Bakarwadi Recipe In Marathi
Bakarwadi Recipe In Marathi संध्याकाळी लागणाऱ्या छोट्याशा भुकेसाठी आपल्याला सर्वांनाच काहीतरी चटपटीत स्नॅक खाण्याची सवय असते. अनेक वेगवेगळे स्नॅक्स आपण रोज खात असतो. पण आपण अनेकदा बाहेरचे पदार्थ खात असतो त्यामुळे आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे घरच्याघरी बनवलेला एखादा पदार्थ खाल्ला तर उत्तमच आहे.
बाकरवडी हेसुद्धा आपल्या महाराष्ट्रातील खूपच लोकप्रिय स्नॅक्स आहे. ही बाकरवडी चहासोबत खाल्ली जाते. अतिशय कुरकुरीत आणि मसालेदार बाकरवडी सर्वांचीच फेव्हरेट आहे. बाकरवडी आंबट आणि अतिशय तिखट चवीची असते.
पुण्यातील चितळे बंधूंची बाकरवडी तर अतिशय प्रसिद्ध आहे. या बाकरवडीची चव खूपच छान असते आणि अनेकजण या बाकरवडीचे फॅन आहेत.
आज आपण हीच बाकरवडी आपल्या घरी बनवणार आहोत. ही Bakarwadi Recipe In Marathi रेसिपी घरी खूपच स्वादिष्ट बनते आणि बनवायलाही खूप सोपी आहे.
बाकरवडी बनवण्याचं साहित्य :
Bakarwadi Recipe In Marathi बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.
बाकरवडी मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य :
- 1 चमचा जीरा
- 2 चमचे तीळ
- 3-4 चमचे किसलेलं सुकं खोबरं
- 3-4 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
- 1 चमचा जीरा पूड
- 2 चमचे धने पूड
- 2-3 चमचे लाल तिखट मिरची पावडर
- 3-4 चमचे शेव
- 1 चमचा साखर
- चवीप्रमाणे मीठ
- गरजेनुसार पाणी
- तळण्यासाठी तेल
बाकरवडीची पारी बनवण्याचं साहित्य :
- 1 कप मैदा
- 2 चमचे बेसन
- 2-3 चमचे शेंगदाणे तेल
- चवीनुसार मीठ
- गरजेनुसार पाणी
चिंच आणि गुळाची चटणी बनवण्याचं साहित्य :
- 25 ग्रॅम चिंच
- 25 ग्रॅम गूळ
- चवीनुसार मीठ
- चवीनुसार तिखट
- जिरेपूड
बाकरवडी बनवण्याची कृती :
बाकरवडीचा मसाला बनवण्याची कृती :
- बाकरवडीचा मसाला बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक पॅन गॅसवर गरम करून घ्यायचा. त्यानंतर मंद आचेवर गॅस करून या पॅनमध्ये 1 चमचा जिरे, 2 चमचे पांढरे तीळ, 3-4 चमचे किसलेलं सुखं खोबरं, 3-4 चमचे बारीक चिरलेली कोरडी कोथिंबीर टाकून 2-3 मिनिटे परतून घ्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचा.
- यानंतर हा मसाला मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचा आणि त्यात 1 चमचा जिरे पूड, 2 चमचे धने पूड, 2 चमचे लाल तिखट पावडर, चवीनुसार मीठ, 3-4 चमचे शेव घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा.
- त्यानंतर या मसाल्यात 1 चमचा साखर घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. आता आपला बाकरवडीचा मसाला तयार आहे.
आपल्याला हा बाकरवडीचा मसाला झणझणीत तिखट करून घ्यायचाय कारण तळल्यानंतर या मसाल्याचा तिखटपणा कमी होतो. सोबतच बाकरवडीला मैद्याचं आवरण असतं त्यामुळे तिखटपणा कमी होतो.
चिंच गुळाची चटणी बनवण्याची कृती :
- आपण 25 ग्रॅम चिंच बिया काढून एक तास गरम पाण्यात भिजत घालायची आणि एक तासानंतर मिक्सरमध्ये फिरवून पेस्ट तयार करून घ्यायची.
- नंतर या पेस्टमध्ये थोडंसं पाणी टाकून गाळून घ्यायची आणि ही पेस्ट गॅसवर ठेवून त्यात 25 ग्रॅम गूळ, चवीनुसार मीठ, तिखट आणि जिरेपूड टाकून थोडी घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायची.
आपली चिंच गुळाची चटणी तयार आहे.
Shrikhand Puri Marathi Recipe | श्रीखंड पुरी रेसिपी
बाकरवडीची पारी बनवण्याची कृती :
आता आपण बाकरवडीची पारी बनवून घेणार आहोत.
- सर्वात आधी आपण एका भांड्यात 1 कप मैदा, 2 मोठे चमचे बेसन, चवीप्रमाणे मीठ, 2-3 चमचे गरम शेंगदाणे तेल घ्यायचं.
- हे सर्व मिश्रण थंड झाल्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं. तेल आपल्या मैद्याला आणि बेसनाला छान लागलं पाहिजे त्यामुळे आपल्या बाकरवडीची पारी छान खुसखुशीत होईल.
- हे पीठ कोरडंच मिक्स करून घ्यायचं आणि पीठ मुठीत घेऊन दाबून पाहायचं. त्याची मूठ पडली म्हणजे तेल छान पिठाला लागलं गेलंय.
- यानंतर पिठात थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आणि त्याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा. हे पीठ जर सैल झालं तर यात थोडा मैदा टाकून घट्ट बनवू शकता.
- गोळा झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवायचा. 15 मिनिटांनी हा गोळा पुन्हा एकदा मळून घ्यायचा. त्याचे दोन भाग करायचे.
- त्यातला एक गोळा घेऊन पातळ पारी लाटायची आहे. जाड ठेवायची नाही नाहीतर आतला भाग नीट शिजणार नाही.
- गोल पोळीसारखं लाटून झाल्यावर त्याला कापून चौकोनी आकार द्यायचाय. मग या चौकोनी पारीवर चिंच गुळाची चटणी लावायचीय. त्यावर आपण तयार केलेला मसाला भरपूर टाकून पसरून घ्यायचाय.
- त्यावर शेव पसरून टाकायची आणि मग एकदा छान लाटण्याने लाटून घ्यायचं. मग ही पारी छान रोल करून घ्यायची. पारीच्या कडेवर छान पाणी लावून घ्यायचं म्हणजे ते चांगलं चिकटेल आणि आपली बाकरवडी फुटणार नाही.
- त्यानंतर 2-3 मिनिटे ही पारी हातानेच गोल लाटून घ्यायची म्हणजे चांगली पातळ होईल. मग त्याच्या कडा कट करून घ्यायच्या आणि चाकूने आपल्याला हव्या त्या आकाराच्या बाकरवड्या कापून घ्यायच्या.
- त्यानंतर कापलेल्या बाकरवडी सरळ करून बोटाने हलक्या हाताने दाबून घ्यायच्या म्हणजे मसाला चांगला सेट होईल आणि तळताना तो सांडणार नाही.
- बाकरवडी तळण्यासाठी गॅसवर एका पॅनमध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग मंद आचेवर ठेवून सगळ्या बाकरवडी पॅनमध्ये टाकून 9 ते 10 मिनिटे मंद आचेवर खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या.
- शेवटचा 1 मिनिट जास्त आचेवर या बाकरवडी तळून घ्यायच्या म्हणजे चांगल्या क्रिस्पी होतील. आपल्या या बाकरवडी 2-3 दिवसानंतर नरम पडतात पण तुम्हाला जर 7-8 दिवस खुसखुशीत ठेवायच्या असतील तर आणखी 2-3 मिनिटे तळून काढा म्हणजे त्या आणखी जास्त क्रिस्पी होतील.
- यानंतर बाकरवडी तेलातून काढून एका टिशू पेपरवर ठेवू आणि थंड झाल्यावर एका हवाबंद डब्यात ठेवा. आपली खुसखुशीत बाकरवडी तयार आहे.
आता तुम्ही आपण बनवलेली खुसखुशीत बाकरवडी Bakarwadi Recipe In Marathi एका प्लेटमध्ये सर्व्ह करू शकता.
बाकरवडी हा आपल्या सर्वांचा लाडका खाद्यपदार्थ आहे पण हा आपला महाराष्ट्रीयन पदार्थ नसून तो मूळचा गुजरातमधील फरसाणचा महत्वाचा भाग आहे. खूप पूर्वीपासून बाकरवडी हा पदार्थ गुजरातमध्ये खाल्ला जातो.
बाकरवडीपासून दुसरे अनेक पदार्थदेखील बनवता येतात. आजकाल बाकरवडीची चाट खूपच लोकप्रिय आहे.
बाकरवडी चाट रेसिपी :
- बाकरवडीची चाट बनवण्यासाठी एका भांड्यात बाकरवडी, चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली काकडी, चिरलेला बटाटा, थोडीशी मिरची पावडर, चवीप्रमाणे चाट मसाला टाकायचा.
- या सर्व वस्तू एकत्र करायच्या आणि त्यावर लिंबाचा रस, थोडंसं मध आणि मुरमुरे टाकायचे. त्यानंतर एक कप शेव आणि चिरलेली कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्यायचं.
- त्यावर चवीनुसार मीठ टाकून मिक्स करायचं आणि एका भांड्यात सर्व्ह करायचं. वरून शेव आणि कोथिंबीर घालून गारनिशिंग करायचं. आपली बाकरवडी चाट तयार आहे.
Bakarwadi Recipe In Marathi Important Tips महत्वाच्या टिप्स :
- बाकरवडीची पारी तयार करण्यासाठी घट्ट पीठ मळायचं. जर पीठ सैल झालं तर त्यात कोरडा मैदा टाकून घट्ट बनवू शकता.
- बाकरवडीत टाकायचा मसाला झणझणीत तिखट बनवायचा आहे कारण बाकरवडी तळल्यानंतर त्याचा तिखटपणा कमी होतो आणि हा मसाला मैद्याच्या आवरणात असतो त्यामुळेही तिखटपणा आणखी कमी होतो.
- बाकरवडीची पारी पातळ लाटायची ती जाड लाटायची नाही म्हणजे आतला भाग नीट शिजतो.
- पारीमध्ये मसाला टाकल्यानंतर त्याचा रोल केला की त्याच्या कडेला पाणी लावून चिकटून घ्यायचं म्हणजे आपली बाकरवडी फुटणार नाही.
FAQ About Bakarwadi Recipe In Marathi काही महत्त्वाचे प्रश्न :
- Bakarwadi Recipe In Marathi कशापासून बनवली जाते ?
बाकरवडी ही बेसन आणि मैद्यापासून बनवली जाते त्यामध्ये खोबरं, तीळ, शेव आणि अनेक मसल्यांचं मिश्रण भरलं जातं. नंतर त्याचे गोल काप करून तेलात तळले जातात. अशाप्रकारे आपल्या कुरकुरीत बाकरवडी तयार आहेत.
- Bakarwadi Recipe In Marathi खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे का ?
बाकरवडी ही आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे. यामध्ये खूप सारे मसाले असतात आणि ते कमी तेलात तळले जातात किंवा मग बेक केले जातात त्यामुळे बाकरवडी खूप पौष्टिक आणि आरोग्यासाठी चांगली आहे.
- Bakarwadi Recipe In Marathi सर्वात आधी कोणी बनवली ?
बाकरवडी हा आपल्या महाराष्ट्रातील लोकप्रिय खाद्यपदार्थ असला तरी त्याचे मूळ हे गुजरातमध्ये आहे. बाकरवडी हा खूप आधीपासून गुजराती फरसाणचा भाग आहे. आपल्या महाराष्ट्रात चितळे बंधूंनी बाकरवडी सर्वात आधी बनवली. बाकरवडीची ओळख त्यांनी आपल्याला करून दिली.
- पुण्यात कोणती Bakarwadi Recipe In Marathi सर्वात लोकप्रिय आहे ?
पुण्यामध्ये चितळे बंधूंची बाकरवडी ही सर्वात जास्त लोकप्रिय आहे. चितळेंची बाकरवडी एक अनोखी चव देते जी दुसऱ्या स्नॅक्सपेक्षा खूप वेगळी आहे. भाऊसाहेब चितळे हे बाकरवडीचे निर्माते म्हणून ओळखले जातात.
- Bakarwadi Recipe In Marathi शेल्फ लाईफ किती दिवस आहे ?
बाकरवडीची शेल्फ लाईफ ही 4 महिने इतकी आहे.
आपली घरी बनवलेली खुसखुशीत बाकरवडीBakarwadi Recipe In Marathi तयार आहे. ही तुम्ही घरच्यांना स्नॅक म्हणून चहासोबत सर्व्ह करू शकता. लहान मुलांना तर बाकरवडी खायला खूपच आवडते. ही बाकरवडी सर्वांना इतकी आवडेल की 2 दिवसातच संपून जाईल आणि ते तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला लावतील यात शंका नाही.
तुम्हाला ही Bakarwadi Recipe In Marathi रेसिपी आवडली असेल तर नक्कीच सांगा. अशाच नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी आमच्या दुसऱ्या रेसिपीसुद्धा नक्कीच वाचा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.