Kisan Vikas Patra 2024
Kisan Vikas Patra 2024 प्रत्येक व्यक्ती कष्ट करून पैसा कमावतो. पैसे कमवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, मेहनत घ्यावी लागते. परंतु आपण कमवलेले पैसे जर कोणतेही कष्ट न करता दुप्पट झाले, तर किती छान होईल ना. परंतु खऱ्या आयुष्यात असं होत नाही. कमवलेले पैसे दुप्पट होत नाही, असं तुम्ही म्हणाल. परंतु भारतीय सरकारने आणि भारतीय पोस्टने अशी एक योजना आणली आहे, ज्यामुळे तुम्ही कमवलेले पैसे दुप्पट होऊ शकतात. मग ही योजना नेमकी आहे तरी काय ? या योजनेत पैसे कसे दुप्पट होतात ? आज आपण त्याबद्दलचं जाणून घेणार आहोत.
तुमचे पैसे दुप्पट करणाऱ्या या योजनेचे नाव आहे किसान विकास पत्र योजना. भारत सरकार आणि भारत पोस्टने सुरू केलेली ही एक छोटी बचत योजना आहे आणि या योजनेत सध्या 115 महिने म्हणजेचं 9.5 वर्षात तुम्ही गुंतवलेली रक्कम दुप्पट होते. मग ही किसान विकास पत्र योजना (Kisan Vikas Patra 2024) कधी सुरू झाली ? या योजनेचं उद्दिष्ट काय आहे ? या योजनेच्या अटी काय आहेत ? पात्रता काय आहे ? आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
किसान विकास पत्र योजनेचा इतिहास
भारत सरकारने आणि भारत पोस्टने 1988 साली किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra 2024) ही लघुबचत योजना सुरू केली होती. सुरुवातीला या योजनेत फक्त शेतकरीचं गुंतवणूक करू शकत होते. त्यानंतर ही योजना सर्व भारतीयांसाठी खुली करण्यात आली. या योजनेअंतर्गत लोकांना बचत करण्याची सवय लागावी, त्यांनी दीर्घकालीन बचत योजनेमध्ये पैसे गुंतवावे, असं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं.
किसान विकास पत्र योजनेची उद्दिष्टे
जसं की या योजनेचे नाव आहे, (Kisan Vikas Patra 2024) किसान विकास पत्र. किसान म्हणजेचं शेतकऱ्यांना दीर्घकालीन बचत योजनेत पैसे गुंतवता यावे, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती.
जवळपास दहा वर्षांमध्ये या योजनेत गुंतवलेले पैसे दुप्पट होतात. म्हणूनचं ही एक दीर्घकालीन बचत योजना आहे. लोकांना बचत करण्याची सवय लागावी, हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे.
हेही वाचा : Ladli Behna Yojana In Maharashtra | लाडली बहना योजना माहिती
तसंच अनेक भारतीयांना अशा योजनेत गुंतवणूक करण्याची इच्छा असते, ज्यामध्ये कोणतीही जोखीम नाहीये. रिस्क फ्री चांगला परतावा मिळावा, अशी इच्छा आहे. त्या लोकांसाठी किसान विकास पत्र योजना खूपचं फायदेशीर आहे. कारण ही एक सरकारने सुरू केलेली योजना असून यात कोणतीही जोखीम नाहीये. तुम्हाला तुमची मूळ रक्कम आणि परतावा परत मिळेल, याची शंभर टक्के हमी आहे.
किसान विकास पत्र योजनेची वैशिष्ट्ये
भारतीय पोस्टाने सुरू केलेली (Kisan Vikas Patra 2024) ही बचत योजना खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपण याबद्दल आणखीन जाणून घेऊया.
1) या योजनेत कोणताही भारतीय व्यक्ती गुंतवणूक करू शकतो.
2) किसान विकास पत्र योजनेत कमीत कमी 1 हजार रुपये रक्कम गुंतवावी लागते. तर जास्तीत जास्त रक्कम गुंतवण्याची कोणतीही लिमिट नाहीये.
3) सध्याच्या अपडेटनुसार या योजनेत पैसे गुंतवल्यानंतर 115 महिन्यात म्हणजेचं 9.5 वर्षांमध्ये गुंतवलेली रक्कम दुप्पट होते.
4) किसान विकास पत्र योजनेत पैसे गुंतवण्याची जास्तीची कोणतीही लिमिट नाहीये. परंतु मनी लॉन्ड्रीग रोखण्यासाठी 2014 मध्ये सरकारने या योजनेत 50 हजार रुपयेपेक्षा जास्त रक्कम गुंतवली जात असेल, तर पॅन कार्ड बंधनकारक केलं आहे.
5) आणि तुम्ही जर या योजनेत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम गुंतवत असाल, तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न सबमिट करावा लागेल.
6) किसान विकास पत्र योजनेचे (Kisan Vikas Patra 2024) सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, ही सरकार समर्थन असलेली बचत योजना असल्यामुळे मार्केटमधील कोणत्याही घडामोडींचा या योजनेच्या रिटर्न्सवर फरक पडत नाही. तुमची रक्कम सुरक्षित राहते. त्याचबरोबर परतावासुद्धा गॅरेंटेड असतो.
7) तसंच किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करण खूप सोपं आहे. तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने गुंतवणूक करू शकतात. ऑफलाइन पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही किसान विकास पत्र खरेदी करू शकता.
किसान विकास पत्र योजनेसाठी पात्रता अटी
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी सरकारने काही पात्रता अटी ठरवून दिल्या आहेत.
1) गुंतवणूक करणारी व्यक्ती भारत देशाची कायम स्वरूपी निवासी असावी.
2) 18 वर्षांवरील व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते.
3) अनिवासी भारतीय किसान विकास पत्र योजनेत (Kisan Vikas Patra 2024) गुंतवणूक करू शकत नाही.
किसान विकास पत्र योजना बंद करता येते का
जर तुम्ही किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक केली, तर 30 महिने म्हणजेचं अडीच वर्ष तुम्ही तुमच्या जमा केलेले पैसे काढू शकत नाही. तो लॉक इन पिरेड आहे. त्यानंतरचं तुम्हाला हे पैसे काढता येतील.
किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक कशी करायची
या (Kisan Vikas Patra 2024) योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागेल. तेथे गेल्यावर तुम्हाला किसान विकास पत्र योजनेशी संबंधित फॉर्म दिला जाईल. हा फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर तुम्ही या योजनेत रक्कम गुंतवू शकता.
किसान विकास पत्र योजनेचे फायदे
1) सध्या या योजनेत 7.5% व्याजदर दिला जात आहे. हा व्याजदर कोणत्याही बँकेच्या एफडीपेक्षा किंवा अन्य सरकारी योजनापेक्षा जास्त असल्याने तुमच्या रकमेवर तुम्हाला जास्त मोबदला मिळेल.
2) किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करण्याचा आणखीन एक मोठा फायदा म्हणजे तुम्हाला आयकर नियम 80C अंतर्गत दीड लाख रुपयेपर्यंत टॅक्स बेनिफिटही दिला जातो.
3) किसान विकास पत्र एका व्यक्तीच्या नावावरून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफरही करू शकतात. परंतु त्यासाठीही काही नियम आखून दिलेले आहेत.
A) किसान विकास पत्र ज्या व्यक्तीच्या नावावर आहे, त्या व्यक्तीचा मृत्यू झालास नॉमिनीला हे किसान विकास पत्र ट्रान्सफर केलं जाऊ शकतं.
B) त्याचबरोबर माननीय कोर्टाच्या आदेशानुसार एका व्यक्तीच्या नावावरून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर किसान विकास पत्र ट्रान्सफर केलं जाऊ शकतं.
C) जर किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra 2024) जॉईंट असेल, दोन व्यक्तींच्या नावावर असेल. तर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर ते सिंगल सर्टिफिकेट म्हणून ट्रान्सफर केलं जाऊ शकतं.
किसान विकास पत्राचे प्रकार
पोस्ट ऑफिसद्वारे दिल्या जाणाऱ्या किसान विकास पत्राचे काही प्रकार आहेत.
1) सिंगल होल्डर सर्टिफिकेट : जर एखाद्या व्यक्तीने किसान विकास पत्र खरेदी केलं, तर त्याला हे सिंगल होल्डर सर्टिफिकेट दिलं जातं.
2) जॉईंट होल्डर सर्टिफिकेट : दोन व्यक्ती जर किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करत असतील तर त्यांना जॉईंट होल्डर्स सर्टिफिकेट दिलं जातं.
FAQ About Kisan Vikas Patra 2024 किसान विकास पत्र योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1) प्रश्न : किसान विकास पत्र ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी आहे का ?
उत्तर : नाही. किसान विकास पत्र योजना आता सर्व भारतीयांसाठी उपलब्ध आहे. परंतु 1988 मध्ये जेव्हा ही योजना सुरू करण्यात आली होती, तेव्हा ती फक्त शेतकऱ्यांसाठीचं मर्यादित होती. परंतु आता कोणताही भारतीय या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
2) प्रश्न : किसान विकास पत्र योजनेत (Kisan Vikas Patra 2024) किती रक्कम गुंतवता येते ?
उत्तर : या योजनेत कमीत कमी 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते. जास्तीत जास्त रकमेची कोणतीही अट नाहीये.
3) प्रश्न : किसान विकास पत्र योजनेचे स्वरूप काय आहे ?
उत्तर : ही एक दाम दुप्पट योजना असून, सध्या दिलेल्या व्याज दरानुसार 115 महिने म्हणजेचं साडेनऊ वर्षात गुंतवलेली रक्कम दुप्पट होते.
4) प्रश्न : किसान विकास पत्र योजनेत गुंतवलेल्या रकमेवर किती व्याजदर दिला जातो ?
उत्तर : या योजनेत सध्या गुंतवलेल्या रकमेवर 7.4% व्याजदर दिला जातो.
5) प्रश्न : किसान विकास पत्र योजना (Kisan Vikas Patra 2024) कधी सुरू करण्यात आली ?
उत्तर : किसान विकास पत्र योजना 1988 मध्ये भारतीय पोस्टद्वारे सुरू करण्यात आली होती. या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडावं लागेल.
किसान विकास पत्र योजना त्या व्यक्तींसाठी खूपचं लाभदायक आहे. ज्यांच्याकडे एकरकमी पैसे आहेत आणि त्यांना दीर्घकालीन बचत योजनेत ते गुंतवायचेच आहेत. त्याचबरोबर जास्तीचा रिटर्न हवा आहे.
सध्या भारत सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये ही सर्वात फायदेशीर अशी बचत योजना आहे. जिथे फक्त 115 महिने म्हणजे साडेनऊ वर्षात दाम दुप्पट दिले जाते. गुंतवलेली रक्कम दुप्पट होते.
सध्या आपण अशा अनेक योजना पाहतो, ज्या खूप थोड्या कालावधीतचं गुंतवलेली रक्कम दाम दुप्पट करून देण्याची हमी देतात. परंतु या योजना मार्केटमधील परिस्थितीवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ शेअर मार्केट. अशा योजनांमध्ये जोखीम खूप असते. पैसे लवकर वाढतील याची शक्यता असते. परंतु त्याचबरोबर नुकसान होण्याची शक्यताही जास्त असते.
त्यामुळे ज्या लोकांना कोणत्याही जोखमीशिवाय त्यांचे पैसे दाम दुप्पट करायचे आहेत. चांगला परतावा मिळवायचा आहे. त्यांच्यासाठी भारतीय पोस्टद्वारे सुरू केलेली ही किसान विकास पत्र योजना खूपचं फायदेशीर आहे. त्यांनी या योजनेत गुंतवणूक करण्यास कोणतीही हरकत नाही.
तुमच्या मनात किसान विकास पत्र योजनेबद्दल (Kisan Vikas Patra 2024) आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि अशाच नवीन नवीन योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !