Khaman Dhokla Recipe In Marathi | खमण ढोकळा मराठी रेसिपी 2024

Khaman Dhokla Recipe In Marathi

Khaman Dhokla Recipe In Marathi

Khaman Dhokla Recipe In Marathi रोज आपल्या घरात नाश्त्यासाठी पोहे उपमा असे नेहमीचेच पदार्थ बनत असतात पण तेच तेच खाऊन बोर होतं. मग आपण साऊथ इंडियन, चायनीज पदार्थ बनवतो त्यामुळे आपल्याला नवीन काहीतरी टेस्ट करायला मिळतं.

असाच एक चमचमीत नाश्त्याचा पदार्थ म्हणजे खमण ढोकळा. आपल्याकडे सगळे याला ढोकळाच म्हणतात. खमण ढोकळा हा खाण्यासाठी खूपच स्वादिष्ट आणि पचण्यासाठीही खूप हलका असतो. टेस्टी असल्यामुळे सर्वांनाच खमण ढोकळा खूप आवडतो.

खमण ढोकळा Khaman Dhokla Recipe In Marathi ही एक गुजराती डिश आहे. बेसनपासून ही डिश बनवली जाते. एकदम जाळीदार असा हा ढोकळा असतो. अनेकांना ही डिश खूपच आवडते. स्वीट होममध्ये सगळे खमण ढोकळा खूपच आवडीने खातात.

यासोबतच अनेकजण घरीसुद्धा हा खमण ढोकळा बनवत असतात. पण अनेकदा आपल्याला हा ढोकळा जमत नाही. तो हलका जाळीदार बनत नाही आणि त्यात पाणी राहतं. मग हा ढोकळा खाण्यातही मजा येत नाही.

पण आज आम्ही तुमच्यासाठी खमण ढोकळाची अगदी परफेक्ट रेसिपी Khaman Dhokla Recipe In Marathi घेऊन आलो आहोत. ज्यामुळे आपला ढोकळा अगदी बाहेरच्या सारखा हलका, जाळीदार आणि टेस्टी बनेल. असा स्पंजी ढोकळा मग तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल. पाहुणे घरी आल्यानंतर किंवा मग तुमच्या घरी एखाद्या पार्टीमधेही तुम्ही हा ढोकळा पाहुण्यांना सर्व्ह करू शकता.

खमण ढोकळा बनवण्यासाठी लागणारं साहित्य :

खमण ढोकळाची रेसिपी Khaman Dhokla Recipe In Marathi बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते पाहूया.

खमण ढोकळा बनवण्याचं साहित्य :

  • 2 कप बेसन
  • थोडंसं पाणी
  • 3 चमचे साखर
  • 1 चमचा लिंबू सत्व
  • 1 चमचा मीठ
  • पाव चमचा हळद
  • अर्धा इंच आल्याचा तुकडा
  • 3 चमचे तेल
  • 1 चमचा बेकिंग सोडा
  • थोडीशी कोथिंबीर

तडका बनवण्यासाठी लागणारं साहित्य :

  • 2 चमचे तेल
  • 2 चमचे मोहरी
  • 4-5 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • थोडासा कढीपत्ता
  • 1 कप पाणी
  • 4 चमचे साखर
  • चिमूटभर मीठ
  • चिमूटभर लिंबू सत्व

Khaman Dhokla Recipe In Marathi Procedure खमण ढोकळा बनवण्याची कृती :

  1. सगळ्यात आधी आपल्याला एका चाळणीमध्ये 2 कप बेसन घ्यायचं आहे. ते एका रवीच्या साहाय्याने भांड्यात चाळून घेऊया. हे बेसन आपण बाजूला ठेवूया.
  2. त्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया. त्यात 3 चमचे साखर घ्यायचीय. एका रवीने हलवून ही साखर आपल्याला पाण्यात विरघळून घ्यायचीय.
  3. मग त्यात 1 चमचा लिंबू सत टाकून रवीने छान मिक्स करून घ्यायचंय. आता आपलं हे पाणी बेसनपीठात टाकून द्यायचंय.
  4. यात एक चमचा मीठ आणि पाव चमचा हळद टाकायची आणि मग थोडं थोडं पाणी टाकून रवीच्या साहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं.
  5. आपल्याला हलवून याचं बटाटा वडे सारखं पातळ बॅटर तयार करून घ्यायचंय. रवीच्या साहाय्याने हे आपल्याला ढवळत राहायचंय.
  6. या मिश्रणात आपल्याला अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून घालायचाय आणि 3 चमचे तेल टाकायचंय. पुन्हा रवीच्या साहाय्याने हे मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आणि साधारण 10 मिनिटे हे मिश्रण ढवळत राहायचं.
  7. या बॅटरमध्ये सुरुवातीपासून आपल्याला थोडं थोडं करून जवळपास सव्वा कप पाणी घालून हे बॅटर तयार करायचंय.
  8. यामध्ये आता आपल्याला 1 चमचा बेकिंग सोडा टाकायचाय आणि पुन्हा रवीच्या साहाय्याने 5-6 मिनिटे ढवळत राहायचंय.
  9. त्यानंतर आपलं हे बॅटर छान फुललेलं दिसेल. आता आपल्याला एक टिन घ्यायचंय आणि त्याला आतून तेल लावून घ्यायचंय. हे टिन उंच असायला हवं म्हणजे आपला ढोकळा छान फुगेल.
  10. हे बॅटर आपल्याला टिनमध्ये टाकून द्यायचंय. मग एक कढई गॅसवर ठेवायचीय. त्यात थोडंसं पाणी टाकायचंय आणि एक स्टॅण्ड ठेवायचं.
  11. कढईमधील हे पाणी उकळलं की टिन आपल्याला कढईमध्ये स्टँडवर ठेवून द्यायचंय आणि त्यावर झाकण ठेवून द्यायचं. हा ढोकळा आपल्याला 25-30 मिनिटे कमी गॅसवर वाफवून घ्यायचाय.
  12. 25 मिनिटांनंतर आपला ढोकळा छान फुललेला आहे. आता गॅस बंद करायचाय आणि 5 मिनिटे तसाच राहू द्यायचाय.
  13. थोड्यावेळाने ढोकळा कढईमधून बाहेर काढायचा आणि अर्धा तास थंड होऊ द्यायचा.
  14. ढोकळा थंड झाला की एका चाकूच्या साहाय्याने टिनमधून कडेने मोकळा करायचा आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. आपला ढोकळा छान जाळीदार झालाय.
  15. हा ढोकळा एका चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायचा आणि त्यावर कोमट तडक्याचं पाणी टाकून द्यायचं. आपला ज्यूसी ढोकळा तयार आहे. यावर थोडीशी कोथिंबीर टाकून गारनिशिंग करायचं.
  16. एका प्लेटमध्ये हा ढोकळा घ्यायचा आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून सर्व्ह करायचा.

तडका बनवण्याची कृती :

  1. तडका तयार करण्यासाठी गॅसवर एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं. त्यात 2 चमचे मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की त्यात आपल्याला 4-5 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या.
  2. त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकायचा. फोडणी चांगली तडतडली की त्यात 1 कप पाणी टाकायचं. 4 चमचे साखर, थोडंसं मीठ टाकायचं आणि चिमूटभर लिंबू सत्व टाकायचं.
  3. साखर विरघळेपर्यंत आणि पाण्याला उकळी येईपर्यंत हे शिजवून घ्यायचं. पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचा आणि हे थंड होऊ द्यायचं.

आपला हा खमण ढोकळा Khaman Dhokla Recipe In Marathi तुम्ही तळलेल्या हिरव्या मिरच्या आणि पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. चटणीसोबत ढोकळा खूपच टेस्टी लागतो.

Gulab Jamun Recipe In Marathi | खव्याचे गुलाबजामुन रेसिपी 24

वेगवेगळ्या प्रकारचे ढोकळे

आपण बेसनपासून बनलेला खमण ढोकळा Khaman Dhokla Recipe In Marathi तयार केला पण याव्यतिरिक्त अनेक प्रकारचे ढोकळेसुद्धा बनवता येतात.

  1. चना डाळ ढोकळा
  2. तांदळाच्या पिठाचा ढोकळा
  3. रवा ढोकळा
  4. स्टीम ढोकळा
  5. रवा बेसन ढोकळा
  6. रवा पोहा ढोकळा
  7. मिक्स डाळीचा ढोकळा

असे वेगवेगळ्या प्रकारचे ढोकळेसुद्धा आपण नक्की ट्राय करू शकतो.

आपण ढोकळा बनवताना नेहमी त्याचे चौकोनी तुकडे करतो पण आपण ढोकळ्याला वेगळ्या आकारात देखील कापू शकतो आणि त्याला वेगळे नावंही दिले आहेत.

  1. इडली ढोकळा –

आपण जर ढोकळा इडलीच्या आकारात केला तर त्याला इडली ढोकळा म्हणतात. ही रेसिपीसुद्धा खूपच छान बनते. आपल्या ढोकळ्याला इडलीचा आकार देण्यासाठी तुम्ही इडलीचं पात्र वापरू शकता.

  1. ढोकळा वाटी –

ढोकळा हा वाटीच्या आकारातही बनवता येतो त्यामुळे या रेसिपीला ढोकळा वाटी असं म्हणतात. वाटीचा वापर करून ढोकळ्याला हा आकार आपण देऊ शकतो. हा ढोकळासुद्धा सर्वांना खूप आवडतो.

तुम्ही आपल्या नेहमीच्या खमण ढोकळ्यासोबतच या नवीन रेसिपीसुद्धा नक्कीच ट्राय करू शकता. तुम्हाला खूपच आवडतील.

Khaman Dhokla Recipe In Marathi Important Tips महत्वाच्या टिप्स :
  1. ढोकळा वाफवून घेण्यासाठी जे भांडं घेतो त्याची उंची 2 इंच तरी असायला हवी म्हणजे आपला ढोकळा छान फुगतो.
  2. ढोकळा फुगल्यानंतर तो थंड झाल्यावरच भांड्यामधून काढायचा म्हणजे तो व्यवस्थित निघतो.
  3. फोडणी गार झाल्यावरच ती ढोकळ्यावर टाकायची म्हणजे ते छान मुरतं.
FAQ About Khaman Dhokla Recipe In Marathi काही महत्त्वाचे प्रश्न :
  1. Khaman Dhokla Recipe In Marathi कशापासून बनवला जातो ?

ढोकळा हा बेसनपासून बनवला जातो. त्यात साखर, लिंबू सत्व, हळद, बेकिंग सोडा, मीठ टाकून बनवतात आणि त्यावर तेलात हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, साखर, लिंबू सत्व टाकून फोडणी टाकतात.

  1. खमण ढोकळा कुठला प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे ?

खमण ढोकळा हा गुजरातमधील खूपच लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. ही खूपच स्पंजी आणि टेस्टी डिश आहे. सध्या देश विदेशात सगळेच ढोकळा खूप आवडीने खातात.

  1. Khaman Dhokla Recipe In Marathi स्पंजी कसा बनवतात ?

खमण ढोकळा हा स्पंजी झाला तरच तो खाण्याची मजा आहे. जाळीदार ढोकळा बनवणं खूपच सोपं असतं. आपण ढोकळा बनवताना त्यात बेकिंग सोडा किंवा लिंबाचा रस किंवा इनो टाकलं तर आपला ढोकळा खूप स्पंजी बनू शकतो. पण बेकिंग सोडा हा फ्रेश असलेलाच वापरायचा जुना नाही.

  1. ढोकळा किती काळ टिकू शकतो ?

ढोकळ्याचं शेल्फ लाईफ कमी असतं. ढोकळा शिजवल्यानंतर काही तासातच तुम्ही तो खाऊ शकता. पण जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायचे असतील तर तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवू शकता.

  1. ढोकळा जंक फूड आहे का ?

ढोकळा हे खूपच आरोग्यादायी जेवण आहे. यामध्ये अनेक पोषक तत्वे आहेत. अगदी योग्य प्रमाणात आपण ढोकळा खाल्ला तर वजन कमी करण्यासाठीही खूप फायदा होऊ शकतो. टेस्टी असण्यासोबतच ढोकळ्याचे अनेक फायदेही आहेत.

  1. Khaman Dhokla Recipe In Marathi आरोग्यासाठी चांगला आहे का ?

खमण ढोकळा हा आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगला आहे. ढोकळा हा वाफवून बनवतात त्यामुळे त्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेटस असे पोषक तत्वे असतात. यामध्ये फायबर असतात त्यामुळे आपलं पचन सुधारतं आणि आतड्याचं आरोग्य सुधारतं. आपल्या शरीराला ताकद मिळते.

अशाप्रकारे आपली ही अतिशय सोपी आणि स्वादिष्ट खमण ढोकळा रेसिपी Khaman Dhokla Recipe In Marathi तयार आहे. मार्केटमध्ये मिळणाऱ्या ढोकळ्यापेक्षाही उत्तम आपला हा ढोकळा तयार आहे. असा टेस्टी ढोकळा जर आपल्या घरी बनत असेल तर मग बाहेरून आणायची काय गरज आहे.

इतका चांगला खमण ढोकळा घरी बनवल्यानंतर घरचे सगळे तुमचं खूप कौतुक करतील आणि हा ढोकळा पुन्हा पुन्हा बनवण्यासाठी नक्कीच आग्रह करतील यात शंका नाही.

तुम्हालासुद्धा ही रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.

तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.

Scroll to Top