Heart Touching Marathi Story : परदेशातून शिक्षण घेऊन ती भारतात परत आली, तेव्हा तिला समजलं, तिचे आई बाप चार वर्षांपूर्वीचं या जगातून ….

Heart Touching Marathi Story

Heart Touching Marathi Story लंडनच्या सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध यूनिवर्सिटीचा दीक्षांत समारोह सुरू होता. यावर्षी डॉक्टर बनलेल्या सर्व विद्यार्थ्यांची नावे स्टेजवर अनाउन्स केली जात होती आणि एकानंतर एक विद्यार्थी स्टेजवर जाऊन आपली डिग्री घेत होते सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता आणि अचानक कांचन शिंदे हे नाव पुकारलं गेलं. सडपातळ बांध्याची, अवघी साडेचार फूट उंची असलेली, साधीसुधी दिसणारी कांचन शिंदे स्टेजवर आली आणि टाळ्यांचा एकचं कडकडाट झाला. कारण कांचनने संपूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये पहिला क्रमांक मिळवला होता.

कांचनला तिची डिग्री देण्यात आली आणि मनोगत व्यक्त करण्यास सांगितलं गेलं. कांचन माईकसमोर येते आणि म्हणते, “आज मी माझ्या मातृभाषेत मराठीत बोलणार आहे. मी इंग्रजीत बोलू शकते, परंतु ज्या भाषेत मी माझ्या आयुष्यातील पहिला शब्द बोलले, माझ्या आई-वडिलांना जी भाषा समजते, त्या भाषेतचं मला बोलायचंय. मित्रांनो, मी मुंबईतील एका झोपडपट्टीमध्ये राहणारी अतिशय गरीब घरातील मुलगी. माझे आई बाबा हे दोघेही रोजंदारीवर काम करतात. मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये विटा, वाळू वाहण्याचं आणि पेंटिंगचं काम करतात.

Heart Touching Marathi Story

परंतु लहानपणापासूनचं त्यांनी माझ्यासाठी एक स्वप्न पाहिलं होतं. मला डॉक्टर बनवायचं, खूप शिकवायचं.  मी शाळेत हुशार होते. आई-बाबांची परिस्थिती पाहून मी पुढे खूप शिकायचं ठरवलं. मला स्कॉलरशिप मिळाली आणि त्या स्कॉलरशिपच्या बळावर मुंबईच्या झोपडपट्टीत राहणारी एक मुलगी आज लंडनच्या सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध युनिव्हर्सिटीमध्ये येऊन डॉक्टर झाली आणि तिने पहिला नंबरही मिळवला.”

तिचं हे वाक्य संपताचं, संपूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये जमलेल्या विद्यार्थ्यांच्या टाळ्यांचा कडकडाट ऐकू येतो. कांचन म्हणते, “आज मी खूप आनंदी आहे आणि माझ्या यशाचं संपूर्ण श्रेय माझ्या आई बाबांना जातं. कारण त्यांनी आज मला या उंचीवर नेऊन ठेवलंय. त्यांच्यामुळे हे सगळ शक्य झालंय. तुम्हाला सर्वांना आश्चर्य वाटेल, परंतु मागील चार वर्षांपासून मी माझ्या घरी नाही गेले. कारण स्कॉलरशिपच्या पैशातून फक्त माझ्या शिक्षणाचा खर्च भागतो, परंतु चार वर्षात घरी जाण्याएवढे पैसे माझ्याकडे कधी नव्हतेचं. मी येथे काम केलं आणि आता मला घरी जाता येईल, एवढे पैसे कमावलेत. माझ्या आई-बाबांकडे कोणताही स्मार्टफोन नाहीये. त्यामुळे मी त्यांना कधी व्हिडिओ कॉलही नाही केला आणि मी त्यांच्याशी कधी फोनवरही बोलले नाही. कारण त्यांना असं वाटतं कज विदेशात फोन केल्यावर खूप पैसे लागतात. Heart Touching Marathi Story विसाव्या शतकासारखं आम्ही मागील चार वर्षांपासून एकमेकांबरोबर पत्रातून बोलतोय. पण आता मी लवकरच घरी जाणार आहे. माझ्या देशात जाऊन माझ्या आई-वडिलांना भेटणार आहे. देशवासीयांची सेवा करणार आहे.

कांचनचं मनोगत संपतं आणि सगळेजण तिच्यासाठी उभ राहून टाळ्या वाजवतात. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात. काही दिवसानंतर कांचन भारतात परत येते. एअरपोर्ट उतरल्यावर तिला असं वाटतं की, तिचे आई-बाबा तिच्या स्वागतासाठी आले असतील, Heart Touching Marathi Story तिला भेटण्यासाठी आले असतील. परंतु कोणीही आलेल नसतं. कांचन तिच्या घरी पोहोचते. तेव्हा तिच्या घराला टाळ लागलेलं असतं. तिला वाटतं की, आपली आणि आई-बाबांची चुकामुक झाली असेल. ते आपल्याला घेण्यासाठी एअरपोर्टवर गेले असतील. ती घराबाहेरचं त्यांची वाट पाहत थांबायचं ठरवते.

Marathi Sad Story

तेवढ्यात कांचनच्या शेजारी राहणारे काका काकू तेथे येतात आणि म्हणतात, “कांचन कधी आलीस तू ?” कांचन काका काकूंच्या पाया पडते आणि म्हणते, “आत्ताच आले. पण आई-बाबा कुठे गेलेत ? ते मला घेण्यासाठी एअरपोर्टवर गेले आहेत का ?” Heart Touching Marathi Story काका काकूंचा चेहरा पडतो. कांचनला काय उत्तर द्यावं, हेच त्यांना समजत नाही. कांचन विचारते, “काय झालं काका, तुम्ही उत्तर का देत नाही ? कुठे गेलेत माझे आई-बाबा, कुठे बाहेरगावी गेलेत का ?”

काका तिला म्हणतात, “कांचन चल आमच्या घरी. तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय.” आणि ते कांचनला आपल्या घरी घेऊन जातात. काकू कांचनसाठी चहा बनवते. कांचन विचारते, “काय झालं काका, मागील दहा मिनिटांपासून तुम्ही मला असंच बसवून ठेवलंय. सांगा ना, आई बाबा कुठे गेलेत ?” Heart Touching Marathi Story काका उठतात आणि आपल्या कपाटातून एक वर्तमानपत्र बाहेर काढतात. हे वर्तमानपत्र ते कांचनसमोर ठेवतात.

कांचन हे वर्तमानपत्र पाहते, तर त्यात एक बातमी आलेली असते. बातमीत लिहिलेलं असतं की, बिल्डिंगचं रंगकाम करताना, एका कामगार जोडप्याचा विसाव्या मजल्यावरून पडून मृत्यू. कांचन ही बातमी सविस्तर वाचते, तेव्हा तिला समजतं, Heart Touching Marathi Story ही तिच्याचं आई-बाबांच्या मृत्यूची बातमी होती आणि तीही आत्ताची नाही, तर चक्क चार वर्षांपूर्वीची, म्हणजे ती लंडनला शिकायला गेल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनंतरची.

ही बातमी वाचून कांचनला मोठा धक्का बसतो. काय बोलावं, काय विचारावं, रडावं का, हे तिला काही समजत नाही. ती स्वतःला कशीबशी सावरते आणि म्हणते, “काका हे काय आहे ? तुम्ही माझी चेष्टा करताय का ? Heart Touching Marathi Story काही दिवसांपूर्वी मी माझ्या आई-बाबांशी पत्राद्वारे बोलत होते. चार वर्षात असा एकही आठवडा गेला नाही की, त्यांनी मला पत्र पाठवलं नाही आणि यात असं लिहिलंय की, चार वर्षांपूर्वीच ते दोघे या जगातून गेलेत.”

Marathi Emotional Stories

काकू कांचनजवळ येते आणि तिला सावरते. तिचा हात घट्ट पकडते. कांचन खूप दुःखी झालेली असते. तिला काहीचं समजत नाही. Heart Touching Marathi Story तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. काका तिच्यासमोर हात जोडतात आणि म्हणतात, “मला माफ कर पोरी. परंतु मला हे सत्य माहित असतानाही, मी तुला नाही सांगितलं. कारण तुझ्या आई बाबांची तशी इच्छा होती.”

कांचन म्हणते, “काका मला सगळं सत्य सांगा. मला काहीच कळत नाहीये, हे सगळं काय चाललंय.” काका सांगतात, “तू लंडनला शिकायला गेल्यानंतर तुझे आई बाबा खूप खुश होते. त्यांनी भविष्याची खूप सारी स्वप्नही पाहिली होती. परंतु दोन महिन्यांनंतरच जेव्हा ते रोजच्या प्रमाणे बिल्डिंगच्या रंकामासाठी गेले होते, तेव्हा विसाव्या मजल्यावर तुझे बाबा रंग देत होते. त्याच वेळेस दोरी तुटली आणि ते खाली कोसळू लागले. एका दोरीला कसाबसा त्यांनी हात पकडला होता, तुझी आज तिथेच होती. तिने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचाही तोल गेला आणि ते दोघेही विसाव्या मजल्यावरून खाली पडले.

मराठी रडवणारी गोष्ट

तुझी आई ही जागीच ठार झाली होती. पण तुझे बाबा जिवंत होते. Heart Touching Marathi Story दोन दिवसानंतर त्यांना शुद्ध आली. तेव्हा मी त्यांच्याजवळ होतो. त्यांनी मला सांगितलं की, आमच्या कांचनला याबद्दल काहीही सांगू नका. मला नाही वाटत, मी जगेल. परंतु जर ही बातमी कांचनला समजली, तर ती सगळं सोडून परत येईल आणि परत नाही जाऊ शकणार.

आम्ही आयुष्यभर हे स्वप्न पाहिलं होतं की, आमच्या मुलीने मोठ व्हावं, चांगलं शिकावं आणि आता तिला नशिबाने, तिच्या मेहनतीने ही संधी मिळाली आहे, तर आमच्या दारिद्रिपणामुळे, आमच्या नशिबामुळे ती तिच्याकडून हिरावली जाऊ नये, त्यामुळे तुम्ही तिला काहीही सांगू नका.

कांचन मी तुझ्या बाबांना विचारलं, जेव्हा तू विचारशील की, Heart Touching Marathi Story माझे आई बाबा कुठे आहेत, तेव्हा काय सांगायचं ? तेव्हा ते म्हणाले की, तुम्ही तिला म्हणा की फोनवर बोलायला आई-बाबांना खूप खर्च लागतो, म्हणून ते फोनवर नाही बोलत आणि तिला पत्र लिहित जा आमच्या नावाने. तिचं शिक्षण पूर्ण व्हावं हिचं आमची शेवटची इच्छा आहे.”

काका म्हणतात, “पोरी हे बोलल्यानंतर तुझ्या वडिलांनी जीव सोडला. त्याचं दिवशी तुझे आई वडील Heart Touching Marathi Story हे जग सोडून गेले आणि त्यांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे मी तुला हे सत्य नाही सांगितलं. तुझे आई बाबा बनून मी तुला पत्र लिहायचो.”

कांचन ढसाढसा रडू लागते. तिचा यावर विश्वासचं बसत नाही. लंडनवरून परत येताना तिने किती स्वप्न पाहिली होती, परंतु त्या सर्व स्वप्नांचा चक्काचूर झाला होता. आता ती स्वप्न कधीही पूर्ण होणार नव्हती. कारण कांचनचे आई बाबा या जगात नव्हतेच. Heart Touching Marathi Story कांचनला कधीही भरून न निघणारी जखम झालेली असते. तिचं हृदय पूर्णपणे तुटलेलं असतं. Heart Touching Marathi Story कांचन ढसाढसा रडू लागते. तिचा यावर विश्वासचं बसत नाही. लंडनवरून परत येताना तिने किती स्वप्न पाहिली होती, परंतु त्या सर्व स्वप्नांचा चक्काचूर झाला होता. आता ती स्वप्न कधीही पूर्ण होणार नव्हती. कारण कांचनचे आई बाबा या जगात नव्हतेच. कांचनला कधीही भरून न निघणारी जखम झालेली असते. तिचं हृदय पूर्णपणे तुटलेलं असतं. 

ती आपल्या बॅगमधून आई-बाबांचा फोटो काढते आणि म्हणते, “आई-बाबा असं का केलं तुम्ही ? मला स्वप्नांच्या दुनियेत नेऊन ठेवलं आणि स्वतः मात्र या जगातून निघून गेलात. मला सुद्धा तुम्हाला तसं जग द्यायचं होतं, तसं आयुष्य द्यायचं होतं. तुमची सगळी स्वप्न पूर्ण करायची होती. तुम्ही आजपर्यंत जे करू शकलो ना, ते सगळं तुमच्यासाठी करायचं होतं. एक मुलीचं कर्तव्य निभावायचं होतं.  पण तुम्ही ती संधी मला दिलीच नाही, असं का केलं तुम्ही ?”

कांचन आई बाबांच्या फोटोकडे पाहते आणि म्हणते, “मला माफ करा आई-बाबा मी तुमच्या शेवटच्या क्षणात तुमच्याबरोबर नव्हते. परंतु मी तुम्हाला वचन देते, मी तुमचं स्वप्न पूर्ण करेल. खूप चांगली डॉक्टर बनेल. गरिबांची सेवा करेल. कधी पैशांसाठी काम करणार नाही. एकदा एक दिवस तुमच्या दोघांच्या नावाने मी खूप मोठ हॉस्पिटल बांधणार.

आई बापाच्या आठवणीत व्याकुळ होऊन, त्यांचा फोटो छातीला कवटाळून कांचन रडू लागते, तेव्हा तिचा आक्रोश हृदय हेलावणारा असतो.

तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा. नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top