Post Office Monthly Income Scheme
Post Office Monthly Income Scheme तुमच्याकडे लाखो करोडो रुपयांचा बँक बॅलन्स जरी असला, तरीही दर महिन्याला कमाई व्हायलाचं पाहिजे, असा अनेकांचा नियम असतो. पण काही कारणांमुळे जर तुमच्याकडे दरमहा पैसे येणं थांबलं, तर उत्पन्नाचा नवीन स्त्रोत मिळत नाही. अशा वेळेस तुम्ही आधीचं कमवून ठेवलेल्या पैशातून तुम्हाला दरमहा उत्पन्न मिळू शकतं.
आज आम्ही तुमच्यासाठी अशीचं एक योजना घेऊन आलो आहोत. ज्या योजनेद्वारे तुम्ही तुमच्या पैशांना कामाला लावू शकतात आणि घरबसल्या आरामात मंथली उत्पन्न मिळवू शकतात. घरबसल्या दर महिन्याला पैसे देणाऱ्या स्कीमबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या योजनेचे नाव आहे (Post Office Monthly Income Scheme) पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम. मग ही पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम नेमकी आहे तरी काय ? या योजनेत किती रक्कम गुंतवू शकता ? व्याजदर किती मिळतं ? मंथली इन्कम किती मिळेल ? पात्रता काय आहे ? अटी काय आहेत ? आज आपण त्याबद्दलचं जाणून घेणार आहोत.
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम
काही वर्षांपूर्वी भारतीय पोस्ट म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पत्र पाठवण्यासाठीची व्यवस्था असं समजलं जायचं. पोस्टाद्वारे पैसेही पाठवता येत होते. म्हणजेचं मनी ऑर्डर. परंतु आता पोस्ट ऑफिसने त्यांच्या कामकाजात खूप मोठा बदल घडून आणला आहे. त्यामुळे तुम्ही बँकेप्रमाणेचं पोस्ट ऑफिसचा वापर तुमची आयुष्यभराची कमाई ठेवण्यासाठीही करू शकता आणि फक्त एवढंच नाही, तर पोस्ट ऑफिस अशा अनेक नवनवीन योजना घेऊन आलं आहे. ज्यामुळे तुमच्या पैशांचा तुम्हाला मोबदला मिळतो.
अशीचं एक योजना आहे, पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (Post Office Monthly Income Scheme). ज्या लोकांना त्यांनी कमावलेल्या पैशाला कामाला लावायचे आहे आणि दर महिन्याला मंथली इनकम जनरेट करायचा आहे, त्या लोकांसाठी ही योजना खूपचं फायद्याची आहे.
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीममध्ये गुंतवलेल्या पैशांवर एक ठराविक व्याजदर देतं आणि या व्याजाचे जे पैसे असतात, ते दर महिन्याला तुमच्या अकाउंटवर जमा केले जातात. तुम्ही हे पैसे वापरू शकतात. म्हणजे हा एक प्रकारचा तुमचा मंथली इनकम, प्रत्येक महिन्याचा पगारचं झाला. तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करताय आणि तुम्हाला घरबसल्या चांगला इन्कम होतोय.
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीमची वैशिष्ट्ये
आता आपण पाहूया की, या योजनेमध्ये किती पैसे गुंतवता येतात आणि व्याजदर किती मिळतो आणि अटी काय आहेत.
1) पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीममध्ये (Post Office Monthly Income Scheme) तुम्ही कमीत कमी 1000 रुपये ते जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवू शकता.
2) 9 लाख रुपये गुंतवण्याची अट ही एका व्यक्तीसाठी आहे. एक व्यक्ती स्वतःच्या नावावर जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवू शकतो.
3) जर तुम्हाला पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये नऊ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम गुंतवायची असेल, तर तुम्ही जॉईंट अकाउंट उघडू शकता. जॉईंट अकाउंटमध्ये तुम्ही जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात.
4) या योजनेत (Post Office Monthly Income Scheme) गुंतवलेल्या पैशांवर पोस्ट ऑफिस सध्या 7.4 % व्याजदर देत आहे. प्रत्येक तिमाहीमध्ये या व्याजदराची समीक्षा केली जाते आणि व्याजदर कमी जास्त केला जातो.
5) सध्या अनेक बँकांमध्ये किंवा इतर योजनांमध्ये मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा हा व्याजदर नक्कीचं जास्त आहे.
6) तसंच इतर बँका आणि सरकारी योजनांमध्ये तुम्हाला मूळ रकमेवरील व्याज दर महिन्याला तुमच्या अकाउंटवर मिळत नाही. पण या मंथली इनकम स्कीममध्ये हे व्याज तुमच्या पोस्ट ऑफिसच्या सेविंग अकाउंटवर जमा केलं जातं आणि तुम्ही ते पैसे तुमच्या उदरनिर्वाहासाठी वापरू शकता.
7) पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्किम ही योजना भारत सरकारने समर्थन केलेली एक छोटी बचत योजना आहे. मार्केटमधील कोणतीही रिस्क यावर लागू होत नाही. जोखीमरहित योजना असल्यामुळे ज्या नागरिकांना आपले पैसे अशा एखाद्या योजनेमध्ये गुंतवायचे आहेत, जी रिस्क फ्री आहे आणि जेथे परतावा हा गॅरंटीड आहे. तर ही योजना तुमच्यासाठीचं आहे.
8) पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीममध्ये पाच वर्षांसाठी गुंतवणूक करायची असते. पाच वर्षांचा मॅच्युरिटी पिरियड संपल्यानंतर तुम्ही जे पैसे गुंतवले आहेत, ते तुम्हाला परत केले जातात. दोनदा ही पाच वर्षांशी मुदत वाढवली जाऊ शकते. म्हणजे एक व्यक्ती 15 वर्ष या योजनेत पैसे गुंतवू शकतं.
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम योजनेच्या अटी
या (Post Office Monthly Income Scheme) योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पोस्ट ऑफिसने काही अटी घालून दिल्या आहेत. आपण त्यांबद्दल चर्चा करूया.
1) या योजनेत लाभार्थी होण्यासाठी तुम्ही भारतीय नागरिक असायला हवे.
2) दहा वर्षांवरील कोणतीही भारतीय व्यक्ती या स्कीममध्ये पैसे गुंतवू शकते.
3) या स्कीममध्ये जॉईंट अकाउंटही उघडू शकतात. तीन लोक हे जॉईंट अकाउंट उघडू शकतात आणि मिळालेली व्याजाची रक्कम या तिघांमध्ये डिव्हाइड करून दिली जाते.
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
या (Post Office Monthly Income Scheme) योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी तुमच्याकडे खालीलप्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता आहे.
1) अर्जदाराचं आधार कार्ड
2) अर्जदारचा रहिवासी दाखला
3) अर्जदाराचे पोस्ट ऑफिसमध्ये खातं
4) अर्जदाराचं पॅन कार्ड
5) अर्जदाराचे पासपोर्ट साईज फोटो
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीममध्ये अकाउंट कसे उघडायचं
जर तुम्हाला या योजनेत (Post Office Monthly Income Scheme) अकाउंट उघडायचं असेल, तर तुम्ही नजीकच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पोस्ट ऑफिस मंथली स्कीम अकाउंट उघडू शकतात. येथे गेल्यावर तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागेल आणि आवश्यक कागदपत्र जोडावी लागतील. त्यानंतर तुम्हाला कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त 9 लाख रुपयांपर्यंतची रक्कम रोख किंवा चेकद्वारे जमा करावी लागेल.
हेही वाचा : Kisan Vikas Patra 2024 | किसान विकास पत्र योजनेची माहिती
पोस्ट ऑफिस मंथली स्कीममध्ये दर महिन्याला किती पैसे मिळतील
आपण जशी चर्चा केलीये की, सध्या या योजनेवर 7.4% वार्षिक व्याजदर मिळतंय. मग तुम्ही जितके पैसे जमा कराल, त्यानुसार तुम्हाला दर महिन्याला व्याज दिलं जाईल. आपण एका उदाहरणाद्वारे तुम्हाला दर महिन्याला किती पैसे मिळतील ते समजून घेऊया.
उदाहरणार्थ जर तुम्ही पोस्ट ऑफिस मंथली स्कीममध्ये (Post Office Monthly Income Scheme) 5 लाख रुपये गुंतवले, तर 7.4% व्याज दराने तुम्हाला संपूर्ण वर्षाचं 36 हजार 996 रुपये व्याज म्हणजेचं दरमहा 3083 रुपयांची मंथली इन्कम होईल. दरमहा हे तीन हजार त्र्याऐंशी रुपये तुमच्या पोस्ट ऑफिसच्या सेविंग अकाउंटवर जमा केले जातील.
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम वेळेआधी बंद करता येते का ?
तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीचं आला असेल की, या योजनेत 5 वर्षांचा मॅच्युरिटी पिरियड आहे, मग पाच वर्ष आधी आपण जमा केलेले पैसे काढू शकतो का ?
तर होय, आपण मॅच्युरिटी आधी जमा केलेले पैसे काढू शकतो. पण त्यासाठी काही अटी आहेत.
1) पैसे जमा केल्यानंतर एक वर्षांचा लॉक इन पिरियड आहे. एक वर्षभर तुम्ही या योजनेतून पैसे नाही काढू शकत.
2) 1 वर्ष ते 3 वर्षा दरम्यान जर तुम्हाला पैसे काढायचे असतील, तर तुम्ही जितकं अमाऊंट जमा केलंय त्यापैकी 2 टक्के दंड तुम्हाला भरावा लागेल आणि पैसे काढता येतील.
3) 3 वर्षे ते 5 वर्षा दरम्यान जर तुम्हाला तुम्ही जमा केलेले पैसे काढायचे असतील, तर तुम्हाला 1 टक्के जमा केलेल्या रकमेवर दंड भरावा लागेल.
4) जर 5 वर्षांचा मॅच्युरिटी अवधी पूर्ण होण्याआधीचं अकाउंट धारकाचा मृत्यू झाला, तर हे अकाउंट बंद करून नॉमिनीला जमा असलेली रक्कम परत केली जाते.
FAQ About Post Office Monthly Income Scheme | पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीमबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1) प्रश्न : पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीममध्ये (Post Office Monthly Income Scheme) दरमहा उत्पन्न मिळतं का ?
उत्तर : होय, या स्कीममध्ये तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर जमा झालेलं व्याज पोस्ट सेविंग बँक अकाउंटमध्ये जमा केलं जातं.
2) प्रश्न : पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीममध्ये किती पैसे गुंतवता येतात ?
उत्तर : या योजनेमध्ये एक व्यक्ती जास्तीत जास्त नऊ लाख रुपये गुंतवू शकतं. तर जॉईंट अकाउंट मध्ये 15 लाख रुपयांपर्यंत रक्कम गुंतवता येते.
3) प्रश्न : पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीममध्ये जमा केलेल्या रकमेवर किती व्याजदर मिळतं ?
उत्तर : या योजनेमध्ये जमा केलेल्या रकमेवर सध्या 7.4% व्याजदर मिळतं.
4) प्रश्न : पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीममध्ये अकाउंट उघडण्याची वयोमर्यादा काय आहे ?
उत्तर : या स्कीममध्ये कोणतीही भारतीय व्यक्ती जिचं वय दहा वर्षांपेक्षा जास्त आहे, ती अकाउंट उघडू शकते.
5) प्रश्न : पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीममध्ये जॉईंट अकाउंट उघडता येते का ?
उत्तर : होय, या स्कीममध्ये (Post Office Monthly Income Scheme) तुम्ही जॉईंट अकाऊंट उघडू शकता. एका वेळेस तीन व्यक्ती एकत्र अकाउंट उघडू शकता.
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम त्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे, ज्यांच्याकडे एक रकमी पैसे आहेत आणि त्यांना अशा योजनेत पैसे गुंतवायचेत, जी रिस्क फ्री आहे. ज्यावर कोणतीही जोखीम नाहीये आणि पैसे गुंतवल्यानंतर त्यांना दरमहा त्यातून एक उत्पन्नाचा स्रोत तयार होईल.
जर तुमच्या मनात पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (Post Office Monthly Income Scheme) या योजनेबद्दल आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू आणि इतर सरकारी योजनाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !