Shram Yogi Mandhan Yojana
Shram Yogi Mandhan Yojana एखाद्या सरकारी नोकरीतून रिटायर झालेल्या वरिष्ठ नागरिकाला तुम्ही विचारलं की, आता तुमचा उदरनिर्वाह कसा चालणार ? तर त्यांचं एकचं उत्तर असतं की, पुढील काही महिन्यांमध्ये माझी दरमहा पेन्शन सुरू होईल आणि त्यातून माझा उदरनिर्वाह सहज होईल.
आणि हाच प्रश्न जर तुम्ही एखाद्या प्रायव्हेट नोकरी करणाऱ्या माणसाला विचारला, व्यावसायिकाला विचारला, तर त्यांचे उत्तर असेल आम्ही तरुणपणापासूनचं काही बचत केली होती, तीच आम्हाला म्हातारपणात उपयोगी येईल.
परंतु त्या लोकांचं काय, ज्या लोकांना सरकारी नोकरीही नाहीये. तसंच ते कोणती प्रायव्हेट नोकरी किंवा व्यवसायही करत नव्हते. त्यांचं हातावर पोट होतं. उदाहरणार्थ रोजंदारीवर काम करणारे, चहाची टपरी चालवणारे, पान टपरी चालवणारे, घरकाम करणाऱ्या स्त्रिया, अशा लोकांकडे ना सरकारी नोकरीची पेन्शन असते, ना त्यांनी तरुणपणात खूप जास्त पैसा कमावून ठेवलेला असतो. त्यांचे हातपाय चालायचे थांबल्यानंतर, वयाच्या साठ वर्षानंतर जेव्हा त्यांना काम करता येणार नाही, तेव्हा त्यांचा उदरनिर्वाह कसा चालणार ?
याच प्रश्नाचे उत्तर घेऊन भारत सरकारची एक नवीन योजना आली आहे. याच योजनेचे नाव आहे (Shram Yogi Mandhan Yojana) प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. मग ही प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना नेमकी आहे तरी काय ? या योजनेचा लाभ काय आहे ? या योजनेच्या अटी काय आहेत ? Shram Yogi Mandhan Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत ? आज आपण त्याबद्दलचं जाणून घेणार आहोत.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना कधी सुरू करण्यात आली ?
भारत सरकारने 15 फेब्रुवारी 2019 रोजी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन (Shram Yogi Mandhan Yojana) योजना सुरू केली होती.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची उद्दिष्टे
ही Shram Yogi Mandhan Yojana योजना सुरू करण्यामागे सरकारने खूप चांगली उद्दिष्ट ठेवली आहेत. आपण त्याबद्दल जाणून घेऊया.
जसं की, आपण याआधी चर्चा केलीये की, सरकारी कर्मचारी यांना सेवानिवृत्तीनंतर मासिक पेन्शन मिळते. तसंच प्रायव्हेट नोकरीतील कर्मचारी आणि व्यावसायिकांकडे त्यांनी तरुणपणात कमवलेली बचत असते.
परंतु असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक ज्यांना रोजंदारी मिळते. जे रोज पैसे कमवतात आणि जगतात किंवा ज्यांचं मासिक उत्पन्न हे पाच अंकी आकड्यापेक्षाही कमी असतं. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर, त्यांचे हातपाय काम करण्याचे थांबल्यानंतर उदरनिर्वाहाचं काय ? या प्रश्नावर तोडगा म्हणूनचं प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू करण्यात आली आहे.
असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक खूप कष्टाचं काम करत असतात. ज्यामुळे एका वयानंतर त्यांना काम करणं शक्य होत नाही. त्यांना शारीरिकदृष्ट्या ते जमत नाही. त्यातचं त्यांना मिळणारा मोबदलाही खूप कमी असतो. म्हणून त्यांच्याकडे चांगलं घर आणि बचतही नसते.
अशावेळेस उतार वयात काम करणं थांबवल्यानंतर त्यांचा उदरनिर्वाह होण खूप अवघड होतं. अशाने आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. त्याचबरोबर डिप्रेशनमध्ये जाणं, उपासमार होणे अशा गोष्टीही होतात.
या अनेक गोष्टींवर समस्या म्हणूनचं भारत सरकारने श्रमयोगी मानधन योजना सुरू केली आहे.
श्रमयोगी मानधन योजनेचे लाभ
या Shram Yogi Mandhan Yojana योजनेअंतर्गत भारत सरकार असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना दरमहा 3000 रुपये पेन्शन देणार आहे. ही पेन्शन वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळेल.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेच्या अटी
1) या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सदर व्यक्ती असंघटित क्षेत्रात काम करणारी असावी.
2) अर्जदाराचं वय 18 वर्षे ते 40 वर्षे या वयोगटा दरम्यान असावं.
3) अर्जदाराचं मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी असावं.
4) अर्जदाराने कधीही आयकर भरलेला नसावा.
5) अर्जदार इतर कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा लाभ घेत नसावा.
श्रमयोगी मानधन योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे
1) अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड
2) अर्जदार व्यक्तीचा रहिवासी दाखला
3) अर्जदार व्यक्तीचा उत्पन्नाचा दाखला
4) अर्जदार व्यक्तीचं बँक अकाउंट पासबुक
5) अर्जदार व्यक्तीचा पासपोर्ट साईज फोटो
6) अर्जदार व्यक्तीचा मोबाईल नंबर
श्रमयोगी मानधन योजनेचे अकाउंट कसं उघडावं
या Shram Yogi Mandhan Yojana योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या कॉमन सर्विस सेंटरला भेट द्यावी लागेल. येथे गेल्यावर तुम्ही अर्ज भरून देऊ शकता आणि आवश्यक असलेली कागदपत्र जमा करावी लागतील.
त्याचबरोबर तुम्ही श्रमयोगी मानधन योजनेचं अकाउंट ऑनलाइनही उघडू शकता. त्यासाठी या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळला भेट द्यावी लागेल.
या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर how to enroll आणि सेल्फ एनरोलमेंट या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला एक फॉर्म सबमिट करायचा आहे. आवश्यक कागदपत्र अपलोड करायचे आहेत आणि मग तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकतात.
असंघटित क्षेत्रात काम करणारे व्यक्ती म्हणजे कोण
आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीचं आला असेल कि असंगठित क्षेत्र म्हणजे काय ? आणि या क्षेत्रात काम करणारे व्यक्ती कोणते काम करतात ? आता आपण त्याबद्दलचं जाणून घेऊया.
हेही वाचा : Mahila Samman Bachat Patra Yojana | महिला सन्मान बचत पत्र योजना
असंघटित क्षेत्रांमध्ये अनेक वेगवेगळी कामं करणारी लोक येतात. जसं की, रोजंदारीवर काम करणारी माणसं, जे आज काम करतात. त्यांना या कामाचे संध्याकाळी पैसे भेटतात. तसंच चहाची टपरी, वडापावची दुकानं, काही खाण्याच्या वस्तू विकणारे लोक, रिक्षा चालवणारे, बस चालवणारे ड्रायव्हर. एखाद्या दुकानात 15000 पेक्षा कमी पगारावर काम करणारे कारागीर, या सर्व लोकांचा समावेश असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये होतो.
श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत किती पैसे भरावे लागतात
जर तुम्हाला या Shram Yogi Mandhan Yojana योजनेअंतर्गत दरमहा 3000 रुपयांची पेन्शन मिळवायची असेल, तर या योजनेत काही रक्कम गुंतवावी लागते आणि ही रक्कम दरमहा भरायची असते.
समजा तुम्हाला जर तीन हजार रुपये पेन्शन मिळवायची आहे. तर तुम्हाला अर्ज भरण्याच्या वेळेस तुमचे जे वय आहे, त्या वयानुसार एक ठराविक रक्कम सांगितली जाईल. ही रक्कम तुम्ही भरल्यानंतर सरकार त्यांचा शेअर या रकमेत जमा करेल आणि मग ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होत राहील.
उदाहरणार्थ तुमचं वय जर 18 वर्ष असेल आणि तुम्हाला 60 वर्षानंतर 3 हजार रुपये मासिक पेन्शन हवी असेल. तर तुम्हाला 100 रुपये दरमहा भरावे लागतील. यामध्ये सरकार त्यांचे 100 रुपये जमा करेल आणि मग तुम्हाला तुम्ही 60 वर्षांचे होईपर्यंत दरमहा 100 रुपये भरावे लागतील.
श्रमयोगी मानधन योजनेतून बाहेर पडता येते का ?
तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीचं आला असेल की, जर मला या Shram Yogi Mandhan Yojana योजनेतून बाहेर पडायचं असेल, तर काय ? त्यासाठीही काही नियम आहेत.
1) या योजनेत पैसे भरायला सुरुवात केल्यानंतर जर दहा वर्षांच्या आतचं तुम्हाला या योजनेतून बाहेर पडायचं असेल, तर तुम्ही जे पैसे जमा केले आहेत. त्यावर सेविंग अकाउंटच्या व्याजदराने पैसे दिले जातील आणि तुमचे पैसे परत केले जातील.
2) जर या योजनेच्या लाभार्थ्याचा एखाद्या कारणाने मृत्यू झाल्यास त्याचा जो साथीदार असेल, त्याला ही स्कीम पुढे चालवण्याची सूट दिली जाईल.
3) पेन्शन सुरू झाल्यानंतर जर लाभार्थ्याचा मृत्यू झाला आणि त्याला पेन्शन मिळत असेल, तर या व्यक्तीचा जो नॉमिनी असेल, त्याला अर्धी पेन्शन दिली जाईल.
4) या योजनेअंतर्गत 3 हजार रुपये दरमहा मिळणारी पेन्शन ही सर्वात जास्त पेन्शन आहे. तुम्ही यापेक्षा कमी पेन्शन मिळवण्याचा पर्याय सुद्धा निवडू शकता. तुम्ही जितके पैसे भराल, त्यानुसार हा पेन्शनचा आकडा चेंज केला जाईल.
FAQ About Shram Yogi Mandhan Yojana प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1) प्रश्न : Shram Yogi Mandhan Yojana कोणासाठी सुरू केली गेली आहे ?
उत्तर : ही योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सुरू केली गेली आहे. ज्यांचं मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
2) प्रश्न : प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत लाभार्थ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल ?
उत्तर : या योजनेत लाभार्थ्यांना दरमहा 3000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते.
3) प्रश्न : प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे ?
उत्तर : या Shram Yogi Mandhan Yojana योजनेच्या लाभार्थ्यांचे वय 18 वर्षे ते 40 वर्षे या वयोगटादरम्यान असावं.
4) प्रश्न : असंघटित क्षेत्रातील कामगार म्हणजे कोण ?
उत्तर : असंघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये रोजंदारीवर काम करणारे, कोणतेही खाद्य पदार्थ, पेय रस्त्यावर विकणारे, रिक्षा, बस यांसारखी वाहन चालवणारे. वीटभट्टी, शेती येथे मजुरी करणारे, असे अनेक कर्मचारी येतात.
5) प्रश्न : प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत मासिक किती रुपये भरावे लागतात ?
उत्तर : या योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा किती पेन्शन हवी आहे, त्याचबरोबर सध्या तुमचं वय किती आहे, यानुसार दरमहा भरणाऱ्या हप्त्याचा आकडा निश्चित केला जातो.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (Shram Yogi Mandhan Yojana) ही भारत सरकारने सुरू केलेली उल्लेखनीय आणि कौतुकास्पद योजना आहे. या योजनेचा लाभ असंघटित क्षेत्रातील कामगारांना मिळेल, जो खूप महत्त्वाचा आहे. कारण या क्षेत्रातील कामगारांना सेवानिवृत्तीनंतर उदरनिर्वाह कसा करावा, हा खूप मोठा प्रश्न होता. या प्रश्नावर तोडगा म्हणून ही योजना आणली गेली.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेबद्दल तुमच्या मनात आणखीन काही प्रश्न असतील तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू आणि सरकारच्या अशाच विविध योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !