Balushahi Recipe In Marathi | बालूशाही रेसिपी मराठी 2024

Balushahi Recipe In Marathi

Balushahi Recipe In Marathi

Balushahi Recipe In Marathi बालूशाही ही आपल्या देशातील पारंपरिक मिठाई आहे. विशेषतः उत्तर भारतामध्ये बालूशाही खूपच लोकप्रिय मिठाई आहे आणि तिकडे खूपच आवडीने खाल्ली जाते. आपल्याकडेही अनेक मिठाईच्या दुकानांमध्ये उत्तम प्रकारची बालूशाही बनवली जाते आणि अनेकजण आवर्जून ही बालूशाही खाताना दिसतात. बालूशाही अतिशय टेस्टीसुद्धा असते.

विशेषतः सणावाराला बालूशाही अनेक घरांमध्ये आवडीने खाल्ली जाते. मिठाई घेण्यासाठी अनेक दुकानांमध्ये भरपूर गर्दीसुद्धा पाहायला मिळते. पण सध्या दुकानांमधील मिठायांमध्ये जी भेसळ पाहायला मिळते ती पाहता अनेकजण घरीच मिठाई बनवण्याचा प्रयत्न करतात.

घरच्याघरी बालूशाही बनवणं अगदी सोपं आहे त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी बालूशाही बनवण्याची सोपी रेसिपी (Balushahi Recipe In Marathi) घेऊन आलो आहोत. अशाप्रकारे बालूशाही घरीच बनवली तर तुम्हाला बाहेरून आणण्याची काहीच गरज राहणार नाही.

बालूशाही बनवण्याचं साहित्य :

बालूशाही (Balushahi Recipe In Marathi) बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.

अर्धा किलो बालूशाही बनवण्यासाठी आपण घेणार आहोत

  • 5 कप मैदा
  • 2 छोटे चमचे बेकिंग पावडर
  • चिमूटभर मीठ
  • 1 कप तूप
  • गरजेनुसार पाणी
  • तळण्यासाठी तेल

साखरेचा पाक बनवण्याचं साहित्य :

  • 4 कप साखर
  • 2 कप पाणी
  • केसरचे धागे
  • पाव चमचा वेलची पूड

बालूशाही बनवण्याची कृती :

  1. बालूशाही (Balushahi Recipe In Marathi) बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यावर चाळणी ठेवायची आणि या चाळणीत 5 कप मैदा घ्यायचा. हा अर्धा किलो मैदा होतो.
  2. यामध्ये आता 2 छोटे चमचे बेकिंग पावडर टाकायची आणि चमच्याच्या साहाय्याने हलवून हा मैदा आणि बेकिंग पावडर चाळून घ्यायची.
  3. आपण बालूशाही बेकिंग पावडर वापरून करणार आहोत. जर आपण बेकिंग सोडा वापरला तर त्यामध्ये दहीसुद्धा टाकावं लागतं पण आपण दही वापरणार नाही त्यामुळे बेकिंग सोडासुद्धा टाकायचा नाही.
  4. चाळलेला मैदा एका पसरट ताटामध्ये काढायचा आहे. त्यामुळे चिमूटभर मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे चव आणखी वाढते. आता 1 कप साजूक तूप टाकायचंय. याऐवजी तुम्ही वनस्पती तूपसुद्धा वापरू शकता. 5 कप मैद्याला 1 कप साजूक तूप हे अगदी योग्य प्रमाण आहे.
  5. आता हे मिश्रण आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचंय. आपलं तूप हे सर्व मैद्याला लागलं गेलं पाहिजे. मिक्स करून झाल्यावर या मिश्रणाची मूठ बांधली तर मूठ पडली पाहिजे इतकं हे मिक्स करायचं.
  6. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर गोळा मिक्स करून घ्यायचा. इथे आपल्याला पोळीची कणिक मळतो तसं जोर देऊन मळायचं नाही फक्त थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचंय. आपल्याला बालूशाहीला भरपूर लेयर्स आणायचे आहेत त्यामुळे हलका गोळा ठेवायचाय.हलक्या हाताने हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि हा गोळा तयार झाल्यावर यावर एक झाकण ठेवून अर्धा ते 1 तास आपल्याला तसंच ठेवायचं आहे.
  1. 1 तास झाल्यावर या गोळ्याच्या आपल्याला लेयर्स तयार करून घ्यायच्या आहेत. यासाठी अर्धा गोळा तोडून तो एकावर एक ठेवायचा. पुन्हा अर्धा गोळा तोडून दुसऱ्यावर ठेवायचा असं अनेकवेळा करायचं. अशाप्रकारे लेयर्स द्यायच्या आहेत आणि ते मिक्स करून घ्यायचंय.
  2. आपल्या गोळ्याला छान लेयर्स आल्यावर यापासून बालूशाही तयार करून घ्यायच्या आहेत. छोटा गोळा घेऊन सुरुवातीला त्याला गोल आकार द्यायचा आणि मग चपटं केल्यावर त्याच्या मध्यभागी छिद्र करायचं. रवी किंवा लाटणं किंवा खलबत्त्यामधील बत्त्याच्या मागील बाजूने हे छिद्र करायचं. अशाप्रकारे आपल्या सर्व बालूशाही तयार करून घ्यायच्या.
  3. बालूशाही तळण्याआधी आपण साखरेचा पाक तयार करून घेऊया. त्यासाठी एका पसरट पॅनमध्ये 4 कप साखर घेऊया आणि यात 2 कप पाणी टाकायचंय. आता साखर विरघळेपर्यंत सलग चमच्याने ढवळत राहायचंय. गॅस मिडीयम फ्लेमवर ठेवायचा.
  4. साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर थोडेसे केसरचे धागे गरम पाण्यात भिजवून घेतलेले यात टाकायचे. यामुळे पाकाला आणि बालूशाहीला छान रंग येतो.
  5. बालूशाहीसाठी आपल्याला एकतारी पाक करायचाय. हा पाक चिकट असायला हवा. साखर विरघळल्यानंतर पाकाला उकळी आली की साधारण 6-7 मिनिटे हा पाक शिजवून घ्यायचाय. एक तार पडेपर्यंत हा पाक शिजवायचा.
  6. या पाकामध्ये पाव चमचा वेलची पूड टाकायची. यामुळे फ्लेवर खूप छान येतो. आता गॅस बंद करून पाक बाजूला ठेवून द्यायचा.
  7. आता आपण बालूशाही तेलात तळून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल घ्यायचं आणि हलकं तेल गरम झालं की त्यात बालूशाही सोडायच्या. गॅस कमी फ्लेमवरच ठेवायचा. बालूशाही तेलात सोडल्यानंतर त्या वर येईपर्यंत आपल्याला वाट पाहायचीय. त्याला अजिबात हात लावायचा नाही.
  8. बालूशाही तेलात वर आल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने त्याची बाजू बदलून घ्यायच्या आहेत. 5 ते 6 मिनिटे शिजवल्यानंतर चमच्याने बाजू पलटून घ्यायची आहे. गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला बालूशाही शिजवायच्या आहेत. मैदा असल्यामुळे बालूशाही शिजायला वेळ लागतो त्या आतपर्यंत शिजायला पाहिजे त्यामुळे घाई करायची नाही.
  9. सर्व बालूशाहीला एकसारखा रंग आला की त्या तेलातून काढून कोमट पाकामध्ये टाकून द्यायच्या. गरम बालूशाही लगेच कोमट पाकात टाकायच्या. त्यातून बुडबुडे येताना दिसले म्हणजे त्या पाक शोषून घेताय.
  10. बालूशाहीची पहिली बाजू पाकामध्ये 4 ते 5 मिनिटे राहू द्यायची त्यानंतर ती पलटून दुसरी बाजूही 3 ते 4 मिनिटे राहू द्यायची. 7 ते 8 मिनिटे बालूशाही पाकात मुरल्यानंतर या बालूशाही काढून घ्यायच्या.
  11. पुढच्या बालूशाही तेलात तळण्यासाठी तेल गरम असेल म्हणून गॅस आधी बंद करायचा कारण बालूशाही तळण्यासाठी तेलाचं तापमान मध्यम असायला हवं आणि या बालूशाही पाकात टाकण्याआधी तोही कोमट करून घ्यायचा. बालूशाही कोमट पाकातच टाकायच्या.
  12. आपल्या बालूशाही पाकातून काढून एका प्लेटमध्ये ठेवायच्या. जसं बाजारातील बालूशाहींवर एक साखरेचा लेअर असतो त्याप्रमाणेच आपल्या बालूशाहीवर करण्यासाठी आपला उरलेला साखरेचा पाक गॅसवर आणखी शिजवून दोन तारी करून घ्यायचा. मग हा पाक चमच्याने सर्व बालूशाहींवर टाकून घ्यायचा.
  13. या बालूशाहींवर (Balushahi Recipe In Marathi) पिस्त्याचे काप टाकायचे आहेत आणि 3 ते 4 तास मुरू दिल्यानंतर खाण्यासाठी तयार होतात. आज बालूशाही तयार केल्यानंतर उद्या त्या तुम्ही खाऊ शकता.

या बालूशाही 15 दिवसापर्यंत टिकू शकतात पण इतक्या टेस्टी झाल्यात की 2 दिवसांच्या वर टिकणारच नाहीत.

आपल्या बालूशाही (Balushahi Recipe In Marathi) तयार आहेत तुम्ही त्या काही वेळाने घरच्यांना खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.

Kothimbir Vadi Recipe In Marathi | कोथिंबीर वडी रेसिपी मराठी 2024

Important Tips For Balushahi Recipe In Marathi
  1. बालूशाही बनवण्यासाठी बेकिंग पावडर घेतली तर दही टाकण्याची काही गरज नाही पण जर तुम्ही दही घेतलं तर बेकिंग सोडादेखील टाकावा लागतो.
  2. तुम्ही जर 5 कप मैदा म्हणजेच अर्धा किलो मैदा घेतला तर 1 कप साजूक तूप असं प्रमाण घ्यायचं.
  3. बालूशाहीला (Balushahi Recipe In Marathi) लेयर्स यावेत म्हणून याच्या पिठाचा गोळा हलक्या हाताने मळायचा. थोडं थोडं पाणी टाकून फक्त मिक्स करायचं.
  4. बालूशाहीला लेयर्स यावे म्हणून गोळा तयार झाल्यावर अर्धा तोडून एकावर एक ठेवायचा. असं अनेकवेळा करायचं.
  5. बालूशाहीसाठी पाक कच्चा ठेवायचा नाही नाहीतर त्या खूप मऊ होतात आणि फार जास्तही शिजवायचा नाही नाहीतर पाक आतपर्यंत मुरतं नाही आणि बालूशाही कच्च्या राहतात.
  6. बालूशाही तळण्यासाठी तेल किंवा तूप वापरायचं. जर तेल वापरत असाल तर रिफाईंड तेल सूर्यफूल, सोयाबीन, राईस ब्रान यापैकी कुठलंही तेल वापरू शकता. बालूशाही मध्यम तापलेल्या तेलावरच तळायच्या.
  7. बालूशाही तेलात टाकल्यानंतर वर येऊपर्यंत हात लावायचा नाही आणि तळून झाल्या की गरम असताना लगेच कोमट पाकातच टाकायच्या.
  8. बालूशाही (Balushahi Recipe In Marathi) पाकातून काढल्यावर उरलेला पाक हा बालूशाहीवरच टाकून द्यायचा म्हणजे खूप छान दिसतात.

तुम्ही या सर्व टिप्स वापरून अगदी मार्केटसारखी चमचमीत बालूशाही घरीच बनवू शकता.

FAQ’s About Balushahi Recipe In Marathi
  1. बालूशाही मिठाई कशापासून बनवली जाते ?

बालूशाही मिठाई ही खूपच चविष्ट असते. ही मिठाई मैद्यापासून बनवली जाते आणि त्यामध्ये बेकिंग पावडर, मीठ, तूप टाकतात. मग तेलात तळून बालूशाही साखरेच्या पाकात मुरू देतात. अशाप्रकारे आपली टेस्टी बालूशाही तयार आहे.

  1. Balushahi Recipe In Marathi उगम कुठे झाला ?

बालूशाहीचा उगम हा आपल्या देशाच्या उत्तर भागातच झाल्याचं बोललं जातं. उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये आजही बालूशाही खूपच आवडीने खाल्ली जाते पण त्यानंतर मुगल शासकांनी ही बालूशाही दक्षिणेकडील राज्यात नेल्याचं समजतं.

  1. बालूशाहीमध्ये आपण मैद्याऐवजी काय टाकू शकतो ?

बालूशाही ही मैद्यापासून बनवली जाते पण मैदा हा आपल्या आरोग्यासाठी चांगला नसतो. मैदा पचण्यासाठी जड असतो त्यामुळे मैद्याऐवजी आपण गव्हाचं पीठही वापरू शकतो. गव्हाचं पीठ हे आरोग्यासाठी चांगलं असतं. आजकाल मैद्याला पर्याय म्हणून अनेक पदार्थांमध्ये गव्हाचं पीठ वापरलं जातं.

  1. बालूशाही आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे का ?

बालूशाहीसारखी टेस्टी मिठाई खायला तर आपल्याला सर्वांनाच आवडतं. पण गोड पदार्थ जास्त खाल्ल्याने आपलं वजन वाढू शकतं. त्याचबरोबर डायबिटीजचा त्रासदेखील होऊ शकतो त्यामुळे गोड पदार्थ कमी प्रमाणात खाणं चांगलं आहे.

  1. बालूशाहीची शेल्फ लाईफ किती दिवसांची आहे ?

बालूशाही (Balushahi Recipe In Marathi) ही 15 दिवसांपर्यंत चांगली राहू शकते पण ती इतकी टेस्टी बनते की 2 दिवसांपेक्षा जास्त काही उरणारच नाही यात शंका नाही.

आपल्या अतिशय टेस्टी बालूशाही तयार आहेत. घरच्यांना त्या खाण्यासाठी द्या. सर्वांना या बालूशाही खूपच आवडतील. इतक्या स्वादिष्ट बालूशाही (Balushahi Recipe In Marathi) घरीच बनवल्यानंतर तुम्हाला मार्केटमधून बालूशाही आणण्याची काहीच गरज नाही. अगदी सोप्यात आपली बालूशाही तयार होतील. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच बनवून पहा.

तुम्हालासुद्धा ही Balushahi Recipe In Marathi रेसिपी आवडली का नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.

तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.  

Scroll to Top