Second Phase Voting In Maharashtra : दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात या मतदारसंघात होणार मतदान

Second Phase Voting In Maharashtra

Second Phase Voting In Maharashtra आपल्या देशात सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे. देशातील मतदारांची लोकसंख्या आणि देशाचा विस्तार पाहता निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ही निवडणूक घेण्याचं ठरवलंय. 19 एप्रिल रोजी निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला.

Second Phase Voting In Maharashtra

आपल्या महाराष्ट्रातही एकूण पाच टप्प्यांमध्ये ही निवडणूक घेतली जाते. पहिला टप्पा 19 एप्रिलला झाला, जेव्हा महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांमध्ये निवडणूक पार पडली. विदर्भातील पाच मतदारसंघ नागपूर, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि रामटेक या मतदारसंघात मतदान झालं.

आणि आता शुक्रवार 26 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा Second Phase Voting In Maharashtra पार पडणार आहे. आपल्या महाराष्ट्रातही दुसऱ्या टप्प्या अंतर्गत मतदान होईल. मग महाराष्ट्रातील कोणत्या मतदारसंघात हे मतदान पार पडणार आहे आपण ते पाहूया.

वोटर लिस्टमध्ये नाव नोंदवायचंय ?

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात येथे होणार मतदान

महाराष्ट्रातील एकूण आठ मतदारसंघात मतदान पार पडेल. यापैकी सहा मतदारसंघ हे विदर्भातील असतील, तर दोन मतदारसंघ मराठवाड्यातील आहेत.

नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ वाशिम, वर्धा, अमरावती, बुलढाणा आणि अकोला या एकूण आठ मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. त्यामुळे येथील शाळा आणि कॉलेजेसला सुट्टी देण्यात आली आहे आणि सर्व मतदारांनी मतदान करावं असं आवाहन करण्यात आलंय.

दुसऱ्या टप्प्या अंतर्गत Second Phase Voting In Maharashtra देशातील एकूण 13 राज्यातील 89 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल.

आपल्या भारत देशात एकूण 543 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि शंभर कोटींपेक्षा जास्त मतदार. जगभरातील सर्वात मोठी लोकशाही आणि सर्वात मोठी निवडणूक म्हणून भारतातील निवडणूक प्रक्रियेकडे पाहिलं जातं.

भारतातील निवडणूक प्रक्रिया ही जगभरातील लोकांसाठी एक अभ्यासाचा विषय असतो. एवढ्या मोठ्या देशात, एवढ्या मोठ्या लोकसंख्येद्वारे निवडणूक घेणं, ही काही सोपी गोष्ट नाहीये. परंतु देशातील प्रशासन व्यवस्था आणि निवडणूक आयोग हे आव्हान लिलया पेलतं.

देशाचे सुजाण नागरिक म्हणून निवडणुकीत मतदान करणं, हे आपलं कर्तव्य आहे आणि प्रत्येक देशवासियाने हे कर्तव्य बजावायला हवं. तर तुमच्याही मतदारसंघात उद्याच निवडणुका आहे की नाही ? तुम्ही मतदान केलंय का ? नक्कीचं कमेंट करुन सांगा.

अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top