CID 2 On Sony TV हा क्राईम शो तर आपण सगळ्यांनीच पाहिला असेल. 1998 साली टीव्हीवर सुरू झालेल्या या शोने पुढे अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी शो म्हणून याकडे पाहिले जाते. CID मधील एसीपी प्रद्युम्न, अभिजीत, दया, डॉक्टर साळुंके, तारिका ही सर्वच पात्रं प्रेक्षकांची आवडती आहेत. तब्बल 20 वर्ष अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 2018 मध्ये या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. अचानक हा शो बंद करण्याचा निर्णय घेतल्याने प्रेक्षक खूप नाराज झाले होते. इतक्या वर्षानंतरही फॅन्स शोला खूप मिस करत असतात.
CID 2 On Sony TV
पण आता CID च्या फॅन्ससाठी खूपच आनंदाची बातमी समोर आली आहे. आपले आवडते दया आणि अभिजीत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पण हे दोघे आपल्या जुन्या भूमिकेतून नाही तर एक नवीनच शो घेऊन येणार आहेत. अभिनेता दयानंद शेट्टी आणि अभिनेता आदित्य श्रीवास्तव एक नवीन शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करतील.
अभिनेता दयानंदने एका मुलाखतीत सांगितलं की आम्ही दोघे परतणार आहोत पण दया आणि अभिजीत म्हणून नाही. आम्ही मागील 20 वर्षांपासून गुन्ह्यांची उकल करण्याचा प्रयत्न करत होतो पण आता तसं होणार नाही. CID शोची जुनी टीम एका ट्रॅव्हल शोच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. हा शो ते मे महिन्यात युट्युबवर लॉन्च करणार आहेत.
कलर्स मराठीवर आणखीन एक नवीन मालिका सुरु होणार
या शोमध्ये प्रेक्षकांना एक वेगळाच आनंद अनुभवता येणार आहे. CID 2 On Sony TV आपल्या आवडत्या कलाकारांच्या प्रवासातल्या गोष्टी, त्यांच्या गंमती जमती, वेगवेगळं खाणं पिणं हे सर्व शोमध्ये पाहायला मिळेल. याआधी त्यांची टीम साताऱ्याला जाऊन फिरून आली आहे आणि आता ते पुढे गोव्याला जाण्याचा प्लॅन बनवत आहेत.
CID २ मालिका लवकरचं सुरु होणार
CID 2 On Sony TV याशिवाय आपले आवडते दया आणि अभिजीत आपल्याला एका चित्रपटातसुद्धा सोबत काम करताना दिसणार आहेत. त्यांनी या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केलीय आणि लवकरच तो आपल्याला पाहायला मिळेल.
सीआयडी शोच्या टीमचा हा नवीन शो प्रेक्षकांसाठी खास मेजवानीच असणार आहे. यामुळे आपल्या सर्वांच्याच जुन्या आठवणी नक्की ताज्या होतील यात शंका नाही.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद.