Actress Jui Gadkari Tattoos नेहमीप्रमाणे अभिनेत्री जुई गडकरी ही आपल्या मालिकेच्या माध्यमातून टेलिव्हिजनवर धुमाकूळ घालताना दिसतेय. तिने आपल्या सायली या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली आहे. अगदी साधीभोळी आणि खूपच प्रेमळ सायली प्रेक्षकांना प्रचंड आवडतेय. हे प्रेक्षकांचं प्रेमच म्हणता येईल की सुरुवातीपासून ठरलं तर मग ही मालिका टीआरपी रेटिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर राज्य करतेय. त्यानंतर कितीही नवीन मालिका सुरू झाल्या पण या मालिकेचं स्थान कोणीही हलवू शकलेलं नाही. ही सगळी अभिनेत्री जुई गडकरीच्या अभिनयाचीच कमाल आहे.
Actress Jui Gadkari Tattoos
जुई सोशल मीडियावरही सक्रिय असते आणि त्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या नेहमी संपर्कात राहते. ती नेहमी आपल्या वैयक्तिक आयुष्यासोबतच मालिकेच्या सेटवरील धमाल, सहकलाकारांसोबतचे डान्स आणि मजा मस्तीचे व्हिडिओ शेअर करते. नुकताच तिने सायलीच्या लूकमधील एक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडीओ तिच्या टॅटूबद्दल आहे. दररोज सायलीच्या भूमिकेसाठी तयार होताना तिच्या मेकअप आर्टिस्टला तिच्या अंगावरील टॅटू मेकअपने लपवावे लागतात.
स्टार प्रवाहची अबोली मालिका बंद होणार
सायलीच्या अंगावर एकही टॅटू नाहीये Actress Jui Gadkari Tattoos पण जुईच्या अंगावर तीन टॅटू आहेत त्यामुळे सायलीच्या भूमिकेसाठी तिला हे टॅटू लपवावे लागतात. जुईच्या पाठीवर 1 टॅटू आहे तर तिच्या हातांवरदेखील 2 टॅटू आहेत. जुईच्या पाठीवर मोरपीसचा टॅटू आहे. तर तिच्या एका हातावर बुलेटप्रूफ नावाचा टॅटू आहे. तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं की बुलेटप्रूफ हे टॅटू तिने एका गाण्यावरून बनवलं आहे. ‘आय ऍम बुलेटप्रूफ नथिंग टू लूज’ या गाण्यावरून तिने हे टॅटू बनवलंय. हे गाणं एका स्त्रीच्या आयुष्यावर आधारित आहे Actress Jui Gadkari Tattoos. एक स्त्री किती बुलेटप्रूफ असते. कोणीही तिला कितीही त्रास दिला तरी ती खूप मजबूत आहे. त्याप्रमाणेच मीसुद्धा मजबूत आहे. मी बुलेटप्रूफ आहे. प्रत्येक टॅटूचं तुमच्या आयुष्यात महत्व असलं पाहिजे असंही ती म्हणाली.
जुईच्या दुसऱ्या हातावर बेबी एंजलचा टॅटू आहे. त्याला मांजरीचे पाय जोडलेले आहेत. यामध्ये एक आई आपल्या बाळाची किती काळजी करते ते दिसून येते. जुईचे हे तिन्ही टॅटू खूपच सुंदर आणि अर्थपूर्ण आहेत. तिची चॉईस खूपच छान आहे. पण आपल्या कामासाठी तिला हे टॅटू रोज कॅमेरासमोर लपवावे लागतात.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे खूप खूप धन्यवाद.