Masale Bhat Marathi Recipe 2024
Masale Bhat Marathi Recipe 2024 मैत्रिणींनो सध्या सगळीकडेच कडाक्याचा उन्हाळा सुरू झालेला आहे अशावेळी आपल्यापैकी कोणाचीही जेवणावर ईच्छा राहिलेली नाही सर्वजण फक्त काहीतरी थंडगार पिण्याच्या मनस्थितीत आहेत. जास्त उन्हामुळे जेवणापेक्षा काहीतरी थंड पेय पिण्याकडेच सर्वांचा कल असतो. मग जेवणात काय बनवावं हा प्रश्न तर आपल्यासमोर उभा राहतोच.
उन्हाळ्यात तशीही भूक कमी लागते आणि गर्मीमुळे कोणाला जेवणही चांगलं जात नाही. घरातल्या रोज त्याच त्याच मसालेदार भाज्या खाऊन कंटाळादेखील येतो अशावेळी हमखास आपल्या घरात मसालेदार भातच बनवला जातो. हा ऐनवेळी बनवला जाणारा मसालेभात अतिशय चविष्ट असतो आणि सर्वांना खूप आवडतो. लहान मुलंसुद्धा मसालेभात आवडीने खातात आणि यामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या टाकू शकतो. ज्या भाज्या मुलं खाण्याचा कंटाळा करतात त्याही नकळत मुलांच्या पोटात जातात.
आपण गावाहून घरी आलो आणि स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा आला तरी पटकन मसालेभात बनवण्याचा विचार मनात येतो. घरात आवडीच्या भाज्या संपल्या तरी मसालेभात हा चांगला पर्याय असतो. एवढंच काय लग्नाच्या जेवणामध्येही मसालेभात नेहमीच बनवला जातो. हा मसालेभात सगळ्यांना प्रचंड आवडतो.
आज आम्ही तुमच्यासाठी अगदी लग्नातल्यासारखा मसालेभात Masale Bhat Marathi Recipe 2024 घरच्याघरी बनवण्याची सर्वात सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत. आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे मसालेभात बनवला जातो. काही भागात यामध्ये तोंडल्याची भाजी, वांगं हे सगळं टाकलं जातं तर काही भागात फ्लॉवर, बटाटा, वाटाणे हे सगळं टाकतात. गोडा मसाला टाकल्यामुळे मसालेभाताला खास चव येते त्यामुळे गोडा मसाला नक्की वापरायचा. अतिशय आरोग्यदायी आणि चविष्ट मसालेभात आपण बनवणार आहोत. तुम्ही हा मसालेभात नक्कीच बनवून पहा.
मसाले भात बनवण्याचं साहित्य :
मसालेभात Masale Bhat Marathi Recipe 2024 बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.
- 1 कप साधा तांदूळ
- 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या
- 1 इंच आल्याचा तुकडा
- 3 मोठे चमचे तेल
- 1 छोटा चमचा मोहरी
- 1 छोटा चमचा जिरे
- 5-6 काळे मिरी
- 2 लवंगा
- दालचिनीचा तुकडा
- 1 मोठी ईलायची
- तेजपत्ता
- 4-5 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- 10-12 कढीपत्त्याची पानं
- 1 मोठा कांदा बारीक चिरलेला
- 2 चमचे किसलेलं खोबरं
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- पाव कप हिरवे वाटाणे
- 100 ग्रॅम मध्यम आकारात चिरलेली फ्लॉवर
- 2 मध्यम आकारात कापलेले बटाटे
- 2 छोटे चमचे हळद
- 2-3 चमचे लाल तिखट
- 1 छोटा चमचा जिरे पावडर
- चवीनुसार मीठ
- चिमूटभर हिंग
- 1 छोटा चमचा धनेपूड
- 3-4 चमचे गोडा मसाला
- चिमूटभर साखर
- दीड कप गरम पाणी
- थोडीशी कोथिंबीर
मसाले भात बनवण्याची कृती :
- मसालेभात Masale Bhat Marathi Recipe 2024 बनवण्यासाठी 1 कप साधा तांदूळ घ्यायचा आहे. नेहमी घरगुती भात बनवण्यासाठी आपण जो तांदूळ वापरतो तोच घ्यायचाय. हा तांदूळ आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. एका बाऊलमध्ये तांदूळ टाकायचे आणि वरून पाणी टाकायचं. हे तांदूळ आपल्याला घासून घासून धुवून घ्यायचे आहेत म्हणजे त्यातील स्टार्च पूर्णपणे निघून जाईल
- तांदूळ 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता त्यामध्ये पाणी घालून 10 मिनिटे भिजत ठेवूया त्यामुळे यातील फायटीक ऍसिड कमी होईल आणि तांदूळ पचायला हलके होतील.
- आता 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घ्यायचा. हे आपण छान ठेचून घेऊ.
- कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल घ्यायचं. तेल गरम झाल्यावर 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे टाकायचं. मोहरी जिरे छान तडतडलं की त्यात आपण खडे मसाले टाकणार आहोत. 5-6 काळे मिरी, 2 लवंगा, दालचिनीचा तुकडा, 1 मोठी वेलची टाकायची. तुम्ही तेजपत्तासुद्धा टाकू शकता. त्यानंतर आपण केलेला आलं लसणाचा ठेचा टाकायचा. 3-4 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 10-12 कढीपत्त्याची पानं टाकायची. हे सगळं थोडं परतून घ्यायचं.
- त्यानंतर 1 मोठा कांदा बारीक चिरलेला यात टाकायचा. कांदा 1 ते 2 मिनिटे छान परतून घ्यायचा. 2 चमचे किसलेलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव कप भिजवलेले हिरवे वाटाणे टाकायचे. आता आपल्याला फ्लॉवर 10 मिनिटे गरम पाण्यात भिजवून त्याचे मध्यम आकाराचे काप करून घालायचे. 2 बटाटे मध्यम आकाराचे काप करून टाकायचे.
- तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा टाकू शकता. बटाटा, फ्लॉवर आणि वाटाण्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर तुमच्याकडे वाटाणे नसतील तर तुम्ही शेंगदाणेसुद्धा टाकू शकता.
- आता यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत. 2 छोटे चमचे हळद, 2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर, 1 छोटा चमचा जिरे पावडर, चवीनुसार मीठ, चिमूटभर हिंग टाकून हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय. गॅस मध्यम फ्लेमवरच ठेवायचाय. हे परतून झाल्यावर यावर एक झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटे हलकीशी वाफ येऊ देणार आहोत.
- वाफ आल्यावर यामध्ये 1 छोटा चमचा धनेपूड, 3-4 चमचे गोडा मसाला टाकायचा. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मसालेभातात आपल्याला गोडा मसाला वापरायचाय त्यामुळे खूप छान चव येते. गोडा मसाला वापरल्यामुळे आपल्याला खडे मसाले वापरायची गरज नाही.
- त्यानंतर आपण जे तांदूळ पाण्यात भिजत घातले होते त्यातून पाणी काढून घ्यायचं आणि तांदूळ यात टाकून देऊया. तुम्हाला जर मसालेभात फार मसालेदार आणि तिखट लागत नसेल तर खडे मसाले नाही वापरायचे. गोडा मसाल्याची छान चव येते. पण तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही खडे मसालेही वापरू शकता.
- आता चिमूटभर साखर टाकायची. थोडीशी साखर टाकल्याने चव बॅलन्स होते. दीड कप गरम पाणी टाकायचं. गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आणि एक छान उकळी काढून घ्यायची. उकळी आल्यानंतर 2 ते 3 मिनिटे असंच शिजू द्यायचं. या पद्धतीने शिजवल्याने भात छान मोकळा होतो.
- छान उकळी आलेली आहे आता यावर झाकण ठेवूया आणि गॅस मध्यम फ्लेमवर करूया. भात शिजेपर्यंत 10 ते 12 मिनिटे शिजू देऊया. वेळ झाल्यानंतर झाकण काढायचं. आपला भात छान शिजलेला आहे. यातील वाफ आपल्याला काढायची नाही. यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया.
- गॅस बंद करायचा आणि कढईवर झाकण ठेवून 15 मिनिटे असंच राहू द्यायचं म्हणजे भात छान वाफेवर शिजतो.
आपला मसाले भात Masale Bhat Marathi Recipe 2024 तयार आहे. तो एका प्लेटमध्ये सर्व्ह करूया. 15 ते 20 मिनिटे भात थंड झाल्यावरच सर्व्ह करायचा म्हणजे भात छान मोकळा होतो. यासोबतच तुम्ही मठ्ठा आणि जिलेबीसुद्धा खाऊ शकता. हा मेन्यू लग्नाच्या पंगतीतसुद्धा असतो.
Patal Pohyancha Chivda Marathi Recipe | पातळ पोह्यांचा चिवडा
Important Tips For Masale Bhat Marathi Recipe
- तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यात घासून घासून धुवून घ्यायचा म्हणजे त्यातील स्टार्च निघून जातील. त्यानंतर तांदूळ पाण्यात भिजवून ठेवायचा म्हणजे त्यातील फायटीक ऍसिड कमी होईल आणि तांदूळ पचायला हलका होतो.
- तुम्हाला मसालेभात जास्त तिखट आणि मसालेदार हवा असेल तर तुम्ही यात खडे मसाले वापरू शकता. पण तुम्हाला तिखट आणि मसालेदार लागत नसेल तर खडे मसाले न वापरता गोडा मसाला टाकायचा. यामुळे छान चव येते.
- तांदळात गरम पाणी टाकल्यावर एक उकळी येऊ द्यायची आणि 2 ते 3 मिनिटे उकळी आल्यावर असाच शिजू द्यायचा म्हणजे आपला भात छान मोकळा होतो. मसालेभात 15 ते 20 मिनिटे थंड झाल्यावर सर्व्ह करायचा म्हणजे छान मोकळा होतो.
- मसालेभात Masale Bhat Marathi Recipe 2024 बनवताना गोडा मसाला टाकल्यामुळे त्याला वेगळीच चव येते त्यामुळे गोडा मसाला नक्की वापरायचा.
तुम्ही या टिप्स वापरून टेस्टी मसालेभात Masale Bhat Marathi Recipe 2024 नक्की बनवू शकता.
FAQ’s For Masale Bhat Marathi Recipe
- Masale Bhat Marathi Recipe 2024 कसा बनवता येतो ?
मसालेभात बनवण्यासाठी तांदूळ धुवून घ्यायचा आणि एका भांड्यात टाकून पाण्यात भिजवून ठेवायचा. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून सगळे मसाले टाकायचे. मग त्यात चिरलेला कांदा, किसलेलं खोबरं, चिरलेली कोथिंबीर, हिरवे वाटाणे, कापलेला फ्लॉवर, कापलेला बटाटा टाकायचा. त्यानंतर सुके मसाले टाकायचे. मग आपण भिजवलेला तांदूळ टाकायचा आणि गरम पाणी टाकायचं. उकळी येऊ द्यायची आणि आपला मसालेभात तयार आहे.
- मसालेभात आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे का ?
मसालेभात Masale Bhat Marathi Recipe 2024 आपल्या आरोग्यासाठी चांगला असतो कारण मसालेभात बनवताना तांदळात अनेक प्रकारचे मसाले टाकले जातात. यामधून शरीराला अनेक पोषकद्रव्ये मिळतात. अनेक भाज्यासुद्धा या मसालेभातात टाकलेल्या असतात.
- दररोज भात खाणं चांगलं आहे का ?
दररोज भात खाणं चांगलं असतं. पण त्यासोबत दुसरे वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ खाणंही महत्वाचं आहे कारण त्यामधून आपल्या शरीराला गरज असलेले पोषकद्रव्ये मिळतात. तुम्ही दुसऱ्या अन्नपदार्थांसोबत भात रोज खाऊ शकता.
- तांदूळ भिजवल्याने त्यातील पोषक तत्वे निघून जातात का ?
तांदूळ शिजवण्याच्या आधी ते पाण्यामध्ये भिजवल्याने त्यातील अशुद्धी दूर होतात. यासोबतच त्याचे पौष्टिक मूल्य वाढते आणि त्यातील पोषण शोषण्याची क्षमता वाढते. तांदूळ पाण्यात भिजवल्यानंतर तो पचण्याससुद्धा हलका होतो. तांदूळ पाण्यात भिजवल्याने अनेक फायदे होतात.
आपला एकदम टेस्टी मसालेभात Masale Bhat Marathi Recipe 2024 तयार आहे. तो तुम्ही नक्की बनवा आणि तुमच्या घरच्यांना खायला द्या. इतका चविष्ट मसालेभात सर्वांना नक्कीच आवडेल आणि ते तुम्हाला पुन्हा पुन्हा नक्कीच बनवायला लावतील. तुम्ही ही मसालेभात Masale Bhat Marathi Recipe 2024 रेसिपी नक्कीच एकदा बनवून पहा.
तुम्हाला ही Masale Bhat Marathi Recipe 2024 रेसिपी आवडली का नक्कीच सांगा. अशाच नवनवीन मसालेदार रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.