Zero Calories Breakfast : पोटाची चरबी वाढत चाललीये, नाश्त्याला खा हे पदार्थ वजन वाढणार नाही

Zero Calories Breakfast

Zero Calories Breakfast सध्याच्या काळात अनेकांना आरोग्याच्या समस्या आहेत आणि पोटाची चरबी वाढण ही तर सर्वात मोठी समस्या. पोटाची चरबी कमी करण्यासाठी अनेक लोक डायटिंग करतात. परंतु उपाशी राहिल्याने पोटाची चरबी कमी होते की नाही माहित नाही, पण आरोग्याच्या इतर समस्या मात्र नक्कीच उद्भवू शकतात. तुमच्या दैनंदिन कामांमध्ये सुद्धा तुम्हाला त्रास होऊ शकतो. अनेकांना नाश्ता करण्याची सवय असते. ब्रेकफास्टमध्ये जड पदार्थ खाल्ल्याने वजन वाढण्याची समस्या होऊ शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नाश्त्याला खाता येणारे असे सहा पदार्थ सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचं पोटही भरेल आणि वजनही वाढणार नाही.

Zero Calories Breakfast 

नाश्त्याला खात जा हे सहा पदार्थ पोटही भरेल आणि वजनही वाढणार नाही

१) पोहा : महाराष्ट्रचं नाही तर संपूर्ण देशात पोह्याची क्रेझ आहे. आपल्या महाराष्ट्रात तर पाहुणे आलेले असो किंवा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम कांद्यापोहे हमखास बनतात. नाश्त्याला पोहे खाणं हे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा उपयोगी आहे. पोहे हलके असतात आणि त्यामुळे लवकर पोटही भरतं. त्यामुळे पोह्याचा नाश्ता केल्याने तुमच्या पोटाची चरबीही वाढणार नाही आणि वजन वाढण्याची समस्याही कमी होईल. या पोह्याबरोबर तुम्ही रस्साही बनवू शकतात. म्हणजे पोह्याची चव आणखीनच वाढते.

२) उपमा : Zero Calories Breakfast पोह्यानंतर सर्वांचा दुसरा आवडता नाश्त्याचा पदार्थ म्हणजे उपमा. रव्यापासून बनणारा हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. उपमा खाल्ल्याने सुद्धा तुमचं वजन वाढणार नाही आणि सकाळची भूकसुद्धा शमेल. अनेक लोकांना उपमा जास्त आवडत नाही. परंतु या उपम्याला तुम्ही आणखीन आरोग्यदायी बनू शकता. गाजर, टोमॅटो, कांदा अशा भाज्या बारीक करून तुम्ही जर उपम्यात टाकल्या, तर उपम्याची चवही वाढते आणि तुमच्या आरोग्यास त्याचा फायदा होतो.

३) बेसनाचे धिरडे : Zero Calories Breakfast या पदार्थाला हिंदीमध्ये चीला असही म्हणतात. बेसनाचं पीठ भिजवून त्यामध्ये विविध भाज्या बारीक चिरून टाकून तुम्ही हे बेसनाचे धिरडे बनवू शकतात. लहान मुलांनाही हा पदार्थ खूप आवडतो. याने सकाळची भूकही क्षमते आणि वजन वाढण्याची समस्याही कमी होते.

जगातील सर्वात महागड्या चहाची किंमत माहितेय का ?

४) अंडी आणि आमलेट : Zero Calories Breakfast जी माणसं अंडी खातात, त्यांच्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडी हा खूपच उपयोगी पदार्थ आहे. अंडी खाल्ल्याने वजनही वाढत नाही आणि आरोग्यलासुद्धा अंडी खाण्याचे खूप फायदे आहेत. अंडी उकडूनही खाता येतात किंवा त्याचं ऑम्लेटही बनवून खाता येतं. अंडी खाल्ल्याने तुमचं वजनही वाढणार नाही. पोटाची चरबीही कंट्रोलमध्ये राहील.

५) मोड आलेली मटकी आणि मूग : अनेक लोकांना सकाळी खूप भूक लागते. त्यांना नाश्ता हवाचं असतो. परंतु शून्य वजन वाढवणारा किंवा चरबी वाढवणारा पदार्थ नाश्त्याला खायचा आहे, अशा लोकांसाठी मोड आलेली मटकी आणि मूग हा सर्वात चांगला पदार्थ आहे. या पदार्थामुळे तुमची भूकही शमेल. त्याचबरोबर दिवसभर तुम्हाला एनर्जी मिळेल आणि वजनही वाढणार नाही.

तर हे होते असे Zero Calories Breakfast पाच पदार्थ, जे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकतात आणि त्यामुळे तुमच्या पोटाची चरबी वाढणार नाही.

तर वाचकहो अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top