Matar Paneer Recipe In Marathi | मटार पनीर रेसिपी मराठी

Matar Paneer Recipe In Marathi

Matar Paneer Recipe In Marathi

Matar Paneer Recipe In Marathi मैत्रिणींनो रोज भाजीला नवीन काय बनवायचं हा प्रश्न तर सर्वच गृहिणींना पडतो. नेहमीच्याच भाज्या खाऊन खाऊन सर्वच जण कंटाळून जातात त्यामुळे नवीन काहीतरी बनवायचं अशी फर्माईश घरातल्या सगळ्यांकडून येते. अशावेळी काय बनवावं हा मोठा प्रश्न सर्वांच्यासमोर उभा राहतो.

त्यातल्या त्यात घरातल्या एकाला ही भाजी आवडत नाही तर दुसऱ्याला ती भाजी आवडत नसते त्यामुळे सगळंच कन्फ्युजन होऊन जातं. अशावेळी अनेकजण हॉटेलमध्ये जाऊन खाण्याचा किंवा मग बाहेरून पार्सल आणण्याचा पर्याय निवडतात पण एकदा दोनदा आपण हॉटेलमध्ये खाऊ पण नेहमी नेहमी आपण तसं करू शकत नाही.

हॉटेलच्या भाज्या तर सर्वांनाच आवडतात मग या भाज्या आपण घरीच बनवून खाल्ल्या तर त्यापेक्षा उत्तम काय असेल. घरच्यासारखी हेल्दी आणि स्वच्छ भाजी तर आपल्याला हॉटेलमध्येही मिळू शकत नाही. सोबतच आपण हॉटेलसारखीच भाजीची टेस्टही घरी आणू शकतो.

आज आम्ही अगदी हॉटेलसारखी टेस्टी मटार पनीरची भाजी Matar Paneer Recipe In Marathi घरच्याघरी बनवण्याची अगदी सोपी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ही मटार पनीरची भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल.

मटार पनीर बनवण्याचं साहित्य :

  • 250 ग्रॅम पनीर
  • 2 चमचे तेल
  • 2 मोठे उभे चिरलेले कांदे
  • 2 मोठे चिरलेले टोमॅटो
  • थोडंसं मीठ
  • 1 चिरलेली हिरवी मिरची
  • 4-5 काजू
  • 1 चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर
  • 1 चमचा किचनकिंग मसाला
  • थोडंसं पाणी
  • 2-3 मोठे चमचे तेल
  • 1 छोटा चमचा जिरे
  • 2 छोटे चमचे आलं लसणाची पेस्ट
  • 1 छोटा चमचा जिरेपूड
  • 1 छोटा चमचा धनेपूड
  • अर्धा छोटा चमचा हळद
  • 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर
  • 1 वाटी मटार
  • 2 चमचे दूध पावडर
  • 2 चमचे तूप
  • चवीनुसार मीठ
  • 1 चमचा किचनकिंग मसाला
  • थोडीशी कसुरी मेथी
  • थोडीशी कोथिंबीर
  • नारळाचं कवच
  • थोडंसं तूप

मटार पनीर बनवण्याची कृती :

  1. मटार पनीर Matar Paneer Recipe In Marathi बनवण्यासाठी सर्वात आधी आपण 250 ग्रॅम फ्रेश पनीर घेणार आहोत. जर तुम्हाला पनीर 2 ते 3 दिवस एकदम फ्रेश ठेवायचं असेल तर ते तुम्ही मिठाच्या पाण्यात बुडवून फ्रीजमध्ये ठेऊ शकता. पनीर खूप छान टिकतं आणि तुम्ही जे पाणी वापरलंय ते प्रत्येकदिवशी बदलायचं. पनीरचे चौकोनी काप करून घ्यायचे. तुम्ही मलाई पनीरसुद्धा वापरू शकता.
  2. आता आपण भाजीची ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत. यासाठी एक पॅन गॅसवर गरम करून घेऊया. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकूया. तेल गरम झालं की 2 मोठे उभे चिरलेले कांदे टाकायचे. कांदे आपल्याला छान परतून घ्यायचेत. गॅस मिडीयम फ्लेमवर ठेवायचा. कांदा छान सुटसुटीत झाल्यानंतर पॅनवर झाकण ठेवून कांदा 5 ते 6 मिनिटे शिजवून घ्यायचा. गॅस कमी फ्लेमवर करायचा.
  3. आपला कांदा छान शिजलेला आहे आणि खरपूस रंगसुद्धा आलाय. आता आपल्याला त्यात 2 मोठे टोमॅटो चिरून टाकायचे आहेत. थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे आपले टोमॅटो लवकर शिजतील. छान परतून घ्यायचं आणि त्यात 1 चिरलेली हिरवी मिरची टाकायची. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही 2 हिरव्या मिरच्या घेऊ शकता किंवा तिखट आवडत नसेल तर मिरची नाही घेतली तरी चालेल. यावर पुन्हा झाकण ठेवून टोमॅटो 5 ते 6 मिनिटे शिजवून घ्यायचे.
  4. आपला टोमॅटो छान शिजला आहे. कांदा, टोमॅटो छान शिजले पाहिजे. आपण जी ग्रेव्ही बनवणार आहोत ते तुमचा मसाला किती छान शिजलेला आहे त्यावर अवलंबून असतं. आता यामध्ये 4 ते 5 काजू चिरून टाकायचे आणि परतून घ्यायचे.
  5. आपला कांदा, टोमॅटो छान शिजलेत. थोडावेळ हे थंड होऊ देऊया आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून देऊया. यामध्ये 1 चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर, 1 चमचा किचनकिंग मसाला टाकायचा आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करून घ्यायची.
  6. आता पॅनमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल टाकायचं. तेल तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. गॅस हाय फ्लेमवर करून तेल गरम करून घ्यायचं आणि मग गॅसचा फ्लेम कमी करायचा. आता तेलात 1 छोटा चमचा जिरे, 2 छोटे चमचे लसणाची पेस्ट टाकायची. लसूण छान परतून घ्यायचा म्हणजे त्याचा उग्रपणा जाईल.
  7. तेल चांगलं गरम असायला पाहिजे. त्यात आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकूया. हे वाटण तेलासोबत छान मिक्स करून घेऊया. गॅस हाय फ्लेमवर करून तेलासोबत छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर गॅस कमी फ्लेमवर करून हे मिश्रण तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं. पॅनवर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटे शिजवून घ्यायचं.
  8. आपला मसाला छान शिजलाय तेल सुटायला लागलंय. हा मसाला एकदा परतून घ्यायचा म्हणजे तो पॅनला लागणार नाही. हा मसाला आपल्याला पुन्हा शिजवून घ्यायचाय. त्यासाठी पॅनवर झाकण ठेवून पुन्हा 7 ते 8 मिनिटे शिजू द्यायचा.
  9. आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलंय. यामध्ये 1 छोटा चमचा जिरेपूड, 1 छोटा चमचा धनेपूड, अर्धा छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं. थोडंसं गरम पाणी टाकायचं. ग्रेव्ही आपल्याला घट्टच ठेवायचीय त्यानुसार अर्धा कप पाणी यात टाकून मिक्स करून घ्यायचं.
  10. यामध्ये 1 वाटी स्वच्छ धुतलेले फ्रेश मटार टाकायचे. आपण हे ग्रेव्हीसोबतच शिजवून घेणार आहोत. मटार लवकर शिजतात. आता पॅनवर झाकण ठेवून छान तेल सुटेपर्यंत कमी गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत.
  11. दुसरीकडे आपल्याला 2 चमचे दूध पावडर घ्यायची आहे त्यात थोडंसं पाणी घालून छान पेस्ट तयार करून घ्यायचीय. रेस्टोरंटमध्ये या भाजीमध्ये क्रीम टाकतात पण क्रीम सगळ्यांकडे सहज उपलब्ध नसतं त्यामुळे आपण दूध पावडरची पेस्ट तयार करून घेणार आहोत त्यामुळे भाजीला छान टेस्ट येते.
  12. 7 ते 8 मिनिटांनंतर आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटलंय. यामध्ये आपण पेस्ट टाकून देणार आहोत. यामुळे अगदी रेस्टोरंटसारखी चव येते. हे छान मिक्स करून घ्यायचं. बऱ्याचदा क्रीममुळे भाज्या गोडसर होतात पण दूध पावडरमुळे गोडसर होत नाही आणि फ्लेवरसुद्धा छान येतो.
  13. छान मिक्स करून झाल्यावर यामध्ये पनीरचे तुकडे टाकायचे. तुम्ही पनीरचे तुकडे शॅलो फ्राय करूनसुद्धा घालू शकता. पण पनीर फ्रेश असेल तर तसंच टाकायचं म्हणजे खाताना छान सॉफ्ट लागतं. पॅकेटच्या पनीरला चव छान नसते त्यामुळे तुम्ही डेअरीमधील पनीर वापरा.
  14. आता यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं छान चव लागते. थोडंसं मीठ टाकायचं. 1 चमचा किचनकिंग मसाला, थोडीशी कसुरी मेथी चोळून घालायची. सगळं छान मिक्स करून घ्यायचं.
  15. पुन्हा ही भाजी आपल्याला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची त्यामुळे पॅनवर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटे कमी फ्लेमवर शिजू द्यायची. जितकी छान आपली ग्रेव्ही शिजेल तितकी छान ही भाजी लागते.
  16. आपल्या भाजीला छान तेल सुटलंय. आपली भाजी तयार झालीय. आता गॅस बंद करायचा. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची.
  17. आता नारळाचे 2 स्वच्छ धुवून वाळवलेले कवच घ्यायचे. हे गॅसवर जाळून घ्यायचे. ते एका वाटीत ठेवायचे आणि ही वाटी पॅनमध्ये भाजीवर ठेवून त्यावर थोडंसं तूप घालायचं. मग पॅनवर झाकण ठेवून द्यायचं. 1 मिनिट ही वाटी आपल्याला भाजीवर ठेवायची मग काढून घ्यायची. यामुळे आपल्या भाजीला स्मोकी फ्लेवर येतो. एकदम चुलीवर भाजी केल्यासारखी वाटते.
  18. 1 मिनिटाने ही वाटी काढून घ्यायची जास्तवेळ ठेवायची नाही नाहीतर जळल्यासारखी टेस्ट लागते. आपली रेस्टोरंटसारखी मटार पनीर भाजी Matar Paneer Recipe In Marathi तयार आहे. ती तुम्ही पोळीसोबत प्लेटमध्ये सर्व्ह करू शकता.

Misal Pav Marathi Recipe 2024 | मिसळ पाव रेसिपी मराठी

Important Tips For Matar Paneer Recipe In Marathi
  1. तुम्हाला जर पनीर 2 ते 3 दिवस फ्रेश ठेवायचं असेल तर मिठाच्या पाण्यात भिजवून फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे पनीर छान टिकतं. फक्त ते पाणी रोज बदलायचं.
  2. कांदा टोमॅटो शिजवताना थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे आपले टोमॅटो लवकर शिजतील.
  3. जितका छान आपला मसाला शिजेल तितकी आपली भाजीची ग्रेव्ही टेस्टी बनते त्यामुळे मसाला छान शिजवायचा.
  4. आपल्या मटार पनीरमध्ये क्रीमऐवजी दूध पावडरची पेस्ट टाकायची म्हणजे आपली भाजी गोडसर होणार नाही आणि फ्लेवर छान येतो.
  5. पॅकेटचं पनीर वापरायचं नाही कारण त्याची टेस्ट छान नसते. तुम्ही डेअरीचं पनीर वापरू शकता.
  6. आपल्या भाजीला छान स्मोकी फ्लेवर येण्यासाठी नारळाचे कवच गॅसवर जाळून ते एका वाटीत ठेवायचे आणि ही वाटी 1 मिनिट भाजीवर ठेवायची आणि पॅनवर झाकण ठेवायचं. आपली भाजी चुलीवर बनवल्यासारखीच लागते.

तुम्ही या सर्व टिप्स वापरून टेस्टी मटार पनीरची Matar Paneer Recipe In Marathi भाजी बनवू शकता.

FAQ’s About Matar Paneer Recipe In Marathi
  1. Matar Paneer Recipe In Marathi कशापासून बनवली जाते ?

Matar Paneer Recipe In Marathi ही खूपच टेस्टी भाजी आहे. ही भाजी हिरवेगार वाटाणे आणि फ्रेश पनीरपासून बनवली जाते. आणखी यामध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, तूप, काजू, कोथिंबीर, दूध पावडर आणि खूप सारे मसाले टाकले जातात. उत्तर भारतात ही मटार पनीरची Matar Paneer Recipe In Marathi भाजी खूप प्रसिद्ध आहे.

  1. Matar Paneer Recipe In Marathi आरोग्यासाठी चांगलं आहे का ?

Matar Paneer Recipe In Marathi खाणं आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. यामध्ये हिरवे वाटाणे, पनीर टाकलेलं असतं. ही भाजी खूप हेल्दी असते यात भरपूर प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स असतात जे आपल्याला स्ट्रॉंग बनवतात. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी ही भाजी छान बनते. दुसऱ्या भाज्यांइतकेच यातून शरीराला फायदे मिळतात.

आपली अतिशय टेस्टी रेस्टोरंटपेक्षाही चांगली मटार पनीर Matar Paneer Recipe In Marathi तयार आहे. तुम्ही घरच्यांना सर्व्ह करू शकता. ही भाजी सर्वांना नक्कीच आवडेल. ही मटार पनीर रेसिपी तुम्ही नक्कीच एकदा बनवून पहा.

तुम्हाला ही Matar Paneer Recipe In Marathi कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन टेस्टी रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.

तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.  

Scroll to Top