Indori Poha Recipe In Marathi
Indori Poha Recipe In Marathi पोहे हा आपल्या सर्वांच्या घरातील आवडीचा नाश्ता आहे. अनेकदा आपल्या दिवसाची सुरुवात ही नाश्त्यामध्ये पोहे खाऊनच होत असते. कडक चहा आणि त्यासोबत चटपटीत पोहे खाल्ले की मन अगदी तृप्त होऊन जातं. घरातल्या माणसांकडून अनेकदा टेस्टी पोहे बनवण्याची फर्माईशदेखील येतच असते त्यामुळे नाश्त्यामध्ये पोहे बनवावेच लागतात.
आपल्या घरी पाहुणेसुद्धा येतात तेव्हा त्यांचं स्वागत हे चहा आणि पोह्यांनीच केलं जातं. आपल्या सर्वांचा पोहे हा आवडता खाद्यपदार्थ आहे. एवढंच काय मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमातही पाहुण्यांना कांदे पोहेच बनवले जातात. या कार्यक्रमालाही कांद्यापोह्यांचा कार्यक्रम असंच म्हटलं जातं. एखाद्या नवीन नात्याची सुरुवातही आपल्याकडे कांद्या पोह्यांनीच केली जाते.
असे हे पोहे घरासोबतच बाहेर हॉटेलमध्येही खूप आवडीने खाल्ले जातात. बाहेर पोहे खाण्यासाठी खवय्यांची भरपूर गर्दी पाहायला मिळते. रस्त्याच्या बाजूला एखाद्या गाडीवर किंवा हॉटेलमध्ये अतिशय टेस्टी पोहे मिळतात तिथे लोक आवडीने पोहे खातात. सध्या कांदा पोहे, दडपे पोहे, तर्री पोहे, दही पोहे असे असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे पोहे खायला मिळतात.
असेच आजकाल इंदोरी स्टाईलचे पोहे Indori Poha Recipe In Marathi अतिशय लोकप्रिय आहेत. त्यातील उत्तम मसाले आणि रुचकर चवीमुळे इंदोरी पोहे त्या भागातच नाही तर पूर्ण देशभरात आणि विदेशातसुद्धा प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यावर इंदोरी शेव, डाळिंबाचे दाणे असे अनेक पदार्थ वरून टाकतात.
आज आम्ही इंदोरी पोहे Indori Poha Recipe In Marathi घरच्याघरी बनवण्याची अतिशय सोपी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
इंदोरी पोहा बनवण्याचं साहित्य :
इंदोरी पोहे Indori Poha Recipe In Marathi बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.
जीरावन मसाला बनवण्याचं साहित्य :
- 4-5 सुक्या लाल मिरच्या
- 2 तेजपत्ता
- 2 हिरवी वेलची
- 1 मोठी वेलची
- थोडेसे दालचिनीचे तुकडे
- जावित्री
- 2 चमचे धने
- थोडीशी काळी मिरी
- 4-5 लवंगा
- 1 चमचा जिरे
- 1 चमचा बडीशेप
पोहे बनवण्याचं साहित्य :
- 2 कप जाड पोहे
- पाव चमचा हिंग
- पाव चमचा सुंठ पावडर
- 1 चमचा काळं मीठ
- 1 चमचा साधं मीठ
- 1 चमचा आमचूर पावडर
- थोडंसं किसलेलं जायफळ
- चवीनुसार मीठ
- 2 चमचे पिठीसाखर
- अर्धा चमचा मोहरी
- अर्धा चमचा जिरे
- 3-4 कापलेल्या हिरव्या मिरच्या
- कढीपत्त्याची पानं
- अर्धा चमचा बडीशेप
- थोडेसे तेजपत्ता
- थोडीशी हळद
- चिमूटभर हिंग
- तळलेले शेंगदाणे
- लिंबाचा रस
- थोडासा चिरलेला कांदा
- थोडासा चिरलेला टोमॅटो
- थोडीशी चिरलेली कोथिंबीर
- बारीक शेव
- रतलामी शेव
इंदोरी पोहा बनवण्याची कृती :
आज आपण इंदोर स्पेशल इंदोरी पोहा Indori Poha Recipe In Marathi बनवणार आहोत. त्यामध्ये एक स्पेशल जीरावन मसाला टाकला जातो. आपण सर्वात आधी हा जीरावन मसाला बनवून घेणार आहोत.
- जीरावन मसाला बनवण्यासाठी गॅसवर एक पॅन तापत ठेवायचा. त्यामध्ये 4 ते 5 सुक्या लाल मिरच्या, 2 तेजपत्ता, 2 हिरवी वेलची, 1 मोठी वेलची, थोडेसे दालचिनीचे तुकडे, जावित्री, 2 चमचे धने, थोडीशी काळी मिरी, 4 ते 5 लवंगा, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप हे सर्व मसाले कमी गॅसवर 4 ते 5 मिनिटे आपल्याला परतून घ्यायचे आहेत.
- मसाल्याचा छान सुगंध सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर गॅस बंद करून मसाले थंड होऊ द्यायचे आणि मिक्सरमध्ये याची पूड तयार करून घ्यायची. तेजपत्ताचे तुकडे करून घ्यायचे आणि मिरच्यांचे देठ काढून घ्यायचे.
- आता आपण पोह्यांची तयारी करूया. एका भांड्यात 2 कप जाड पोहे घ्यायचे. हे पोहे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. अगदी हलक्या हाताने पोहे धुवायचे. त्यानंतर एका चाळणीमध्ये हे पोहे टाकून त्यातलं पाणी काढून घ्यायचंय आणि पोहे नितळत ठेवायचे. 5 ते 10 मिनिटे हे पोहे आपल्याला मुरत ठेवायचे आहेत.
- आपले मसाले थंड झाले आहेत. आता ते मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घ्यायचे आहेत. हा मसाला एका वाटीत काढून त्यात पाव चमचा हिंग, पाव चमचा सुंठ पावडर, 1 चमचा काळं मीठ, 1 चमचा साधं मीठ, 1 चमचा आमचूर पावडर, थोडंसं जायफळ किसून घालायचं आणि चमच्याने हे सगळं मिक्स करायचं. आपला जीरावन मसाला तयार आहे.
- हा मसाला चवीला चटकदार आणि झणझणीत असतो. तुम्ही समोसे, दही वडे वरूनही हा मसाला घालू शकता. जर तुमच्याकडे हे सर्व साहित्य उपलब्ध नसेल तर अशावेळी धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, सुंठ पावडर, सौफ पावडर आणि जायफळ हे सर्व मिक्स करून त्यामध्ये आमचूर पावडर, काळं मीठ आणि साधं मीठ वापरून हा मसाला बनवू शकता. पण आपण घेतलेल्या ताज्या मसाल्यांची चव छान लागते आणि जीरावन मसाला टाकल्यानंतरच इंदोरी पोह्यांची चव फुलते त्यामुळे हा मसाला असायलाच हवा.
- आपले पोहे छान मुरले आहेत. मोकळे मोकळे झालेत. आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया. यामध्ये चवीनुसार मीठ, 2 चमचे पिठीसाखर घालायची. इंदोरी पोहा चवीला चटपटीत आणि गोड जास्त प्रमाणात असतो त्यामुळे यात साखर टाकायची आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं.
- आता आपल्याला पोह्यांमध्ये फोडणी तयार करून घालायचीय. त्यासाठी एका वाटीत अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 3-4 कापलेल्या हिरव्या मिरच्या, थोडीशी कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा बडीशेप, थोडेसे तेजपत्ता काप करून घालायचे. बडीशेपमुळे इंदोरी पोह्यांना छान फ्लेवर येतो.
- पॅनमध्ये तेल तापवून घ्यायचं आणि लगेचच त्यामध्ये सर्व साहित्य घालायचं म्हणजे फ्लेवर छान येतो. तेलात सर्व साहित्य टाकायचं मग थोडीशी हळद आणि चिमूटभर हिंगसुद्धा घालायचं. 2 ते 3 मिनिटे ही फोडणी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून पोह्यांमध्ये घालायची आहे. अगदी हलक्या हाताने हे छान मिक्स करून घ्यायचं.
- यामध्ये वरून तळलेले शेंगदाणे टाकायचे. आता आपण पोहे शिजवून नाही तर पाण्यावर वाफवून घेणार आहोत. यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवायचं. या इडली पात्रात ढोकळ्याच्या प्लेटवर आपण पोहे वाफवून घेणार आहोत. यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटे आपण पोहे वाफवून घेऊया. मिडीयम फ्लेमवर हे वाफवायचे आहेत.
- बाहेर गाडीवर हे पोहे सलग पाण्याच्या वाफेवर गरम होत असतात आणि तसेच खायला दिले जातात. घरातही तसेच पोहे वाफेवर गरम करायचे.
- साधारण 6 ते 7 मिनिटे झालेली आहेत आणि आपले पोहे मस्त वाफवले गेलेले आहेत. सर्व्ह करेपर्यंत हे पोहे असेच पाण्यावर ठेवायचे म्हणजे छान गरम राहतात.
- इंदोरी पोह्यांवर Indori Poha Recipe In Marathi भरपूर साऱ्या गोष्टी वरून टाकल्या जातात. आता आपण हे पोहे सर्व्ह करून घेऊया पोहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यावर लिंबूचा रस पिळायचा, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, आवडीनुसार जीरावन मसाला, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडी बारीक शेव, रतलामी किंवा इंदोरी शेव टाकायची.
जर तुमच्याकडे शेव उपलब्ध नसेल तर तुम्ही फरसाणसुद्धा टाकू शकता. यासोबतच गाजराचे काप, बीटरूटचे काप, डाळिंबाचे दाणे, तिखट बुंदी घालू शकता. आपले इंदोर स्पेशल इंदोरी पोहे तयार आहेत. सर्वांना हे नक्कीच आवडतील.
Important Tips For Indori Poha Recipe In Marathi
- इंदोरी पोह्यांमध्ये Indori Poha Recipe In Marathi जीरावन मसाला टाकल्यामुळे टेस्ट आणखीन वाढते त्यामुळे हा मसाला असायलाच हवा.
- इंदोरी पोह्यांमध्ये बडीशेप नक्की वापरायची नाहीतर इंदोरी पोह्यांचा फ्लेवर येणार नाही.
- इंदोरी पोहे शिजवत नाहीत तर पाण्यावर वाफवून घेतात. त्यासाठी इडलीच्या पात्रात पाणी उकळून त्यावर ढोकळ्याच्या भांड्यात पोहे टाकून हे पाण्यावर वाफवले जातात.
तुम्ही या सर्व टिप्स वापरून इंदोरी पोहा Indori Poha Recipe In Marathi घरच्याघरी नक्की बनवू शकता.
FAQ’s About Indori Poha Recipe In Marathi
- Indori Poha Recipe In Marathi कसा बनवला जातो ?
इंदोरी पोहा हा खूपच प्रसिद्ध आहे. यामध्ये जाड पोहे, पिठीसाखर, बडीशेप, हिरव्या मिरच्या आणि भरपूर सारे मसाले टाकले जातात. जीरावन मसल्यामुळे इंदोरी पोह्यांना वेगळीच चव येते. हे पोहे पाण्याच्या वाफेवर वाफवले जातात. त्यावर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, बारीक शेव, रतलामी शेव असे सर्व पदार्थ टाकले जातात.
- पोह्यांसाठी कोणतं शहर प्रसिद्ध आहे ?
इंदौर हे शहर आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांसाठी प्रचंड लोकप्रिय आहे. इथे असंख्य प्रकारचे स्नॅक्स मिळतात जे खाण्यासाठी खवय्ये खूप गर्दी करतात. इथे पोहा सर्वात जास्त लोकप्रिय पदार्थ आहे. इंदोरी पोहा म्हणून देश विदेशात अतिशय लोकप्रिय आहे.
- पोहे खाल्ल्याने काय फायदा होतो ?
Indori Poha Recipe In Marathi खाण्याचे आरोग्याला खूप सारे फायदे आहेत. पोहे हे पचनासाठी खूप हलके असतात त्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगलं राहतं. अपचन कधी होत नाही. पोह्यांमध्ये प्रोटीन, फायबर आणि कार्बोहायड्रेट्स असतात त्यामुळे पचनशक्ती सुधारते. पोह्यांमध्ये भरपूर फायबर असल्याने ब्लड शुगर लेव्हल आपोआप मेंटेन राहते. यामध्ये भरपूर आयरन असल्यामुळे महिलांना प्रेग्नन्सी दरम्यान आणि पिरियड असताना फायदा होतो.
- पोह्यांचे कोणते प्रकार आहेत ?
आजकाल पोहे अनेक प्रकारचे बनवले जातात. कांदे पोहे, बटाटे पोहे, दही पोहे, तर्री पोहे, दडपे पोहे, फोडणीचे पोहे, मिक्स पोहे, इंदोरी पोहे Indori Poha Recipe In Marathi, कोळाचे पोहे, भेळ पोहे, मटार पोहे, कांदा बटाटा पोहे, बंगाली पोहे, कोकणी पोहे असे वेगवेगळे पोहे असतात.
पोह्यांचे हे सर्व प्रकार आपण नक्कीच ट्राय करायला हवेत.
आपले घरीच बनवलेले इंदोरी पोहे Indori Poha Recipe In Marathi तुम्ही घरच्यांना खायला देऊ शकता. सर्वांना ते खूपच आवडतील. अगदी बाहेरच्यापेक्षाही चवीला टेस्टी आणि हेल्दी पोहे बनले आहेत. तुम्हीसुद्धा नक्कीच ही रेसिपी बनवून पहा.
तुम्हाला ही Indori Poha Recipe In Marathi रेसिपी आवडली का नक्कीच सांगा. अशाच नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.