काही दिवसांपूर्वी पूजा बिरारीच्या नव्या मालिकेचा प्रोमो दाखवण्यात आला होता.

या मालिकेत विशाल निकम आणि पूजा बिरारी मुख्य भूमिकेत होते.

परंतु त्यानंतर मालिकेचा प्रोमो दाखवण्यात आला नाही.

आयपीएलमध्ये मालिकेला कमी टीआरपी मिळेल अशा विचाराने हे झालेलं.

पण आता याड लागलं प्रेमाचं मालिकेची वेळ जाहीर करण्यात आलीये.

27 मे पासून रात्री 10:30 वाजता ही नवीन मालिका सुरू होईल.

याचा अर्थ अबोली मालिका बंद होईल असा लावला जातोय.

परंतु असं नाहीये, अबोली मालिका बंद होणार नसून वेळ बदलणार आहे.

अबोली मालिका दुपारी दाखवली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.

याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्वाईप अप करा.