Homemade Cake Recipe In Marathi
Homemade Cake Recipe In Marathi केक तर आपल्या सर्वांचाच फेव्हरेट आहे. घरात कसलंही सेलिब्रेशन असो आपण केक सर्वात आधी कट करतो आणि सर्वजण फार आवडीने खातो. घरातील लहान मुलांना तर केक प्रचंड आवडतो त्यामुळे ते तर अतिशय आवडीने खातात.
केकमध्ये असंख्य प्रकारची व्हरायटी पाहायला मिळते. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स खायलाही आवडतात. अनेकदा केक हे आपण स्वीट खायचं म्हणून असेच खात असतो.
अनेक दिवस केक खाल्ला नाही तरी आपल्याला केक खूप खावासा वाटतो. पण दुकानांमध्ये पाहिलं तर आजकाल केकचे भाव प्रचंड वाढले आहेत त्यामुळे अनेकजण केक बनवण्याचा क्लासही करताना दिसतात. क्लास केल्यानंतर खूपच टेस्टी केक हा आपण घरीच बनवू शकतो.
आपल्याला घरीच जर छान केक बनवता आला तर उत्तमच आहे त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी घरच्याघरी अगदी सोप्यात केक बनवायची रेसिपी Homemade Cake Recipe In Marathi घेऊन आलो आहोत.
घरगुती केक बनवण्याचं साहित्य :
- 1 कप गव्हाचं पीठ
- 3 चमचे मिल्क पावडर
- अर्धा चमचा बेकिंग सोडा
- 1 चमचा बेकिंग पावडर
- पाव कप तेल
- अर्धा कप फ्रेश दही
- अर्धा कप पिठीसाखर
- थोडासा व्हॅनिला एसेंस
- कापलेले काजू, बदाम, पिस्ता आणि थोडेसे किसमिश
- अर्धा कप दूध
घरगुती केक बनवण्याची कृती :
Homemade Cake Recipe In Marathi केक बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक टिन घ्यायचंय आणि त्याला आतून 1 चमचा तेल सर्व बाजूने लावून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला गाळणीच्या साहाय्याने 1 चमचा गव्हाचं पीठ त्यावर पसरून घ्यायचंय. आपलं टिन ग्रीस करून झालंय.
आता आपण केक बनवायला सुरुवात करूया.एक भांडं घ्यायचं आणि त्यावर एक चाळणी ठेवायची. यावर आपण 1 कप गव्हाचं पीठ, 3 चमचे मिल्क पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर टाकायचं. हे सर्व आपल्याला चाळून घ्यायचं आहे.बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर दोन्ही फ्रेश असायला हवं एक्सपायरी झालेलं नको. हे दोन्ही फ्रेश असेल तरच आपला केक फुलतो नाहीतर फुलत नाही. तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर इनो वापरू शकता.
- आपलं हे पीठ एकदा चाळून झाल्यानंतर हे सर्व आपल्याला एकूण 3 वेळा चाळून घ्यायचंय. 3 वेळा चाळल्याने आपला केक सॉफ्ट होतो. आपलं पीठ चाळून तयार आहे.
- आता आपण केकसाठी बॅटर तयार करणार आहोत. त्यासाठी एका भांड्यात पाव कप तेल, अर्धा कप फ्रेश दही, अर्धा कप साखरमध्ये ईलायची टाकून त्याची पिठीसाखर बनवून घ्यायची थोडंसं व्हॅनिला एसेंस टाकून रवीने छान फेटून घ्यायचं.
- त्यानंतर यामध्ये आपण चाळलेलं पीठ टाकायचं आणि चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आणखी बदाम आणि काजूचे काप आणि थोडी किशमिश टाकायची आहे. हे पुन्हा एकदा मिक्स करायचं.
- आता आपल्याला अर्धा कप दूध थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं. सगळं दूध एकाच वेळी टाकायचं नाही. सगळं मिक्स करून झाल्यावर आपलं केकचं बॅटर तयार आहे.
- आता आपण हे बॅटर ग्रीस केलेल्या टिनमध्ये टाकून देऊया आणि हलवून यामधील हवा काढून घेऊया. यावर आता काजू, बदाम, पिस्त्याचे काप आणि किशमिश टाकूया.
- आपला केक आता बेक करून घ्यायचा आहे. त्यासाठी कढई गॅसवर ठेवून 5 ते 10 मिनिटं गरम करून घ्यायची आहे. तुम्ही जर इंडक्शनवर केक बेक करत असाल तर नॉनस्टिक कढई वापरायची आहे.
- पण जर तुम्ही केक गॅसवर बेक करत असाल तर तुम्ही लोखंडाची किंवा जर्मनची कढई वापरू शकता. त्यामध्ये मीठ पसरून घ्यायचं आणि स्टॅण्ड ठेवून कढई गरम करून घ्यायची. इंडक्शनवर नॉनस्टिक कढईमध्ये मीठ घालायची गरज नाही ऑटोमॅटिक हिट तयार होते. जर तुम्हाला नॉनस्टिक कढई खराब व्हायची भीती वाटत असेल तर यात थोडंसं तेल टाकून गरम करायला ठेवू शकता.
- 10 मिनिटांनंतर आपली कढई गरम झालीय. आता आपलं टिन कढईमध्ये स्टँडवर बेक करायला ठेवायचं आहे आणि वरून झाकण ठेवायचंय. हा केक आपल्याला कमी आचेवर 1 तास बेक करून घ्यायचा आहे.
- 1 तासानंतर आपला केक छान बेक झाला आहे. तो पूर्णपणे थंड होऊ द्यायचाय. यासाठी अर्धा तास वाट पाहायचीय.
- अर्ध्या तासाने आपला केक थंड झालाय. आता चाकूच्या साहाय्याने टिनमधील केकच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि हा केक एका प्लेटमध्ये काढून घेऊया.
- आपला स्पंजी केक तयार आहे. केकसाठी लागणारं साहित्य अगदी योग्य प्रमाणात घेतलं की केक खूप छान बनतो. कोणताही मैदा, अंडं किंवा ओव्हन न वापरता आपण हा केक बनवलाय.
आपला हा टेस्टी केक Homemade Cake Recipe In Marathi तुम्ही कट करून घरच्यांना सर्व्ह करू शकता. सर्वांना हा आपण घरी बनवलेला केक नक्कीच आवडेल. आपल्या घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच हा इतका टेस्टी केक बनू शकतो. गव्हाच्या पिठापासून बनलेला आपला हा केक खूपच हेल्दीसुद्धा आहे. हा आपला खूप सिम्पल केक आहे पण अशाचप्रकारे तुम्ही दुसऱ्या अनेक फ्लेवरचे केकसुद्धा बनवू शकता.
लवकरच मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत तर तुम्ही त्यांच्यासाठी असे नवनवीन केक Homemade Cake Recipe In Marathi बनवू शकता त्यांना नक्कीच खूप आवडतील.
Shegaon Kachori Recipe In Marathi | शेगांव कचोरी रेसिपी 2024
Homemade Cake Recipe In Marathi Important Tips महत्वाच्या टिप्स :
- केक Homemade Cake Recipe In Marathi बनवताना बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर फ्रेशच वापरायचं एक्सपायरी झालेलं घ्यायचं नाही नाहीतर तुमचा केक फुगणार नाही. बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही इनो वापरू शकता.
- आपला केक सॉफ्ट बनवण्यासाठी पीठ हे 3 वेळा चाळून घ्यायचं.
- केक कढईमध्ये साधारण 1 तास बेक करायचा त्यामुळे केक छान बेक होतो आणि केक ब्राऊन होतो त्याची टेस्ट खूप छान लागते.
- बहुतांश केक बनवताना त्यामध्ये अंडं वापरलं जातं त्यामुळे केकचं बॅटर उत्तम बनतं आणि टेस्टसुद्धा वाढते पण अनेकजणांना बिना अंड्याचा केक हवा असतो. अशावेळी केक बनवताना अंड्याला पर्याय म्हणून दूध किंवा फ्रेश दही वापरलं जातं. यामुळे केकच्या बॅटरचा घट्टपणा वाढतो. त्यातील सर्व घटक व्यवस्थित एकजीव होतात आणि केकची टेस्टसुद्धा चांगली वाढते.
- घरी केक बनवताना आपण अंड्याऐवजी दूध किंवा दही वापरू शकतो.
- केकसाठी लागणारं साहित्य योग्य प्रमाणात वापरलं तरच तो आपल्याला हवा तसा बनतो.
FAQ’s About Homemade Cake Recipe In Marathi काही महत्त्वाचे प्रश्न :
- Homemade Cake Recipe In Marathi कशापासून बनवता येतो ?
घरगुती केक हा अतिशय टेस्टी बनतो. हा केक गव्हाच्या पिठापासून बनवता येतो आणि त्यामध्ये मिल्क पावडर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, दही, पिठीसाखर, दूध आणि तेल हे पदार्थ मिसळले जातात. हा केक कढईमध्ये बेक केला जातो.
- Homemade Cake Recipe In Marathi स्पंजी कसा बनवू शकतो ?
केक स्पंजी बनवण्यासाठी त्यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकतात. ही बेकिंग पावडर गरम झाली की त्यातून कार्बन डायऑक्साईड गॅस निघतो त्यामुळे केक फुगतो आणि नरम आणि स्पंजी बनतो. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर फ्रेश असेल तरच केक फुगतो.
- केक खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे का ?
केक बनवताना प्रोसेस केलेले गव्हाचे पीठ, भरपूर साखर वापरतात. यामध्ये भरपूर फॅट्स, कार्बोहायड्रेट्स असतात. यामुळे केक हेल्दी राहत नाही पण आपण केक हेल्दी बनवू शकतो. आपण जर केक घरीच बनवला आणि त्यामध्ये वापरले जाणारे पदार्थ गव्हाचे पीठ, साखर सर्व योग्य प्रमाणात वापरले तर आपला केक उत्तम बनू शकतो.
- बिना अंड्याचा केक बनवता येतो का ?
आपण बिना अंड्याचा केक बनवू शकतो. अंडी वापरल्यामुळे केकचं बॅटर हे घट्ट होतं त्यामध्ये ओलावा राहतो. सर्व वस्तू एकत्र राहतात आणि टेस्टसुद्धा छान होते. पण ज्यांना अंडं नको असेल ते दूध किंवा दही वापरू शकता. केकमध्ये छान ओलावा राहील आणि अंड्यामुळे होणारे सर्व फायदे होतील.
- Homemade Cake Recipe In Marathi अनेकदा मधूनच फुटून का जातो ?
अनेकदा आपण केक तयार केल्यानंतर तो वरून फुटून जातो याचं कारण आपण जेव्हा तो बेक करण्यासाठी टिनमध्ये भरतो तेव्हा तो तंतोतंत भरतो आणि टिनमध्ये काहीच जागा उरत नाही. मग केक फुगण्यासाठी जागाच उरत नाही त्यामुळे केकचं सर्व साहित्य मधोमध जमा होऊन तो फुटू लागतो. त्यामध्ये भेगाही पडतात आणि आपला केक कच्चा राहतो.
- केकचे प्रकार कोणकोणते आहेत ?
केकचे आपल्याकडे अनेक प्रकार आहेत. पण केकमधील पदार्थ आणि मिश्रण करण्याच्या पद्धतीनुसार त्याचे बटर केक, स्पंज केक, एंजल फूड केक असे प्रकार आहेत. याशिवाय चवीनुसार आणि फ्लेवरनुसार अनेक प्रकार पडतात. चॉकलेट केक, रेड वेलवेट केक, व्हॅनिला केक, फ्रुट केक, पाईनऍपल केक असे केक असतात.
आपली स्पंजी केकची घरगुती रेसिपी Homemade Cake Recipe In Marathi तयार आहे. आपला हा केक तुम्ही घरच्यांसाठी सहज बनवू शकता. हा केक बनवायला इतका सोपा आणि कमी वेळेत बनणारा आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा नक्की बनवाल.
बिना मैदा, अंडं आणि ओव्हनशिवाय हा केक बनवता येतो. गव्हाच्या पिठापासून बनवलेला हा केक खूप हेल्दीसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही लहान मुलांनादेखील खायला देऊ शकता. संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी आपण हा केक नक्कीच खाऊ शकतो.
बाहेर मिळणाऱ्या केकपेक्षाही हा केक खूप चांगला बनेल आणि कमी पैशांमध्येही बनतो त्यामुळे आपली चांगली बचतदेखील होते. हा केक तुमच्या घरातील सर्वांनाच नक्की आवडेल.
तुम्हाला केकची ही रेसिपी Homemade Cake Recipe In Marathi आवडली का नक्कीच सांगा. अशाच छान छान रेसिपींसाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.