Basundi Recipe In Marathi 2024
Basundi Recipe In Marathi 2024 मैत्रिणींनो दरवर्षीप्रमाणे होळी आलीय आणि सोबत खूप सारा आनंदसुद्धा घेऊन आलीय. या होळीला आपण काहीतरी गोड पदार्थ बनवून सगळ्यांचं तोंड गोड करायला हवं म्हणजे होळीचा आनंद अजूनच द्विगुणित होईल. होळीच्या रंगांसोबत एखादा गोड पदार्थ खाण्याची मजा काही औरच असते.
आपण या होळीला सर्वांची आवडती बासुंदी बनवणार आहोत. बासुंदी ही दुधापासून आणि साखरेपासून बनणारी स्वादिष्ट मिठाई आहे. आपल्याला सर्वांना बासुंदी खायला तर अतिशय आवडते. विशेष म्हणजे ही बासुंदी आपल्या महाराष्ट्रातच बनवण्यात आलीय. बासुंदी ही आपल्या महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचं प्रतीक आहे.
अगदी टेस्टी बासुंदी घरच्याघरी बनवणं खूप सोपं असतं. आज आम्ही Basundi Recipe In Marathi 2024 सुमधुर बासुंदी बनवण्याची अतिशय सोपी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. होळीच्या सणानिमित्त ही गोड बासुंदी तुम्ही नक्कीच बनवून पहा.
बासुंदी बनवण्याचं साहित्य :
सुमधुर बासुंदी Basundi Recipe In Marathi 2024 बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.
- 1 लिटर म्हशीचं दूध
- 2 चमचे थंड दूध
- केशरचे धागे
- 20 ग्रॅम काजू
- 1 छोटा चमचा चारोळी
- पाव कप साखर
- अर्धा चमचा वेलची पूड
- थोडीशी जायफळ पूड
बासुंदी बनवण्याची कृती :
- बासुंदी Basundi Recipe In Marathi 2024 बनवण्यासाठी आपण जी कढई किंवा पॅन वापरणार आहोत ते एकदम स्वच्छ असायला हवं. आपण अनेकदा या कढईमध्ये तेलाचे पदार्थ बनवतो त्यामुळे त्यात धुतल्यानंतरही तेलाचे काही अंश असतात. अशावेळी दुधाचे पदार्थ बनवण्याआधी या कढईमध्ये एक दोन वेळा गरम पाणी उकळून घ्यायचं त्यामुळे कढई स्वच्छ होऊन जाते.
आपण स्वच्छ धुतलेली कढई घेतली आहे. याला कुठलाही वास किंवा तेलकटपणा नाहीये. - या कढईमध्ये आपण 1 लिटर म्हशीचं दूध घेऊया. जर तुम्ही पॅकेटचं दूध वापरत असाल तर तुम्हाला फुल क्रीम दूध घ्यायचं आहे.
- आता आपण हे दूध उकळून घेणार आहोत. हाय फ्लेमवर दूध उकळायचंय. दुधाला उकळी आली की गॅस कमी फ्लेमवर करायचा आणि सलग ढवळत हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. पसरट भांडं घेतल्यामुळे दूध लवकर आटलं जातं. बासुंदी बनवण्यासाठी पसरट भांडं घ्यायचं म्हणजे दूध लवकर आटतं.
- दूध सलग ढवळत राहायची गरज नाही. गॅस मंद करून पॅनवर चमचा ठेवू शकता त्यामुळे बासुंदी उतू जाणार नाही किंवा खालून लागणारही नाही.
- जर आपण खोलगट किंवा उभं भांडं घेतलं तर त्यावर एखादी प्लेट किंवा वाटी ठेवू शकता त्यामुळे दूध खालून लागणार नाही. कढईवर सुद्धा छोटीशी प्लेट ठेवू शकता.
- सलग आपण दूध ढवळत असू तर प्लेट ठेवायची नाही. पण जर तुम्हाला दुसरं काही काम करायचं असेल तर तुम्ही प्लेट ठेवू शकता. आपल्याला सलग बुडापासून ढवळत राहायचंय म्हणजे खालून बासुंदी लागणार नाही.
- तोपर्यंत दुसरीकडे 2 चमचे थंड दूध घ्यायचं आणि त्यामध्ये थोडे केशरचे धागे टाकायचे आहेत. दुधाला साय आलेली आहे ती आपण बाजूला करून घेऊया आणि मध्यभागी खालच्या भागातून ढवळत राहायचं.
- मंद गॅसवरच दूध आपल्याला तापवत राहायचंय त्यामुळे दुधाच्या खालच्या भागाला जास्त तापमान मिळतं आणि वरच्या भागाला तापमान कमी मिळतं त्यामुळे तिथे साय बनते. बासुंदीमध्ये दुधाला साय आल्याने चव छान लागते. जर आपण गॅस हाय फ्लेमवर केला तर दुधाला सर्व बाजूंनी समान तापमान मिळेल आणि साय बनणार नाही.
- सुरुवातीचे 20 ते 25 मिनिटे आपल्याला दूध मंद आचेवरच तापवायचंय. सायमुळे दुधाला चव आणि टेक्सचर छान येतं.
- आता आपल्याला 20 ग्रॅम काजू घ्यायचेत आणि त्याची मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची. ही काजूची पावडर बासुंदीमध्ये टाकल्याने बासुंदी लवकर आटते. 1 लिटर दुधासाठी आपण 20 ग्रॅम काजू घेणार आहोत.
- काजूची मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आणि ती या दुधामध्ये टाकायची. 2 ते 3 चमचे काजूची पावडर आपल्याला दुधात घालायची. काजूची पावडर आपण थंड दुधात मिक्स करून सुद्धा घालू शकतो. तशीच टाकली तरी चालते.
- गुठळ्या होऊ नये म्हणून दूध सलग ढवळत राहायचं म्हणजे त्या दुधात मिक्स होतील. काजू पावडरऐवजी तुम्ही 1 ते 2 चमचे खवासुद्धा टाकू शकता नाहीतर 2 पेढे कुस्करून देखील घालू शकता म्हणजे बासुंदी लवकर घट्ट होते. कुठलाही एक पदार्थ तुम्ही टाकू शकता त्यामुळे चव खूप छान येते.
- आता 1 छोटा चमचा चारोळी दुधात टाकायची. त्यानंतर केसरचं दूध टाकून मिक्स करून घ्यायचं. आता पाव कप साखर यामध्ये टाकायची. तुम्हाला जर बासुंदी जास्त गोड हवी असेल तर तुम्ही जास्त साखरही टाकू शकता. पण खूप गोड बासुंदी चांगली लागत नाही कमी गोड बासुंदी छान लागते त्यामुळे साखर कमीच टाका.
- साखर टाकल्यावर गॅस बंद करायचा आणि अर्धा चमचा वेलची पूड आणि थोडीशी जायफळ पूड घालून मिक्स करून घ्यायचं. आपली घट्टसर बासुंदी तयार आहे.
- तुम्हाला जर कमी घट्ट बासुंदी हवी असेल तर तुम्ही साखर घातल्यावर कधीही गॅस बंद करू शकता.
- तुम्ही आपली ही सुमधुर बासुंदी आता सर्व्ह करू शकता.
- बासुंदी तुम्ही पुरीसोबत किंवा तशीही खाऊ शकता. मस्त टेस्टी लागते. होळीला ही बासुंदी बनवल्याने आणखीनच जास्त शोभा येईल.
- घट्ट बासुंदीला Basundi Recipe In Marathi 2024 उत्तर भारतात रबडी असं देखील म्हणतात. बासुंदीचे अनेक प्रकारदेखील असतात. तुम्ही बासुंदी बनवताना त्यात काही पदार्थ मिसळून वेगवेगळ्या फ्लेवरची बासुंदी बनवू शकता.
आपण बासुंदीचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत.
- खवा बासुंदी
- सीताफळ बासुंदी
- आंबा बासुंदी
- अननस बासुंदी
- गुलकंद बासुंदी
- नवरत्न बासुंदी
- गुलाबजामुन बासुंदी
- इंद्राणी बासुंदी
- केशर पिस्ता बासुंदी
- चॉकलेट बासुंदी
- बटरस्कॉच बासुंदी
- रोझ बासुंदी
- स्ट्रॉबेरी बासुंदी
- अंगुरी बासुंदी
- लस्सी बासुंदी
- रसगुल्ला बासुंदी
- ड्रायफ्रूट मिक्स बासुंदी
- राजभोग बासुंदी
- शुगर फ्री बासुंदी
- नारळ बासुंदी
आजकाल तर मार्केटमध्ये बासुंदी चहासुद्धा मिळायला लागला आहे. हा बासुंदी चहा खूप टेस्टी लागतो आणि सध्या अतिशय लोकप्रियसुद्धा झाला आहे.
बासुंदी चहा हा रेग्युलर चहापेक्षा थोडा घट्ट असतो. हा चहा फक्त दुधापासून बनवला जातो त्यात पाणी घालत नाही. बासुंदी चहाचा स्पेशल मसालासुद्धा असतो जो या चहामध्ये टाकला जातो.
Important Tips For Basundi Recipe In Marathi 2024
- Basundi Recipe In Marathi 2024 बनवताना आपण जी कढई घेतो ती खूप स्वच्छ असायला हवी. कढईत आपण तेलाचे पदार्थ बनवतो त्यामुळे त्यात तेलाचे अंश किंवा वास राहू शकतो ते घालवण्यासाठी त्यात 1 ते 2 वेळा पाणी उकळून घ्यायचं म्हणजे कढई छान स्वच्छ होते.
- बासुंदी बनवण्यासाठी पसरट भांडं घ्यायचं म्हणजे दूध लवकर आटलं जातं.
- तुम्ही पसरट भांडं घेतलं तर त्यावर चमचा ठेवून द्यायचा म्हणजे दूध उतू जाणार नाही आणि खोलगट किंवा उभं भांडं घेतलं तर त्यावर एखादी प्लेट किंवा वाटी ठेवू शकता.
- दूध कमी गॅसवर तापवायचं म्हणजे बासुंदीला छान साय येते आणि साय आल्यामुळे बासुंदी छान टेस्टी बनते.
- बासुंदी लवकर घट्ट होण्यासाठी तुम्ही काजूची पावडर किंवा खवा किंवा पेढे कुस्करून दुधात घालू शकता.
- बासुंदीमध्ये कमी साखर घालायची म्हणजे टेस्ट छान लागते.
- तुम्हाला जर बासुंदी कमी घट्ट हवी असेल तर साखर टाकल्यानंतर तुम्ही गॅस कधीही बंद करू शकता.
या सर्व टिप्स वापरून तुम्ही सुमधुर बासुंदी Basundi Recipe In Marathi 2024 घरीच बनवू शकता.
Balushahi Recipe In Marathi | बालूशाही रेसिपी मराठी 2024
FAQ’s About Basundi Recipe In Marathi 2024
- Basundi Recipe In Marathi 2024 कशापासून बनवली जाते ?
बासुंदी ही खूपच स्वादिष्ट मिठाईचा प्रकार आहे. ही बासुंदी म्हशीच्या दुधापासून बनवली जाते. दुधामध्ये साखर, काजू, चारोळी, केसरचं दूध, वेलची पूड आणि जायफळ पूड टाकून बासुंदी बनवली जाते. होळीला ही गोड बासुंदी खूप आवडीने बनवली जाते. ही बासुंदी आपण तशीच किंवा पुरीसोबत खाऊ शकतो.
- बासुंदी खाणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे का ?
बासुंदी ही शुद्ध दुधापासून बनवली जाते आणि दूध हे आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगलं आहे त्यामुळे ही दुधाची बासुंदी आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. शुद्ध दूध हे आरोग्यासाठी अमृतच आहे. ही बासुंदी तुम्ही थंड करून खाऊ शकता त्याचे शरीराला अनेक फायदे आहेत.
- Basundi Recipe In Marathi 2024 ही कुठली प्रसिद्ध मिठाई आहे ?
बासुंदी ही आपल्या महाराष्ट्रातीलच प्रसिद्ध मिठाई आहे. महाराष्ट्रासोबतच गुजरात आणि राजस्थानमध्ये ही बासुंदी बनवली जाते. पण सध्या पूर्ण देशभरात बासुंदी बनवली जाते आणि आवडीने खाल्ली जाते. उत्तर भारतात घट्ट बासुंदीला रबडी म्हणतात. बासुंदी पुरीसोबत खाल्ली जाते किंवा जेवणानंतर गोड म्हणून खातात.
- बासुंदी आपण किती दिवस फ्रीजमध्ये ठेऊ शकतो ?
Basundi Recipe In Marathi 2024 जर तुम्हाला जास्त काळ टिकवायची असेल तर तुम्ही हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. 3 ते 4 दिवस तुमची बासुंदी चांगली राहील. त्यानंतर तुम्ही थंड बासुंदी खाऊ शकता किंवा मग पॅनमध्ये गरम करूनही खाऊ शकता.
- दुधामुळे आपली चरबी वाढते का ?
आपण रोज दुधापासून बनलेले पदार्थ खात असतो. दूध, दही किंवा चिझ आपल्या जेवणात असतंच पण हे सर्व पदार्थ खूप हेल्दी असतात आणि त्यामुळे आपल्या शरीरात चरबी वाढत नाही. आजकाल लो फॅट आणि फॅट फ्री डेअरी प्रोडक्ट बनवले जातात त्यामुळे सगळीकडे गैरसमज पसरलाय की दुधाचे पदार्थ खाल्ल्याने चरबी वाढते पण दूध किंवा दुधाच्या पदार्थांमुळे चरबी वाढत नाही.
तुम्ही होळीला ही सुमधुर बासुंदी Basundi Recipe In Marathi 2024 नक्कीच बनवून पहा. ही टेस्टी बासुंदी खाऊन तुमच्या घरचे खूपच खुश होतील. घट्ट बासुंदी खायला खूप छान वाटतं. बासुंदी बनवण्याची ही इतकी सोपी रेसिपी आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा नक्कीच बनवाल आणि या टेस्टी बासुंदीचा आस्वाद घ्याल.
तुम्हालासुद्धा ही Basundi Recipe In Marathi 2024 रेसिपी आवडली का नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.