Paneer Biryani Recipe In Marathi
Paneer Biryani Recipe In Marathi बिर्याणी हे आपल्या सर्वांचं खूप आवडतं जेवण आहे. आपल्या जबरदस्त टेस्टमुळे बिर्याणी खूप पसंत केली जाते. मग ती व्हेज बिर्याणी असो किंवा नॉन व्हेज बिर्याणी दोन्हीही खूपच लोकप्रिय आहे. असेही बिर्याणीचे खूप सारे प्रकार आहेत जे खूप प्रसिद्ध आहेत.
मार्केटमध्ये बिर्याणी खाण्यासाठी लोकांची सगळीकडेच खूप गर्दी पाहायला मिळते. विकेंडला किंवा मग एखाद्या सेलिब्रेशनच्या दिवशी अनेकजण बिर्याणी खाऊन एन्जॉय करतात. बिर्याणी हे सर्वांचं आवडतं स्ट्रीट फूडदेखील आहे.
घरात रोजचीच भाजी पोळी खाऊन कंटाळा आला की काहीतरी चटपटीत खाण्यासाठी बिर्याणी हा खूपच चांगला ऑप्शन आहे. पण बाहेरची जेवणातली स्वच्छता आणि महागाई पाहता आपण ती बिर्याणी घरीच बनवली तर चांगलंच आहे.
आज आपण पनीर बिर्याणीची Paneer Biryani Recipe In Marathi अगदी सोपी रेसिपी घरच्याघरी बनवणार आहोत. पनीर बिर्याणीदेखील सर्वांची खूप फेव्हरेट आहे.
पनीर बिर्याणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य :
पनीर बिर्याणी Paneer Biryani Recipe In Marathi बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.
- 1 कप बासमती तांदूळ
- 4 कप पाणी
- 1 तेजपत्ता
- 4-5 हिरवी वेलची
- वेलदोडा
- 10-12 काळी मिरी
- 5-6 लवंग
- दगडीफुल
- चक्रीफुल
- जावित्री
- कलमीचा तुकडा
- जिरे
- 1 ते दीड चमचा मीठ
- 1 चमचा तूप
- 4 मोठे चमचे तेल
- 2 मोठे कांदे उभे चिरलेले
- जिरे
- 2-3 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- दीड चमचा आलं लसणाची पेस्ट
- 1 छोटा कांदा बारीक चिरलेला
- दीड चमचा धनेपूड
- अर्धा चमचा हळद
- 1 चमचा लाल मिरची पावडर
- 2-3 चमचे एव्हरेस्ट शाही बिर्याणी मसाला
- 1 टोमॅटोची प्युरी
- 2 मोठे चमचे दही
- 200 ग्रॅम पनीरचे मोठे आकाराचे काप
- भरपूर चिरलेली कोथिंबीर
- काही पुदिन्याची पानं
- 2 चमचे तूप
- 2 चमचे केशर घातलेलं दूध
- काही गुलाबाच्या पाकळ्या
- अल्युमिनियम फॉईल
रायता बनवण्याचं साहित्य :
- 2 कप दही
- थोडंसं पाणी
- चवीनुसार मीठ
- जिरेपूड
- किंचित पिठीसाखर
- थोडीशी कोथिंबीर
- थोडी बुंदी
Chole Bhature Recipe In Marathi | छोले भटूरे रेसिपी मराठी
पनीर बिर्याणी बनवण्याची कृती :
- Paneer Biryani Recipe In Marathi बिर्याणी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका भांड्यात 1 कप लांब शीत असलेला बासमती तांदूळ घेणार आहोत. हा तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. त्यानंतर तांदळामध्ये स्वच्छ पाणी घालून 15 ते 20 मिनिटे मुरत ठेवायचा.
- नंतर एका पॅनमध्ये 4 कप पाणी घ्यायचं. त्यात आपण खडे मसाले घालणार आहोत. 1 तेजपत्ता, 4-5 हिरवी वेलची, 1 वेलदोडा, 10-12 काळी मिरी, 5-6 लवंग, दगडीफुल, चक्रीफुल, जावित्री, कलमीचा तुकडा, जिरे हे सर्व मसाले या पाण्यामध्ये टाकायचे आहेत.
- आता 1 ते दीड चमचा मीठ टाकायचं. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये भिजत घातलेले तांदूळ टाकायचे. गॅस मिडीयम फ्लेमवर ठेवायचा.
- 1 चमचा तूप टाकून मिक्स करायचं आणि हे तांदूळ 50 ते 60 टक्क्यांपर्यंत शिजवून घ्यायचे. 5 ते 10 मिनिटांत तांदूळ शिजवून होतात.
- तांदूळ शिजल्यानंतर ते लगेच एका चाळणीवर काढायचे म्हणजे त्यातील सर्व पाणी आपल्याला काढून घेता येईल. एका चमच्याच्या साहाय्याने तांदूळ मोकळे करायचे म्हणजे थंड होतात आणि त्यात घातलेले खडे मसाले काढून घ्यायचे. ते खाताना दाताखाली येणार नाही आणि आपलं काम झालंय मसाल्यांचा फ्लेवर तांदळाला मिळाला आहे.
- आता पॅनमध्ये 4 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं. त्यात 2 मोठे उभे चिरलेले कांदे टाकायचे आणि तेलात छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचे. मिडीयम फ्लेमवर आपला कांदा छान क्रिस्पी होतो. हा कांदा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि पसरून ठेवायचा म्हणजे गार होतो.
- त्याच तेलामध्ये थोडेसे जिरे, 2-3 उभ्या चिरलेल्या मिरच्या, दीड चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून परतून घ्यायचं. त्यात 1 छोटा कांदा बारीक चिरून टाकायचा आणि परतून घ्यायचा. गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा शिजवून घ्यायचा.
- त्यानंतर यामध्ये दीड चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 2-3 चमचे एव्हरेस्ट शाही बिर्याणी मसाला टाकून कमी फ्लेमवर हा मसाला 1 मिनिट परतून घ्यायचा.
- 1 टोमॅटोची प्युरी टाकायची आणि कमी फ्लेमवर पुन्हा परतून घ्यायचं. यामध्ये 2 मोठे चमचे दही फेटून घालायचं. टोमॅटोची प्युरी आणि दही दोन्ही टाकल्यामुळे बिर्याणीला खूप छान चव येते. हे छान मिक्स करून मिडीयम फ्लेमवर परतून घ्यायचं.
- तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा. मग त्यामध्ये 200 ग्रॅम पनीरचे मोठे तुकडे करून घालायचे. पनीर थोडावेळ परतून झाल्यावर भरपूर कोथिंबीर, पुदिन्याची पानं, तळून घेतलेला कांदा आणि शिजवून घेतलेल्या भाताची एक लेअर कढईभर सगळीकडे पसरून घालायची. गॅस एकदम कमी फ्लेमवर ठेवायचा.
- यावर तांदूळ शिजल्यावर निघालेलं पाणी 2 ते 3 चमचे टाकायचं म्हणजे मसाल्याच्या फ्लेवरमुळे चव छान येते. मग 2 चमचे तूप, 2 चमचे केशर घातलेलं दूध, पुदिन्याची पानं आणि तळलेला कांदा पसरून घ्यायचा. भरपूर कोथिंबीर, काही गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या.
- या भांड्याला अल्युमिनियम फॉईलने कव्हर करून घ्यायचं आणि त्यावर झाकण ठेवायचं. कमी फ्लेमवर 10 ते 15 मिनिटे आपल्याला ही बिर्याणी शिजवून घ्यायची.
आता आपण रायता तयार करून घेऊया.
- एका भांड्यात 2 कप दही घेऊया. हे दही चांगलं फेटून घ्यायचं मग पुन्हा थोडंसं पाणी टाकून फेटून घ्यायचं. यात चवीनुसार मीठ, जिरेपूड, किंचित पिठीसाखर आणि थोडीशी कोथिंबीर टाकून फेटून घ्यायचं. आपला रायता तयार आहे. वरून आपण सर्व्ह करताना यामध्ये बुंदी घालणार आहोत.
- 15 मिनिटांनंतर आपली बिर्याणी छान शिजली आहे. आता गॅस बंद करून तसंच राहू द्यायचं आणि मग झाकण खोलायचं म्हणजे तशीच वाफेवर शिजली की बिर्याणी आणखी मोकळी होते.
आपली Paneer Biryani Recipe In Marathi तयार आहे. पनीरचे तुकडे छान दिसताय. बिर्याणीवर कोथिंबीर, तळलेला कांदा, पुदिन्याची पानं टाकून गारनिश करू शकता. सोबत कांदा, लिंबू आणि बुंदी घालून रायता देऊन प्लेटमध्ये सर्व्ह करू शकता.
अगदी रेस्टोरंटसारखी अत्यंत स्वादिष्ट पनीर बिर्याणी Paneer Biryani Recipe In Marathi आपली घरच्याघरी तयार आहे.
Important Tips For Paneer Biryani Recipe In Marathi
- तांदूळ शिजवण्यासाठी आपण तांदूळ घेतला त्याच्या प्रमाणात चारपट पाणी घ्यायचं आहे.
- तांदूळ शिजल्यानंतर त्यात टाकलेले खडे मसाले बाजूला काढून घ्यायचे म्हणजे खाताना नंतर ते दाताखाली येणार नाहीत आणि मसाल्यांचा फ्लेवरही आधीच तांदळाला लागलेला असतो.
- उभा चिरलेला कांदा तेलामध्ये क्रिस्पी होईपर्यंत छान परतून घ्यायचा हाच नंतर आपण बिर्याणीवर गारनिशिंगसाठीही वापरू शकतो.
- टोमॅटोची प्युरी आणि दही टाकल्याने बिर्याणीला खूप छान टेस्ट येते.
- आपली बिर्याणी शिजल्यावर गॅस बंद करायचा आणि 15 मिनिटे तशीच ठेवायची म्हणजे ती वाफेवर शिजते आणि छान मोकळी होते.
या सर्व टिप्स वापरून तुम्ही अतिशय टेस्टी Paneer Biryani Recipe In Marathi घरीच बनवू शकता.
FAQ’s About Paneer Biryani Recipe In Marathi
- Paneer Biryani Recipe In Marathi कशापासून बनवली जाते ?
पनीर बिर्याणी ही खूपच स्वादिष्ट असते. यामध्ये बासमती तांदूळ, पनीर, दही, कांदा, टोमॅटो आणि खूप सारे मसाले असतात. यासोबत दह्याचा रायतादेखील सर्व्ह केला जातो.
- Paneer Biryani Recipe In Marathi तब्येतीसाठी चांगली आहे का ?
पनीर बिर्याणीमध्ये कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि जीआय असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये याचा समावेश करू शकतात. पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम असतं. पनीरमुळे वजन कमी करता येतं. पनीर डायबिटीस पेशंटसाठीही चांगलं असतं कारण यामध्ये प्रोटीन जास्त असतं आणि कार्बोहायड्रेट्स कमी असतात त्यामुळे पचायला वेळ लागतो आणि डायबिटीजसाठी चांगलं असतं.
- पनीर खाल्ल्यामुळे वजन वाढते का ?
पनीर हे खूपच पौष्टिक असते. त्यामध्ये भरपूर पोषक द्रव्ये असतात. पनीर खाल्ल्याने प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम सारखे घटक शरीराला मिळतात. आपले आरोग्य चांगले राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते. पनीर मर्यादित खाल्लं तर वजन नियंत्रणात राहतं. कारण त्यामध्ये जास्त प्रोटीन आणि कमी कार्बोहायड्रेट्स असतात त्यामुळे पोट भरलेलं वाटतं.
- बिर्याणी कुठली प्रसिद्ध डिश आहे ?
बिर्याणी ही इराण या देशातून आपल्या भारतात आली आहे. तिकडे या डिशला बेरयान असं म्हणतात. बाहेरून येऊनही बिर्याणी आपल्याकडे खूपच लोकप्रिय बनली आहे आणि संपूर्ण भारतात खूप आवडीने खाल्ली जाते. हैद्राबादी बिर्याणी आपल्याकडे प्रचंड लोकप्रिय डिश आहे.
- बिर्याणीचे प्रकार कोणकोणते आहेत ?
बिर्याणी ही खूप लोकप्रिय डिश आहे आणि तिचे अनेक प्रकारदेखील आहेत. बिर्याणी ही अनेकदा स्थानिक नावांवरून ओळखली जाते. हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी, कोलकाता बिर्याणी, दिल्ली बिर्याणी, मलबार बिर्याणी, काश्मिरी बिर्याणी, लखनौवी बिर्याणी, थलासरी बिर्याणी, कांपुरी बिर्याणी अशा अनेक बिर्याणी आहेत.
आपली टेस्टी Paneer Biryani Recipe In Marathi तयार आहे. तुम्ही सुट्टीच्या दिवशी या पनीर बिर्याणीचा बेत नक्की बनवू शकता. सर्वांना ही बिर्याणी खूपच आवडेल. घरीच एवढी टेस्टी पनीर बिर्याणी बनत असेल तर मग बाहेर खाण्याची काहीच गरज नाही. अगदी आपल्या बजेटमध्ये मनभरून आपण ही पनीर बिर्याणी खाऊ शकतो.
तुम्हालासुद्धा ही Paneer Biryani Recipe In Marathi रेसिपी आवडली का नक्कीच सांगा. अशाच नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.