Actress Apurva Nemlekar Loose Weight : शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा नवीन लूक पाहिलात का ?

Actress Apurva Nemlekar Loose Weight

Actress Apurva Nemlekar Loose Weight अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही रात्रीस खेळ चाले मालिकेतील शेवंता या भूमिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाली. तिच्या मादक सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. तिची ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. शेवंताची भूमिका साकारण्यासाठी अपूर्वाने आपलं वजनदेखील वाढवलं होतं.

Actress Apurva Nemlekar Loose Weight

पण सध्या अपूर्वा पुन्हा एकदा आपल्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसतेय आणि तिने वजन घटवण्यासाठी वर्कआऊटदेखील सुरू केलं आहे. नुकतेच अपूर्वाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या वर्कआऊटचे काही फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये अपूर्वा जीमच्या आऊटफिटमध्ये वर्कआऊटसाठी जीममध्ये गेल्याचं दिसतंय. ही जिम तिच्या बिल्डिंगच्या क्लबहाऊसमध्येच आहे. तिच्या बिल्डिंगमध्ये स्विमिंग पूलदेखील आहे. पिंक टीशर्ट आणि ब्लॅक शॉर्टसमध्ये ती खूप सुंदर दिसतेय.

Actress Apurva Nemlekar Transformation Shocked Everyone
Actress Apurva Nemlekar Transformation Shocked Everyone

आता अपूर्वामध्ये खूपच बदल झालेला दिसून येतोय. आधीपेक्षा अपूर्वाने आपलं वजन बऱ्यापैकी कमी केलं आहे. व्यायामासोबतच ती डाएटकडेही लक्ष देत असल्याचं दिसतंय. तिची मेहनत दिसून येतेय. वजन कमी होताच अपूर्वाचा लूक बऱ्यापैकी बदललेला दिसतोय. ती आधीपेक्षा आणखीन जास्त सुंदर दिसतेय आणि फिटसुद्धा दिसत आहे. अपूर्वाचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन झाल्याचं दिसतंय.

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने कमी केलं वजन

अपूर्वा सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत सावनी Actress Apurva Nemlekar Loose Weight ही खलनायकी भूमिका साकारतेय. या भूमिकेसाठीच तिने आपलं वजन कमी केल्याचं बोललं जातंय. ती या नवीन मालिकेतसुद्धा खूपच सुंदर आणि ग्लॅमरस भूमिका साकारत आहे. वजन कमी केल्यानंतर ती या भूमिकेत अजूनच जास्त ग्लॅमरस दिसतेय.

प्रेमाची गोष्ट मालिकेतील कलाकारांची यादी

अपूर्वाचे फोटो पाहून तिच्या फॅन्सनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. तिचा हा नवीन लूक पाहून अनेकांना विश्वासच बसत नाहीये. अनेकांनी तिच्या डेडिकेशनचं कौतुक केलंय. तर काहींनी तिच्यापासून प्रेरणासुद्धा घेतली आहे. सगळ्यांनी तिच्या या नवीन लूकचं भरभरून कौतुक केलंय आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.

तुमचे खूप खूप धन्यवाद.  

Scroll to Top