Shrikhand Puri Marathi Recipe | श्रीखंड पुरी रेसिपी

Shrikhand Puri Marathi Recipe

Shrikhand Puri Marathi Recipe

Shrikhand Puri Marathi Recipe आपण प्रत्येक आनंदाच्या क्षणी मिठाई खाऊन तो क्षण साजरा करत असतो. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई मिळतात. या सर्व मिठाई खायला आपल्याला सर्वांनाच खूप आवडतं.

अशीच एक सर्वांची आवडती मिठाई आहे ती म्हणजे श्रीखंड. श्रीखंड ही खूपच टेस्टी मिठाई आहे. सणावाराला किंवा मग पाहुणे घरी आल्यावर श्रीखंड हमखास आपल्या जेवणात असतं.

गुढीपाडव्याला आपण श्रीखंडाचा नैवेद्य दाखवतो. या श्रीखंडाला हजारो वर्षांपासूनचा इतिहास आहे. श्रीखंडाचा महाभारताशी देखील खूप महत्वाचा संबंध आहे. महाभारतात जेव्हा भीम हा बल्लव नावाने स्वयंपाक बनवत होता, तेव्हा त्याने सर्वात आधी श्रीखंड हा पदार्थ बनवला.

हा पदार्थ खाऊन श्रीकृष्णाला झोप लागली होती. श्रीच्या दैनंदिन कामात खंड पडला म्हणून या पदार्थाला श्रीखंड हे नाव पडलं.

या कडक उन्हाळ्यात श्रीखंड खाणं खूप चांगलं आहे. कडक उन्हाचा सामना करता यावा, थकवा येऊ नये आणि शरीरात ताकद राहावी म्हणून श्रीखंड खाणं खूप फायद्याचं आहे.

श्रीखंड हे पुरीसोबत खूपच स्वादिष्ट लागते. आपल्या घरात तर श्रीखंड पुरीचा बेत खूप छान जमतो. आज आपण श्रीखंड पुरीची रेसिपी (Shrikhand Puri Marathi Recipe) बनवणार आहोत.

श्रीखंड पुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य

आपल्या कुटुंबातील 4-5 जणांसाठी श्रीखंड पुरी बनवायची असेल तर काय काय साहित्य लागतं ते पाहूया.

श्रीखंड बनवण्याचं साहित्य :

  • 1 लीटर दही
  • आवश्यकतेनुसार पिठीसाखर
  • 4 चमचे दूध
  • अर्धा चमचा वेलची
  • जायफळ पावडर
  • कापलेले काजू, बदाम, पिस्ता
  • 5-6 धागे केशर

पुरी बनवण्याचं साहित्य :

  • 2 कप गव्हाचं पीठ
  • 2 मोठे चमचे तेल
  • गरजेनुसार पाणी
  • तळण्यासाठी तेल
  • चवीनुसार मीठ

Procedure For Shrikhand Puri Marathi Recipe श्रीखंड पुरी बनवण्याची कृती :

श्रीखंड बनवण्याची कृती :

  1. सगळ्यात आधी आपण श्रीखंड बनवण्यासाठी चक्का तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एका भांड्यावर चाळणी ठेवून घेऊया आणि त्यावर एक सुती कापड ठेवणार आहोत.
  2. या कापडावर आपण घेतलेलं 1 लिटर दही टाकणार आहोत. हे दही जर घरी लावलेलं असेल तर खूपच चांगलं होईल.
  3. हे कापड गोळा करून मग दाबून आपण दह्यातलं सगळं पाणी काढून घेणार आहोत. शक्य तेवढे पाणी काढल्यानंतर आपल्याला हा कपडा गाठण बांधून रात्रभर नळाला अडकून ठेवायचा आहे.
  4. दुसऱ्या दिवशी सकाळी आपला हा दही ठेवलेला कपडा उघडून घ्यायचाय. आपला चक्का तयार आहे. हा एका भांड्यात काढून घ्यायचाय.
  5. त्यानंतर आपल्याला अर्धा कप साखर, एक लवंग आणि 3-4 वेलची साल काढून टाकायची आहे आणि हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे.
  6. या चक्क्यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर टाकायची आहे. त्यानंतर 2 चमचे गरम दुधात केशरचे 5-6 धागे टाकून मिक्स करून घ्यायचे आणि हे दूध गार झाल्यानंतर त्यात टाकायचं.
  7. त्यानंतर आणखी 2 चमचे थंड दूध टाकून छान फेटून घ्यायचं. हे मिश्रण जास्त पातळ होऊ द्यायचं नाही मध्यमच ठेवायचं.
  8. वरून त्यात कापलेले काजू, बदाम आणि पिस्ता घालायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचे. सर्वात शेवटी एकदम थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टेस्ट आणखीनच छान येते.
  9. पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपलं स्वादिष्ट श्रीखंड तयार आहे. हे श्रीखंड एका वाटीत काढून घ्यायचं आणि शेवटी पुन्हा एकदा काजू, बदाम आणि पिस्ताचे तुकडे घालून छान गारनिशिंग करायची.
  10. आता हे श्रीखंड खाण्याआधी 1-2 तास फ्रीजमध्ये ठेवूया म्हणजे एकदम गार श्रीखंड आपल्याला खूप छान वाटेल.

पुरी बनवण्याची कृती :

  1. पुरी बनवताना सगळ्यात आधी आपण पुरीसाठी कणिक मळून घेणार आहोत. एका भांड्यात आपण 2 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यात एक चमचा तेल आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे.
  2. हे सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर खूप वेळासाठी पुऱ्या मऊ ठेवायच्या असतील तर अजून दुसरं यात काहीच घालायचं नाही.
  3. यानंतर थोडं थोडं पाणी टाकून गोळा तयार करून घ्यायचा आणि यात एक चमचा तेल टाकून पीठ नीट मळून घ्यायचं. आपली पुरीसाठीची कणिक तयार आहे. ही कणिक अर्धा तास तशीच राहू द्यायचीय.
  4. अर्ध्या तासानंतर आपली कणिक छान मुरली आहे. आता या कणकेचे पेढ्याच्या आकाराचे छान गोळे करून घ्यायचे आणि काहीच पीठ न लावता मिडीयम आकाराच्या गोल पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत.
  5. आता एका कढईत पुऱ्या तळण्यासाठी तेल घ्यायचं. हे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यात पुरी टाकून तळून घ्यायची. झाऱ्याने पुरी वरून दाबली तर ती खूप छान टम्म फुगते.
  6. पुरी तळताना एक बाजू चांगली शिजवायची ती पलटवायची नाही. पुरीची एक बाजू चांगली शिजली की मगच दुसरी बाजू शिजवून काढायची.
  7. सर्व पुऱ्या तेलात तळून घ्यायच्या. आपल्या सर्व पुऱ्या तयार आहेत.

Masala Dosa Marathi Recipe | मसाला डोसा रेसिपी

अशाप्रकारे आपलं स्वादिष्ट श्रीखंड आणि पुरी तयार (Shrikhand Puri Marathi Recipe) आहे. आता तुम्ही एका प्लेटमध्ये पुऱ्या आणि श्रीखंड सर्व्ह करू शकता. यासोबतच तुम्ही बटाट्याची चटणीसुद्धा सर्व्ह करू शकता.

श्रीखंडाचे प्रकार

आजकाल मार्केटमध्ये खूप प्रकारचे श्रीखंडदेखील मिळतात. आपण त्याचे वेगवेगळे प्रकार पाहूया.

  1. आंबा श्रीखंड
  2. केशर श्रीखंड
  3. व्हॅनिला ड्रायफ्रूट श्रीखंड
  4. जांभूळ श्रीखंड
  5. काजू द्राक्ष श्रीखंड
  6. चॉकलेट बदाम श्रीखंड
  7. पान मसाला श्रीखंड
  8. ब्राऊनी श्रीखंड
  9. पिस्ता श्रीखंड
  10. नवरत्न श्रीखंड

यासोबतच श्रीखंडापासून वडीसुद्धा तयार करता येते.

श्रीखंडाचा चक्का दही, साखर, पिठीसाखर, दूध, केशराच्या काड्या, विलायची पावडर, जायफळ पावडर, काजू बदाम हे सर्व साहित्य वापरून श्रीखंड वडी बनवली जाते.

श्रीखंड वडी बनवण्यासाठी चक्का दहीमध्ये साखर मिसळून घेतात आणि हे मिश्रण गॅसवर ठेवून त्यात घेतलेल्या सर्व वस्तू टाकून मिक्स करून घ्यायच्या आणि मग हे मिश्रण चांगलं एकजीव झाल्यावर ते गॅसवरून काढून घ्यायचं आणि घट्ट झाल्यावर त्याच्या वड्या पाडून घेतात. श्रीखंडप्रमाणेच श्रीखंड वडीसुद्धा खूपच टेस्टी लागते.

आपण श्रीखंडाचा हा टेस्टी पदार्थदेखील नक्कीच ट्राय करायला हवा कारण खूपच छान बनतो.

Important Tips For Shrikhand Puri Marathi Recipe महत्वाच्या टिप्स :
  1. (Shrikhand Puri Marathi Recipe) श्रीखंड बनवताना दही एका कपड्यात बांधून त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं. हे दही जर जास्त आंबट असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा नाहीतर बाहेरच ठेवू शकता.
  2. पुऱ्या तळताना तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मगच त्यात पुऱ्या तळायच्या.
  3. आपण पुऱ्या तेलात तळतो तेव्हा पुरी एका बाजूने चांगली तळून झाल्यावरच दुसऱ्या बाजूने तळायची. त्याआधी पुरी पलटवायची नाही म्हणजे चांगली तयार होते.
  4. श्रीखंड हा एक मिठाईचा पदार्थ आहे. तो तुम्ही सणासुदीला, जेवणानंतर गोड पदार्थ आणि पाहुणे घरी आल्यानंतरदेखील खाऊ शकता. श्रीखंड जर तुम्ही सकाळी सकाळी खाल्लं तर दिवसभर तुमच्या शरीरात ऊर्जा राहते. श्रीखंड खाणं आपल्या तब्येतीसाठी खूपच फायदेशीर आहे.
  5. श्रीखंड (Shrikhand Puri Marathi Recipe) खाल्ल्याने वजन कमी होण्यास खूप मदत मिळते कारण ते दहीपासून बनलेलं असतं. दह्यात भरपूर कॅल्शियम असतं त्यामुळे वजनावर नियंत्रण राहतं आणि शरीर फुगत नाही. श्रीखंड पचायला जड असतं त्यामुळे पुन्हा पुन्हा भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहतं.
FAQ About Shrikhand Puri Marathi Recipe काही महत्त्वाचे प्रश्न :
  1. (Shrikhand Puri Marathi Recipe) कशापासून बनवले जाते ?

श्रीखंड ही आपल्या महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध मिठाई आहे. हे श्रीखंड दहीपासून बनवलं जातं आणि त्यात पिठीसाखर, दूध, वेलची, जायफळ, ड्रायफ्रुटस टाकले जातात. श्रीखंड हे पुरीसोबत खाल्लं जातं आणि सणावाराला प्रत्येक घरात बनवतात.

  1. श्रीखंड घट्ट कसं बनवायचं ?

श्रीखंड हे घट्ट असलं तर खाण्यात खूप छान लागते. श्रीखंड घट्ट करण्यासाठी दही व्यवस्थित गाळणे हे खूप महत्त्वाचं आहे. दह्यातलं सर्व पाणी छान काढून घेतलं की श्रीखंड घट्ट बनतं. दही एकदम छान गाळण्यासाठी ते एका स्वच्छ पातळ कपड्यात बांधून टांगून ठेवायचं म्हणजे सर्व पाणी गेल्यानंतर श्रीखंड छान घट्ट होईल.

  1. श्रीखंड (Shrikhand Puri Marathi Recipe) खाण्याचे काय फायदे आहेत ?

श्रीखंड खाण्याचे उन्हाळ्यात खूप सारे फायदे आहेत. श्रीखंड खाल्ल्याने थकवा येत नाही आणि शरीरात ताकद राहते. यामध्ये अनेक व्हिटॅमिन्स, कॅल्शियम आणि फॉस्फरस असते. श्रीखंड खाल्ल्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते, पचन सुधारते आणि वजनसुद्धा कमी होते. हाडंसुद्धा मजबूत होतात.

  1. श्रीखंड पुरी खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे का ?

श्रीखंड पुरी खाणं खूप चांगलं असतं. हे जेवण प्रत्येकासाठी खूप आरोग्यदायी आहे. डायबिटीस, लठ्ठपणा आणि हार्टचे आजार असणाऱ्यांसाठी श्रीखंड पुरी खूप चांगलं जेवण आहे.

  1. श्रीखंडमध्ये प्रोटीन असते का ?

श्रीखंडमध्ये (Shrikhand Puri Marathi Recipe) प्रोटीन असते. यामध्ये मिल्क प्रोटीन 9 टक्के असते.

आपली श्रीखंड पुरीची रेसिपी (Shrikhand Puri Marathi Recipe) तयार आहे. तुम्ही एका प्लेटमध्ये आपल्या कुटुंबियांना सर्व्ह करू शकता. घरी बनवलेली ही श्रीखंड पुरीची रेसिपी सर्वांना नक्कीच आवडेल आणि ते तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला लावतील यात काहीच शंका नाही. आजकाल बाहेर हॉटेलमध्येही श्रीखंड पुरी मिळते पण घरी बनवलेलं कधीही उत्तमच.

तुम्हालासुद्धा (Shrikhand Puri Marathi Recipe) ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच सांगा. अशाच नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्की वाचा.

तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.  

Scroll to Top