Homemade Pizza Recipe In Marathi
Homemade Pizza Recipe In Marathi पिझ्झा आपण सर्वांनी तर खाल्लाच असेल. अतिशय टेस्टी असल्यामुळे सर्वांना पिझ्झा खायला खूप आवडतो. अगदी लहाण्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण पिझ्झाचे फॅन आहेत. मार्केटमध्ये पिझ्झा खाण्यासाठी अनेक ठिकाणी भरपूर गर्दी पाहायला मिळते.
घरी मग एखादं सेलिब्रेशन असो किंवा विकेंडला सुट्टीचा दिवस हमखास अनेकजण घरी पिझ्झा ऑर्डर करून मागवतात. पिझ्झा हा सर्वांचं खूपच आवडतं जेवण आहे. पण नेहमी नेहमी असं बाहेरून पिझ्झा मागवणं खिशाला परवडत नाही. आजकाल सगळ्याच ठिकाणी खाण्याच्या पदार्थांच्या किंमती वाढलेल्या दिसतात त्यामुळे हे असं बाहेरून ऑर्डर करणं किंवा बाहेर खाणं महागात पडतं.
अशावेळी जर तुम्हाला घरातच अगदी मार्केटसारखा टेस्टी पिझ्झा बनवता आला तर किती चांगलं होईल. अनेकदा घरातील लहान मुलं पिझ्झा खाण्याचा हट्ट करतात त्यामुळेही घरात पिझ्झा बनवता आला तर उत्तमच आहे. लहान मुलं अनेक भाज्या खात नाहीत तर या पिझ्झावर टाकून त्या भाज्या मुलांच्या पोटात जातील.
आज आम्ही तुमच्यासाठी पिझ्झा Homemade Pizza Recipe In Marathi बनवण्याची एकदम सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत. तुमचा पिझ्झा खूपच टेस्टी बनेल.
पिझ्झा बनवण्याचं साहित्य :
पिझ्झा Homemade Pizza Recipe In Marathi बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.
- अर्धा कप हलकं गरम पाणी
- 1 छोटा चमचा पिठीसाखर
- दीड चमचा इन्स्टंट ड्राय यीस्ट पावडर
- दीड कप मैदा
- अर्धा कप रवा
- अर्धा चमचा मीठ
- अर्धा चमचा ओरिगॅनो
- 3 छोटे चमचे तेल
- 1 कप मीठ
- 1 वाटी मक्याचं पीठ
- थोडासा पिझ्झा सॉस
- थोडासा टोमॅटो केचअप
- 1 चिझ स्लाइस
- भरपूर किसलेलं मोझरेला चिझ
- चिरलेले कांदा, टोमॅटो, शिमला मिरची
- थोडेसे रेड चिली फ्लेक्स
- थोडंसं ओरिगॅनो
पिझ्झा बनवण्याची कृती :
- पिझ्झा Homemade Pizza Recipe In Marathi तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण अगदी मार्केटसारखा पिझ्झाचा बेस तयार करून घेणार आहोत. पिझ्झा बेसचं पीठ तयार करण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात अर्धा कप हलकं गरम पाणी घेणार आहोत. या पाण्यात आपल्याला बोट ठेवता येईल इतकं गरम पाणी असलं पाहिजे. खूप जास्त गरम पाणी घ्यायचं नाही नाहीतर यीस्टमधील पार्टीकल मरून जातील आणि आपलं यीस्ट ऍक्टिवेट होणार नाही.
- त्यानंतर 1 छोटा चमचा पिठीसाखर पाण्यात टाकून मिक्स करून घ्यायची. मग दीड छोटा चमचा इन्स्टंट ड्राय यीस्ट पावडर टाकून मिक्स करायचं. यीस्ट टाकताना त्याची एक्सपायरी डेट पहायची. फ्रेश यीस्ट वापरायचं खूप जुनं वापरायचं नाही नाहीतर ते ऍक्टिवेट होत नाही.
- पिठीसाखर आणि यीस्ट पाण्यात नीट मिक्स करून त्या भांड्यावर झाकण ठेवून आपल्याला 15 मिनिटे वाट पहायची आहे. इन्स्टंट ड्राय यीस्ट असल्यामुळे ते 15 मिनिटात ऍक्टिवेट होतं. 15 मिनिटांनंतर तुम्हाला यीस्टमध्ये बुडबुडे आलेले दिसतील आणि ते फुगलेलं दिसेल.
- आपलं हे यीस्ट छान फुगलं आहे ते आपण बाजूला ठेऊन देऊया.
- पिझ्झा बेस बनवण्यासाठी ब्रेडचं पीठ वापरलं जातं. ते पीठ घरच्याघरी बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये दीड कप मैदा आणि अर्धा कप रवा घ्यायचाय. अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा ओरिगॅनो, 3 छोटे चमचे तेल आणि आपण तयार केलेलं यीस्ट यामध्ये टाकायचं.
- हे सर्व एका चमच्याने मिक्स करायचं आणि नंतर हलक्या हाताने मिक्स करायचं. आपल्याला याचा सैलसर गोळा तयार करायचाय.
- हा गोळा 5 ते 10 मिनिटे हाताने मळून घ्यायचाय. हाताला पीठ चिकटलं असेल तर हाताला तेल लावून मळायचा म्हणजे हाताला चिकटणार नाही आणि हाताला चिकटलेलं निघून जाईल.
- त्यानंतर दोन्ही हाताला तेल लावायचं आणि या पिठाच्या गोळ्याला गोल आकार द्यायचा. एक गोल भांडं घ्यायचं त्याला आतून तेल लावायचं आणि त्यात हा गोळा ठेवायचा. गोळ्याला वरून तेल लावायचं.
- या भांड्यावर ओला सुती कपडा ठेवायचा आणि वरून एक प्लेट ठेवायची. त्यानंतर 2 ते 3 तास हे पीठ बाजूला ठेवायचंय.
- 3 तासांनंतर आपलं हे पीठ छान फुगलं आहे. आता हे पीठ एका भांड्यात काढून घ्यायचं आणि हलक्या हाताने मळून घ्यायचं. त्याचे 3 गोळे करायचे. साधारण 3 मिडीयम साईझचे पिझ्झा त्यापासून बनतात.
- आज आपण कढईमध्ये पिझ्झा बनवणार आहोत. त्यासाठी कढई गरम करणं महत्वाचं आहे. या कढईमध्ये 1 कप मीठ पसरून द्यायचं आणि त्यावर एक स्टॅण्ड ठेवायचं. या कढईवर झाकण ठेवून मध्यम आचेवर ही कढई 10 मिनिटे गरम होऊ द्यायची आहे.
- पिझ्झा बेसला घोळण्यासाठी आपण मक्याचं पीठ वापरणार आहोत त्यामुळे फ्लेवर छान येतो आणि खालची लेअर छान येते.
- आता एक मोठं ताट घ्यायचं आणि ते पालथं करून त्यावर मक्याचं पीठ पसरून घ्यायचं. एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि तो ताटावर टाकून हाताने थापून घ्यायचा.
- यानंतर एक प्लेट घ्यायची आणि त्यावर बटर लावून घ्यायचं. त्यानंतर आपण थापून घेतलेला पिझ्झाचा बेस प्लेटवर ठेवायचा आणि पसरून घ्यायचा. कडेचा भाग बोटाने जाडसर करून घ्यायचा.
- या बेसवर रेडिमेड मिळणारा पिझ्झा सॉस आणि टोमॅटो केचअप टाकून पसरून घ्यायचा. त्यानंतर यावर एक चिझ स्लाइस तोडून टाकायची.
- त्यानंतर यावर भरपूर प्रमाणात किसलेलं मोझरेला चिझ टाकायचं आहे. जेवढं जास्त चिझ असेल तेवढी त्याची मजा येते.
- पिझ्झावर Homemade Pizza Recipe In Marathi टॉपिंग टाकण्यासाठी चिरलेला कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची पसरून टाकायची आहे. वरून पुन्हा मोझरेला चिझ टाकायचं आहे.
- वरून थोडीशी रेड चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो टाकायचे आहेत. कडेला पुन्हा एकदा खूप सारं बटर लावायचंय.
- आपला पिझ्झा तयार आहे. आता आपण तो बेक करणार आहोत. आपली कढईसुद्धा गरम झाली आहे. कढईमध्ये आपल्याला हा पिझ्झा ठेवायचाय आणि वरून झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे मध्यम आचेवर बेक करून घ्यायचाय.
- पिझ्झा बेस छान बेक होईपर्यंत आणि चिझ वितळेपर्यंत आपल्याला पिझ्झा बेक करायचाय. 20 मिनिटांनंतर आपला पिझ्झा छान बेक झालाय. गॅस बंद करायचा.
- 5 मिनिटे पिझ्झा थंड होईपर्यंत तसाच ठेवायचा आणि मग कढईमधून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. त्यावर थोडंसं ओरिगॅनो आणि रेड चिली फ्लेक्स टाकायची. आपला पिझ्झा तयार आहे. तुम्ही पिझ्झा कटरने किंवा चाकूने हा पिझ्झा कट करू शकता.
आपला अगदी मार्केटसारखा पिझ्झा Homemade Pizza Recipe In Marathi तयार आहे. तो तुम्ही घरच्यांना सर्व्ह करू शकता. सर्वांना हा पिझ्झा नक्कीच आवडेल.
Samosa Recipe In Marathi | समोसा रेसिपी मराठी 2024
पिझ्झाचे खूप सारे प्रकारदेखील आहेत.
- व्हेज पिझ्झा
- चिकन पिझ्झा
- चिझ पिझ्झा
- कॉर्न पिझ्झा
- चिकन टिक्का पिझ्झा
- मशरूम पिझ्झा
- शिमला मिरची पिझ्झा
- चिझ बर्स्ट पिझ्झा
- क्रिस्पी कॅबेज पिझ्झा
- मेक्सिकन पिझ्झा
- मिनी मशरूम पिझ्झा
- व्हेजिटेबल पनीर पिझ्झा
- मल्टिग्रेन पिझ्झा
- पेपरोनी पिझ्झा
असे वेगवेगळे प्रकारचे पिझ्झा Homemade Pizza Recipe In Marathi देखील आपण ट्राय करायला हवेत.
Homemade Pizza Recipe In Marathi Important Tips
- मार्केटसारखा पिझ्झा Homemade Pizza Recipe In Marathi बनवायचा असेल तर पिझ्झा बेस बनवण्यासाठी इन्स्टंट ड्राय यीस्ट पावडर वापरायची. हे यीस्ट फ्रेश वापरायचं जुनं वापरायचं नाही.
- पिझ्झा बेस घोळण्यासाठी मार्केटमध्ये मिळणारं मक्याचं पीठ वापरायचं.
- पिझ्झा बनवण्यासाठी त्यावर पिझ्झा सॉस लावायचा पण तुमच्याकडे पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही टोमॅटो केचअप, रेड चिली सॉस, ओरिगॅनो आणि शेजवान चटणी मिक्स करून पिझ्झा सॉस बनवू शकता.
FAQ About Homemade Pizza Recipe In Marathi काही महत्त्वाचे प्रश्न :
- Homemade Pizza Recipe In Marathi हा कुठला खाद्यपदार्थ आहे ?
पिझ्झा हा सर्वांचा आवडता पदार्थ आहे. पिझ्झा मूळचा इटली देशातील खाद्यपदार्थ आहे. पण आजकाल सगळीकडेच खूप आवडीने खाल्ला जातो. फास्ट फूड म्हणून पिझ्झा प्रचंड लोकप्रिय बनला आहे.
- Homemade Pizza Recipe In Marathi कशापासून बनवला जातो ?
पिझ्झासाठी ब्रेडच्या पिठापासून बेस बनवला जातो पण ते सहज मिळत नाही म्हणून मैदा आणि रवा वापरून पिझ्झा बेस बनवतात. त्यावर पिझ्झा सॉस आणि टोमॅटो केचअप लावतात आणि मग वरून चिरलेले कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची टाकतात आणि नंतर पिझ्झा बेक करून घेतात.
- Homemade Pizza Recipe In Marathi जंक फूड आहे का ?
पिझ्झा हे जंक फूड आहे. कारण त्यामध्ये चिझ आणि प्रोसेस टॉपिंगमुळे भरपूर प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट्स असतात. यामुळे तुमचं कोलेस्टेरॉल वाढतं आणि हार्टअटॅकचा धोका वाढतो. जास्त प्रमाणात पिझ्झा खाल्ला तर तब्येतीवर वाईट परिणाम होतो.
- पिझ्झा Homemade Pizza Recipe In Marathi खाल्ल्याने वजन वाढते का ?
पिझ्झा हा मैद्यापासून बनवलेला असतो आणि मैदा हा आपल्या आरोग्यासाठी वाईट असतो त्यामुळे त्यापासून बनवलेला पिझ्झादेखील हानिकारक असतो. पिझ्झामध्ये पोषणतत्वे कमी असतात त्यामुळे पिझ्झा खाल्ल्यामुळे आपलं वजन वाढते.
- पिझ्झा Homemade Pizza Recipe In Marathi हेल्दी आहे का ?
पिझ्झा हे जंक फूड आहे त्यामुळे तो हेल्दी नाही. पिझ्झा खाल्ल्यावर वजन वाढते, रक्तात साखरेची पातळी वाढते, हृदयरोगाचा धोका वाढतो, ब्लडप्रेशर वाढू शकते त्यामुळे पिझ्झा हा कमी प्रमाणात खायला पाहिजे.
आपला अगदी बाहेरच्यासारखा टेस्टी पिझ्झा Homemade Pizza Recipe In Marathi तयार आहे. इतका छान पिझ्झा जर घरीच बनवता येत असेल तर बाहेरून आणायची काय गरज आहे. तुमच्या घरातील सर्वांना हा पिझ्झा नक्कीच आवडेल. मुलांनासुद्धा तुम्ही पुन्हा पुन्हा हा पिझ्झा नक्की बनवून देऊ शकता.
तुम्हालासुद्धा पिझ्झाची Homemade Pizza Recipe In Marathi ही रेसिपी आवडली का नक्कीच सांगा. अशाच नवनवीन रेसिपी शिकून घेण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.