरवून घ्यायचं. 3 बॅचेसमध्ये आपण हे दूध काढलेलं आहे.
7. आपलं नारळाचं दूध तयार आहे. हा जो चोथा उरलेला आहे तो तुम्ही भाजी करण्यासाठी किंवा चटणी करण्यासाठी वापरू शकता. ओल्या नारळाचा कुठलाही पदार्थ करण्यासाठीही वापरू शकता. छान घट्टसर आपलं नारळाचं दूध तयार झालेलं आहे. यामध्ये आपण मिरची, आलं आणि लसूण घातलेलं आहे त्यामुळे या दुधाला छान फ्लेवर आहे.
8. आपण जे कोकम भिजत घातलेले होते त्याला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे. त्याला थोडंसं पाण्यामध्ये कुस्करून घेऊया. छान रस काढून घ्यायचा. खूप छान रंगसुद्धा आलेला आहे.
9. आता आपण हा कोकमचा रस गाळणीने दुधामध्ये गाळून घेऊया. छान जांभळा रंग आलेला आहे. बाजारात कोकम आगळसुद्धा मिळतात तुम्ही तेही वापरू शकता. पण त्यात बरेचसे आर्टिफिशियल कलर वापरलेले असतात त्यापेक्षा घरी केलेलं कधीही उत्तम. रवीने हे चांगलं मिक्स करून घेऊया. थोडा अजून रस गाळून घालूया. 10 ते 12 कोकमचा छान असा रस निघतो. पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं. आपल्या सोलकढीला मस्त रंग आलेला आहे.
10. यामध्ये 1 छोटा चमचा साखर टाकायची. तुम्हाला गोड आवडत नसेल तर साखर नाही टाकली तरी चालेल. चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करायचं.
बाजारात मिळणारी सोलकढी Solkadhi Recipe In Marathi खूप गुलाबी असते कारण त्यात कलरचा वापर करतात किंवा त्यात बीटसुद्धा वापरतात पण आपल्याला घरी असं काहीच करायचं नाहीये.
11. आपली सोलकढी Solkadhi Recipe In Marathi तयार आहे. सर्व्ह करण्यापूर्वी तुम्ही अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि त्यानंतर सर्व्ह करू शकता. ही थंडगार सोलकढी खूप आरोग्यदायी, पित्तशामक आहे.
बऱ्याचदा जास्त जेवण झाल्यावर ही सोलकढी Solkadhi Recipe In Marathi घेतली तर जेवण पचायला सोपं होतं. यासोबतच याचे अनेक दुसरेसुद्धा फायदे आहेत. घरी आलेल्या पाहुण्यांनादेखील आपण सोलकढी देऊ शकतो.
12. सोलकढी Solkadhi Recipe In Marathi ही भाताबरोबरसुद्धा खाल्ली जाते त्यामुळे आपण उरलेल्या सोलकढीला फोडणी देऊया. त्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करायचं. तेल गरम झाल्यावर गॅस बंद करायचा. मग तेलात अर्धा चमचा मोहरी, मोहरी चांगली तडतडली की त्यात अर्धा चमचा जिरे, थोडेसे कढीपत्त्याची बारीक चिरलेली पानं आणि थोडासा हिंग टाकायचा. आपली फोडणी छान झालीय. ती सोलकढीत टाकायची आणि चमच्याने ढवळून घ्यायची.
13. सोलकढी भाताबरोबर खायची असेल किंवा जेवण करताना सोबत खायची असेल तर तुम्ही याला फोडणी देऊ शकता. खूप अप्रतिम चव लागते. पण तुम्हाला जेवण झाल्यावर प्यायची असेल किंवा पाहुण्यांना द्यायची असेल तर फोडणी न देता पिऊ शकता.
आपण भाताबरोबर ही सोलकढी Solkadhi Recipe In Marathi सर्व्ह करूया. गरमागरम मऊ लुसलुशीत भात आणि थंडगार सोलकढी हे खूप जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. सोलकढी हा उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा पदार्थ आहे. तुम्ही नक्कीच बनवून पहा.
Veg Khichda Recipe In Marathi| व्हेज खिचडा रेसिपी मराठी
Solkadhi Recipe In Marathi महत्वाच्या टिप्स :
1. नारळाचं दूध काढल्यानंतर जो चोथा उरलेला आहे तो भाजी करण्याकरिता, चटणी करण्याकरिता किंवा ओल्या नारळाचा कोणताही पदार्थ करण्यासाठी वापरू शकता.
2. आपण कोकमचा रस घरीच काढून घेणार आहोत. मार्केटमध्ये कोकम आगळसुद्धा मिळतात ते वापरायचं नाही कारण त्यात बरेचसे आर्टिफिशियल रंग वापरलेले असतात. त्यापेक्षा घरी केलेलं कधीही उत्तम आहे.
3. बाहेर जी सोलकढी Solkadhi Recipe In Marathi मिळते ती खूप गुलाबी रंगाची असते त्यासाठी त्यात कलर टाकला जातो किंवा बीटसुद्धा वापरला जातो. पण आपण असं काहीच करायचं नाही.
4. हेवी जेवण झाल्यावर सोलकढी पिली तर जेवण पचायला सोपं जातं.
5. सोलकढी Solkadhi Recipe In Marathi भाताबरोबर खायची असेल किंवा जेवण करताना सोबत खायची असेल तर तुम्ही याला फोडणी देऊ शकता आणि जर तुम्हाला जेवण झाल्यावर किंवा पाहुण्यांना द्यायची असेल तर फोडणी न देता पिऊ शकता.
तुम्ही या छान टिप्स वापरून टेस्टी सोलकढी सहज बनवू शकता.
Solkadhi Recipe In Marathi FAQ’s काही महत्त्वाचे प्रश्न :
1. टेस्टी सोलकढी कशी बनवली जाते ?
सोलकढी बनवण्यासाठी एका वाटीमध्ये कोकम घ्यायचे आणि त्यात गरम पाणी टाकून भिजत ठेवायचे. त्यानंतर एका ओल्या नारळाचे चाकूने बारीक काप करून ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. नारळाचा चव तयार आहे. आता
मिक्सरच्या ज्युसर पॉटमध्ये नारळाचा चव, हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, आलं आणि कोमट पाणी टाकून वाटून घ्यायचं.
त्यानंतर एका बाऊलवर गाळणी ठेवून हे मिश्रण गाळून घ्यायचं. यामधून बाऊलमध्ये नारळाचं दूध काढायचं आहे. उरलेला चोथा हा पुन्हा मिक्सरमध्ये टाकायचा आणि पाणी टाकून वाटून घ्यायचा. पुन्हा तो गाळणीवर टाकून रस काढायचा. आपलं नारळाचं दूध तयार आहे. यात कोकमचा रस टाकून मिक्स करायचा. साखर, मीठ आणि कोथिंबीर टाकून मिक्स करायचं. आपली सोलकढी तयार आहे. तुम्ही सोलकढीला फोडणीसुद्धा देऊ शकता.
2. सोलकढी पिण्याचे कोणकोणते फायदे आहेत ?
सोलकढी Solkadhi Recipe In Marathi पिण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. ही सोलकढी पित्तशामक आणि अतिशय आरोग्यदायी आहे. शरीरातील उष्णता कमी करते. बद्धकोष्ठ आणि अपचनापासून आराम देते. डायबिटीजच्या पेशंटसाठी कोकममधील खनिजांमुळे साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं. त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी आणि नितळ तेजस्वी त्वचा होण्यासाठी सोलकढी मदत करते.
कडक उन्हाळ्यात आपल्या शरीराला थंडावा, एनर्जी आणि पाण्याचं प्रमाण योग्य करणारी ही आरोग्यदायी सोलकढी नक्कीच बनवायला हवी. ही सोलकढी बनवून तुम्ही घरच्यांनासुद्धा टेस्ट करायला द्या. सगळे या सोलकढीचे फॅन होऊन जातील. तुम्ही ही रेसिपी लवकरच ट्राय करून पहा.
तुम्हाला ही Solkadhi Recipe In Marathi रेसिपी आवडली का नक्कीच सांगा. अशाच आरोग्यदायी रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद !