Enrollement In Votor List 2024 आपला भारत देश ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. लोकशाही सुरळीत चालवण्याचं कर्तव्य प्रत्येक भारतीयाचं आहे आणि त्यासाठी आपल्याला मतदान करणं खूप गरजेचं आहे.
प्रत्येक भारतीय नागरिक वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार बजावण्यास पात्र असतो. परंतु फक्त वयाची 18 वर्षे पूर्ण होऊन चालत नाही, तर तुमचं नाव मतदार यादीमध्ये सुद्धा समाविष्ट असलं पाहिजे. तरचं मतदानाचा अधिकार बजावता येतो.
Enrollement In Votor List 2024
18 वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांचे नाव मतदार यादीत जोडण्यासाठी निवडणूक आयोग आणि सरकार विविध अभियान चालवत असतं. परंतु अनेक कारणांमुळे पात्र झालेल्या व्यक्तींची नावे मतदान यादीत जोडली जात नाहीत. अनेक घोळही होतात. कधी कधी ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, त्यांची नावही मतदान यादीत (Enrollement In Votor List 2024) असतात. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरतो, खूप गोंधळाची परिस्थिती निर्माण होते.
घरबसल्या असं काढा PVC वोटर कार्ड
परंतु आता या सगळ्या गोष्टींवर तोडगा म्हणून भारत सरकार एक नवीन विधेयक आणणार आहे आणि या विधेयकाद्वारे प्रत्येक भारतीय व्यक्ती ज्याचं वय 18 वर्ष पूर्ण झालंय, त्याचं नाव हे आपोआपचं मतदान यादीत जोडले जाईल आणि ज्या व्यक्तीचा मृत्यू झालाय, त्या व्यक्तीचे नाव आपोआपचं मतदार यादीतून काढून टाकले जाईल.
मतदार यादीत नाव नोंदणी
या विधेयकाअंतर्गत जन्म आणि मृत्यू नोंदणी जनगणना यादीबरोबर जोडली जाईल आणि हा संपूर्ण डेटा निवडणूक आयोगाबरोबर शेअर केला जाईल, म्हणजे जन्माची नोंदणी झाल्यानंतर पुढील 18 वर्षानंतर त्या व्यक्तीचं नाव मतदार यादीमध्ये जोडले जाईल आणि मृत्यूची नोंदणी होताचं त्या व्यक्तीचं नाव मतदार यादीतून काढून टाकलं जाईल.
Enrollement In Votor List 2024 एकूणच भारतासारख्या मोठ्या लोकशाहीमध्ये ही खूपच चांगली सुधारणा आहे. यामुळे मतदार यादी मधील गोंधळ दूर होण्यास नक्कीच फायदा होईल, यात शंका नाही.
तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, ही माहिती तुम्हाला फायदेशीर वाटल्यास नक्कीच कमेंट करुन सांगा आणि आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
खूप खूप धन्यवाद !