Ladli Behna Yojana In Maharashtra
Ladli Behna Yojana In Maharashtra सध्या देशात एका योजनेची सगळीकडे चर्चा होत आहे आणि या योजनेचे नाव आहे लाडली बहना योजना. परंतु ही योजना केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली नसून आपल्या शेजारील मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली योजना आहे.
या (Ladli Behna Yojana In Maharashtra) योजनेत लाभार्थी महिलांना दरमहा एक ठराविक रक्कम दिली जाते. ही रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक अकाउंटवर जमा केली जाते. मग ही लाडली बहना योजना (Ladli Behna Yojana In Maharashtra) नेमकी आहे तरी काय ? लाडली बहना योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? या योजनेसाठी अटी काय आहेत ? पात्रता काय आहे ? कोणती कागदपत्र आवश्यक असतात ? आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
लाडली बहना योजना सुरू करण्याची उद्दिष्टे
मध्य प्रदेश सरकारने राज्यातील महिलांच्या सशक्तिकरणासाठी ही (Ladli Behna Yojana In Maharashtra) योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. ही योजना सुरू करण्यामागे मध्य प्रदेश सरकारची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.
1) महिलांचं आर्थिक सशक्तिकरण करणे
2) अनेक महिलांना पोषणाची कमी आहे, त्यामुळे त्यांना स्वास्थ्य संबंधित अडचणींना सामोरे जावं लागतं. त्या महिलांना दरमहा ठराविक रकमेद्वारे या अडचणी दूर करण्याची संधी दिली जाईल.
3) महिलांचं कुटुंबातील महत्त्व वाढवणे. आपल्या समाजात कुटुंबात कोण किती पैसे कमवतं, यावरून त्यांचं कुटुंबातील स्थान निश्चित केलं जातं, त्यांना महत्त्व दिलं जातं. अनेकदा महिला घर चालवतात. त्यांची कोणतीही आर्थिक कमाई नसते. म्हणून त्यांना कुटुंबात कौटुंबिक निर्णयांमध्ये महत्त्वाचं स्थान दिलं जात नाही. मध्यप्रदेश सरकार या योजनेद्वारे महिलांच्या बँक अकाउंटवर एक ठराविक रक्कम पाठवतं, म्हणजे ही योजना त्यांचं एक दरमहा उत्पन्नाचं साधनचं बनलीये.
लाडली बहना योजनेचा फायदा
लाडली बहना (Ladli Behna Yojana In Maharashtra) योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक अकाउंटवर दरमहा 1250 रुपये पाठवले जातात. संपूर्ण भारतात दुसऱ्या कोणत्याही राज्यात अशी योजना राबवली जात नाहीये. मध्य प्रदेश सरकारची ही योजना गेमचेंजर म्हणून ओळखली जाते. ज्यामुळे महिलांच्या आयुष्यात एक खूप मोठा बदल झाला आहे.
हेही वाचा : Shram Yogi Mandhan Yojana | पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना
लाडली बहना योजनेत सहभागासाठी अटी
मध्य प्रदेश सरकारने या Ladli Behna Yojana In Maharashtra योजनेत सहभागासाठी खालीलप्रमाणे अटी घालून दिल्या आहेत.
1) फक्त मध्य प्रदेशमध्ये स्थायिक असलेल्या महिलाचं या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
2) ज्या महिलांचे वय 21 वर्ष ते 60 वर्षांदरम्यान आहे. त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळतो.
3) विवाहित, विधवा, घटस्फोटीत अशा सर्व प्रकारच्या महिला या योजनेत अर्ज करू शकता.
4) कोणत्याही कॉलेज किंवा शाळेमध्ये शिकत असलेल्या महिला किंवा मुली या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही.
5) जी महिला या योजनेसाठी अर्ज करत आहे, त्या महिलेच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत नसावी.
6) अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असू नये.
7) ही योजना फक्त विवाहित, घटस्फोटीत आणि विधवा महिलांसाठी आहे. अविवाहित महिला या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही.
8) या योजनेत अर्ज करण्यासाठी जातीचं कोणतंही बंधन नाहीये. कोणत्याही जातीची महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते.
9) अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती भारत सरकार व राज्य सरकारची कर्मचारी असू नये, किंवा रिटायर होऊन पेन्शन प्राप्त करत असू नये.
लाडली बहना योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?
लाडली बहना योजनेसाठी (Ladli Behna Yojana In Maharashtra) अर्ज करायला तुम्ही नजीकच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा वॉर्ड कार्यालयातही जाऊ शकता. येथे तुमच्याकडून अर्ज भरून घेतला जाईल.
त्याशिवाय तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्जही करू शकता.
लाडली बहना योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
या (Ladli Behna Yojana In Maharashtra) योजनेत अर्ज करण्यासाठी सदर महिलेकडे खालीलप्रमाणे कागदपत्र असावीत.
1) अर्जदार महिलेचं आधार कार्ड
2) अर्जदार महिलेला सरकारद्वारे मिळालेले ओळखपत्र
3) अर्जदार महिलेचा वयाचा दाखला
4) अर्जदार महिलेच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला
5) अर्जदार महिलेचं बँक पासबुक
6) अर्जदार महिलेचा मोबाईल नंबर
7) अर्जदार महिलेचे पासपोर्ट साईज फोटोज
ही सर्व कागदपत्रे अर्ज करताना जमा करायची आहेत.
लाडली बहना योजनेचा फायदा झाला का
मध्यप्रदेश राज्यातील महिलांनी या Ladli Behna Yojana In Maharashtra योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ उचलला आहे. सरकारी आकड्यानुसार 1 कोटी 32 लाख पेक्षा जास्त महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे.
कोणत्याही समाजात महिलांचं स्थान हे जितकं महत्त्वाचं असतं, त्यांना जितका आदर सन्मान दिला जातो, अर्थव्यवस्थेत त्यांचं स्थान जेवढे बळकट असतं, कुटुंबात त्यांचं स्थान जेवढं महत्वाचं असतं. तेवढंच ते कुटुंब, तो देश, ती अर्थव्यवस्था ते राज्य प्रगती करू शकतं.
मध्यप्रदेश सरकारने सुरू केलेली ही लाडली बहना योजना (Ladli Behna Yojana In Maharashtra) त्या दिशेतचं कार्यरत आहे. ही योजना सुरू करताना सरकारने उद्दिष्टचं अशी ठेवली होती की, महिलांचं त्यांच्या कुटुंबातील स्थान उंचावण, महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवणं आणि त्यांच्या आरोग्यविषयक समस्या दूर करणं.
या उद्दिष्टांना डोळ्यासमोर ठेवूनचं ही योजना सुरू करण्यात आली आहे आणि आता 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ होतोय. आतापर्यंत दहा मासिक हप्ते या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक अकाउंटवर डीबीटीद्वारे पाठवण्यात आले आहेत.
सुरुवातीला लाडली बहना योजना दरमहा एक हजार रुपये लाभार्थी महिलांच्या अकाउंट जमा करत होती. परंतु आता ही रक्कम 250 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. सध्या दरमहा 1250 रुपये म्हणजेचं वार्षिक 15000 रुपये लाभार्थी महिलांच्या अकाउंटवर पाठवले जातात.
21 वर्षे ते 60 वर्ष वयोगटातील महिला ज्यांना कौटुंबिक जबाबदारी आहे, त्या विवाहित आहेत, विधवा आहेत किंवा घटस्फोटीत आहेत. त्यांना मुलं आहेत. अशा महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. म्हणजे त्यांच्या गरजेनुसार त्या या पैशांचा वापर करू शकतात.
लाडली बहना योजना आरोग्यासाठीही महत्त्वाची
या योजनेचा (Ladli Behna Yojana In Maharashtra) महिलांना आरोग्याविषयक फायदा होत आहे. सरकारने ही योजना अशा महिलांसाठीही सुरू केलीये, ज्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे किंवा आर्थिक अडचणीमुळे स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांचं आरोग्य दिवसेंदिवस खालावत चाललंय.
लाडली बहना योजनेद्वारे मिळालेल्या पैशांचा वापर त्या स्वतःचं आरोग्य सुधारण्यासाठी करू शकतात. त्यांना पोषण मिळेल, असं अन्न त्या विकत घेऊन खाऊ शकतात. म्हणजे त्यांचं आरोग्य सुधारेल आणि जीवनातील विविध संकटांचा सामना करण्याची त्यांच्यामध्ये ताकद येईल.
लाडली बहना योजना (Ladli Behna Yojana In Maharashtra) महिलांना स्वावलंबी बनवते
ही योजना मुख्यत्वे त्या महिलांसाठी आहे, ज्यांच्यावर जबाबदारी आहेत. त्यांच्याकडे स्वतःचा कोणताही आर्थिक स्त्रोत नाहीये. त्या कोणतीही नोकरी अथवा व्यवसाय करत नाहीये. अशा महिलांना पैशांसाठी, आर्थिक गरजांसाठी, कुटुंबातील इतर सदस्यांवर अवलंबून राहावं लागतं.
एक रुपयाही त्यांना हवा असेल, तर घरातली इतर सदस्यांकडे त्यांना मागणी करावी लागते. अशा वेळेस त्यांच्यातील स्वावलंबत्व कमी होतं. त्याचबरोबर जर त्यांना पैसे मिळाले नाहीत, तर निराशा आर्थिक चणचणही त्यांना भासू शकते.
या योजनेद्वारे अशा महिलांच्या बँक अकाउंटवर दरमहा 1250 रुपये जमा होतात. म्हणजेचं त्यांची आर्थिक गरज या उत्पन्नातून भागू शकते.
FAQ About Ladli Behna Yojana In Maharashtra | लाडली बहना योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1) प्रश्न : Ladli Behna Yojana In Maharashtra कधी सुरू करण्यात आली आहे ?
उत्तर : मध्यप्रदेश सरकारने लाडली बहना योजना 2023 मध्ये सुरू केली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत दहा मासिक हफ्ते लाभार्थी महिलांच्या बँक अकाउंटवर पाठवण्यात आले आहेत.
2) प्रश्न : लाडली बहना योजना सुरू करण्याची उद्दिष्टे काय आहेत ?
उत्तर : या योजनेद्वारे महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणे, त्यांच्या आरोग्यविषयक समस्या दूर करणे आणि कुटुंबातील त्यांचं स्थान उंचावणं अशी उद्दिष्टे सरकारने ठेवली आहेत.
3) प्रश्न : लाडली बहना योजना महिलांना दरमहा किती लाभ देते ?
उत्तर : या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1250 रुपये दिले जातात. ही रक्कम या महिलांच्या बँक अकाउंटवर डीबीटी द्वारे ट्रान्सफर केली जाते.
4) प्रश्न : लाडली बहना योजनेचा फायदा कोणत्या महिलांना मिळतो ?
उत्तर : या योजनेचा फायदा मध्यप्रदेश राज्यातील स्थानिक महिला ज्यांचं वय 21 वर्षे ते 60 वर्षां दरम्यान आहे आणि ज्या महिला विवाहित, विधवा किंवा घटस्फोटीत आहे, अशा महिलांना दिला जातो.
5) प्रश्न : लाडली बहना योजना महाराष्ट्रात सुरू आहे का ?
उत्तर : नाही, लाडली बहना योजना (Ladli Behna Yojana In Maharashtra) महाराष्ट्रात सुरू नाहीये. कारण ही भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना नसून मध्यप्रदेश सरकारने सुरू केलेली योजना आहे. मध्यप्रदेश राज्यातील स्थानिक निवासी महिलांनाचं या योजनेचा लाभ मिळतो.
एकूणच लाडली बहना योजना (Ladli Behna Yojana In Maharashtra) गेमचेंजर योजना ठरली आहे. कारण संपूर्ण भारतात ही अशी एकमेव योजना आहे, जी 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा 1250 एवढी रक्कम देते. या योजनेतून सरकारने एकाचं वेळेस अनेक उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांना स्वावलंबत्व, आर्थिक सशक्तीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे.
तुमच्या मनात लाडली बहना योजनेबद्दल आणखी काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा, आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि महाराष्ट्र सरकार, भारत सरकारच्या इतर योजनांबद्दल जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !