Chole Bhature Recipe In Marathi
Chole Bhature Recipe In Marathi छोले भटूरे ही खूपच लोकप्रिय पंजाबी डिश आहे. ती संपूर्ण उत्तर भारतात खूप आवडीने खाल्ली जाते. मसालेदार छोले आणि त्यासोबत भटूरे म्हणजे मैद्याची पुरी खाल्ली जाते. हे छोले भटूरे अतिशय टेस्टी असतात.
स्ट्रीट फूड म्हणून छोले भटूरे खूप लोकप्रिय आहेत. कित्येक वर्षांपासून छोले भटूरेला लोकांची पसंती आहे. अनेक रेस्टॉरंट आणि रस्त्याच्या कडेला छोले भटूरे मिळतात. ते खाण्यासाठी भरपूर गर्दीसुद्धा पाहायला मिळते.
हे असे टेस्टी छोले भटूरे बाहेर खाण्याऐवजी आपण घरीच बनवू शकतो. रोजचंच खाऊन बोर झालं तर आपण एखाद्या दिवशी हे छोले भटूरे घरीच बनवू शकतो. छोले भटूरेची रेसिपीसुद्धा Chole Bhature Recipe In Marathi खूप सोपी आहे. अगदी सोप्यात तुम्ही रेस्टोरंट स्टाईल छोले भटूरे घरात बनवू शकता.
छोले भटूरे बनवण्याचं साहित्य :
पंजाबी छोले भटूरे Chole Bhature Recipe In Marathi बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.
भटूरे बनवण्याचं साहित्य :
- 2 कप मैदा
- पाव कप रवा
- चिमूटभर बेकिंग सोडा
- अर्धा चमचा बेकिंग पावडर
- 1 चमचा पिठीसाखर
- चवीनुसार मीठ
- 1 मोठा चमचा तेल
- पाव कप दही
- गरजेनुसार पाणी
छोले बनवण्याचं साहित्य :
- 1 कप भिजवलेले छोले
- 1 कप पाणी
- 1 चमचा चहापत्ती
- 1 कढीपत्ता
- चवीनुसार मीठ
- किंचित बेकिंग सोडा
- अर्धा चमचा गरम मसाला
- किसून वाळवून घेतलेला आवळा
- 1 कप पाणी
- 2 मोठे चिरलेले कांदे
- 2 मोठे चिरलेले टोमॅटो
- 7-8 लसणाच्या पाकळ्या
- थोडेसे आल्याचे काप
- 2 कापलेल्या हिरव्या मिरच्या
- 3 मोठे चमचे तेल
- 2 तेजपत्ता
- 2 वेलची
- 2 लवंग
- दालचिनीचा तुकडा
- चक्रीफुल
- 2 काळी मिरी
- 1 चमचा जिरे
- थोडीशी कसुरी मेथी
- चिमूटभर हिंग
- अर्धा चमचा हळद
- 1 चमचा धनेपूड
- 2 चमचे लाल मिरची पावडर
- चवीनुसार मीठ
- 1 चमचा किचनकिंग मसाला
- अर्धा चमचा कांदा लसूण मसाला
- थोडीशी हिरवी कोथिंबीर
Procedure For Chole Bhature Recipe In Marathi छोले भटूरे बनवण्याची कृती :
सर्वात आधी आपण भटूरे बनवून घेणार आहोत.
- एका भांड्यात 2 कप मैदा, पाव कप रवा, चिमूटभर बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा पिठीसाखर, चवीनुसार मीठ टाकून हे सगळं चमच्याने मिक्स करायचं.
- त्यानंतर त्यात 1 मोठा चमचा तेल, पाव कप घट्ट दही टाकून मिक्स करायचं आणि यात थोडं थोडं पाणी घालून नरम गोळा तयार करायचा आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला हा नरम गोळा मळून घ्यायचाय. पुरीसाठी आपण घट्ट गोळा मळतो पण भटूरेसाठी सैल गोळा मळायचा.
- हलक्या हाताने हा गोळा मळून घ्यायचा. मग या गोळ्याला वरून तेल लावून घ्यायचं आहे. हा गोळा आपल्याला झाकून 2 ते 3 तास मुरू द्यायचा आहे.
- यानंतर आपल्याला छोले बनवायचे आहेत.
- रात्रभर आपण 1 कप छोले भिजून घेतले आहेत. आता त्याचं प्रमाण 2 कप एवढं झालेलं आहे.
- आता एका पॅनमध्ये 1 कप पाणी घ्यायचं. त्यात 1 चमचा चहापत्ती टाकायची. ही चहापत्ती आपल्याला पाण्यात उकळून घ्यायची आहे. गॅस बंद करून हे बाजूला ठेवायचंय.
- आता आपण छोले कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये भिजवलेले छोले टाकून द्यायचे आहेत. मग त्यात 1 तेजपत्ता, चवीनुसार मीठ, किंचित बेकिंग सोडा, अर्धा चमचा गरम मसाला, किसून वाळवून घेतलेला आवळा, उकळून घेतलेली चहापत्तीचं पाणी गाळून घ्यायचं आणि 1 कप पाणी टाकायचं आणि कुकरचं झाकण लावून छोले 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. पहिली शिट्टी जास्त आचेवर काढून घ्यायची आणि मग उरलेल्या 5 शिट्ट्या मंद आचेवर काढायच्या.
- 6 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा. आपले छोले खूप सॉफ्ट शिजले आहेत.
- आता आपण मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मोठे चिरलेले कांदे, 2 मोठे चिरलेले टोमॅटो, 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे आल्याचे काप, 2 हिरव्या मिरच्या याची आपल्याला पाणी न घालता मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घ्यायची आहे.
- त्यानंतर एका कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल घ्यायचंय. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 2 तेजपत्ता, 2 हिरवी वेलची, 2 लवंगा, दालचिनीचा तुकडा, चक्रीफूल, 2 काळी मिरी, 1 चमचा जिरे, थोडीशी कसुरी मेथी आणि चिमूटभर हिंग याची आपल्याला छान फोडणी तयार करून घ्यायचीय.
- फोडणी झाल्यावर यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटोची पेस्ट टाकायची आणि मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटे तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचंय.
- त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पूड, 2 चमचे लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा किचनकिंग मसाला टाकून छान मिक्स करून शिजवून घ्यायचं. किचनकिंग मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरू शकता.
- मसाले शिजल्यानंतर त्यात आपल्याला शिजवलेले छोले पाण्यासोबत टाकायचे आहेत. त्यात अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आणि आपल्याला हे छोले 10 ते 15 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहेत.
- त्यानंतर गॅस बंद करायचा आणि वरून थोडी कोथिंबीर घालायची. आपले छोले तयार आहेत.
- आता आपण भटूरे तयार करून घेऊया. 3 तासानंतर आपण तयार केलेला गोळा छान मुरला आहे. हलक्या हाताने पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. या पिठाचे मिडीयम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत.
- त्यानंतर पोळपाट आणि लाटणं घेऊन दोन्हीला तेल लावून घ्यायचं. आता एक गोळा घेऊन तुम्हाला ज्या आकाराचे भटूरे हवे आहेत त्या आकाराचे लाटून घ्यायचे आहेत.
- हा गोळा आपल्याला पोळीप्रमाणे लाटून घ्यायचा आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नको. मोठ्या आकाराचा भटूरा लाटून घ्यायचाय.
- आता कढईमध्ये भरपूर तेल टाकून कडक गरम करून घ्यायचंय आणि त्यात भटूरा जास्त फ्लेमवर तळून घ्यायचाय. जास्त फ्लेमवर तळला तरच आपला भटूरा छान फुगतो.
- तुम्हाला भटूरा कुरकुरीत हवा असेल तर तेलात जास्त वेळ तळू शकता नाहीतर सॉफ्ट हवा असेल तर लगेच काढू शकता. असेच आपले सगळे भटूरे तळायचे. भटूरा झाऱ्याने मध्ये दाबला तर तो चांगला फुगतो.
- आपले छोले आणि भटूरे दोन्ही तयार आहेत त्यामुळे एका प्लेटमध्ये सर्व्ह करून घेऊया. त्यासोबत कांदा आणि लिंबूसुद्धा घेऊ शकता.
अगदी रेस्टोरंट स्टाईल चमचमीत छोले भटूरे Chole Bhature Recipe In Marathi आपले घरच्याघरी तयार आहेत.
Homemade Cake Recipe In Marathi | घरगुती केक रेसिपी मराठी
Important Tips For Chole Bhature Recipe In Marathi
- भटूरेसाठी कणकेचा गोळा हलक्या हाताने सैल मळून घ्यायचा म्हणजे आपले भटूरे छान मऊ होतात.
- चहापत्ती पाण्यात उकळून ते पाणी छोलेमध्ये घालायचं त्यामुळे चव आणि रंग खूप छान येतो.
- भटूरे तळण्यासाठी कढईमध्ये तेल खूप गरम करायचं आणि हाय फ्लेमवर तळायचं तरच भटूरा फुगतो.
- तुम्हाला जर भटूरा कुरकुरीत हवा असेल तर जास्त वेळ तेलात तळू शकता. पण जर भटूरा सॉफ्ट हवा असेल तर लवकर तेलातून काढू शकता.
- तळताना भटूरा झाऱ्याने मध्यभागी प्रेस केला तर तो छान फुगतो.
तुम्ही या सर्व टिप्स वापरून अगदी टेस्टी छोले भटूरे सहज बनवू शकता.
FAQ’s About Chole Bhature Recipe In Marathi
- Chole Bhature Recipe In Marathi ही कुठली प्रसिद्ध डिश आहे ?
छोले भटूरे हा उत्तर भारतातील अतिशय लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. दिल्ली आणि पंजाब या भागात तर लोक जास्त आवडीने खातात. 1940 च्या दशकात दिल्ली, यूपी, पंजाब आणि हरियाणा राज्यात याची निर्मिती झाली आणि पुरानी दिल्लीमध्ये जेवण म्हणून सुरुवात झाली होती.
- Chole Bhature Recipe In Marathi कशापासून बनवले जातात ?
छोले भटूरेमध्ये मसालेदार छोले आणि त्यासोबत मैदा रव्याची पोळी म्हणजे भटूरा असतो. छोले आणि भरपूर मसाले वापरून हे मसालेदार छोले बनवले जातात. तर भटूरा हा मैद्यामध्ये रवा, पिठीसाखर, दही, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, तेल टाकून बनवला जातो आणि तो तेलात तळतात.
- Chole Bhature Recipe In Marathi खाऊन वजन वाढते का ?
छोले भटूरेमध्ये मसालेदार चणे आणि मैद्यापासून बनवलेले तेलात तळलेले भटूरे असतात त्यात कॅलरीज जास्त असतात त्यामुळे नियमित छोले भटूरे खाल्ल्याने वजन वाढू शकते. छोले भटूरे खाल्ल्यामुळे मेटाबॉलिज्म खराब होतं ज्याच्यामुळे आपलं वजन वाढू शकते.
- भटूरा नरम करण्यासाठी काय करायचं ?
भटूरा हा नरम आणि छान फुगलेला होण्यासाठी त्याची कणिक छान सैल मळून घ्यायची आहे. मैदा वापरल्यामुळे भटूरा मऊ बनतो आणि कणिक मळताना त्यात दहीसुद्धा टाकणं महत्वाचं आहे.
- छोले खाण्याचे फायदे काय आहेत ?
छोले खाण्याचे अनेक फायदे आहेत. छोलेमध्ये कॅल्शियम, फायबर आणि पोटॅशियम असतं त्यामुळे हार्टच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. आपली हाडंसुद्धा मजबूत होतात. आपल्या शरीरातील पेशींचे आरोग्य सुधारते.
आपली छोले भटूरेची अत्यंत टेस्टी रेसिपी Chole Bhature Recipe In Marathi तयार आहे. ही तुम्ही घरच्यांना सर्व्ह करू शकता. ही चमचमीत रेसिपी सर्वांना नक्कीच आवडेल. अतिशय सोपी रेसिपी असल्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा नक्कीच बनवाल. एखाद्या सुट्टीच्या दिवशी असे चमचमीत छोले भटूरे खाल्ल्यानंतर सुट्टीचा आनंद आणखीनच वाढेल यात शंका नाही.
तुम्हालासुद्धा ही Chole Bhature Recipe In Marathi रेसिपी आवडली असेल तर नक्कीच सांगा. अशाच नवनवीन टेस्टी रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.