Sakhar Amba Marathi Recipe 2024
Sakhar Amba Marathi Recipe 2024 मैत्रिणींनो कडाक्याचा उन्हाळा सुरू झालाय आणि आपल्या प्रत्येकाच्या घरात उन्हाळी वाळवणाच्या कामांना सुरुवात झालीय. चकल्या, पापड्या, चिप्स, कुरडया हे सगळं बनवण्याची लगबग सुरू झालीय. बाजारामध्ये कैऱ्यासुद्धा यायला सुरुवात झालीये त्यामुळे आता कैऱ्याचं लोणचं त्याचबरोबर कैऱ्याचा साखर आंबा म्हणजेच मुरांबा बनवण्याची सुद्धा तयारी सुरू झालीय.
साखर आंबा Sakhar Amba Marathi Recipe 2024 हा आपल्या सर्वांनाच खूप आवडतो. उन्हाळ्यात कैरीपासून बनवलेले सर्वच पदार्थ सगळे आवडीने खातात. मग ते कैरीचं लोणचं असो किंवा कैरीचं पन्हं आणि साखर आंबा सगळ्यांना आवडतो. कैरीची आपण सगळे वर्षभर वाट पाहत असतो. हा आंबट गोड साखर आंबा तर आपण पुढील अनेक महिने चवीने खात असतो.
बाजारातील जॅम किंवा सॉससारख्या आरोग्यास हानिकारक पदार्थांना आपला साखर आंबा खूपच हेल्दी पर्याय असू शकतो. हा साखर आंबा आपण पराठा, पोळीसोबत आवडीने खाऊ शकतो. साखर आंबा किंवा मुरांबा हा प्रचंड टेस्टी असतो.
आज आम्ही तुमच्यासाठी हाच टेस्टी साखर आंबा Sakhar Amba Marathi Recipe 2024 बनवण्याची अगदी सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही ही रेसिपी नक्कीच एकदा बनवून पहा.
साखर आंबा बनवण्यासाठीचं साहित्य :
साखर आंबा Sakhar Amba Marathi Recipe 2024 बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.
- अर्धा किलो तोतापुरी कैऱ्या
- एक मोठी वाटी साखर
- 3-4 लवंगा
- थोडीशी हळद
- चवीनुसार मीठ
- 10-12 केशरच्या काड्या
- थोडीशी वेलची पूड
साखर आंबा बनवण्याची कृती :
- साखर आंबा Sakhar Amba Marathi Recipe 2024 बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला अर्धा किलो कैऱ्या घ्यायच्या आहेत. तोतापुरी कैऱ्या आपण घेऊ शकतो कारण या कैऱ्या फार जास्त आंबट नसतात किंवा जास्त गोडही नसतात त्यामुळे साखर आंबा बनवण्यासाठी परफेक्ट आहेत पण तुमच्याकडे या नसतील तर तुम्ही कुठल्याही कैऱ्या घेऊ शकता.
- या कैऱ्या आपल्याला 2 तास पाण्यात बुडवून ठेवायच्या आहेत म्हणजे त्या स्वच्छ धुतल्या जातात आणि मग स्वच्छ कपड्याने पुसून फॅनखाली अर्धा तास वाळवून घ्यायच्या आहेत.
- कैऱ्या वाळल्या की किसणीने त्याचे साल काढून घ्यायचे. आपल्या सगळ्या कैऱ्यांचे साल काढून घ्यायचे. आता मोठे छिद्र असलेल्या किसणीने या कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत. किसताना या कैऱ्या आडव्या किसून घ्यायच्या आहेत म्हणजे त्यामुळे आपल्याला लांब किस मिळतो. चारही बाजूने कैऱ्या आडव्या किसायच्या आणि गुठळी आणि त्याच्या आजूबाजूचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे.
- आपल्या कैऱ्या किसून झाल्या आहेत. एक मोठी वाटी भरून आपला हा किस तयार झालाय.
- साखर आंबा करताना आपल्याला स्टीलचे किंवा काचेचे भांडे वापरायचे आहेत. हा कैरीचा किस आपल्याला स्टीलच्या भांड्यात टाकून कमी गॅसवर परतून घ्यायचा आहे. कमी फ्लेमवर कोरडाच परतून घ्यायचा. ही खूप महत्त्वाची स्टेप आहे कारण साखर आंबा आपल्याला अनेक महिने टिकवायचा असतो त्यामुळे कमी फ्लेमवर कोरडाच रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा. या रेसिपीमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस कमी फ्लेमवरच ठेवायचा.
- 8 ते 10 मिनिटे हा कैरीचा किस आपण कमी फ्लेमवर परतून घेतलाय. आता कैरीचा रंग हलकासा चेंज झालाय आणि कैरीला जे पाणी सुटलेलं होतं ते आटलेलं आहे. कैरीतील पाण्याचा अंश आपल्याला कमी करून घ्यायचाय. यातील पाण्याचा अंश जितका कमी होईल तितकेच दिवस तो साखर आंबा टिकेल. बऱ्याच लोकांचा साखर आंबा लगेच खराब होतो त्यामुळे इथे तुम्हाला काळजी घ्यायची आहे.
- आपली कैरी मस्त परतून झालीय आता यामध्ये आपल्याला साखर घालायचीय. जितका कैरीचा किस घेतला होता तितकीच साखर घ्यायची. आपण 1 मोठी वाटी कैरीचा किस घेतला होता तितकीच आपल्याला 1 मोठी वाटी साखर घ्यायचीय. त्यात 3-4 लवंगा घेतलेल्या आहेत.
- साखर कैरीच्या किसमध्ये टाकून मिक्स करून घ्यायची आणि कमी फ्लेमवर 1 मिनिट परतून घ्यायचीय. त्यानंतर त्यात थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, 10-12 केशरच्या काड्या टाकायच्या आणि कमी फ्लेमवर हे परतत राहायचं. थोडीशी हळद टाकल्यामुळे मस्त पिवळा रंग येतो आणि थोडं मीठ टाकल्यामुळे चटपटीत साखर आंबा बनतो.
- साखरेचं प्रमाण तुम्हाला जेवढं सांगितलंय तेवढं घ्यावंच लागेल कारण साखर आंबा जास्त दिवस टिकवायचा असेल तर साखर जास्त टाकावीच लागेल. जेवढा कैरीचा किस तेवढी साखर टाकावीच लागेल. जर तुम्ही साखर कमी घेतली तर तुमचा साखर आंबा 1-2 महिन्यानंतर खराब होऊ शकतो. जर तुम्ही जास्त आंबट कैऱ्या घेतल्या तर तुम्हाला कैरीचा किस घेतला त्यापेक्षाही जास्त साखर घालावी लागेल.
- कमी फ्लेमवर सलग परतत आपण हा साखर आंबा शिजवून घेतलेला आहे. आता एक तार येईपर्यंत हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचाय. सुरुवातीला या मिश्रणाला उकळी येऊपर्यंत शिजवून घ्यायचंय. उकळी आल्यानंतर एक तार पडते की नाही ते चेक करून बघायचं. एक तार पडायला लागलीय. आता त्यानंतरही 4 ते 5 मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायचंय.
- आता यामध्ये थोडीशी वेलची पूड घालायची. हिरवी वेलची वेळेवर कुटून यामध्ये घालायची म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो. आता गॅस बंद करून आपण साखर आंबा गार होऊ देऊ. साधारण 2 ते 3 तासानंतर आपला साखर आंबा गार झालाय. त्याचं टेक्सचर छान पारदर्शक आलंय. मस्त चकाकी येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचंय.
- आपला साखर आंबा Sakhar Amba Marathi Recipe 2024 तयार आहे. हा साखर आंबा तुम्ही हवाबंद काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. साखर आंबा फ्रीजमध्येच स्टोर करायचा कारण तो बाहेर जर ठेवला तर बदलत्या ऋतूनुसार खराब होऊ शकतो.
Indori Poha Recipe In Marathi | इंदोरी पोहा रेसिपी मराठी
या साखर आंबामध्ये प्रिझर्व्हेटिव्हज नाहीत त्यामुळे खूप हेल्दी आहे. बाहेरच्या जॅम आणि टोमॅटो केचअपपेक्षा आपला साखर आंबा खूप चांगला असतो. हा साखर आंबा शरीराला अजिबात घातक नाहीये.
हा साखर आंबा हवाबंद डब्यात भरून ठेवायचा आणि हाताळताना याला ओला चमचा किंवा पाण्याचा अंश लागू द्यायचा नाही म्हणजे तो खराब होणार नाही. घरातल्या लहाण्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा साखर आंबा खूपच आवडेल.
तुम्ही हा साखर आंबा Sakhar Amba Marathi Recipe 2024 पराठे आणि पोळीसोबत मस्त खाऊ शकता.
Important Tips For Sakhar Amba Marathi Recipe 2024
- साखर आंबा Sakhar Amba Marathi Recipe 2024 बनवण्यासाठी तोतापुरी कैऱ्या एकदम योग्य आहेत कारण त्या जास्त आंबटही नसतात आणि गोडही नसतात.
- कैऱ्या किसताना आडव्या किसायच्या म्हणजे लांब किस मिळतो.
- साखर आंबा करताना स्टीलचे किंवा काचेचे भांडे वापरायचे.
- साखर आंबा जास्त काळ टिकावा यासाठी तो कमी गॅसवर कोरडाच परतून घ्यायचा. कैरीतला पाण्याचा अंश कमी करून घ्यायचा. कैरीतला पाण्याचा अंश जेवढा कमी होईल तितकाच साखर आंबा जास्त काळ टिकेल.
- साखर आंबा बनवताना जेवढा कैरीचा किस घेऊ तेवढीच साखर घ्यायचीय. यात थोडीशी हळद टाकायची म्हणजे पिवळा रंग येतो आणि थोडंसं मीठ टाकलं तर चटपटीत बनतो.
- जास्त प्रमाणात साखर टाकली तर साखर आंबा जास्त काळ टिकतो. जर साखर कमी वापरली तर साखर आंबा लवकर खराब होतो. जर कैऱ्या जास्त आंबट असतील तर साखरेचं प्रमाण आणखी जास्त वाढवायचं.
- साखर आंबा हवाबंद काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवायचा. जर तो बाहेर ठेवला तर बदलत्या ऋतूनुसार खराब होऊ शकतो. हाताळताना याला ओला चमचा किंवा पाण्याचा अंश लागू द्यायचा नाही म्हणजे तो खराब होणार नाही.
या सर्व टिप्स वापरून तुम्ही घरच्याघरी एकदम टेस्टी साखर आंबा Sakhar Amba Marathi Recipe 2024 अगदी सहज बनवू शकता.
FAQ’s For Sakhar Amba Marathi Recipe 2024
- Sakhar Amba Marathi Recipe 2024 कसा बनवला जातो ?
साखर आंबा खूपच जास्त टेस्टी असतो. तो कैरीचा किस करून त्यात साखर, लवंगा, हळद, मीठ, केशरच्या काड्या, वेलची पूड टाकून गॅसवर छान शिजवून घेतात. त्यानंतर हा साखर आंबा छान मुरला की हवाबंद काचेच्या डब्यात ठेवायचा.
- घरी बनवलेला साखर आंबा किती काळ टिकू शकतो ?
साखर आंबा बनवल्यानंतर तो काचेच्या हवाबंद डब्यात टाकून फ्रीजमध्ये ठेवायचा. बाहेर ठेवला तर तो जास्त काळ टिकणार नाही. पण फ्रीजमध्ये ठेवला तर अनेक महिने टिकू शकतो. साखर आंबामध्ये पाण्याचा अंश नसला तर तो खूप काळ टिकू शकतो.
- Sakhar Amba Marathi Recipe 2024 खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे का ?
आपण जो घरगुती साखर आंबा बनवतो त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रिझर्व्हेटिव्ह नसतात त्यामुळे तो खूप हेल्दी असतो. बाजारात मिळणारे जॅम, केचअप एवढे हेल्दी नसतात त्यामुळे साखर आंबा खूप चांगला ऑप्शन आहे. आपल्या आरोग्यासाठी साखर आंबा खूपच चांगला आहे.
- साखर आंबा तयार करताना त्यात आपण साखरेऐवजी गूळ वापरू शकतो का ?
साखर आंबा तयार करताना तुम्ही त्यात साखर न वापरता गूळसुद्धा वापरू शकता. साखरेपेक्षा गूळ हा एक चांगला पर्याय आहे. गूळ हा साखरेपेक्षा हेल्दी असतो. गूळ वापरलेला केव्हाही चांगला म्हणजे डायबिटीजचे पेशंट आणि डायटिंग करणारे लोकंही खाऊ शकतील. गूळ वापरून केलेल्या मुरांब्याला गुळांबा असं म्हणतात.
आपला कैरीपासून बनवलेला एकदम टेस्टी साखर आंबा Sakhar Amba Marathi Recipe 2024 तुम्ही छान स्टोअर करून ठेवा आणि मग मुरल्यानंतर घरातल्या सर्वांना टेस्ट करायला द्या. तुमच्या घरातील सर्वांनाच हा साखर आंबा खूप आवडेल. पुढे वर्षभर तुम्ही पराठे, पोळ्यासोबत हा साखर आंबा नक्की खाऊ शकता. घरातच इतका टेस्टी साखर आंबा बनत असेल तर मग मार्केटमधून जॅम आणि टोमॅटो केचअप आणण्याची काहीच गरज नाही. तुम्ही ही रेसिपी नक्कीच एकदा बनवून पहा.
तुम्हाला ही Sakhar Amba Marathi Recipe 2024 रेसिपी आवडली का नक्कीच सांगा. अशाच नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.